मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra corona update) सतत 40 हजारांच्या पुढे आहे. कालच्या तुलनेत आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी किंचीत घटली असली तरी आजही राज्यात 41 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 40 हजार 386 कोरोना रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आज 29 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनची आकडेवारी चांगलीच घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 8 नवे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला आहे. त्यातले 932 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.
मुंबईला मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांपूर्वी एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी वीस हजारांच्या पुढे पोहोचली होती, मात्र आता ती गेल्या काही मागील काही दिवसात सातत्याने घटताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे. 20 हजारावरून कोरोना रुग्णांचा आकडा घसरून 7 हजारांवर आला आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात 7 हजार 895 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आज 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज 21 हजार 25 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुंबई पॅटर्नची जगभर चर्चा झाली होती, येत्या काही दिवसातही मुंबईकरांनी नियमांचे पालन केल्यास लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही मुंबई पॅटर्न प्रभावी ठरल्याचे दिसून येईल.
#CoronavirusUpdates
16th January, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 7895
Discharged Pts. (24 hrs) – 21025Total Recovered Pts. – 9,20,387
Overall Recovery Rate – 92%
Total Active Pts. – 60371
Doubling Rate – 48 Days
Growth Rate (9 Jan – 15 Jan)- 1.40%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 16, 2022
इतर जिल्ह्यातली रुग्णवाढ कायम
मुंबईतली रुग्णसंख्या जरी झपाट्याने घटत असली तरी इतर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. विषेशत पुण्यातल्या रुग्णसंख्येना आता चिंता वाढवली आहे. राज्यात ऑक्सिजनची गरज 700 मेट्रीक टनच्या पुढे गेल्यास मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.