तुकाराम मुंढे यांचा आरोग्य अधिकाऱ्यांना धसका…कधी नव्हे ते नाशिक जिल्हा रुग्णालयात घडलं
तीन दिवस दौऱ्यावर असलेले तुकाराम मुंडे अचानक येण्याची भीती संपूर्ण आरोग्य यंत्रणेला असल्याने सगळीकडे टापटीपपणा बघायला मिळत असून वैद्यकीय अधिकारी रात्री उशिरापर्यंत कामावर राहत आहे.
नाशिक : कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे नाशिक दौऱ्यावर आहेत. प्रशासकीय कामकाजात प्रचंड दरारा असलेले तुकाराम मुंढे यांच्या दौऱ्याने जिल्हा रुग्णालायत एकच धावपळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येत आहे. रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना मुंढे भेट देणार आहे. आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच गलथान कारभारामुळे चर्चेत असतं मात्र, मुंढे यांचा दौरा होणार असल्याने कधी नव्हे ते चित्र बघायला मिळाले. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांपासून ते शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यन्त प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र होते, प्रत्येक कर्मचारी ड्रेसकोडमध्ये होते, अगदी टापटीपपणा जिल्हा रुग्णालयात बघायला मिळाला आहे. त्यामुळे शासकीय जिल्हा रुग्णालय हे खाजगी रुग्णालयात तर नाही ना ? असा संभ्रम काही काळ रुग्णांच्या मनात आला असावा असं चित्र बघायला मिळाले आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील सर्वच कर्मचारी गळ्यात ओळखपत्र दिसले, नेहमीच अस्वच्छतेकडे दुर्लक्ष कर्मचारी स्वच्छता करत होते. पहिल्यांदाच छतापासून जमीणीपर्यंत धुण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयातील वार्डच्या खिडक्याच्या सज्जावर रुग्णांनी फेकलेले कपडे, अन्न, बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या स्वच्छ करण्यात आल्या. वार्डाच्या भिंतीचीही प्रथमच साफसफाई करण्यात आली.
रुग्णालयातील भिंतीवर लावलेले पोस्टर काढून टाकण्यात आले आहे. रुग्णांचे बेडसीट देखील स्वच्छ टाकण्यात आले आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्यात आली.
पंख्यांना लागलेले जाळे, अडगळीत पडलेले साहित्य काढून टाकण्यात आले आहे. संपूर्णं रुग्णालयात जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे.
तीन दिवस दौऱ्यावर असलेले तुकाराम मुंडे अचानक येण्याची भीती संपूर्ण आरोग्य यंत्रणेला असल्याने सगळीकडे टापटीपपणा बघायला मिळत असून वैद्यकीय अधिकारी रात्री उशिरापर्यंत कामावर राहत आहे.
प्रशासकीय कामकाजात प्रचंड दरारा असलेले तुकाराम मुंढे यांच्या नियोजित दौऱ्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच धावपळ उडाली असून आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.