Maharashtra Breaking News LIVE 24 September 2024 : राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुणे दौऱ्यावर, नक्की कारण काय?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Badlapur Akshay Shinde Encounter Update : बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले. पोलिसांनी स्व:संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षयचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अक्षयच्या आई-वडिलांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत पोलिसांवर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनीही यावरुन जोरदार टीका करत मोठं षडयंत्र असल्याचे म्हटलं आहे. आता या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरु आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडून पुणे दौऱ्यात लोकप्रतिनिधींशी चर्चा करत जिल्ह्यातील आढावा
राज्यपाल सी पी राधाकृष्णन पुणे दौऱ्यावर आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी पुणे दौऱ्यात लोकप्रतिनिधींशी चर्चा करत जिल्ह्यातील आढावा घेतला. राज्यपालांच्या या पुणे दौऱ्यात खासदार श्रीरंग बारणे , आमदार माधुरी मिसाळ , आमदार संजय जगताप यांनी हजेरी लावली. जिल्हा प्रशासनाने शहर आणि जिल्ह्यातील सुरु असलेल्या विकास कामाचा आढावा दिला.
-
महाविकास आघाडी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बुधवारी करणार आंदोलन
पुणे जिल्हा नियोजन समितीमधून महाविकास आघाडीच्या आमदारांना वगळण्यात आलं आहे. त्यामुळे संजय जगताप, संग्राम थोपटे आणि अशोक पवार यांना निधीतून वगळलं. त्यामुळे मविआ बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
-
-
अमित शहा यांचा मिशन विदर्भ 45साठी कार्यकर्त्याना कानमंत्र, बैठकीत काय सांगितलं?
भाजपची अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरू असलेली विदर्भ आढावा बैठक संपली आहे. भाजपचा विदर्भात मिशन 45 लक्ष आहे. विदर्भ मिशन 45 साठी अमित शहा यांनी कार्यकर्त्याना कानमंत्र दिला आहे. “विरोधकांच्या बूथ वर सरशी साधा. बूथवर मोटर सायकल रैली काढा. 10-10 चे गट करून घरोघरी पोहचा प्रत्येक बूथ वर मतदान टक्केवारी वाढवा. नाराज कार्यकर्त्यांना जवळ करा , त्यांच्याशी संवाद साधा बूथ प्रमुखांच्या भरवश्यावर बूथ सोडू नका स्वता लक्ष घाला. सगळ्या नेत्यांनी जबाबदारी घ्यावी ,कार्यकर्त्यांवर ढकलू नये. नेत्यांनी नेते म्हणून राहू नका कार्यकर्त्यांसोबत काम करा. विरोधकांचे गावागावातील बूथ आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करा. संत-महंत याना भेट त्यांना एकत्रित करा. बाहेरच्या कार्यकर्त्यांना आपलं करून त्यांना सोबत घ्या”, असा कानमंत्र अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिला.
-
सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारची याचिका फेटाळली
एनआरआय कोट्याच्या विस्ताराबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पंजाब सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हे थांबवावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
-
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – डीके शिवकुमार
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी काहीही चूक केलेली नाही. तो कोणत्याही घोटाळ्यात सहभागी नाही. हे भाजपाचे राजकीय षडयंत्र आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, त्यांना पाठिंबा देऊ. ते देश, पक्ष आणि राज्यासाठी चांगले काम करत आहेत.
-
-
सर्वांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, राहुल गांधी आणि खर्गे ठरवतील – रणदीप सुरजेवाला
हरियाणातील कैथल येथील काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले, “प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हायचे आहे. सेलजा आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. आम्हा तिघांच्या व्यतिरिक्त हा अधिकार इतर कोणाचाही असू शकतो. शेवटी निर्णय खरगे आणि राहुल गांधी यांना घ्यायचा आहे. ते जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल.”
-
काँग्रेसचे मूळ चरित्र दलितविरोधी आहेः मुख्यमंत्री नायबसिंग सैनी
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले की, काँग्रेसचे मूळ चरित्र दलितविरोधी आहे. त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा दलितविरोधी चेहरा समोर येतो. त्यांनी नेहमीच आपल्या नेत्यांचा अपमान केला आहे. काँग्रेसमधला कोणताही दलित नेता त्याच्या मेहनतीमुळे थोडाही उठला, तर त्याला चिरडण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे, हे संपूर्ण देशासमोर आहे.
