एकलहरे वीज केंद्रात भीषण अपघात! संवेदनशील भागात कार कुणी नेली? तीन दिवस उलटले प्रशासन अंधारातच…

नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एकलहरे येथे वीज निर्मिती केंद्र आहे. याच वीज निर्मिती केंद्रातील प्रतिबंधित विभागाच्या रेल्वे इंजिनने कारला धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

एकलहरे वीज केंद्रात भीषण अपघात! संवेदनशील भागात कार कुणी नेली? तीन दिवस उलटले प्रशासन अंधारातच...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 1:11 PM

नाशिक : नाशिक शहरालगत असलेल्या एकलहरे वीज निर्मिती केंद्रात रेल्वे ट्रॅकवर भीषण ( Railway Accident ) अपघात झाला आहे. यामध्ये कुठलीही जीवित हांनी झाली नसली तरी ही संपूर्ण घटना गंभीर ( Nashik News ) आहे. संवेदनशील भागात कार कुणी नेली असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. मात्र, हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार चार भिंतीच्या आतमध्येच कसा राहील याची काळजी घेतल्याचे समोर आले आहे. तीन दिवस उलटून गेले तरी वरिष्ठ पातळीवर याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे पोलीस ठाण्यात सुद्धा या अपघाताची अद्यापपर्यन्त नोंद झालेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होऊ लागली आहे.

नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर एकलहरे येथे वीज निर्मिती केंद्र आहे. याच वीज निर्मिती केंद्रातील प्रतिबंधित विभागाच्या रेल्वे इंजिनने कारला धडक दिल्याची घटना समोर आली आहे.

यातील विशेष बाब म्हणजे या संपूर्ण प्रतिबंधित विभागात कुठेलही वाहनास परवानगी नाही. याच ठिकाणी अनेक अधिकारी मनमानी करत कार घेऊन जातात. कामाच्या ठिकाणाच हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रतिबंधित क्षेत्र असलेल्या ठिकाणाच्या अनेक अधिकारी आपले वाहने लावतात. वीज निर्मितीचा मोठा परिसर असल्याने अनेक जण वाहने थेट कार्यस्थळावर घेऊन जातात. अशाच प्रकारे एका अधिकाऱ्याने ट्रॅकच्या जवळच कार लावलेली होती.

कार काढून निघत असतांनाच अचानक इंजिन आले. त्यामध्ये रेल्वे इंजिनने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला मात्र अंतर कमी असल्याने रेल्वे इंजिनची कारला धडक बसली, त्यात काही अंतरावर इंजिनने कार फरफटत नेली.

या घटनेमुले वीज निर्मिती केंद्रातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार समोर आला आहे. ही घटना घडल्यानंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्थानिक प्रशासनाने तीन दिवस उलटले तरी महानिर्मिती व्यवस्थापनाला याबाबत माहिती न दिल्याची बाब समोर येत आहे. या प्रकरणी तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप कुठलीही नोंद पोलीस ठाण्यात झालेली नाही.

कोळसा हाताळणी विभागात हा प्रकार घडला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ही खाजगी कार होती. सुदैवाने या अपघातात वरिष्ठ अधिकारी थोडक्यात बचावले आहे. ट्रॅकवरुन प्रवास करत असतांना ही बाब घडल्याने खळबळ उडाली आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात कार घेऊन गेल्याने अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार या निमित्ताने चर्चेत आला आहे. कंपनीतील अनेक कर्मचारी अशाच स्वरूपाचा मनमानी कारभार करत आहे. त्यामुळे याची दखल महानिर्मिती प्रशासन घेऊन काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

याशिवाय स्थानिक प्रशासनाने याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नसतांना अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. त्यामुळे एकलहरे येथील हा अपघात कोणत्या वळणावर जातो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.