Maharashtra Breaking News LIVE 1 April 2025 : देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का ? – हर्षवर्धन सपकाळ

| Updated on: Apr 09, 2025 | 12:12 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 1 April 2025 : देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का ? - हर्षवर्धन सपकाळ
live breaking
Follow us on

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर करणारा कॉमेडियन कुणाल कामराच्या माहीम इथल्या घरी सोमवारी मुंबई पोलिसांचं पथक गेलं होतं. पोलिसांनी कामराला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवलं होतं, पण तो अनुपस्थित राहिला होता. त्यामुळे पोलीस पथक सोमवारी कामराच्या घरी पाहणी करण्यासाठी गेलं होतं. कामराविरोधात खार पोलीस ठाण्यात चार गुन्हा दाखल आहेत. तर दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुन्हा एकदा आंदोलकांचे कान टोचले. संघाचे माजी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी कबरीचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात असल्याचं सांगत ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असं म्हटलं आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Apr 2025 04:46 PM (IST)

    अनेक पुरवठादार विविध औषध आणि बियाणे शेतकऱ्यांचे माथी मारीत आहेत – सुरेश धस

    कृषी खात्यात अनेक पुरवठादार कंपनी आणि अधिकारी विविध औषध आणि बियाणे शेतकऱ्यांचे माथी मारीत आहेत असा आरोप बीडचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

  • 01 Apr 2025 04:33 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का ? – हर्षवर्धन सपकाळ

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी डावा कालवा होईल असे आश्वासन आमदार खेडेकर यांच्या वाढदिवशी दिले होते.या सगळ्यांचा विसर फडणवीस सरकारला कसा पडतो. त्यांनी केलेल्या घोषणेचा आणि वक्तव्याचा पुनर्विचार करावा, अन्यथा देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का हा प्रतिप्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • 01 Apr 2025 04:23 PM (IST)

    इमारती बेकायदा ठरविल्याने बेघर झालेल्या नागरिकांची अंजली दमानिया भेट घेणार

    ठाण्यातील बेघर झालेल्या रहिवाशांना दिलासा आणि न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया त्यांची आणि पालिका अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

  • 01 Apr 2025 02:58 PM (IST)

    मालेगावात अपघाताची मालिका सुरुच

    मालेगावच्या दरेगाव भागात मुंबई -आग्रा महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच आहे. या ठिकाणी विचित्र अपघातात एकाचा मूत्यू झाला आहे. 4 जण गंभीर जखमी झाले आहे.
  • 01 Apr 2025 02:39 PM (IST)

    मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस नयन कदम यांनी औरंगजेबाच्या कबरी जवळ “आम्हा मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेबाला इथेच गाडला” असा फलक लावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली.

  • 01 Apr 2025 02:26 PM (IST)

    बँकेत मनसे कार्यकर्त्यांची भेट

    भाईंदर पश्चिमेत विविध बँकेत मनसे कार्यकर्त्यांनी भेट दिली. 80 टक्के कामकाज मराठी भाषेत व्हावे, मराठी माणसांना प्राधान्य द्यावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे केली. भाईंदर पश्चिमेत आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसवीसी बँक, आयडीएफसी बँक यांच्या व्यवस्थापनेला मनसे उपजिल्हा अध्यक्ष हेमंत सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्या आले.

  • 01 Apr 2025 02:06 PM (IST)

    राजू शेट्टी हे बच्चू कडू यांच्या भेटीला

    अमरावती दौऱ्यावर असलेले शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे बच्चू कडू यांच्या भेटीला आले आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी येत्या 11 एप्रिलला आमदारांच्या घरासमोर मशाल पेटून आंदोलन करणार आहेत.

  • 01 Apr 2025 01:52 PM (IST)

    प्रशांत कोरटकरांच्या जामिनावर सुनावणीला सुरुवात; सरकारी वकीलांचा युक्तिवाद सुरु

    प्रशांत कोरटकरांच्या जामिनावर सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी वकील सूर्यकांत पवार यांच्याकडून युक्तिवाद सुरु आहे. आरोपीने श्रीरामांबाबतही चुकीचे वक्तव्य केल्याचं सरकारी वकीलांनी म्हटलं आहे. तसेच आरोपीला दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे का? असा प्रश्नही सरकारी वकीलांनी विचारला आहे. दरम्यान यावर सौरभ घाग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोरटकरला जामिन मंजूर करण्यात यावा अशी मागणी सौरभ घाग यांनी केली आहे.तसेच मोबाईमधील डेटा डिलीट केल्याचा आरोप चुकीचा असल्याचंही घाग यांनी म्हटलं आहे.

