तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला

आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूरमध्ये देखील धडक कारवाई सुरु केली.

तुकाराम मुंढेंची डॅशिंग कारवाई, गँगस्टर आंबेकरचा अनधिकृत बंगला पाडला
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 5:53 PM

नागपूर : आपल्या शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी नागपूरमध्ये देखील धडक कारवाई सुरु केली (Tukaram Mundhe action against illegal bungalow). मुंढे यांच्या आदेशानुसार नागपूर महानगरपालिकेच्या पथकाने कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकरचा अनधिकृत बंगला जमीनदोस्त केला आहे. यानंतर नागपूरमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरु आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासूनच त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी सर्वात आधी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचं महत्त्व सांगत कारवाईचा इशारा दिला. यानंतर त्यांनी आता शहरातील अनधिकृत कामाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

गॅंगस्टर संतोष आंबेकरचा नागपूरमधील इतवारी अनाधिकृत बंगला होता. याबाबत नागपूर महानगरपालिकेने आंबेकरला कायदेशीर नोटीसही बजावली. मात्र, त्याने स्वतःहून अतिक्रमण हटवले नाही. यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित बंगला जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे मनपाच्या पथकाने आज धडक कारवाई करत हा बंगला पाडला.

नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने थेट गॅंगस्टर संतोष आंबेकरचा अनधिकृत बंगला आज पाडण्यात आल्याने याची जोरदार चर्चा सुरु आहे. नागपूरचे महापौर संदिप जोशी आणि महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  गॅंगस्टर संतोष आंबेकर आतापर्यंत याच बंगल्यातून आपली गॅंग चालवत होता. हा बंगला अनधिकृत असल्यानं मनपाने नोटीसंही बजावली होती, शेवटी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं आज हा बंगला पाडण्यात आला. यावेळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tukaram Mundhe action against illegal bungalow

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.