जनाब Raut, वाय सुरक्षेबाबत लिहिता, तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच; गोपीचंद पडळकारांचं खुलं आव्हान

अभिनेत्री कंगना राणावतसह नारायण राणे (narayan rane) आणि किरीट सोमय्यांपर्यंत (kirit somaiya) अनेकांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरून शिवसेनेचं (shivsena) मुखपत्रं असलेल्या दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून घणाघाती टीका केली आहे.

जनाब Raut, वाय सुरक्षेबाबत लिहिता, तुम्ही सुरक्षेशिवाय राज्यात फिरून दाखवाच; गोपीचंद पडळकारांचं खुलं आव्हान
गोपीचंद पडळकरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 11:50 AM

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतसह नारायण राणे (narayan rane) आणि किरीट सोमय्यांपर्यंत (kirit somaiya) अनेकांना केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यावरून शिवसेनेचं (shivsena) मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून घणाघाती टीका केली आहे. केंद्र सरकार काही लोकांना वाय सुरक्षा देऊन देशात भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हे एक राजकीय तसेच राष्ट्रीय धोरणच दिसते. वाय सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्राला विशेष सुरक्षा दलाची निर्मिती करावी लागेल असेच दिसते, अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या या टीकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे. जनाब संजय राऊत हे वाय सुरक्षेवर लिहित आहेत. त्यांनी हिंमत असेल तर महाराष्ट्रात फिरून दाखवावं, असं आव्हानच गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. जनाब राऊत अजूनही ऊर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतर सुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहा. जनाब राऊत तुम्ही वाय सुरक्षेबाबत लेख लिहता पण माझे तुम्हाला खुले आव्हान आहे. माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा. म्हणजे शेतकऱ्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगचा फज्जा

जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रेदश व गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला आहे. कदाचित ज्यापद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य बाबत दिसतेय, असा खोचक टोला पडळकरांनी लगावला आहे.

तेव्हा मोदींनी तिरंगा फडकवला

जनाब राऊत तुमच्या माहिती करिता सांगतो, जेव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी ‘कोई माई का लाल तिरंगा लहराके दिखाये’ अशा धमक्या देणारी पोस्टर्स लावली होती. त्यावेळेस नरेंद्र मोदीजींनी धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: EDच्या पथकाची कुर्ला येथे छापेमारी, नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढणार?

Gayathri Accident: मैत्रिणींसोबतची होळी ठरली शेवटची; प्रसिद्ध अभिनेत्रीचा अवघ्या 26 वर्षी अपघातात मृत्यू

Maharashtra News Live Update : आयकर विभागाची देशभर छापेमारी, हिरानंदानी ग्रुपवर छापे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.