-
नागपूर मेट्रो सेवा विस्कळीत : शंकरनगर मेट्रो स्टेशन जवळ गाडी बंद पडली
शंकर नगरकडून सीताबर्डीकडे जाणाऱ्या मार्गावर तांत्रिक कारणांमुळे एक मेट्रो बंद पडली असून मेट्रोमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे.
-
नागपूर हायकोर्ट – काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध
नागपूर हायकोर्टाने काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय अवैध ठरविला आहे. तसेच पडताळणी समितीला एक लाखाचा दंडही ठोठावला आहे.
-
मेहबूब शेख यांची नरहरी झिरवळ यांच्यावर टीका
गोकुळ झिरवाळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर असतानाच मेहबूब शेख यांनी नरहरी झिरवाळ यांच्यावर टीका केली. छाती फाडून पाहिल्यावर शरद पवार दिसतील म्हणणारे झिरवाळ यांचं ऑपरेशन कोणी केले त्यांच्या छातीत गद्दारी कशी दिसते, असा सवाल त्यांनी विचारला.
-
सतेज पाटील यांचे एनकाऊंटरवर प्रश्नचिन्ह
बदलापूरच्या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी तमाम महाराष्ट्राची इच्छा होती. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने वेगळं बोलत आहेत हे संयुक्तिक नाही. आपटे याला वाचवण्यासाठी हा एन्काऊंटर होता का याची शंका निर्माण होत आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. सरकारने उज्वल निकम यांची नियुक्ती केली होती त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे, असे ते म्हणाले.
-
संजय राऊत यांच्यावर संजय शिरसाट यांची टीका
एक शिंदेचा एन्काउंटर दुसऱ्या शिंदेने केला मी दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करणार असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. संजय राऊत यांच्या डोक्यात झालेला परिणामाची ही लक्षण आहेत. इतका महामूर्ख माणूस राजकारणात सुद्धा बोलू शकतो हे फक्त उबाठांमध्येचं दिसून येत आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
-
अक्षय शिंदे याने पोलिसांवर जीव घेणा हल्ला केला
अक्षय शिंदे याने पोलिसांवर जीव घेणा हल्ला केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो मारल्या गेल्याची माहिती पोलिसांच्या पीआरओंनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. 16 सप्टेंबरपासून जरांगे पाटील उपोषणावर आहेत. तर मध्यंतरी त्यांनी मंत्री शंभुराज देसाई यांच्या आग्रहा खातर सलाईन घेतले होते. पण उपोषणावर ते अजूनही ठाम आहेत.
-
संजय राऊत मनमाड शहरात
शिवसेना खा.संजय राऊत यांचे मनमाड शहरात आगमन झाले. जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाचे त्यांनी उद्घाटन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शिवसेना कार्यकर्त्यांकडून खा.राऊत यांचे जल्लोषात स्वागत केले.
-
रामदास चारोस्कर यांच्या पत्नीचा शरद पवार गटात प्रवेश
माजी आमदार ठाकरे सेनेचे नेते रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटातून सुनीता चारोस्कर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता.
-
नांदेडमध्ये भाजपा आमदाराला पक्षातूनच आव्हान
भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना पक्षातूनच आव्हान. जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील यांनी निवडणूक लढण्याची केली घोषणा. आपण पक्षाकडे उमेदवारी मागणार असून पक्षाने उमेदवारी दिली नाही तर दुसरा विचार करण्याची भूमिका.
-
अक्षय शिंदे एन्काऊंटवर रामदास आठवले काय म्हणाले?
“अक्षय शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय होता. माणुसकीला कलंक लावणारी ती घटना होती. मी मागणी केली होती की, त्याला फाशी व्हायला पाहिजे. पोलिसांवर हल्ला करण्याचा त्याचा प्रयत्न होता. म्हणून त्याच्यावर गोळी झाडावी लागली” असं रामदास आठवले म्हणाले.
