Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 5th April 2025 : सरकारचे धोरण शेतकऱ्यांना मारक, सदाभाऊ खोत यांची टीका

| Updated on: Apr 06, 2025 | 9:41 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 5 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 5th April 2025 : सरकारचे धोरण शेतकऱ्यांना मारक, सदाभाऊ खोत यांची टीका
live breaking

मराठी भाषेसाठी मुंबईत आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. मराठी बोलता न येणाऱ्या लोकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची खास शिकवणी. बॅनर लावत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातील केस प्रकरणी आमदार अमित गोरखे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असून आ.गोरखे हे भिसे कुटुंबीयांना सोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेत निवेदन देणार आहेत. ह्या भेटीदरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून झालेला हलगर्जीपणा समोर आणणार आहेत. बार्शी शहरातील प्रमुख भागात अवकाळी पावसाने तुफान बॅटिंग केली. गेल्या दोन दिवसांपासून बार्शी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पवासामुळे उकड्याने हैराण झालेल्या बार्शीकरांना दिलासा मिळाला आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेशातील, क्राडी, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Apr 2025 09:07 PM (IST)

    रामनवमीनिमित्त गजानन महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

    रामनवमीनिमित्त गजानन महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

    शेकडो दिंड्या संतनगरी शेगावात दाखल

    भाविकांची गर्दी वाढली

    दर्शनासाठी मंदिर 24 तास खुल राहणार

  • 05 Apr 2025 07:12 PM (IST)

    शेगांवचं गजानन महाराजांचं मंदिर आज आणि उद्या रात्रभर राहणार दर्शनासाठी खुले

    शेगांवचं गजानन महाराजांचं मंदिर आज आणि उद्या रात्रभर राहणार दर्शनासाठी खुले

    रामनवमीनिमित्त मंदिर प्रशासनाचा निर्णय

    रामनवमीनिमित्त मंदिरात गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग

    उद्या शेगाव मंदिरात रामनवमी उत्सव होणार साजरा

  • 05 Apr 2025 06:27 PM (IST)

    नांदेड अपघात प्रकरण; ट्रॅक्टर चालकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी

    नांदेडमध्ये भीषण अपघात झाला होता, ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळून आठ महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणातील ट्रॅक्टर चालकाला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं या ट्रॅक्टर चालकाला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  नागेश आवटे असं या ट्रॅक्टर चालकाचं नाव आहे.

  • 05 Apr 2025 04:54 PM (IST)

    मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात दाखल

    पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित सखी गीतरामायण, राम सीता स्वयंवर कार्यक्रम सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

  • 05 Apr 2025 04:42 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका

    महायुतीचा सरकार बनवण्यात काहीच अर्थ नाही. त्यांच्याकडे मोठा पाठिंबा असतानाही ते एक चांगला निर्णय घेऊ शकत नाही, अशी टीका शिवसेना उबाठा नेता आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

  • 05 Apr 2025 04:36 PM (IST)

    बच्चू कडू शिक्षक मतदार संघात लढणार

    अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील विधानसभा निवडणूक बच्चू कडू लढणार आहे. त्यासाठी त्यांनी चाचपणी सुरू केली आहे. पाच जिल्ह्याचा हा मतदार संघ आहे. लोकांच्या मागणीमुळे ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  • 05 Apr 2025 04:09 PM (IST)

    शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे लागतील

    सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचे मरण ठरलेले आहे. आता खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

  • 05 Apr 2025 12:54 PM (IST)

    धाराशिवमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा मृत्यू

    धाराशिवमधील परंडा येथील रागे शिंदे महाविद्यालयात धक्कादायक घटना घडली आहे. निरोप समारंभाचे भाषण करताना एका विद्यार्थीनीला चक्कर आली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. या विद्यार्थीनीचे नाव वर्षा खरात असे आहे. ती बी एस सी थर्ड ईयरला होती. ती सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नाडी गावची रहिवाशी होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

  • 05 Apr 2025 12:29 PM (IST)

    शेतकरी कर्जमाफीवरून माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त वक्तव्य

    कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते शेतकरी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांनाच सुनावताना दिसत आहेत. सरकार शेतीत भांडवलासाठी पैसा देते, साखरपुडा, लग्न करण्यासाठी नाही, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. कोकाटेंच्या याच विधानावरून रोहित पवारांनी टीका केली आहे.

  • 05 Apr 2025 12:11 PM (IST)

    ‘आम्ही तुम्हाला प्रेमाने मराठी भाषा शिकवू’, शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्याचा टोला

    मुंबईत मनसे मराठी भाषेबाबत आक्रमक भूमिका घेत आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे मनसेला घाबरू नका असे निर्देश देत आहेत. आम्ही मराठी भाषा शिकवणार आहे.. असे बॅनर लावून लोकांना जागृत केले आहे.

