Maharashtra Breaking News LIVE 25 September 2024 : महायुतीची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर- सूत्र

| Updated on: Sep 26, 2024 | 8:15 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 25 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 25 September 2024 : महायुतीची पहिली यादी घटस्थापनेच्या मुहूर्तावर- सूत्र
Maharashtra Live News

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विविध मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहे. यानिमित्ताने पुण्यात जय्यत तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. हवामान विभागाने 27 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सक्रीय झाला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Sep 2024 06:59 PM (IST)

    कल्याणमध्ये जोरदार पावसामुळे स्टेशन परिसरात पाणी साचले

    कल्याणमध्ये जोरदार पावसामुळे स्टेशनं परिसरामध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक संत गतीने होत आहे. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कपोते वाहनतळ येथे रस्त्यावर पाणी साचल्याने नारिकांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. अर्धा तासापासून जोरदार पावसामुने कल्याणच्या अनेक सखल भागातील रस्त्यावर पाणी साचायला सुरवात झाली आहे. विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसामुळे कामावरून येणाऱ्या नागरिकांची धावपळ उडाली आहे.

  • 25 Sep 2024 06:57 PM (IST)

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात घुसले पाणी

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयात पाणी शिरलं आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयात पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे. छत्रपती संभाजी नगरात मुसळधार पाऊस सुरु आहे.

  • 25 Sep 2024 06:45 PM (IST)

    विकासकाच्या मुलाचे अपहरण करून 40 कोटींची मागणी

    विकासकाच्या मुलाचे अपहरण करून 40 कोटींची मागणी करण्यात आली होती. अंबरनाथ पोलिसांनी 12 तासांत 100 पोलिसांच्या मदतीने दहा आरोपीना ठोकल्या बेड्या. आरोपीत दोन मुंबई महानगरपालिकेच्या फायर विभागाचे निलंबित कर्मचाराचा समावेश. निलंबित झाल्यावर कामाला लावण्याच्या 40 पेक्षा अधिक तरुणा कडून करोडो रुपयांची केली होती फसवणूक. ती रक्कम परत करण्यासाठी या दोघांनी फसवणूक केलेल्या तरुणांच्या मदतीने अंबरनाथमधील मोठ्या विकासकाच्या मुलाचे अपहरण करून व्हिडिओ कॉल द्वारे 40 लाखाची मागणी केली होती. मात्र अंबरनाथ पोलिसांनी 12 तासांत कौशल्यपूर्ण तपासाद्वारे अपहरणकर्त्यांना अटक केली आणि मुलाची सुरक्षित सुटका केली.

  • 25 Sep 2024 06:27 PM (IST)

    कोल्हापूर विमानतळावर गृहमंत्री अमित शहा दाखल

    कोल्हापूर विमानतळावर अमित शहा दाखल झाले आहेत. अमित शहा भाजपच्या कार्यक्रम स्थळी रवाना झालेत. अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ते जाणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. विमानतळावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, कामगार मंत्री सुधीर खाडे, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

  • 25 Sep 2024 06:25 PM (IST)

    बार्शीच्या आगळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर

    बार्शीच्या आगळगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे चांदणी नदीला पूर आले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आगळगाव येथील ॲम्बुलन्स बार्शीत जाण्यापासून थांबली. ॲम्बुलन्समध्ये पेशंट महिलेला उपचारासाठी बार्शीला घेऊन जाण्यात अडथळा आलाय. नदीला आलेल्या पुरामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. मागील महिनाभरात तीनवेळा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे नव्याने पूल बांधून मिळावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

  • 25 Sep 2024 05:52 PM (IST)

    आपच्या नगरसेवक प्रीती आणि सरिता फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला

    दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. स्थायी समिती सदस्य निवडीपूर्वी पक्षाच्या नगरसेवक प्रीती आणि सरिता फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रीती या दिलशाद गार्डनच्या प्रभाग क्रमांक-217 मधून नगरसेवक आहेत आणि सरिता फोगट या ग्रीन पार्कच्या प्रभाग क्रमांक-150 मधून नगरसेवक आहेत.

