‘पाहिजे त्या राज्याचं राज्यपालपद देतो’, शास्त्रज्ञाला इतक्या कोटीला गंडवलं, नागपूरच्या पॉश हॉटेलमध्ये मोठा गेम; महाराष्ट्र हादरला

राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यपालपद देण्यासाठी आरोपीने तब्बल पंधरा कोटी रुपये मागितल्याचेही समोर आले आहे.

'पाहिजे त्या राज्याचं राज्यपालपद देतो', शास्त्रज्ञाला इतक्या कोटीला गंडवलं, नागपूरच्या पॉश हॉटेलमध्ये मोठा गेम; महाराष्ट्र हादरला
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 3:00 PM

नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे.  राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यपालपद देण्यासाठी आरोपीने तब्बल पंधरा कोटी रुपये मागितल्याचेही समोर आले आहे. शास्त्रज्ञाला गंडा घालणाऱ्या या नाशिकच्या महाठगाचे बिंग फुटल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेने नागपुरात बेड्या ठोकल्या आहेत. या महाठगाचे  बिंग फुटल्यानं नाशिकसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  माझी राजकीय व्यक्तींची ओळख असून कुठल्याही राज्याचं राज्यपाल पद मिळवून देऊ शकतो, असे सांगून तामिळनाडू राज्यातील चेन्नईत असलेल्या  थिरुवन्मीयूरमध्ये राहणारे 56 वर्षीय शास्त्रज्ञ नरसिम्मा रेड्डी दामोदर रेड्डी अपुरी यांची आणि त्यांचे सहकारी असलेल्या अन्य एकाची फसवणूक करण्यात आली आहे. रेड्डी यांनी ७ फेब्रुवारी ते २ एप्रिल २०२४ या कालावधीत संशयित निरंजन कुलकर्णी याला ५ कोटी ८ लाख ९९ हजार  रुपये दिले, त्यापैकी साठ लाख रुपये रोख रक्कम असून, उर्वरित पैसे स्वत:सह नातलगांच्या बँक खात्यातून रेड्डींनी कुलकर्णी आणि ते सचिव असलेल्या संस्थेच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर काहीतरी गडबड असल्याचं रेड्डी यांच्या लक्षात आले, त्यांनी कुलकर्णी यांच्याकडे पैशांची मागणी केली मात्र पैसे परत देण्यास त्यांनी नकार  दिला व तसेच फोनवरून आरोपीने  रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिली, त्यावेळी रेड्डी यांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर त्यांनी  नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.  त्यानुसार नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक शहरातील गंधर्व नगरी परिसरात राहणाऱ्या  ४० वर्षीय संशयित निरंजन सुरेश कुलकर्णी याला नागपूर मधून अटक केली आहे.

निरंजन कुलकर्णी याला हायप्रोफाईल लाइफस्टाइल जगण्याची हौस होती, तो आपल्या गाडीवर खासदारकीचा लोगो लावूनही फिरत असे. अनेक मोठ्या नेत्यांच्यासोबत संबंध असल्याचे भासविण्यासाठी त्याने मॉर्फ फोटो केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो नागपूरसह दिल्लीत वावरत असल्याचं समोर आलं आहे. रेड्डी यांचे एक नातेवाईक माजी खासदार आहेत, त्यांना राज्यपाल करण्यासाठी ही रक्कम कुलकर्णी याने घेतल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. संशयित कुलकर्णीसोबत या संपूर्ण प्रकरणात असलेल्या आणखी काही साथीदारांच्या मागावर नाशिक पोलिसांची काही पथके आहेत.

संशयित आरोपी निरंजन कुलकर्णी याला नागपुरातील एका हॉटेलमधून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि ताब्यात घेतले, त्यांनतर त्याला न्यायालयात हजर केले असता १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....