Maharashtra Corona Update | दिवसभरात 120 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 90,787 वर
राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 90 हजार 787 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 42 हजार 638 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात आज (9 जून) 2 हजार 259 नवीन (Total COVID-19 Patient In Maharashtra) कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 90 हजार 787 वर पोहोचला आहे. यापैकी एकूण 42 हजार 638 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 44 हजार 849 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Total COVID-19 Patient In Maharashtra) यांनी दिली.
राज्यात आज दिवसभरात 120 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 3 हजार 289 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 661 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 5 लाख 77 हजार 819 नमुन्यांपैकी 90 हजार 787 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 5 लाख 68 हजार 073 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 75 हजार 930 खाटा उपलब्ध आहेत. यात सध्या 26 हजार 470 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज कुठे किती मृत्यू?
- मुंबई – 58
- ठाणे – 13
- वसई-विरार – 2
- मीरा भाईंदर – 6
- पनवेल – 3
- नवी मुंबई – 1
- नाशिक – 3
- पुणे – 16
- सोलापूर – 2
- रत्नागिरी – 1
- औरंगाबाद – 10
- अकोला – 2
- अमरावती – 1
- नागपूर – 1
Total COVID-19 Patient In Maharashtra
मुंबईत कोरोनाचे 1,015 नवे रुग्ण
मुंबईत आज कोरोनाचे 1,015 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर आज दिवसभरात 58 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 51 हजार 100 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 1,760 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 हजार 943 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रातील शहरांचा कोरोना रिपोर्ट
पुणे : पुण्यात दिवसभरात 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 143 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर 119 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : अकोल्यात दिवसभरात 43 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 864 वर पोहोचली.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात आज दिवसभरात 59 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे, तर 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 969 वर पोहोचली आहे.
लातूर : लातूर जिल्ह्यात आज 8 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण बाधितांची संख्या 157 वर पोहोचली आहे.
जळगाव : जिल्ह्यात आणखी 116 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या 1281 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 129 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात आज कोरोनाचे 145 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रग्ण संख्या 4 हजार 343 वर पोहोचली आहे. दिवसभरात 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
भिवंडी : भिवंडी शहरात दिवसभरातो 42, तर ग्रामीणमध्ये 11 अशा 53 रुग्णांची वाढ झाली आहे. तालुक्यातली एकूण रुग्ण संख्या 509 वर पोहोचली आहे (Total COVID-19 Patient In Maharashtra).
कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह
भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना ‘कोरोना’, मातोश्री माधवी राजे शिंदे यांनाही लागण
आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयाचे नाव बदलले, मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे 5 निर्णय