  • 01 Apr 2025 01:18 PM (IST)

    “लाडकी बहिण योजनेमुळे तिजोरीवर बोजा नक्कीच पडतोय पण योजना बंद होणार नाही: दत्तात्रय भरणे

    “लाडकी बहिण योजनेमुळे तिजोरीवर बोजा नक्कीच पडतोय. पण तरीही शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पिक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही.” असा विश्वास क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. तसेच याबद्दल होत असलेली टीका योग्य नसल्याचे भरणे यांनी सांगितले.

     

  • 01 Apr 2025 12:32 PM (IST)

    राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांचा छळ करून जमिनी लाटल्या; अंजली दमानियांचा आरोप

    अंजली दमानिया यांनी राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांना फसवल्याचा आणि त्यांचा छळ केल्याचा आरोप केला आहे. त्या म्हणाल्या की, “राजेंद्र घनवट या व्यक्तिकडून शेतकऱ्यांचा छळ झाला आहे. घनवट यांनी शेतकऱ्यांचा छळ करून कमी दरात जमिनी खरेदी केल्या आहेत. शेतकऱ्यांनी मला भेटून घनवट यांनी छळ केल्याचं सांगितलं आणि त्यांच्या बाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तसेच विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांवर घनवट यांनी खोटे गुन्हे दाखल केले आहे. राजेंद्र घनवट धनंजय मुंडेच्या जवळचे आहेत.” असं म्हणत अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • 01 Apr 2025 12:08 PM (IST)

    ठरलेलं लग्न मोडण्यासाठी नवऱ्याला मारण्यासाठी नवरीनेच दिली सुपारी, धक्कादायक प्रकार समोर

    होणारा नवरा पसंत नसल्याने त्याला थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी सुनील दांगडे हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील सागर जयसिंग कदम याच्यासोबत होणार होता. मात्र मयुरीला सागर सोबत लग्न करायचं नसल्याने सागर कदम याला जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • 01 Apr 2025 11:46 AM (IST)

    बीड मस्साजोग – अभिनेते सयाजी शिंदे धनंजय देशमुख यांच्या भेटीला

    बीड मस्साजोग – अभिनेते सयाजी शिंदे धनंजय देशमुख यांच्या भेटीसाठी दाखल.  सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांची यांची सांत्वन पर भेट घेतली.

  • 01 Apr 2025 11:42 AM (IST)

    उल्हासनगर – खिडकीच्या ग्रिलमधून 2 मुलं दुसऱ्या मजल्यावरून खाली पडली

    खिडकीच्या ग्रिलमधून 2 मुलं दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची दुर्घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरून 7 वर्षांचा मुलगा आणि 4 वर्षांची मुलगी खाली पडली आणि बरीच जखमी झाली. त्या दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 01 Apr 2025 11:35 AM (IST)

    जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांची बदली करू नये म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना घातलं साकडं

    जळगावच्या जामनेर तालुक्यातील नवीदाभाडी गावातील जिल्हा परिषदेतील शाळेच्या शिक्षकांची बदली करू नये म्हणून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत साकडं घातल आहे.

    नवीदाभाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षक बदली पात्र आहेत. या दोन्ही शिक्षकांची बदली थांबवावी म्हणून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक तसेच ग्रामस्थांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे.

  • 01 Apr 2025 11:03 AM (IST)

    पुणे – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू…

    पुणे – उंड्री येथील न्याटी एस्टेबन सोसायटीजवळ आज सकाळी झालेल्या एका दुर्दैवी अपघातात एका मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.  घटनास्थळी कोणतेही सामान सापडले नसल्याने पीडित इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही.

    तसेच हा अपघात कसा झाला याची माहितीदेखील अद्याप मिळालेली नाही. पण प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, मॉर्निग वॉकसाठी घराबाहे पडलेल्या तरुणाला चारचाकीने धडक दिली.

  • 01 Apr 2025 10:34 AM (IST)

    कळंब महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ताब्यात

    कळंब येथील महिला हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रामेश्वर भोसलेला एल सीबिने घेतलं ताब्यात. रामेश्वर उर्फ राण्या माधव भोसले असे आरोपीचे नाव. महिला हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात. उस्मान गुलाब सय्यद असे हत्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव. कळंब महिला हत्या प्रकरणात पहाटे पाच वाजता कळंब पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल. दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील.

  • 01 Apr 2025 10:16 AM (IST)

    डोंबिवली पश्चिमेत आज वीजपुरवठा बंद

    अतिमहत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत डोंबिवली पश्चिमेत आज वीजपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांची गैरसोय, उन्हाच्या कडाक्यात विजेअभावी त्रास, घरून काम करणाऱ्या नोकरदारांवर परिणाम.

