Maharashtra Breaking News LIVE 27th March 2025 : उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, सरकारवर निशाणा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 27 मार्च 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES
-
धारावी सिलेंडर स्फोटानंतर मनसे आक्रमक, दिला दोन दिवसांचा अल्टिमेटम
धारावीत सिलेंडरने भरलेल्या वाहनामध्ये स्फोट झाला होता, त्यानंतर आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. मनसेकडून दोन दिवसांचा अल्टिमेटम देत चारकोप कांदिवली मध्ये रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या सिलिंडरने भरलेल्या वाहनांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
-
त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र वर्ग ‘ अ ‘ दर्जा जाहीर
त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र वर्ग ‘ अ ‘ दर्जा जाहीर
नगर विकास खात्याने दिली मंजुरी
आगामी सिंहस्थ कुंभमेळा, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थस्थान, निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळ अशा महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळे यामुळे अ दर्जा
विभागीय आयुक्तांकडून जानेवारी महिन्यात पाठवण्यात आला होता प्रस्ताव
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष दर्जाचा होणार फायदा
-
-
मनसेकडून अधिकाऱ्यांना विचारला जाब
मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांची मुंबईतील सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयात पोहचले. मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळण्यास होत असलेल्या विलंब प्रकरणात त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
-
पर्यटकांसाठी सिंधुदुर्गात सुविधा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये आणि सिंधुदुर्ग नगरीच्या सौंदर्यामध्ये भर टाकणार भारतीय हवाई दलातील निवृत्त लढाऊ ‘हंटर’ अडगळीत पडले होते परंतु आता प्रशासने दखल घेत रंगरंगोटी करून त्याला पुनर्जीवित करण्याचे काम सुरु केले आहे.
-
अजित पवार यांची उद्धव ठाकरेंवर टीका
अधिवेशनाच्या चार आठवड्यामध्ये आम्ही दररोज नऊ तास काम केले. यामुळे अनेक लक्षवेधी व प्रश्न मार्गी लागले. विरोधकांकडे कोणताच मुद्दा आता राहिलेला नाही, त्यामुळे ते वेगळे काही तरी मुद्दे काढत आहेत, असे अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर सांगितले.
-
-
औरंगजेबाची कबर तोडण्याच काम केंद्र सरकारने सुरू करावं, राहुल शेवाळेंची मोठी मागणी
शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी, “छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर तोडण्याच काम केंद्र सरकारने सुरू करावं. केंद्र सरकारच्या वतीने तोडकामाच्या प्रक्रियेचा प्रारंभ करावा. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीमधून बाहेर काढण्यात यावी ” अशी मागणी केली आहे.
-
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी 6 लाख 50 हजार किंमतीचे दागिने अर्पण
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस दानशुर भाविकांकडून सोन्याचा चार पदरी हार पदकासह अर्पण करण्यात आला आहे. ठाणे येथील विठ्ठल भक्त राकेश परशुराम दलाल व रुपेश परशुराम दलाल यांनी वडीलांच्या स्मरणार्थ सोन्याचा चार पदरी हार पंढरपुर येथील विठ्ठल मंदिरात अर्पण केला आहे. हा हार 73.950 ग्रॅम वजनाचा आहे. याची किंमत 6 लाख रुपये आहे.
-
-
कुणाल कामराविरोधात राहुल कनालकडून पोलिसांत तक्रार; केले गंभीर आरोप
कुणाल कामराविरोधात राहुल कनालने खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दहशतवादी संघटना कुणाल कामराच्या यूट्युब चॅनलला पैसे देतात. असे अनेक गंभीर आरोप कनालने केले आहेत .तसेच राहूल कनाल याने पोलिसांकडे कुणाल कामराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
-
अपयश लपवणारं अधिवेशन होतं; उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनाबद्दल मत व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेगट यांच्यावरही टीका केली आहे. त्यावर ते बोलताना म्हणाले की, शिंदे फडणवीसांना छळतात की काय? असा सवाल नागपूर राड्यावरून उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच “मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय नाही. कारण शिवसेना एकच आहे ती म्हणजे आमची शिवसेना दुसरी गद्दारसेना आहे. हे अधिवेशन म्हणजे अपयश लपवणारं अधिवेशन होतं” असं मत व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली आहे.
