Tomato Price : टोमॅटोला सोन्याचा भाव! CCTV सह लावला कडक पहारा
Tomato Price : टोमॅटोला सध्या सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोची सुरक्षा वाढवली आहे. सीसीटीव्ही सह शेतात खडा पहारा देण्यात येत आहे. टोमॅटो सध्या सर्वाधिक कमाई करुन देणारी पीक ठरलं आहे.
नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : टोमॅटोला सध्या सोन्याचा भाव (Tomato Price) आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोची सुरक्षा वाढवली आहे. सीसीटीव्ही सह शेतात खडा पहारा देण्यात येत आहे. शेतकरीच नाहीत तर व्यापारी पण टोमॅटोच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत. देशभरात टोमॅटोचा भाव गगनाला भिडला आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटना पण वाढल्या आहेत. देशात सध्या टोमॅटो पेट्रोलपेक्षा पण महाग विक्री होत आहे. सध्या देशातील काही भागात टोमॅटो 100 से 200 रुपये किलो तर काही भाजी मंडईत 250-300 रुपये किलो विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी टोमॅटो कडेकोट सुरक्षेत ठेवले आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचा (CCTV) आधार घेण्यात येत आहे. तर काही ठिकाणी टोमॅटोला सुरक्षित ठेवण्यात येत आहे.
शेतात बसवले तीन सीसीटीव्ही
नाशिक जिल्ह्यातील कोकणगाव येथील शेतकरी अब्दुल गणी सैय्यद यांनी त्यांच्या शेतात तीन सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आहेत. शेतातील टोमॅटोचे पीक सुरक्षीत राहण्यासाठी त्यांनी हा उपाय केला आहे. चोरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी करण्यात येत आहे. टोमॅटोच्या किंमती भडकल्याने चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत.
25 हजार केले खर्च
नाशिक जिल्ह्यातील निफाडमधील तालुक्यातील शेतकरी अब्दुल गणी सैय्यद यांनी शेतात सीसीटीव्ही बसवले. त्यांनी तीन एकर शेतात टोमॅटो लावले. त्यासाठी त्यांना 6 लाख रुपये खर्च आला. याठिकाणी 20 किलोच्या एक क्रेटचा भाव 2300 ते 5000 रुपये आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीच्या घटना वाढल्या आहेत. नुकसान टाळण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी त्यांनी सीसीटीव्ही बसवले. त्यासाठी 25 हजार रुपये खर्च केले.
टोमॅटो चोरीच्या घटना
गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलमध्ये टोमॅटो चोरीची घटना घडली. अरुण धोमे या शेतकऱ्याच्या घरातील टोमॅटो चोरीला गेले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या घरातून 20 हजार रुपयांचे 400 किलो टोमॅटो चोरीला गेले. पुण्यातील एका व्यापाऱ्याने त्याच्या दुकानाला दोन कुलूप लावली आहेत.
किंमती भडकल्या
दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किंमती 25-30 रुपये किलो होत्या. आता या किंमती 150 ते 250 रुपये प्रति किलो आहे. तर काही ठिकाणी हा भाव 220-300 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. व्यापारी, दलाल हे जास्त नफा कमावत आहे. तर शेतकऱ्यांना पण यंदा चांगला भाव मिळाला आहे. पावसाने ओढ दिल्यास दक्षिण राज्यात सुद्धा टोमॅटोच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे शेतकरी मालामाल
टोमॅटोच्या महागाईने किंमती वाढल्या आहेत. तर काही ठिकणी शेतकऱ्यांना या वाढीव किंमतींचा फायदा होत आहे. शेतकरी लखपतीच नाही तर करोडपती झाले आहेत. पुण्यातील एका शेतकऱ्याला टोमॅटो विक्रीतून 2.8 कोटी रुपयांची कमाई करता आली. या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणात टोमॅटो आहेत. त्यातून त्याला कमाईचा आकडा 3.5 कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.
करोडपती तालुका
जून्नरमध्ये अनेक कुटुंब करोडपती झाले आहेत. तालुक्यातील 10 ते 12 शेतकरी टोमॅटोमुळे मालदार झाले आहेत. या तालुक्यातील काही शेतकरी लखपती झाले आहेत. बाजार समितीने एका महिन्यात 80 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.