-
आम्ही चांगल्या योजना देण्याचे रेकॉर्ड केले – अजित पवार
“आम्ही चांगल्या योजना देण्याचे रेकॉर्ड केले. कुठल्या मायचा लाल आपलं रेकॉर्ड तोडू शकणार नाही. लाडकी बहीण योजना आणल्यावर विरोधक म्हणले हा चुनावी जुमला आहे. आम्ही लाडक्या बहिणीचे दोन महिन्याचे डायरेक्ट पैसे दिले. डायरेक्ट खात्यावर पैसे जमा केले. विरोधक म्हणतात ही फसवी योजना आहे आणि कोर्टात गेले” असं अजित पवार म्हणाले.
-
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मुंब्रा बायपास याठिकाणी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे.
-
राज ठाकरे सलमान खानच्या घरी दाखल
राज ठाकरे सलमान खानच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये दाखल झाले आहेत. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांची ते भेट घेणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सलीम खान यांना धमकी मिळाली होती.
-
हातात बेड्या असणाऱ्या आरोपीने बंदुक काढलीच कशी? सुषमा अंधारेंचा सवाल
“शिरसाट यांनी या सर्व प्रकरणावर प्रश्न उपस्थित केलाय. आरोपीने हातात बेड्या असताना बंदुक काढलीच कशी”, अशा सवाल सुषमा अंधारे यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी केलाय.
-
नाशिक विद्यार्थिनी आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकारी पोलिसांना देणार निवेदन
नाशिक- शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शिव स्वराज्य यात्रा नाशिकमध्ये होत असून या यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाशिक पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत. मागील आठवड्यात नाशिकच्या के के वाघ कॉलेजच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून मागणी करण्यात येणार आहे.
-
मातोश्रीवर लवकरच बैठक सुरू होणार
मातोश्रीवर लवकरच बैठक सुरू होणार आहे. भास्कर जाधव यांच्यासह इतर ग्रामीण भागातील नेतेही दाखल झाले आहेत. वैभव नाईक यांच्यासह सिंधुदुर्गातील अनेक कार्यकर्ते मातोश्रीवर पोहोचले आहेत.
-
कुणाला तरी वाचवण्यासाठी अक्षयचा बळी घेतला का ? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
आरोपी अक्षयला कोणत्या चौकशीसाठी नेलं जात होतं ? पोलिसांच्या मांडीला गोळी कशी लागली ? कुणाला तरी वाचवण्यासाठी आरोपीचा बळी घेतला का ? असे सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी संशय व्यक्त केलाय.
-
मालवण राजकोट येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू.
मालवण राजकोट येथे महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राजकोट किल्ला येथे नव्याने शिवपुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कणकवली यांनी ही निविदा प्रक्रिया केलेली आहे.
राजकोट किल्ला येथे उभारण्यात आलेला शिव पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्यानंतर तीव्र स्वरूपात शिवभक्तांच्या भावना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात उमटल्या होत्या.
-
सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसाळे बंधारा गेला वाहून
सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे बंधारा वाहून गेला. त्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला असून ये-जा करण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
-
मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवली
संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक, मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवली
-
मराठा कार्यकर्त्यांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवली
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांची खुर्ची पेटवली आहे. तहसीलदाराच्या दालनातून खुर्ची बाहेर आणून खुर्ची पेटवली आहे. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात खुर्चीवर पेट्रोल ओतून तहसीलदारांची खुर्ची पेटवली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी खुर्ची पेटवली आहे. खुर्ची पेटवून फुलंब्री तालुक्यात तीव्र आंदोलन केलं जात आहे.
-
अजित पवारांकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे. अजित पवार गटाकडून 288 मतदारसंघांचा सर्व्हे करण्यात येत आहे. काल रात्री देवगिरीवर पार पडली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रमुख नेते उपस्थित होते. 288 मतदार संघाबाबत अजित दादांनी नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. महायुतीत असतानाही अजित पवारांच्या पक्षाकडून राज्यातील सगळ्या मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे. या आठवड्यातच निर्णय घ्या, अशी मागणी पक्षातील नेत्यांनी अजित दादांकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
-
अमित शाह नागपूर दौऱ्यावर
केंद्रिय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये विदर्भातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक अमित शाह घेणार आहेत. भट सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात स्वागताचे बॅनर पोस्टर लावण्यात आले आहेत. साधारणता दोन वाजता अमित शहा नागपूरात दाखल होऊन भट सभागृहात येणार आहेत. विदर्भातील जवळपास 1500 पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय महत्त्वाची अशी समजली जात आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला आहे.
