Maharashtra Breaking News LIVE 2 September 2024 : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

| Updated on: Sep 02, 2024 | 11:08 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 2 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 2 September 2024 : मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सध्या महायुती आणि महाविकासआघाडी या दोघांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. घटक पक्षांना किती जागा द्यायच्या? कोणत्या जागेवर कोणता उमेदवार योग्य? याचीही चाचपणी सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली. पुण्यातील नाना पेठ येथील डोके तालमीच्या समोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिंगोली, यवतमाळ, लातूर, भुसावळ, नांदेड या भागात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती पाहायला मिळत आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Sep 2024 09:34 PM (IST)

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.

  • 02 Sep 2024 06:52 PM (IST)

    कॅनडामधील प्रसिद्ध गायक एपी धिल्लन यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार

    कॅनडामधील प्रसिद्ध गायक एपी ढिल्लन यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाल्याची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगरचे घर व्हिक्टोरिया बेटावर आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून, सुरक्षा यंत्रणा तपास करत आहेत.

  • 02 Sep 2024 06:37 PM (IST)

    पीएम मोदी बनले भाजपचे पहिले सदस्य, शाह-राजनाथ यांनीही घेतली सदस्यत्व

    भारतीय जनता पक्षाने आज संघटना पर्व, सदस्यत्व अभियान 2024 ला सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम पक्षाचे सदस्यत्व घेतले. यानंतर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी पुन्हा पक्षाचे सदस्यत्व घेतले. या कार्यक्रमात पीएम मोदी म्हणाले की, आज सदस्यत्व मोहिमेची दुसरी फेरी सुरू होत आहे. भारतीय जनसंघापासून आतापर्यंत आम्ही देशात नवी राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 02 Sep 2024 06:18 PM (IST)

    रेल्वे मार्गाच्या मंजुरीमुळे धुळ्यात भाजपकडून जल्लोष..

    केंद्रीय मंत्रिमंडळाने मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे धुळ्यात भाजपकडून जल्लोष करण्यात आला आहे. माजी खासदार सुभाष भामरे यांच्या नेतृत्वात फटाके फोडून भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील झाशीची राणी पुतळ्याजवळ भाजपकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

    रेल्वे मार्गाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. खासदारकीच्या गेल्या दहा वर्षाच्या कार्यक्रमात रेल्वे मार्ग व्हावा म्हणून प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया सुभाष भामरे यांनी यावेळेस दिली. तसेच भामरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले.

  • 02 Sep 2024 06:10 PM (IST)

    सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका

    सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे आणि त्यांच्या चाराने-बाराने यांच्यावर मला जास्त बोलायचं नसल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. नारायण राणे यांची जेव्हा अविघ्न पार्कची फाईल किरीट सोमय्या यांनी काढली तेव्हा पहिल्यांदा लोटांगण घालणारे हेच राणे आहेत. जे राणे आज बोलतात त्यांच्यात काहीच नवीन मुद्दे नाहीत, असंही अंधारे म्हणाल्या.

    तसेच नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बोलतात. त्याचच फडणवीसांनी सभागृहाच्या पटलावर कित गुन्हे दाखल आहेत हे सांगितलं होतं. शाऊटींग ब्रिगेड म्हणणार नाही, पण राणेंची सालगड्यापेक्षा वाईट अवस्था आहे, असं दिवस कोणावर येऊ नयेत, असंही अंधारे म्हणाल्या.

  • 02 Sep 2024 05:56 PM (IST)

    देशात आजपासून भाजपच्या सदस्यता अभियानाला सुरुवात

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. मोदींनी मोबाईलद्वारे सदस्यत्व स्वीकारलं आहे. देशात आजपासून भाजपच्या सदस्यता अभियानाला सुरुवात झाली आहे. मोदी पक्षाचे पहिले सदस्य बनले आहेत. अमित शहा, राजनाथ सिंह यांनीही मोबाईल वरून मिस कॉल देऊन सदस्यत्व स्वीकारलं आहे.

