Maharashtra Breaking News LIVE 29 January 2025 : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 29 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
![Maharashtra Breaking News LIVE 29 January 2025 : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू Maharashtra Breaking News LIVE 29 January 2025 : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/live-breaking.jpg?w=1280)
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले. यामध्ये 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपाचर सुरू आहेत. यानंतर शाही स्नान रद्द करण्यात आलं आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या विविध याचिकांमुळे रखडलेली निवडणूक राज्यामध्ये महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आले असल्याने लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसरीकडे न्यायालयीन सुनावनी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्याने निवडणुक कधी होणार? यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
गायक अभिजित भट्टाचार्यविरोधात पोलिसांकडे तक्रार; महात्मा गांधींबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप
महात्मा गांधींबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याप्रकरणी गायक अभिजित भट्टाचार्य विरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. महात्मा गांधींबद्दल अपमान जनक वक्तव्य केल्याप्रकरणी गायक अभिजित भट्टाचार्य विरुद्ध पुण्यातील डेक्कन पोलिसांकडे सामाजिक कार्यकर्ते मनीष देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे. गायक अभिजित भट्टाचार्य यांनी “महात्मा गांधी हे भारताचे नाही तर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत” असं वक्तव्य केलं होतं.
-
अंजली दमानिया प्रचंड जातीयवादी मानसिकतेच्या,सुपारी घेऊन कार्यक्रम करतात: लक्ष्मण हाके
“अंजली दमानिया प्रचंड जातीयवादी मानसिकतेच्या असून त्या सुपारी घेऊन कार्यक्रम करतात” असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच पुढे ते म्हणालेत, “अंजली दमानियांचा विश्वास हा कोणावरच नसून त्या सतत पोलीस प्रशासनावर तसेच मंत्र्यांवर आरोप करत असतात. अंजली दमानीयांनी एकनाथ खडसे,छगन भुजबळ, अजित पवार यांना कसे संपवले हे सगळ्यांनी पाहिले आहे आता धनंजय मुंडे यांच्या मागे लागल्या आहेत ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत” असे गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केले आहेत.
-
-
मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यात महत्वाची बैठक; चर्चा गुलदस्त्यात
मंत्री धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची बैठक पार पडली. जवळपास 30 मिनिट बैठक पार पडली आहे. सर्व अधिकाऱ्यांना बैठकीच्या वेळी बाहेर काढण्यात आले होतं. मुंडे आणि जोशी या दोघांमध्ये नक्की काय चर्चा झाली हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.
-
सैफ प्रकरण: वांद्रे न्यायालयाने आरोपी शरीफुलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीला त्याच्याच घरात हल्ला झाला होता. यानंतर वांद्रे न्यायालयाने याप्रकरणी आरोपी शरीफुलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
-
महाकुंभ 2025: दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 4.24 कोटी भाविकांनी पवित्र स्नान केले
आज दुपारी 12 वाजेपर्यंत सुमारे 4.24 कोटी भाविकांनी श्रद्धेने स्नान केले. यासोबतच, यूपी सरकारने सांगितले की, आतापर्यंत पवित्र स्नान करणाऱ्या भाविकांची संख्या 20 कोटींहून अधिक झाली आहे.
-
-
दिल्ली दंगलीतील आरोपी शिफउर रहमानला कोर्टातून दिलासा
दिल्ली दंगलीतील आरोपी शिफा उर रहमानला दिल्लीच्या कड़करडूमा न्यायालयाने 3 फेब्रुवारीपर्यंत कोठडीत पॅरोल दिला आहे. निवडणूक प्रचारासाठी न्यायालयाने कोठडीचा पॅरोल दिला आहे. शिफा उर रहमान कोठडीत पॅरोलच्या मुदतीत तिच्या निवासस्थानी राहू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. शिफा उर रहमान ओखला विधानसभा मतदारसंघातून एआयएमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरू आहे. बार्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या आनंद काशीद यांची प्रकृती ढासळली आहे.आनंद काशीद यांची तपासणी करण्यासाठी आलेल्या वैद्यकीय पथकाला उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवून मराठा समाजाला आरक्षण देण्याची करण्यात मागणी करण्यात आली. तसेच हैद्राबाद, सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावं, सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
-
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह धनंजय मुंडे यांची राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा
मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. धनंजय मुंडे यांनी या भेटीनंतर मंत्र्यांसह कोणत्या विषयावर चर्चा केली याबाबत माहिती दिली. “अन्न-नागरी पुरवठा खात्यासंदर्भात चर्चा केली. तसेच ऑनलाईन रेशन कार्डसंदर्भातील समस्यांवर चर्चा केली”, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
-
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी रायगडमधील शिवसेनेचे 3 आमदार मंत्रालयात
रायगड जिल्हा पालकमंत्रिपदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले आहेत.शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झाले आहेत.