  • 05 Apr 2025 11:53 AM (IST)

    Maharashtra Breaking : उल्हासनगरात पान टपरी चालकांची ग्राहकाला बेदम मारहाण

    कैचीने हल्ल्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचाही प्रयत्न… इतर ग्राहकांनी अडवल्याने अनर्थ टळला… चुकीची सिगरेट दिल्याने झाला वाद

  • 05 Apr 2025 11:41 AM (IST)

    Maharashtra Breaking : गोंदिया बल्लारशा रेल्वे लाईनच्या दुसऱ्या मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…..

    240 किलोमीटरच्या रेल्वे मार्ग प्रस्तावित असून खर्चाला केंद्राची मंजुरी… दुसऱ्या मार्गासाठी 4819 कोटींची खर्चाची मंजुरी… गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांना मिळणार चालना… विदर्भातील उद्योग आणि पर्यटनाला मिळणारा चालना…

  • 05 Apr 2025 11:23 AM (IST)

    Maharashtra Breaking : नांदेडच्या आलेगाव शिवारात विहिरीत पडून सात महिला मजुरांचा मृत्यू

    नांदेड काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी वसमत तालुक्यातील गुंज येथे येऊन पीडित कुटुंबियांचे केले सांत्वन… पीडित कुटुंबियांनी रवींद्र चव्हाण यांना सांगितला घटनाक्रम… व्यथा मांडतांना नातेवाईकाच्या डोळ्यातील अश्रुवानावर… गुंज वस्तीवर सुविधा देण्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू… खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिला नातेवाईकाला धीर…

  • 05 Apr 2025 11:10 AM (IST)

    Maharashtra Breaking : कल्याणमध्ये भाजपची बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन

    सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या स्वागतासाठी भाजपकडून बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन… आज सायंकाळी शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था’च्या वतीने कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृहात याज्ञवल्क्य पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आशिष शेलार हे उपस्थित राहणार असून त्यांच्या उपस्थिती आदी कल्याण मध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे…

  • 05 Apr 2025 09:57 AM (IST)

    भाजपने सदस्य नोंदणीत रचला नवा इतिहास

    भाजपने सदस्य नोंदणीत रचला नवा इतिहास.  महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य नोंदणी करणारा भाजप पहिला पक्ष ठरला आहे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवा रेकॉर्ड.

  • 05 Apr 2025 09:29 AM (IST)

    बीड – आष्टीत शाळेच्या बसला अपघात, 12 विद्यार्थी जखमी

    बीड – आष्टीत शाळेच्या बसला अपघात झाल्याने 12 विद्यार्थी जखमी. बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात स्कूल बस आणि कार यांच्यात अपघात होऊन स्कूलबस झाडावर धडकली. अपघातातील जखमी विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 05 Apr 2025 09:20 AM (IST)

    अनेक जण अस्वस्थ, एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, 6 जण वेटिंगवर आहेत – उदय सामंत

    अनेक जण अस्वस्थ, एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, 6 जण वेटिंगवर आहेत. बालिश उल्लेख केल्याने कोणी बालिश होत नाही – उदय सामंत

  • 05 Apr 2025 09:12 AM (IST)

    उदय सामंत-राज ठाकरे यांची दुसरी बैठक, काय झाली चर्चा ?

    एकनाथ शिंदेंची परवानगी घेऊन राज ठाकरेंची भेट घेतली.  मराठी भाषा सर्वांनीच शिकली पाहिजे. मराठीबाबत कोणी उलट-सुलट केलं तर काय करायचं ते बैठकीत ठरवू – उदय सामंत

  • 05 Apr 2025 09:02 AM (IST)

    स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यात हजर राहणार ?

    स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याची शक्यता आहे, खार पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास मुंबई पोलिसांकडून चौथ समन्स पाठवण्यात येणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी तीनवेळा समन्स बजावून चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल कामरा हा चौकशीला हजर राहिला नाहीये. खार पोलीस ठाण्यात कामराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 05 Apr 2025 09:00 AM (IST)

    मराठी भाषेसाठी मुंबईत आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. मराठी बोलता न येणाऱ्या लोकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची खास शिकवणी.  तुम्हाला मराठी येत नसेल आणि तुम्हाला ती शिकायची असेल तर आम्ही तुम्हाला शिकवू. ठाकरे गट शिवसेनेचे बॅनर लावून मनसेला चोख प्रत्युत्तर.

Published On - Apr 05,2025 8:59 AM

Follow us
जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख
जमीन दान करणाऱ्यांकडूनही मंगेशकर रुग्णालयाने घेतले उपचाराचे 3 लाख.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका; सुनील शुक्ला कधीकाळी मनसेत होते?.
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ
मनसे नेते संदीप देशपांडेंना आज्ञाताची शिवीगाळ.
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.