  • 25 Sep 2024 05:37 PM (IST)

    अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये बस हायजॅक

    अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये एका बसचे अपहरण करण्यात आले आहे. पोलिसांच्या पथकाने अपहरण झालेल्या बसला चारही बाजूंनी घेरले आहे. बस चालक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  • 25 Sep 2024 05:25 PM (IST)

    तेल अवीववर हिजबुल्लाहचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला

    हिजबुल्लाहने इस्रायलच्या तेल अवीववर मोठा हल्ला केला आहे. 29 जानेवारीनंतर पहिल्यांदाच तेल अवीववर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने इस्त्रायलला लक्ष्य केले आहे. लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांनंतर हिजबुल्लानेही आता इस्रायलला लक्ष्य केले आहे.

  • 25 Sep 2024 05:10 PM (IST)

    कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद प्रकरणाची पुढील सुनावणी 30 सप्टेंबरला

    मुस्लिम पक्षाच्या रिकॉल अर्जावर ही सुनावणी झाली. मशिदीच्या बाजूची मागणी आहे की मुद्द्यांवर निर्णय घेण्यापूर्वी रिकॉल अर्जावर सुनावणी झाली पाहिजे. सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी करण्याच्या आदेशाविरोधात मुस्लिम पक्षाने रिकॉल अर्ज दाखल केला आहे. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या 18 दिवाणी दाव्यांवर सुनावणी सुरू आहे. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.

  • 25 Sep 2024 04:52 PM (IST)

    वाघोली परिसरात स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे मोठा अपघात टळला

    पुण्यातील वाघोली परिसरात स्कूल बस चालकाच्या चुकीमुळे मोठा अपघात होता होता टळला. कोठारी इंटरनॅशनल स्कूलची बस मुलांना शाळेत घेण्यासाठी येत होती. या दरम्यान रस्त्यातच बस मधोमध वळून घेत होती. यावेळेस त्या शाळेच्या बसला लोहगावकडून अतिवेगाने येणारा डंपर समोरच्या बाजूने धडकला. मात्र डंपर चालकाने प्रसंगावधान दाखवलं. त्याने डंपर रस्त्याखाली घातला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या बस मध्ये एकूण शाळेचे पंधरा विद्यार्थी होते.

  • 25 Sep 2024 04:24 PM (IST)

    सलाईन घेऊन मी उपोषण करु शकत नाही: मनोज जरांगे पाटील

    मराठा समाजासा ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित झांलं आहे. जरांगे पाटील थोड्याच वेळात उपोषण सोडणार आहेत. जरांगे पाटील यांनी उपोषणाच्या नवव्या दिवशी हा निर्णय घेतला. सलाईन घेऊन मी उपोषण करु शकत नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.तसेच ज्यांनी त्रास दिला, त्यांना सरळ करणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. तसेच उद्यापासून कुणीही अंतरवाली सराटी येथे येऊ नये, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं.

  • 25 Sep 2024 04:11 PM (IST)

    अंतरवाली सराटीत राज्यभरातून आलेला मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित

    जालन्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात उपोषण सोडणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु होतं. जरांगे पाटील यांच्या समर्थनसाठी आंदोलनस्थळी राज्यातील विविध ठिकाणाहून मराठा बांधव-भगिणींनी उपस्थिती लावली. त्यातील मराठा भगिणींच्या हस्ते जरांगे पाटील उपोषण सोडणार आहेत.

  • 25 Sep 2024 02:52 PM (IST)

    मराठा समाजाच्या वतीने उद्या पंढरपूर बंदची हाक

    सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तसेच आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात उद्या पंढरपूर तालुका बंदची हाक दिली आहे.

  • 25 Sep 2024 02:35 PM (IST)

    रासपचे नेते राजाभाऊ फड शरद पवार यांच्या पक्षात

    रासपचे नेते राजाभाऊ फड यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होत आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवार,बजरंग बाप्पा सोनवणे, फौजिया खान उपस्थित आहेत.

  • 25 Sep 2024 02:16 PM (IST)

    धरणाचे आठ गेट उघडले

    गोंदिया जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यांमध्ये वाढ झाली. त्यात पूजारीटोला धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्याने धरणाचे आठ गेट हे दोन फुट उंचीने सुरू करण्यात आले.