  • 02 Sep 2024 05:45 PM (IST)

    धुळ्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा

    धुळ्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यंदा चांगला पाऊस पडल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजाला रंगीबेरंगी रंगाची झूल टाकून सजवले आहे. शेतकऱ्यांनी गावातील मारुतीच्या मंदिराला बैलाला प्रदक्षिणा घातली. तसेच वाजत गाजत बैलांची काढली मिरवणूक काढली आहे. सुवासिनींनी बैलांची पूजा केली. बैलांना पुरणपोळीचा खाऊ घातला. एकंदरीत पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी यावर्षी सुखावला आहे.

  • 02 Sep 2024 05:19 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात दाखल

    भाजपच्या सदस्यता अभियानाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत. स्वत: पंतप्रधान मोदी सदस्यता अभियानाची सुरुवात करणार आहेत. त्यासाठी भाजपचे सगळे वरिष्ठ नेते मुख्यालयात दाखल झाले आहेत.

  • 02 Sep 2024 05:13 PM (IST)

    श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    प्रक्षोभक भाषण प्रकरणी नितेश राणेंवर श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. श्रीरामपूर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार नितेश राणे यांनी या निषेध सभेत जातीय तेढ निर्माण करणारे आणि धार्मिक भावना दुखावणारं भाषण केलं होतं. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (२) नुसार हा गुन्हा दाखल केला गेला आहे.

  • 02 Sep 2024 02:54 PM (IST)

    अजित पवार यांचे अत्यंत मोठे विधान

    भष्ट्राचाराचा आरोप कुणी करता कामा नये, पुन्हा महायुतीचे सरकार आले तर योजना कायम सुरु राहणार. सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार आहे, आम्ही गरिबी भोगली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

  • 02 Sep 2024 02:30 PM (IST)

    कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो- अजित पवार

    सर्व जाती धर्मातील लोकं गुण्या गोविंदाने राहतात. मी कधीही जाती पातीचा विचार केला नाही. गुलाबी रंग आवडतो तुम्हाला. काय त्रास होतो. महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे, त्यामुळे महिला. धोरण आणलं, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

  • 02 Sep 2024 02:12 PM (IST)

    आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा समिती स्थापन

    समिती शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार. पंजाब हरियाणा शंभू सीमा पुन्हा खुली करण्याचे प्रकरण. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात राज्य सरकारने बंद केली होती सीमा. त्याविरोधात पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने सीमा खुली करण्याचे आदेश दिले होते

  • 02 Sep 2024 02:02 PM (IST)

    नांदेड शहरातील अनेक भागात पाणीबानी

    घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य भिजलं. मत मागायला येता आता काय झालं ? महिलांची संतप्त प्रतिक्रिया.

  • 02 Sep 2024 01:54 PM (IST)

    Marathi News: परळीत 48 तासांपासून पावसाची संततधार

    बीडमधील परळी तालुक्यामध्ये गेल्या 48 तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. संततधार पावसामुळे परळी तालुक्यातील दाऊतपुर शिवारामध्ये शेतकरी धनंजय कोकाटे यांच्या सोयाबीनच्या पिकामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.

  • 02 Sep 2024 01:43 PM (IST)

    Marathi News: बीड जिल्ह्यात पाऊस

    बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने अनेक नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वारंगा नदीला पूर आल्याने बेलापूर, शिदोड गावासह चार गावांचा सकाळपासून संपर्क तुटला आहे.

  • 02 Sep 2024 01:30 PM (IST)

    Marathi News: मंत्री मुरलधीर मोहोळ यांची पोलिसांशी चर्चा

    पुण्यात वनराज वांदेकर यांची झालेल्या हत्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांनी पुणे आयुक्तांशी चर्चा केली. गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहराचा कायदा सुव्यवस्थेबाबत तडजोड होणार नाही, असे त्यांनी म्हटले.

  • 02 Sep 2024 01:08 PM (IST)

    Marathi News: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. रक्षेच्या कारणास्तव सकाळी दहा वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. राष्ट्रपतींसाठी मंदिरात रेड कार्पेट अंथरण्यात आले आहे.

  • 02 Sep 2024 12:47 PM (IST)

    नांदेड – हदगाव मधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने घातला वेढा, एसडीआरएफची टीम बचावासाठी दाखल

    नांदेड – हदगाव मधील उंचडा गावाला कयाधू नदीच्या पाण्याने वेढा घातला असून गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. 30 शेतकरी शेतामध्ये अडकले असून एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी दाखल झाली आहे.

