भल्याभल्यांना धडकी भरवणारे तुकाराम मुंढे पहिल्यांदाच इमोशनल
मुंबई : कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बारा वर्षांच्या सेवेत अकरा बदल्या झाल्या. प्रत्येक बदलीनंतर तुकाराम मुंढे यांच्या कारकीर्दीविषयी अनेक चर्चा होतात. लोकप्रतिनिधींना ते प्रत्येक ठिकाणी नकोसे होतात. कायद्यावर बोट ठेवून काम करणं ही त्यांची एकमेव चूक असते. पण कधी कुणी विचार केलाय का, की दरवर्षी होणाऱ्या या बदल्यांमुळे तुकाराम मुंढेंच्या कुटुंबावर काय परिणाम होत […]
मुंबई : कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बारा वर्षांच्या सेवेत अकरा बदल्या झाल्या. प्रत्येक बदलीनंतर तुकाराम मुंढे यांच्या कारकीर्दीविषयी अनेक चर्चा होतात. लोकप्रतिनिधींना ते प्रत्येक ठिकाणी नकोसे होतात. कायद्यावर बोट ठेवून काम करणं ही त्यांची एकमेव चूक असते. पण कधी कुणी विचार केलाय का, की दरवर्षी होणाऱ्या या बदल्यांमुळे तुकाराम मुंढेंच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल? कुटुंबाची फरफट रोखण्यासाठी कामाच्या शैलीत बदल करणं हा तुकाराम मुंढे यांचा स्वभाव नाही. पण यामुळे काय भोगावं लागतं, हे एका व्हिडीओतून समोर आलंय
‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अभिनेता मकरंद अनासपुरेंनी तुकाराम मुंढेंना त्यांच्या जीवना विषयी काही खडतर प्रश्न विचारले, त्यावर उत्तर देताना ते भावूक झाले. ‘अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ चा संपूर्ण एपिसोड गुरुवार आणि शुक्रवारी रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर दाखवला जाणार आहे.
भल्याभल्यांना धडकी भरवणारे तुकाराम मुंढे कलर्स मराठीच्या अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमात बोलताना भावूक झाले. दरवर्षी बदली होते. पण या बदल्यांमुळे पाचवीत असलेल्या मुलाला शाळेत अजून नीट मित्रही होऊ शकलेले नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
अर्चना, पत्नी नोकरी करत नाही म्हणून ठिक आहे. पण नोकरी करत असेल तर काय करायचं? मुलगा चौथीत किंवा पाचवीत असेल, त्याचे अजून मित्रच होऊ शकलेले नाहीत. तुमच्यामुळे आम्ही सफर का व्हायचं असा प्रश्न ते विचारतात तेव्हा त्याचं उत्तर माझ्याकडे नसतं. याची भरपाई आपण कशाच्या आधारे त्यांना देणार? मला समाधान मिळतं, पण कुटुंबाचं समाधान कोण भरुन देणार? याची भरपाई कधीच होऊ शकत नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
दरम्यान, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना त्यांनी कानमंत्रीही दिला. शिवाय खाजगी क्लासचं जे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणारं पेव फुटलं आहे, त्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. क्लासमध्ये मार्गदर्शन भेटतं का? 99 क्लासमध्ये भेटत नाही असं माझं मत आहे. स्पर्धा परीक्षेत कोणतंही उत्तर चूक किंवा बरोबर नसतं. ते एक्सलंट असावं लागतं आणि त्यादृष्टीने अभ्यास असावा. तुमचा उद्देश परीक्षा पास होण्याचा पाहिजे. क्लास पाहण्यापेक्षा परीक्षेचं स्वरुप पाहा, यश निश्चित आहे, असा मंत्र तुकाराम मुंढे यांनी दिला.
पाहा व्हिडीओ :