महाराष्ट्रात या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात, नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा
काल रात्री पासून महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. नागपूरसह विदर्भात चांगलचं पाऊस झाला आहे. येत्या काही दिवसात मान्सून पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र : नागपूरसह विदर्भात (Nagpur vidharbh) काल रात्रीपासून मान्सूपूर्व पावसाने (mansoon rain update) जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाने सुरुवात केल्यामुळे शेतकरीवर्ग आनंदात आहे. मान्सून लांबल्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट कोसळलं आहे. ज्या जिल्ह्यात पाऊस झाला आहे. त्या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून त्या ठिकाणी आज मान्सूनपूर्व पाऊस (today maharashtra mansoon rain update) होण्याची शक्यता हवामान खात्याने (imd) व्यक्त केली आहे. सध्याचं वातावरण मान्सून पुढे ढकलण्यास अनुकूल असल्यामुळे येत्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पाऊस सक्रीय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अमरावती जिल्ह्यात पावसाला सुरुवात
काल रात्री अमरावती जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात झाल्यापासून शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात काल चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग येण्यची शक्यता आहे.
ठाण्यात पाऊस पडण्याची शक्यता
ठाण्यात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे आज पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा असल्यामुळे नागरिक पावसाची वाट पाहत आहेत.
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात पाऊस
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात पावसाला सुरवात झाली आहे. वातावरणात बदल झाल्याने कल्याण-डोंबिवलीकरांची उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाली आहे. आज सकाळी कल्याण डोंबिवलीच्या अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली.
अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस
अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि ग्रामीण भागात पाऊस झाला आहे.
दापोलीत पावसाला सुरुवात
कोकणात 24 तासात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत आज सकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मान्सून पाऊस वेळेत आल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
भंडाऱ्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी
भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी मागच्या दोन दिवसांपासून चांगला पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून सगळीकडं ढगाळ वातावरण असून पुन्हा दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांची रखडलेली कामं पुर्ण होणार आहेत. वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची सुटका झाली आहे.