-
छत्रपती संभाजीनगरात जीबीएस सिंड्रोमचे 3 रुग्ण दाखल
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जीबीएस सिंड्रोमचे 3 रुग्ण दाखल केले असून यात 2 महिला आणि एका 10 वर्षीय मुलीचा समावेश आहे.
-
डहाणू: अशोक धोडी अपहरण नऊ दिवस होईऊनही काहीही थांगपत्ता नाही
शिवसेना नेते अशोक धोडी अपहरण प्रकरणाला आता 9 दिवस झाले आहेत तरीही पोलिसांना आणखी धोडी आणि त्यांच्या गाडीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही, त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत.
-
डोंबिवली: दीपेश म्हात्रे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
डोंबिवलीतील ठाकरे गटाचे नेते दीपेश म्हात्रे यांना दोन दिवसापूर्वी कल्याण ग्रामीण विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती केल्यानंतर आज दीपेश मात्रे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आले आहेत.
-
श्रीरामपूर तालुक्यात वाळू तस्करांचा उन्माद
कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांवर प्राणघातक हल्ला. श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील घटना. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली घटना. अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवर दगडफेक.
-
रत्नागिरीतील ऑपरेशन टायगर नंतर रत्नागिरीतील शाखेवरून नवा वाद
बाळासाहेब ठाकरे यांच्या कारकिर्दीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली शाखा साळवी स्टॉप येथे सुरु झाली. उद्धव ठाकरे गटाचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी आपली नियुक्ती झाल्यानंतर आज सायंकाळी याच शाखेत बसून कारभाराची सुरुवात करणार असल्याची केलीये घोषणा. माजी तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांनी केला होता शिवसेनेत प्रवेश. शिवसेनेचे नेते प्रदीप साळवी यांनी याच ठिकाणाहून कारभार पाहणार असल्याचं सांगितल्याने ही शाखा नेमकी कुठल्या पक्षाची याची उत्सुकता.
-
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप
थोड्या वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेश वाटप वितरण करण्यात येणार आहे. गेले तीस वर्षापासून मुंबईतील हिंदुस्थान कम्पोझिट (फेरोडो) प्रायव्हेट लिमिट कंपनीच्या ११०० कामगारांना थकीत व बुडीत महागाई भत्ताची न्यायालयात लढाई सुरू होती. 2006 कंपनी बंद झाली होती. कंपनी बंद झाल्यानंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख नंदू आंबोलकर यांनी पुढाकार घेत या कामगारांना आपला हक्क मिळवून दिला.
-
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई?
पक्षविरोधी भूमिका मांडल्याने भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तर मोहिते यांनी या आरोपांचा इन्कार केला होता. या उत्तराने पक्षाचे समाधान झाले नाही. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
तुरीचा भाव कोसळला
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. शेतकर्यांची नवीन तूर बाजारात येताच तुरीचे भाव कोसळले. दोन महिन्यापूर्वी आठ ते दहा हजार रुपये क्विंटल विकली जाणारी तूर आता मात्र सहा हजारापर्यंत खाली आली आहे.