-
हिंदुच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार?; उद्धव ठाकरे यांचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन ३२ लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहे. मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढला. हिंदुच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? आता आहे का हिंदुत्ववादी पक्ष’ असा सवाल केला आहे.
-
मुंबईतील रस्ते घोटाळा झालाय – उद्धव ठाकरे
बीडच्या सरंपचाची हत्या झाली. पुण्यात बलात्कार झाला. रोज भ्रष्टाचाराची प्रकरण समोर येत आहे. मुंबईतील रस्ते घोटाळा. कर्जमाफी करणारे होते त्याबद्दल कुठे वाच्यता नाही. लाडक्या बहिणींमध्ये वर्गवारी केली जातेय. आता बहिणीची कागदपत्र तपासणार. नको ती योजना असं म्हणण्याची वेळ येतेय. सोलापूरकरबद्दल वाच्यता नाही, मस्तीमध्ये फिरतोय अशी टीका उद्धव ठाकरे म्हणाले.
-
हताशा, निराशावादी अर्थसंकल्प होता – उद्धव ठाकरे
अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं. हताशा, निराशावादी अर्थसंकल्प होता. ही अस्वस्थता, अपयश लपवणारं हे अधिवेशन होतं. विशेषत: जेव्हा हे सरकार स्थापन झालं, तेव्हा 100 दिवसात आम्ही काय करणार हा संकल्प त्यांनी केला होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या तशाच सुरु आहेत. हमीभाव मिळत नाहीत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
-
महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नापेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर देण्याचे काम सुरू – भूषणसिंह राजे होळकर
“मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नापेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यामुळे समाज एकमेकाविरोधात उभा राहत आहे. मागे औरंगजेबाच्या समाधीचा विषय झाला. आता ताजा परिस्थितीत रायगड येथील वाघ्या कुत्र्याचा विषय. रायगड येथे असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा विषय हा कोणत्या एका जातीचा किंवा समाजाचा नाही” असं भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.
-
सत्य कधीच झाकत नाही – मनोज जरांगे पाटील
“सत्य कधीच झाकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी नियतीला मान्य नसतं. त्या रुपांनी कोणासाठी केलं तर ते धनंजय मुंडे यांच्यासाठी. धनंजय मुंडे यांची ही संघटित गुन्हेगारी आहे. कुठे खंडण्या वसूल करायचा, हा धनंजय मुंडे यांना पैसा दिला जायचा, एक नंबरचा आरोपी. टोळी तयार करून अशी कृती करत होता” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.
-
पोलीस निरीक्षकासह दोघांच्या बडतर्फीची शिफारस
राज्यभरात गाजलेल्या कल्याणीनगर येथील हाय प्रोफाइल पोर्शे अपघात प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी २४ मे रोजी त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा कोणीही वापर करू शकतो
बाळासाहेब ठाकरे हे आता राष्ट्रपुरुष आहेत. म्हणून त्यांचा फोटो कोणीही वापरू शकतो, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. म्हणूनच तर एकनाथ शिंदे यांचं फावल ना, असे राऊत म्हणाले. त्यावर आता काही आक्षेप नसणार असे मनसेने त्यांचा बॅनरवर फोटो वापरल्यावर राऊतांनी सांगितले.
-
इस्मालपूरमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती आली धावून
सांगलीच्या इस्लामपूर मध्ये एका भागामध्ये महिलेच्या दारात जादूटोणा आणि करणीचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. दारात बकर्यांचे मुंडके आणि चार पाय अडकवले होते. हा जादूटोणा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळेत हस्तक्षेप करून कुटुंबियाचे आणि नागरिकांचे प्रबोधन केले. तर पोलिसांच्या उपस्थितीत सर्व साहित्य बाजूला करून त्यांच्यात तयार झालेली भीती दूर करण्यात आली. या घटनेची तक्रार घरातील महिलांनी पोलिसांच्याकडे केली आहे.