-
वसई -विरार रिमझिम
वसई -विरारमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. रिम-झिम पाऊसासह अधून-मधून जोरदार पाऊस पडत आहे. परिसरात आभाळ पूर्णतः भरून आले असून हवेत गारवा पसरला आहे. विरार ते चर्चगेट लोकल सेवा आणी शहरतील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
-
Maharashtra News: माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी करणार शरद पवार गटात प्रवेश
माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी करणार शरद पवार गटात प्रवेश.. सुनीता चरोस्कर करणार पक्ष प्रवेश.. सुनीता चारोस्कर गेल्या 10 वर्षांपासून समाज कल्याण सभापती… सुनीता चारोस्कर दिंडोरी विधानसभा निवडणूक लढण्यास आहेत इच्छुक..
-
Maharashtra News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज करमाळा दौरा
करमाळयाचे आराध्य दैवत आई कमलाभवानी देवीचे दर्शन… करमाळयाच्या नवीन तहसिल कार्यालयाच्या भूमिपूजन.. झरे फाटा ते वेणेगाव रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन.. झरे फाटा येथे महिला व शेतकरी मेळाव्याचे आयोजन…
-
Maharashtra News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात… पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 तारखेला पुणे दौऱ्यावर… पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा… सभेसाठी सभामंडप आणि स्टेज उभारण्याचे काम सुरु… 26 तारखेला मोदींच्या हस्ते पुण्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन
-
Maharashtra News: बदलापूर रेल्वे स्थानकावर शिवसेना शिंदे गटाने पेढे भरवत फटाके वाजवत केला आनंद उत्सव साजरा
अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापुरामध्ये आनंद साजरा करण्यात आला. तब्बल आठ तास ज्या रेल्वेस्थानकावरती बदलापूरकर फाशीची मागणी करत होते. त्याच रेल्वे स्टेशनवर आता एन्काऊंटरचा उत्सव आनंदात साजरा करत पेढे वाटून फटाके वाजवत आनंद साजरा करत आहेत…
-
Maharashtra News Live : दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा उद्या दिवसभर बंद राहणार, महापालिकेची माहिती
पुणे – गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणी पुरवठा दिवसभर बंद राहणार
– कात्रज येथे मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार,
– यामध्ये बालाजी नगर, पुण्याई नगर, काशिनाथ पाटील नगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा या भागाचा समावेश
– शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल,
– महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची माहिती
-
Maharashtra News Live : खेड-आळंदी विधानसभा मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा
– खेड-आळंदी विधानसभा मतदार संघावर ठाकरे गटाचा दावा
– खेड तालुक्यातील पदाधिकारी आणि इच्छुक नेत्यांनी घेतली संजय राऊतांची भेट
– विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदारसंघ शिवसेनेला कसा अनुकूल आहे याची माहिती यावेळी राऊतांना देण्यात आली
– महाविकास आघाडीतील ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही
-
Maharashtra News Live : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर
नागपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नागपूर दौऱ्यावर
विधान सभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भातील सर्वच विधानसभा पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक
विदर्भातील 1500 पदाधिकारी असणार बैठकीला उपस्थिती
आजी माजी आमदार खासदारांचा असणार समावेश
विदर्भात लोकसभा निवडणुकीत भाजप ला कमी मताधिक्य मिळालं होतं, त्यावर सुद्धा चर्चा होऊन मताधिक्य वाढविण्यावर मंथन होण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असणार ही अतिशय महत्त्वाची बैठक
निवडणुकीला कशा प्रकारे समोर जायचं विरोधकांना कसा प्रकारे उत्तर द्यायचं यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे
-
Maharashtra News Live : आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार
अक्षय शिंदेचा कळवा रुग्णालय येथे करण्यात येत आहे पंचनामा
पोस्टमार्टम हे जे जे रुग्णालयात करण्यात येणार आहे काही वेळात
पोस्टमार्टम नंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात येणार आहे..
-
Maharashtra News Live : ठाणे पोलीस आयुक्तांनी घेतली जखमी पोलीस अधिकाऱ्यांची भेट
ठाणे : ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्या जखमी पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटीला
मध्यरात्री ज्युपिटर या खाजगी रुग्णालयात घेतली भेट
पोलीस अधिकाऱ्यांची योग्य ती काळजी घेण्याची केली सूचना
Published On - Sep 24,2024 8:27 AM