  • 25 Sep 2024 02:07 PM (IST)

    मनोज जरांगे दुपारी 4 वाजता उपोषण सोडणार

    राज्यभरातून मराठा समाज अंतरवालीकडे येत आहेत, त्यामुळे आता जरांगे पाटील 4 वाजता उपोषण सोडणार आहे.

  • 25 Sep 2024 01:56 PM (IST)

    अखेर उपोषण स्थगित… मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय; नवव्या दिवशी काय घडलं?

    मराठा आंदोलनसाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 25 Sep 2024 01:41 PM (IST)

    Akshay Shinde Encounter : बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी पुढील गुरूवारी पुन्हा सुनावणी

    बदलापूर एन्काऊंटर प्रकरणी पुढील गुरूवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा सीलबंद अहवाल कोर्टात सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घटनेत सहभागी सर्व पोलीसांची सीडीआरही सादर करण्याचे देखील निर्देशही कोर्टाने दिले.

  • 25 Sep 2024 01:31 PM (IST)

    Akshay Shinde Encounter : चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही – हायकोर्टाचा इशारा

    चुकीची माहिती दिली तर गय केली जाणार नाही. न्यायालयाची दिशाभूल सहन केली जाणार नाही. आजच्या सुनावणीत जे काही सांगितलंय त्यात आणि पुढच्या सुनावणीत तर तफावत आढळली नाही तर सोडणार नाही असा इशारा हायकोर्टाने सरकारला दिला आहे.

  • 25 Sep 2024 01:28 PM (IST)

    Akshay Shinde Encounter : आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते मृत्यूपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवा

    आरोपीला तुरुंगातून बाहेर काढल्यापासून ते मृत्यूच्या वेळेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवावे असे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. आरोपी त्याच्या बॅरेकमधून बाहेर आला, वाहनात चढला, कोर्टात गेला आणि नंतर शिवाजी हॉस्पिटलमध्ये गेला, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले तेव्हापासूनचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवावे,असे कोर्टाने नमूद केलं.

  • 25 Sep 2024 01:18 PM (IST)

    मी माझ्या शब्दाला पक्का आहे – मनोज जरांगे पाटील

    मी आणि माझा समाज शब्दाला पक्के आहोत. एकदा राजकारणात नाही जाणार म्हटलं तर नाही जाण, मी समाजाला सांगितलं आहे – मनोज जरांगे पाटील.

  • 25 Sep 2024 01:09 PM (IST)

    Akshay Shinde Encounter : 3 गोळ्या चालवल्या, 2 लागल्या, 1 गोळी कुठे गेली ? – कोर्टाचा सवाल

    3 गोळ्या चालवल्या, 2 लागल्या, 1 गोळी कुठे गेली ? डोक्यात गोळी का मारली ? अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा सरकारी वकिलांना सवाल विचारले आहेत. या एन्काऊंटर प्रकरणी अक्षयच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • 25 Sep 2024 01:02 PM (IST)

    याला एन्काऊंटर बोलू शकत नाही – हायकोर्ट

    डोक्यात गोळी का मारली? पोलीस डोक्यात गोळी मारतात की, पायावर? याला एन्काऊंटर बोलू शकत नाही. एन्काऊंटरची व्याख्या वेगळी. पोलीस एका आरोपीला काबू करत शकत नव्हते का? आरोपीने पिस्तुलाचे लॉक ओपन करुन फायर केले का? कोर्टाचे सवाल.