-
देर है पर अंधेरे नाही
संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह दोन आरोपींनी केली. याप्रकरणी देर है पर अंधेरे नाही अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला हवी अशी मागणी त्यांनी केली. मदत करणाऱ्या पोलिसांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली.
-
अंबादास दानवे कैलास नागरे यांच्या कुटुंबियांच्या भेटीला
उद्धव सेनेचे नेते आंबादास दानवे यांनी शिवणी आरमाल येथील आत्महत्या शेतकरी कुटुंबाला भेट दिली. यावेळी त्यांनी कुटुंबियांकडून सर्व माहिती जाणून घेतली. कैलास नागरे यांनी 14 गावाला पाणी द्या या मागणी साठी आत्महत्या केली होती.
-
प्रशांत कोरटकरला दुसरीकडे हलवले
कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला गुप्तपणे भल्या पहाटे हलवले. त्याच्यावर इतर पोलीस ठाण्यात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
आरोपींना फाशी द्या
सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी चार महिन्यानंतर संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणात आता धनंजय देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
-
शिवसेना या चार अक्षरांमुळे आमची ओळख- संजय राऊत
“शिवसेना या चार अक्षरांमुळे आमची ओळख आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेली लोकं आहोत. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी सर्वकाही दिलं. एकनाथ शिंदे यांच्या जीवनात कृतज्ञता हा शब्द असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्यासाठी हवा,” असं संजय राऊत म्हणाले.
-
मातोश्रीच्या अंगणामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडून गुढीपाडव्यानिमित्त मोठी बॅनरबाजी
मुंबईत मातोश्रीच्या अंगणामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेकडून गुढीपाडव्यानिमित्त मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ असं लिहिलंय.
-
एकनाथ शिंदेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे- संजय राऊत
“एकनाथ शिंदेंनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे. ठाकरेंबद्दल जी भाषा वापारता, त्याबद्दल आत्मपरिक्षण करा. उद्धव ठाकरेंनीच शिंदेंना ऊर्जा दिली होती. शिंदेंना ऊर्जा देऊ नका असं सांगणारे ठाण्यातीलच होते,” असं संजय राऊत म्हणाले.
-
विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आज देणार कैलास नागरे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट
बुलढाणा- विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आज कैलास नागरे यांच्या कुटुंबाला सांत्वनपर भेट देणार आहेत. थोड्याच वेळात दानवे शिवणी आरमाळ येथील नागरे यांच्या घरी भेट देणार आहेत. शिवणी आरमाळ येथील कैलास नागरे यांनी खडकपुर्णा प्रकल्पाचे पाणी मिळावे म्हणून आत्महत्या केली होती. प्रकल्पाचे पाणी गावाला सिंचनासाठी मिळावे म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती. कैलास नागरे यांचा पाण्यासाठी अनेक दिवसांपासून लढा सुरू होता.
-
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची कबुली
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेचा कबुली जबाब समोर आला आहे. देशमुखांच्या अपहरणानंतर हत्या केल्याची कबुली घुलेनं दिली आहे. घुलेसह जयराम चाटे, महेश केदारने हत्या केल्याची कबुली दिली आहे.
-
संतोष देशमुखांची हत्या केल्याची सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली
संतोष देशमुखांची हत्या केल्याची सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली. मीच अपहरण करून हत्या केली अशी कबुली त्याने पोलिस कोठडीत दिली, अशी माहिती समोर आली आहे.
-
नाशिक- कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा
नाशिक- कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येत आहे. शेतीसाठीचा ९० टन युरिया गोदरेज ऍग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात घातल्याचा आरोप आहे. पशुखाद्य तयार करण्यासाठी वापर केला जात होता. हरियाणा आणि कोलकात्ता परिसरातून लाखोंचा कृषी अनुदानित युरिया आला होता.