  • 02 Sep 2024 12:38 PM (IST)

    नवी दिल्ली – आप पक्षाचे आमदार अमानतुल्लाह यांना ईडीने घेतलं ताब्यात

    आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे.  आज सकाळी ईडीने त्यांच्या घरी रेड टाकली होती, चौकशी सुरू होती.

    दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात खान तपासाच्या फेऱ्यात सापडले आहेत. अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी) ने आप आमदार अमानतुल्लाह खान यांच्या विरोधात दिल्ली वक्फ बोर्डाच्या कामकाजात आर्थिक हेराफेरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

  • 02 Sep 2024 12:28 PM (IST)

    कोल्हापूर – शरद पवार यांचा आज पासून चार दिवस कोल्हापूर दौरा

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज पासून चार दिवस कोल्हापूर दौरा सुरू होत आहे. शरद पवार यांचं कोल्हापुरात आगमन झालंअसून  समरजित घाटगे यांनी त्यांच्या स्वागताला हजेरी लावली आहे.

  • 02 Sep 2024 12:09 PM (IST)

    भास्कर जाधव आज राजकोट किल्ल्यावर, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

    सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावर नेत्यांचे पाहणी दौरे सुरूच,

    काल जरांगे पाटील, रामदास आठवले यांच्यानंतर आज भास्कर जाधव मालवण राजकोट किल्ल्यावर येणार

    भास्कर जाधव करणार छञपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी

    पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • 02 Sep 2024 11:50 AM (IST)

    सर्वांनाच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत- जय पवार

    बारामतीत अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. सर्वांनाच अजित पवार मुख्यमंत्री म्हणून हवे आहेत, असं जय पवार म्हणाले. विधानसभेनंतर अजित पवार सीएम होतील, अशी आशा जय पवारांनी व्यक्त केली.

  • 02 Sep 2024 11:40 AM (IST)

    बारामतीत जय पवारांची बाईक रॅली

    बारामतीत जय पवारांची बाईक रॅली काढण्यात आली. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त रॅली काढण्यात आली. जय पवारांचं बारामतीत शक्तीप्रदर्शन सुरू आहे.

  • 02 Sep 2024 11:31 AM (IST)

    लातूर- मण्याड नदीला पूर आला असून अहमदपूर ते खंडाळी रस्ता पाण्याखाली

    लातूर- मण्याड नदीला पूर आला असून अहमदपूर ते खंडाळी रस्ता पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. काल सायंकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. शेनकुडजवळचा पूल 18 तासांपासून पाण्याखाली आहे.

  • 02 Sep 2024 11:20 AM (IST)

    धुळे- शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन

    धुळे- शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • 02 Sep 2024 11:10 AM (IST)

    नांदेडमध्ये पाण्याचा हाहाकार, गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    नांदेड- नांदेडमध्ये पाण्याचा हाहाकार, शहरातील मुख्य स्मशानभूमी पाण्याखाली गेली. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • 02 Sep 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशनची पाहणी

    केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्टेशन ची पाहणी… मुळा मुठा नदीच्या खालून भुयारातून मेट्रोमधून प्रवासाचा अनुभव पुणेकरांना येणार… पुणे मेट्रोच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान सर्व स्थानके भुयारी

  • 02 Sep 2024 10:45 AM (IST)

    Maharashtra News: छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील केळणा नदीला पूर

    सिल्लोड तालुक्यातील बोजगाव परिसरात केळणा नदीला तुफान पूर… केळणा नदीवरील छोट्या पूलांवरील वाहतूक केली बंद… छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे केळणा नदीला पूर… नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे नदीच्या पुरामुळे नुकसान…

  • 02 Sep 2024 10:35 AM (IST)

    Maharashtra News: सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी दिला तडकाफडकी राजीनामा

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या व्हाट्सअपवर पाठविला राजीनामा… पक्षांतर्गत गटबजीला कंटाळून राजीनामा दिल्याची पक्षांतर्गत चर्चा… आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाच पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आल्याने निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता… ऐन विधानसभा तोंडाला आलेल्या असतानाच शहराध्यक्षाने राजीनामा दिल्याने प्रदेशाध्यक्ष राजीनामा स्वीकारणार का याकडे लक्ष….