  • 25 Sep 2024 12:52 PM (IST)

    सामान्य माणसाला बंदुकीचा ट्रिगर ओढता येत नाही – न्यायालय

    सामान्य माणसाला बंदुकीचा ट्रिगर ओढता येत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्याकडून अक्षयने बंदुक कशी खेचली? न्यायमुर्ती चव्हाण यांचे सरकारी वकिलांना सवाल. अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

  • 25 Sep 2024 12:49 PM (IST)

    पोलीस वर्दीत होते का? अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण

    पोलिसांनी कोणती बंदुक वापरली होती? पोलीस वर्दीत होते का? अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा सरकारी वकिलांना सवाल

  • 25 Sep 2024 12:33 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको

    परंडा तालुक्यातील आसू फाटा येथे मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन. परंडा-बार्शी रोडवरील आसू फाटा येथे रस्ता रोको आंदोलन. परंडा तालुक्यातील आसू, पिंपळवाडी,लोणी गावातील सकल समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, एक मराठा, लाख मराठा अशी रस्ता रोको आंदोलनावेळी आंदोलकांची घोषणाबाजी.

  • 25 Sep 2024 12:15 PM (IST)

    आम्ही जो निधी मागतो, त्यावर फुली मारली जाते – सुप्रिया सुळे

    “आम्ही जो निधी मागतो, त्यावर फुली मारली जाते. आम्हाला निधी दिला जात नाही. जनतेची काम आहेत, त्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतो, हे संविधान विरोधी आहेत, विरोधक असला तरी आमच्या काळात निधी दिला जात होता. विरोधक असला तरी ठीक पण निवडणुका पुरता विरोधक, परत नाही. आमच्या काळात विरोधकांना पण निधी देत होतो” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 25 Sep 2024 11:50 AM (IST)

    अक्षय शिंदेचा बनावट एन्काऊंटर केला, कुटुंबीयांचा आरोप

    बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी सीआयडीकडून तपास सुरू झाला आहे. सीआयडीचं पथक आज अक्षयच्या कुटुंबीयांना भेट देणार आहे. अक्षय शिंदेचा बनावट एन्काऊंटर केला असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

  • 25 Sep 2024 11:40 AM (IST)

    संभाजीनगरमध्ये अमित शाहांची बावनकुळे आणि तावडेंसोबत बैठक

    संभाजीनगरमध्ये अमित शाहांची बावनकुळे आणि तावडेंसोबत बैठक आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिघांमध्ये चर्चा होणार आहे. अमित शाह थोड्याच वेळात नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहेत.

  • 25 Sep 2024 11:33 AM (IST)

    मराठा समाजाला त्यांचे अधिकार मिळायलाच हवेत- फडणवीस

    “सारथीच्या माध्यमातून 51 मराठा विद्यार्थी IAS झाले. मराठा समाजासाठी ‘सार्थी’ची स्थापना केली. मराठा समाजाला त्यांचे अधिकार मिळायलाच हवेत,” असं फडणवीस म्हणाले.

  • 25 Sep 2024 11:30 AM (IST)

    अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर म्हणून राऊतांना मिरच्या- नितेश राणे

    सिंधुदुर्ग- “देशाचे गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राऊतला मिरच्या लागत आहेत. जे तुझ्या घरकोंबड्या पक्षप्रमुखाला जमत नाही. भाजपाचा कार्यकर्ता कितीही मोठा झाला तरी संघटना आणि पक्ष याला प्राधान्य देतो. याच उत्तम उदाहरणं म्हणजे मोदी शाह फडणवीस आहेत,” असं नितेश राणे म्हणाले.

  • 25 Sep 2024 11:28 AM (IST)

    आरक्षणाच्या विविध मागण्या करताना त्या कोर्टात टिकतील का ते पहायला हवं- फडणवीस

    “आरक्षणाच्या बाबतीत सध्या विविध मागण्या होत आहेत. मात्र मागण्या करताना त्या कोर्टात टिकतील का ते पहायला हवं. मी सीएम असताना मराठा आरक्षण कोर्टात टिकवून दाखवलं होतं. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावेत हीच सरकारची भूमिका आहे,” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 25 Sep 2024 11:20 AM (IST)

    वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर

    वक्फ विधेयकाबाबत संसदेची संयुक्त समिती आज मुंबई दौऱ्यावर आहे. मुंबईत विविध संस्था-समाजघटकांची मतमतांतरे ऐकणार आहे. वक्फ विधेयकावर संसदेची संयुक्त समिती गेले अनेक दिवस अभ्यास, चर्चा करत आहे. देशभरातून १.२ कोटींहून जास्त मत-मतांतरे समितीला प्राप्त झाली आहेत.

  • 25 Sep 2024 11:10 AM (IST)

    नालासोपाऱ्यात 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी भाजप नेत्यासह तिघांवर गुन्हा

    नालासोपारा- कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचं औषध देऊन नालासोपाऱ्यात 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी भाजप नेत्यासह तिघांवर आचोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गंगेश्वरलाल श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव असं आरोपी भाजप नेत्याचं नाव असून त्याच्याकडे वसई-विरार उपजिल्हाध्यक्ष आणि उत्तर भारतीय मोर्चाचा प्रभारी ही पदंही आहेत.

  • 25 Sep 2024 10:52 AM (IST)

    Maharashtra News: अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये तुंबले पाणी

    अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये तुंबले पाण… अवघ्या काही तासांच्या पावसाने शहरात वाहतूक देखील विस्कळीत… केंद्रीय गृहमंत्री शहरात असताना देखील नियोजन ढासळले… द्वारका परिसरात पाणी साचले, तर मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी… नियोजन शून्य कारभाराचा नाशिककरांना देखील फटका

  • 25 Sep 2024 10:45 AM (IST)

    Maharashtra News: अमरावतीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

    अमरावती विधानसभेच्या आमदार सुलभा खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता… येत्या १३ ऑक्टोबरला करणार राष्ट्रवादी काँग्रेमध्ये प्रवेश… सूत्रांची माहिती… उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सुलभा खोडके करणार प्रवेश?

  • 25 Sep 2024 10:32 AM (IST)

    Maharashtra News: क्रिकेट अकादमीसाठी रहाणेला वांद्रेमध्ये भूखंड देण्याचा निर्णय

    क्रिकेट अकादमीसाठी रहाणेला वांद्रेमध्ये भूखंड देण्याचा निर्णय… 2 हजार चौरस मीटरचा भूखंड देण्याचा सरकारचा कबिनेट बैठकीत निर्णय… वित्त विभागाच्या आक्षेपानंतरही रहाणेला भूखंड देण्याचा निर्णय…

  • 25 Sep 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती…

    माथाडी कामगारांनी एक दिवसाची सुट्टी घेतल्याने लासलगाव ते नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजारपेठ बंद… कांदा आणि धान्यातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प… तर अफगाणिस्तानचा कांदा मोठ्या प्रमाणात भारतात येत असल्याने व्यापाऱ्यांची वाढली डोकेदुखी… उद्या कांदा लिलाव पूर्ववत होताच काय बाजार भाव निघणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा…

  • 25 Sep 2024 10:09 AM (IST)

    Maharashtra News: शाह मणिपूरला गेले नाहीत, काश्मीरला गेले नाहीत – संजय राऊत

    शाह मणिपूरला गेले नाहीत, काश्मीरला गेले नाहीत… जागावाटपाचा आढावा घेण्यासाठी शाह वायूसेनेचं विमान घेऊन आलेत… महत्त्वाचे प्रश्न सोडून भाजपच्या तयारीचा आढावा घ्यायला आलेत… शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरूव राऊतांची टीका…

  • 25 Sep 2024 09:57 AM (IST)

    परतीच्या पावसाने धुळ्याला झोडपलं

    परतीच्या पावसाने धुळे शहरासह तालुक्याला पावसाने झोडपलं आहे. धुळे तालुक्यातील नगाव धमाने कापडणे देवभाने या परिसरात जोरदार पाऊस होत आहे. नदीला नाल्यांना पूर आल्याने घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरांमध्ये पाणी गेल्याने अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे.

  • 25 Sep 2024 09:45 AM (IST)

    अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर

    केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शाह मार्गदर्शन करणार आहे. कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता बैठक पार पडणार आहे. महासैनिक दरबार हॉल परिसरात बैठकीची जोरदार तयारी सुरु आहे. पदाधिकाऱ्यांकडून अमित शाह यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आलेत. बैठकीआधी अमित शाह अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत.