90 मेट्रिक टन युरिया जप्त करण्यात आला असून याप्रकरणी कृषी विभागाच्या अहवालानंतर दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनी संचालक, युरिया पुरवठादार कंपन्या, वाहतूकदार अशा सर्व नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
-
टोरेस घोटाळ्यातील अल्पेश खाराचा ईडीने घेतला ताबा
टोरेस घोटाळ्यातील अल्पेश खाराचा ईडीने ताबा घेतला आहे. अल्पेश खारा याला यापूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. सध्या तो आर्थर रोड कारागृहात आहे.
-
पुणे – मेट्रो रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दिलासा
पुणे शहरातील मेट्रो रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना दिलासा. आंदोलन करणाऱ्या 9 महिला कार्यकर्त्यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. पुणे सत्र न्यायालयाकडून 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी-शर्तीवर जामीन मंजूर.
-
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पोस्टवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो, मनसे पदाधिकाऱ्यांकडून शिवाजी महाराज पार्क परिसरात ही पोस्टर्स लावण्यात आली आहेत. राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचाही फोटो या पोस्टरवर आहे. 30 तारखेला शिवाजी पार्क येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे.
-
विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर तातडीने कारवाई करा – उच्च न्यायालयाचा आदेश
विमानतळ परिसरातील उंचीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींवर तातडीने कारवाई करा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
महापालिका आणि जिल्हाधिकारी कारवाईत अपयशी; नियम मोडणाऱ्या इमारतींवर कठोर पावले उचलण्याचा इशारा.
रिझवी नगर सोसायटीने बेकायदा बांधकाम काढण्याचे प्रतिज्ञापत्र सादर; विंग C आणि विंग E पाडण्याचे आदेश. काही इमारतींनी पाण्याच्या टाक्या, अँटेना आणि जिने हटवून अंशतः नियमांचे पालन केले.
-
कुलाबा शॉपिंग स्ट्रीटमधील १७० अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे न्यायालयाचे आदेश!
मुंबईतील प्रसिद्ध कुलाबा कॉजवे या शॉपिंग स्ट्रीटवर फक्त 83 फेरीवाल्यांकडे परवाने असून, उर्वरित 170 अनधिकृत फेरीवाल्यांना दोन दिवसांत हटवावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आदेशानंतर महापालिकेने फेरीवाल्यांना स्वतःहून जागा खाली करण्यासाठी मुदत दिली आहे, त्यानंतर निष्कासनाची कारवाई केली जाईल.
महापालिकेने स्वतःहून जागा रिकामी करण्याची संधी दिली आहे. नाहीतर अन्यथा थेट कारवाई केली जाणार आहे. कुलाबा कॉजवे टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियनने याचिका दाखल केली होती, ज्यावर न्यायालयाने हा आदेश दिला.
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल 1 हजार 400 रुपयांची वाढ, तर सोन्याच्या भावात 100 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर 99, 800 रुपये प्रति किलोवर पोहोचले असून सोन्याचे दर 88,200 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ‘एफडीए’ची विशेष तपासणी मोहीम सुरू असून त्याअंतर्गत भेसळयुक्त, बनावट अन् मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर ‘वॉच’ ठेवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाची भेसळयुक्त दुधाविरोधातही शोध मोहीम सुरू असून जिल्ह्यात येणाऱ्या दुधाच्या सर्व वाहनांची तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध कुलाबा कॉजवे या शॉपिंग स्ट्रीटवर फक्त ८३ फेरीवाल्यांकडे परवाने असून, उर्वरित १७० अनधिकृत फेरीवाल्यांना दोन दिवसांत हटवावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. आदेशानंतर महापालिकेने फेरीवाल्यांना स्वतःहून जागा खाली करण्यासाठी मुदत दिली आहे, त्यानंतर निष्कासनाची कारवाई केली जाईल. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील मह्तवाच्या बातम्यांचे अपडेट्स घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Published On - Mar 27,2025 8:11 AM