  • 01 Apr 2025 09:47 AM (IST)

    Maharashtra News: झारखंडच्या साहिबगंज मधे दोन रेल्वे मालगाड्यांची धडक

    झारखंडच्या साहिबगंज मधे दोन रेल्वे मालगाड्यांची धडक… धडकेनंतर गाड्यांना लागली आग… घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती… प्रशासनाने तत्काळ मदत पाठवत परिस्थिती नियंत्रणात आणल्या माहिती समोर

  • 01 Apr 2025 09:30 AM (IST)

    Maharashtra News: मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये आढळला गोल्डन जॅकल

    Raw संस्था आणि वनविभाग यांच्यामार्फत गोल्डन जॅकलला पकडण्यात आलं आहे. सकाळी ६ वाजता आढळल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जखमी अवस्थेत आढळल्याने त्याच्यावर पुढील औषध उपचार सुरू…

  • 01 Apr 2025 09:15 AM (IST)

    Maharashtra News: राज्यात 36 टक्के रुग्णांना फुफ्फुसांबाहेरचा क्षयरोग..

    राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती आली समोर… राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवाडेवारिनुसार गेल्या वर्षी राज्यभरात नोंदवलेल्या 36 टक्के रुग्ण हे फुप्फुसांच्याबाहेरील क्षय रोगाचे होते… साधारणपणे मायक्रो बॅक्टेरियम से रोगाचा फुफुस आणि श्वसनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होतो… काही रुग्णांमध्ये शरीराच्या इतर भागावर सर्वाधिक परिणाम होतो राज्यात एकूण क्षयरोग रुग्णांपैकी एक तृतीयांश पेक्षा जास्त रुग्णू फुफुसांबाहेरील क्षयरोगाचे असल्याचे समोर आले आहे.

  • 01 Apr 2025 09:07 AM (IST)

    Maharashtra News: पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत 11 टक्क्यांनी वाढ

    पुणे विमानतळावरून दिवसाला 30 हजारांपेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास… पुणे शहरातून दिल्लीसाठी सर्वाधिक उड्डाणे… पुण्यातून दिवसाला साधारण 20 पेक्षा जास्त उड्डाणे दिल्लीला.. पुण्यातून सध्या साधारण 36 शहरांसाठी विमान सेवा सुरू आहे… पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून असल्याच प्रशासनाचे स्पष्टीकरण…

  • 01 Apr 2025 08:59 AM (IST)

    पुणे- राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर

    पुणे- राज ठाकरेंच्या आदेशानंतर पुण्यात मनसे ॲक्शन मोडवर आहे. आजपासून मनसे पुणे शहरातील सर्व आस्थापनांना निवेदन देणार आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी मनसे पुन्हा आग्रही झाली आहे.

    राज ठाकरे यांनी दिलेला सूचनेनुसार आजपासूनच मनसे मोहीम हातात घेणार असून बँक आणि ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठीचा वापर केले जात आहे का? नाही याची तपासणी करणार आहे. तसेच वेळ पडल्यास खळ-खट्याक देखील करण्यात येणार असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

  • 01 Apr 2025 08:45 AM (IST)

    नवी दिल्ली- काँग्रेस खासदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक

    नवी दिल्ली- काँग्रेस खासदारांची उद्या महत्त्वपूर्ण बैठक आहे. वक्फ सुधारणा विधेयक उद्या मांडलं जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस खासदारांची बैठक होणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. उद्या सभागृहात विधेयकाला काँग्रेस जोरदार विरोध करण्याची शक्यता आहे.

  • 01 Apr 2025 08:32 AM (IST)

    चिपळूणमध्ये रात्रभर अवकाळी पाऊस, आंबा बागायतदारांची वाढली चिंता

    चिपळूणला मध्यरात्रीपासून पावसाने झोडपलंय. रात्रभर अवकाळी पावसाचा जोर होता. चिपळूणमधील सर्व रस्ते ओले झाले. अचानक पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. आंबा पिकांवर अवकाळी पावसाचा परिणाम होणार. अद्यापही वातावरण ढगाळ आहे.

  • 01 Apr 2025 08:29 AM (IST)

    मालाड इथल्या हिंदूंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सात जण ताब्यात

    मालाड इथल्या हिंदू तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी काल सात जणांना ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर कुरार पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 01 Apr 2025 08:28 AM (IST)

    मुंबईत घरं महागणार; राज्यातील रेडी रेकनर दरांमध्ये सरकारकडून वाढ

    मुंबईत ३.३९ टक्के, ठाण्यात ७.७२ टक्के आणि सोलापुरात सर्वाधिक १०.१७ टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्यात सरासरी ४.३९ टक्के रेडी रेकनर दरांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे संपूर्ण राज्यात घरांच्या किंमती वाढणार आहेत. नवे दर आज मंगळवारपासून लागू होतील. त्यामुळे घरे महागणार आहेत. राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक विभागाने २०२५-२६ कालावधीसाठी रेडीरेकनर दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे.