राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2334, मुंबई-पुण्यासह कोठे किती रुग्ण?
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 2334 पर्यंत पोहचली आहे. आज (13 एप्रिल) राज्यात एकूण 352 नवीन रुग्णांचं निदान झालं (Total Corona Patient in Maharashtra).
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 2334 पर्यंत पोहचली आहे. आज (13 एप्रिल) राज्यात एकूण 352 नवीन रुग्णांचं निदान झालं (Total Corona Patient in Maharashtra). दिवसभरात 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 160 वर पोहचला आहे. आत्तापर्यंत राज्यात उपचारानंतर एकूण 229 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.
आज झालेल्या एकूण 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर येथील प्रत्येकी 1 रुग्ण आहेत. या मृतांपैकी 4 पुरुष तर 7 महिला आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 11 रुग्णांपैकी 6 जणांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक होतं. 5 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 8 रुग्णांमध्ये (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या
आजपर्यंत महाराष्ट्रात 43 हजार 199 चाचणी घेण्यात आल्या. त्यापैकी 39,089 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, तर 2334 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण 4223 सर्वेक्षण पथकं काम करत आहेत. त्यांनी आतपर्यंत 15.93 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.आजपर्यंत राज्यातील 229 कोविड 19 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यावर घरी सोडण्यात आलं आहे.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात या व्यक्तींपैकी 50 जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6, मुंबईत 14 तर पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील प्रत्येकी 2 जण आहेत. यात रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीममधील प्रत्येकी एक जणाचाही समावेश आहे. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर 1 जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.
रविवारी (12 एप्रिल) सोलापूरात पहिला कोरोना बाधित मृत्यू झाल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहे. या रुग्णाच्या निवासी परिसरात 35,000 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यासाठी 62 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. या बाधित रुग्णाच्या अतिजोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत 79 निकटवर्तीयांना विलग करण्यात आलं आहे.
कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
केंद्र सरकारकडून मिळणारे धान्य महाग, त्यात सवलत मिळावी : छगन भुजबळ
आधी जितेंद्र आव्हाड, आता त्यांच्यासोबतचे 13 जण होम क्वारंटाईन
पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष
MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?
ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल
Total Corona Patient in Maharashtra