-
मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राऊतांची टीका
दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ही सर्व मिलीभगत असल्याचा आरोप त्यांनी केला. कुणाचा काय संबंध आहे हे अजितदादा नाही तर कोर्ट सांगेल, असे राऊत म्हणाले. न्यायासाठी जे लढत आहेत. त्यांच्यावर दबाव आणल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
अपहरण प्रकरणात संशयित 4 जण ताब्यात
शिवसेना नेते अशोक धोडी अपहरण प्रकरणात संशयित 4 जणांना पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले. अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी संशयित म्हणून ताब्यात घेतले असता रात्री पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी आणि त्यांच्या ब्रिझा गाडीचा अद्याप ही पोलिसांना पत्ता लागला नाही.
-
केंद्रीय पथक पुण्यात दाखल
जीबीएस आजारासंदर्भात केंद्रांचं उच्चस्तरीय पथक पुण्यात दाखल झाले आहे. पुण्यात या आजाराने डोके वर काढले आहेत.
-
सोलापूर जवळील माळढोक अभयारण्यालगत खाजगी क्षेत्रातील 15 एकर गवताला भीषण आग
सोलापूर जवळील माळढोक अभयारण्यालगत खाजगी क्षेत्रातील 15 एकर गवताला भीषण आग लागली आहे. नान्नज मार्डी माळढोक पक्षी अभयारण्यलगतच्या शेतातील गवतात अचानक आग लागली. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या, ब्लोअर पंपाद्वारे आग विझवली. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी ते बीबीदारफळ परिसरात ही घटना घडली आहे. डिसेंबर महिन्यापासून अभयारण्यातील गवत सुकल्याने वणवा लागण्याचा धोका असतो.
-
नाशिक आणि रायगड इथल्या पालकमंत्रीपदाचा तिढा आणखी काही दिवस सुटणार नाही
नाशिक आणि रायगड इथल्या पालकमंत्रीपदाचा तिढा आणखी काही दिवस सुटणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवरून परतल्यानंतर पालकमंत्रीपदाचा निर्णय घेणार आहेत. पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या मंत्र्यांना वेट एंड वाॅचचा सल्ला देण्यात आला आहे. संयम ठेवून प्रसारमाध्यमांशी बोला असे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून मंत्र्यांना देण्यात आले आहेत.
-
शिंदे भविष्यात पक्ष बदलतील अशी शक्यता वाटतेय- संजय राऊत
“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र वाऱ्यावर टाकून नेहमीच फिरत असतात. गणेश नाईक मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंपेक्षा वरिष्ठ आहेत. शिंदे भविष्यात पक्ष बदलतील अशी शक्यता वाटतेय,” असं राऊत म्हणाले.
-
अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वोत्तम होती- संजय राऊत
“महाकुंभमेळ्यातील व्यवस्थेवर लोक खुश नाहीत. भाविकांना दहा किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय. व्हिआयपी गेल्यावर सामान्य भाविकांसाठी घाट बंद केला जातो. घाट बंद केला की बाहेर श्रद्धाळू ताटकळत असतात. पंतप्रधान आणि गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय? अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना कुंभमेळ्याची व्यवस्था सर्वोत्तम होती,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
-
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घमासान
रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सध्या शिवसेना शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घमासान सुरू असून एकनाथ शिंदे यांनी आपल्या रायगडमधील भरत गोगावलेंसह आमदारांना तंबी द्यावी अन्यथा पालघरमध्ये या आमदारांना फिरकू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष विशाल मोहोळ यांनी दिला आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटला नसून अदिती तटकरे यांच्या जागी पालकमंत्री म्हणून भरत गोगावलेंची वर्णी लागावी यासाठी शिवसेना शिंदे गटातील आमदारांची जोरदार लॉबिंग सुरू आहे. अशातच या दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले असून मोहोळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या आमदारांनाही इशारा दिला आहे.