  • 25 Sep 2024 09:30 AM (IST)

    85 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार

    पिंपरी- चिंचवड मध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वृद्धेला फ्लॅट समोर लिफ्ट पर्यंत ओढत आणून आणि तोंड दाबून या नाराधामाने बलात्कार केलाय. याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ओम जयचंद पुरी याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • 25 Sep 2024 09:15 AM (IST)

    अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा

    अमित शाह जळगाव जिल्ह्याचाही स्वतंत्र आढावा घेणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व भाजपचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी हजर राहणार आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बुधवारी, नाशिक दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्यात शाह यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. खानदेशातील धुळे, नंदुबार, जळगाव जिल्ह्यांचा समावेश असलेले क्लस्टर मिळून, तसेच नाशिक आणि अहमदनगर क्लस्टर मिळून संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा आढावा अमित शाह घेणार आहेत.

  • 25 Sep 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जोरदार बॅनरबाजी

    पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार बॅनरबाजी

    – एसपी कॉलेज मैदानाच्या बाहेर मोदींच्या स्वागताचे बॅनर्स,

    – विधानसभा निवडणूकीला इच्छुकांनी लावलेत मोदींच्या स्वागताचे बॅनर्स

    – कसब्यातून इच्छुक हेमंत रासणे, धीरज घाटे, पर्वतीमधून इच्छुक माधुरी मिसाळ, श्रीनाथ भीमाले यांच्याकडून जोरदार बॅनर्सबाजी

    – पंतप्रधान मोदी उद्या पुणे दौऱ्यावर असून एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा पार पडणार

  • 25 Sep 2024 08:16 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यातील गुंडाच्या विरोधात पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर, गुन्हे शाखेच्या पथकांना आदेश

    पुण्यातील गुंडाच्या विरोधात पोलीस आयुक्त पुन्हा अँक्शन मोडवर…

    दहशत माजविण्यासाठी सोशल मीडियावर गुन्हेगारांकडून व्हिडिओ प्रसारित करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशा प्रकारचे रील प्रसारित करणाऱ्या गुंडांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत .

    गुन्हे शाखेच्या पथकांना आदेश दिले आहेत.

    व्हिडिओ ला लाइक देणाऱ्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जाणार असल्याने पोलिसांकडून खबरदारीची सूचना देण्यात आली आहे.

    वाढदिवसाला तलवारीने केक कापणे, कोयते उगारून दहशत माजविणे, तसेच सोशल मीडियावर ‘स्टेटस’वर शस्त्रांची फोटो प्रसारित करण्याच्या घटना पुन्हा वाढू लागल्या आहेत.

    राईत गुंड आणि ते वापरत असलेल्या सोशल मीडिया खात्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

  • 25 Sep 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर पावसाचे सावट? मैदानावर तयारी सुरु

    पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर पावसाचे सावट?

    – पंतप्रधान मोदींची उद्या एस. पी. कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे,

    – त्यासाठी मैदानावर तयारी सुरू आहे.

    – मंगळवारी झालेल्या पावसामुळे मैदानावर चिखल झाला आहे,

    – चिखल झालेल्या ठिकाणी उत्खनकाच्या मदतीने मुरून टाकला जात आहे,

    – पुढील दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे,

    – त्यामुळे सभेच्या ठिकाणी त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. पण, मोदींच्या सभेवर पावसाचे सावट आहे.

  • 25 Sep 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर, वेळापत्रक निश्चित

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा –

    संध्याकाळी ५.३५ वाजता मोदी पुणे विमानतळावर येणार

    पुणे विमानतळावरुन मोदी शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनला ५.५५ वाजता पोहोचतील

    ⁠शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथुन शिवाजीनगर ते स्वारगेट पंर्यतच्या भुयारी मेट्रोला हीरवा झेंडा दाखवणार

    मेट्रोने प्रवास करत मोदी स्वारगेटला पोहचतील

    स्वारगेट येथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार

    स्वारगेट वरुन ६.३० वाजता मोदी एसपी कॉलेज येथे सभास्थळी पोहचतील

    रात्री ७.५५ मिनिटांनी मोदी पुणे विमानतळाहून दिल्लीला रवाना होतील

Published On - Sep 25,2024 8:12 AM

Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.