  • 02 Sep 2024 10:18 AM (IST)

    Maharashtra News: शिवरायांच्या इतिहासाबाबत भाजपने चिंतन केलं पाहिजे – संजय राऊत

    शिवरायांच्या इतिहासाबाबत भाजपने चिंतन केलं पाहिजे… राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा समजून शिवरायांनी सुरत लुटली होती… ब्रिटीशांना मगद मिळायची म्हणून शिवरायांनी सुरट लुटली… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 02 Sep 2024 10:12 AM (IST)

    Maharashtra News: गणरायाच्या आगमन सोहळ्यात गौतमी पाटील सोबत गणेशभक्तांनी धरला ठेका

    गणरायाच्या आगमन सोहळ्यात गौतमी पाटील सोबत गणेशभक्तांनी धरला ठेका… चकरेश्वर मित्रमंडळाच्या वतीने प्रितेश पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं… रविवारी 1 सप्टेंबर रोजी चकरेश्वर मित्रमंडळाच्या गणरायाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. गणरायाच्या अगमनावेळी सबसे कातील गौतमी पाटील हिचा डान्स पाहण्यासाठी हजारो गणेश भक्तांनी हजेरी लावली होती..

  • 02 Sep 2024 09:57 AM (IST)

    आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    नांदेडच्या आसना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नांदेडशी वसमत आणि इतर 50 ते 60 गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे.

  • 02 Sep 2024 09:45 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दहेगाव बंगला या गावात घुसले आहे. पावसाचे पाणी गावातील अनेक घरांमध्ये घुसले. पावसाचे पाणी शाळा जिम वाचनालयातही पावसाचे पाणी घुसले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे गावातल्या घरांमध्ये पाणी घुसले. दहेगाव बंगला या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • 02 Sep 2024 09:30 AM (IST)

    अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर पावसाचं सावट

    उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज बारामतीत आहे. जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने बारामतीत जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. अजित पवार, सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार भव्य कटआउट शहरात लावण्यात आले. बाईक रॅली काढत अजित पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • 02 Sep 2024 09:15 AM (IST)

    मुसळधार पाऊस, वाहतुकीवर परिणाम

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय. पावसामुळे महामार्गावरची वाहतूक मंदावली आहे. धुळे सोलापूर महामार्गावर अनेक वाहनांची गती मंदावली आहे. पावसामुळे महामार्गाची दृश्यमानता कमी झाली आहे. मुसळधार पावसाचा महामार्गावरील रहदारीलाही फटका बसला आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील अनेक वाहने रस्त्याच्या कडेला लावलीत.

  • 02 Sep 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra News Live : यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस, पिकांना फटका

    यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसात

    अंदाजे 4 हजाराहून अधिक हेक्टरवर नुकसान

    सर्वाधिक नुकसान घाटंजी तालुक्यात

    त्या पाठोपाठ बाभुलगाव, पुसद, राळेगाव जिल्ह्यातही नुकसान

    कापूस, सोयाबीन, तूर पिकाला सर्वाधिक फटका

  • 02 Sep 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News Live : महाराष्ट्रात 16 लाख 98 हजार 368 नवीन मतदारांची नोंदणी

    महाराष्ट्रात 16 लाख 98 हजार 368 नवीन मतदारांची नोंदणी

    नवीन मतदार नोंदणीचा फायदा कोणाला होणार?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी 9 कोटी 5 लाख मतदार बजावू शकणार मतदानाचा हक्क

  • 02 Sep 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाची संततधार सुरु

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू

    काल सायंकाळपासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पावसाला सुरुवात

    पावसामुळे अद्याप जिल्ह्यात नुकसान नाही

    मात्र प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्याचा आव्हान

    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज

  • 02 Sep 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra News Live : घरणी नदीला पूर, लातूर-उदगीर रस्ता वाहतुकीसाठी बंद

    लातूर : उदगीर – लातूर रस्ता 12 तासानंतरही वाहतुकीसाठी बंदच,

    वाहतूक शिरूर अनंतपाळ आणि चाकूरमार्गे वळवली.

    नळेगाव जवळील पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प

    घरणी नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प.

Published On - Sep 02,2024 8:41 AM

Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.