-
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रात्री सलाईनद्वारे उपचार घेतले
जालना- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रात्री सलाईनद्वारे उपचार घेतले. अंतरवाली सराटीत उपोषण स्थळीच मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालवली होती. त्यामुळे डॉक्टरांकडून मध्यरात्री त्यांना सलाईन लावण्यात आली. काल मनोज जरांगे यांनी सलाईन घ्यावी अशी विनंती सुरेश धस यांनी देखील केली होती. त्यानंतर डॉक्टर आणि मराठा आंदोलकांच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी उपचारास होकार दिला. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
-
Maharashtra News: शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात पालघर पोलिसांची मोठी कारवाई… अशोक धोडी अपहरण प्रकरणात चार संशयित आरोपींना एलसीबी ने घेतला ताब्यात… चौकशीत अशोक धोडी अपहरण प्रकरणात संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती… काही तासांत अशोक धोडी अपहरण प्रकण उघड होण्याची शक्यता…
-
Maharashtra News: अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती – लक्ष्मण हाके
अंजली दमानिया आणि संदीप क्षीरसागर चिल्लर व्यक्ती… दमानिया यांनी अजित पवारांऐवजी कोर्टासमोर पुरावे द्यावेत… धनंजय मुंडे यांना खाली खेचणं हा दमानिया क्षीरसागरांचा अजेंडा… असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढ11320 रिक्त जागा
आरटीई प्रवेशासाठी मुदत वाढ11320 रिक्त जागा, 31704 अर्ज दाखल, आरटीई अंतर्गत 25% जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 2 फेब्रुवारी 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महापालिका अंतर्गत 627 पात्र शाळा असून एकूण 11320 रिक्त जागा उपलब्ध आहेत त्यासाठी 31704 अर्ज आले आहेत
-
Maharashtra News: ठाणे पालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी 631 वृक्षांचा बळी दिला जाणार
ठाणे पालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी 631 वृक्षांचा बळी दिला जाणार, स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा… इमारत बांधण्यासाठी 2956 वृक्षांवर गदा येणार आहे .त्यातील 2097 वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा आणि 631 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे… नवीन इमारत तब्बल 32 मजल्याची असणार आहे
-
घोटाळेबाज अंबर दलालच्या विरोधात ईडीकडून आरोपत्र दाखल
घोटाळेबाज अंबर दलालच्या विरोधात ईडीने आरोपत्र दाखल केलं आहे. अंबर दलालने गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे पुरावे आरोपपत्रात आहेत. अंबर दलालवर 564 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप. आधी मुंबई पोलिसानी अंबर दलालवर गुन्हा दाखल करून कारवाई केली त्यानंतर ईडी केला होता तपास.
-
नवी मुंबई – चारचाकीची उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक, 1 ठार
नवी मुंबई – एका चारचाकी गाडीने उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली . जुईंनगर रेल्वे स्टेशन बाहेरील घटना, एका रिक्षा चालकाचा मृत्यू
कार चालकाला नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले . रिक्षात बसून प्रवाशांची वाट पाहणाऱ्या रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे,
-
पुण्यातील जनता वसाहतीमध्ये नागरिकांच्या गाड्या फोडल्या
पुण्यातील जनता वसाहतीमध्ये नागरिकांच्या गाड्या फोडल्या. दहशत निर्माण करण्यासाठी या गाड्या, रिक्षा फोडल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामध्ये रिक्षा आणि कॅबचं मोठं नुकसान झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
-
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाले. यामध्ये 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपाचर सुरू आहेत. यानंतर शाही स्नान रद्द करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा करत तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत.
Published On - Jan 29,2025 8:18 AM
![सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत सुनीता विल्यम्स यांची 'पृथ्वी वापसी' क्रु ड्रॅगन कॅप्सुलद्वारे होणार, काय आहे खासीयत](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-sunita-williams.jpeg?w=670&ar=16:9)
![आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती आएशा खान हिला येथे फिरायला आवडते, येथे मिळते मनाला शांती](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayesha_khan-1.jpg?w=670&ar=16:9)
![चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते... चुकीच्या पद्धतीने बदाम खाणे दारुपेक्षाही घातक ठरु शकते...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-almond-benefit-3.jpg?w=670&ar=16:9)
![फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का? फाशीपूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काय पुटपुटतो? उत्तर माहिती आहे का?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-execution-gulity-6.jpg?w=670&ar=16:9)
![या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sujata-Weight-Loss-3.jpg?w=670&ar=16:9)
![दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल? दूध आणि काळे मनुके एकत्र खाल्ल्यास महिन्याभरात काय फरक दिसेल?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/123-8.jpg?w=670&ar=16:9)