पुणे : राज्यातील मुख्य शहरांमध्ये आता (Metro Station) मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्याअनुशंगाने कामही सुरु आहे. पुणे तिथे काय ऊणे याप्रमाणे शहातील विविध भागात मेट्रोचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. (Amrit Mahotsav) आझादी का अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने शहरातील दोन मेट्रो स्टेशनवरील रन यशस्वी झाला आहे. शिवाय प्रशासनाने ठरवून घेतलेल्या वेळेत हा रन झाला असल्याने आता गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी स्टेशन येथून आता (Pune Metro) मेट्रो सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अल्पावधीतच या स्टेशनहून मेट्रो धावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली.
गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली आहे तर दुसरीकडे पुणे मेट्रोने प्रवाशी संख्येचाही यशस्वी टप्पा ओलांडला आहे. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 पर्यंत 70 हजारपेक्षा जास्त प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केल्याचे समोर आले होते. असा प्रवाशांचा प्रतिसाद राहिला मेट्रोचा खऱ्या अर्थाने उद्देश साध्य होणार आहे. आझादी का अमृत महोस्तव आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने, पुणे मेट्रोने रिच 1 वरील फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन आणि रिच 2 वरील गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो अशी पहिली चाचणी पूर्ण करून आणखी एक मैलाचा दगड गाठला.
पुणे मेट्रोने गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन ते डेक्कन मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशन ते दापोडी मेट्रो स्टेशन अशी पहिली ट्रायल रन घेतली. या चाचणीला मोठे यश मिळाले आणि त्यामुळे येत्या काही महिन्यांत गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक येथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या कार्यरत असलेल्या गरवारे कॉलेज मेट्रो स्थानकापासून डेक्कन मेट्रो स्थानकापर्यंत आणि परतीच्या प्रवासाला सकाळी 10.30 वाजता सुरुवात झाली होती.
गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशन आणि फुगेवाडी मेट्रो स्टेशनमधून घेण्यात आलेल्या मेट्रोचा ताशी वेग हा 15 किमी होता. हा केवळ ट्रायल असल्याने कमी वेग होता. काही दिवसांमध्येच सर्व चाचण्या यशस्वी झाल्यावर या दोन्ही स्टेशनवरुन मेट्रो धावणार आहे. ट्रायल बेसवर धावलेल्या मेट्रोचा वेगही नियोजनाप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे.