Maharashtra Breaking News LIVE 10 September 2024 : मनसेप्रमुख राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत आता मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु असल्याचे बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. तर महाविकासाआघाडीच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाबद्दल निर्णय घेतला जाणार आहे. त्यासोबतच राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. तसेच सध्या मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचा लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील समितीची बैठक 18 सप्टेंबर रोजी
वक्फ दुरुस्ती विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीची पुढील बैठक 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. समितीची बैठक 18, 19 आणि 20 सप्टेंबर असे सलग तीन दिवस सुरू राहणार आहे.
-
मणिपूरमध्ये 5 दिवस इंटरनेटवर बंदी
मणिपूर सरकारने आज दुपारी 3 ते 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत पाच दिवसांसाठी राज्यातील इंटरनेट आणि मोबाइल डेटा तात्पुरता निलंबित केला आहे.
-
-
पंजाबमधील भटिंडा येथे दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ
पंजाबमधील भटिंडा येथे दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. कुत्र्याच्या वादातून पिता-पुत्र दोघांची हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी रात्री घडली, मात्र आता याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
-
पंतप्रधान मोदी वाढदिवसानिमित्त तीन शहरांना भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त देशातील तीन शहरांना भेट देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान 17 सप्टेंबरला बनारस, नंतर भुवनेश्वर आणि शेवटी 17 सप्टेंबरला नागपूरला जाणार आहेत.
-
राज ठाकरे सहकुटुंब राजाच्या दर्शनाला
मनसेप्रमुख राज ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांनी सहकुटुंब राजाचे दर्शन घेतलं आहे. गणेशोत्सवाचा आजचा चौथा दिवस आहे. राज ठाकरे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देत आहेत.
-
-
पोलिसांकडून मराठा कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात
संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यपालांना भेटण्यासाठी आलेल्या मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. मराठा कार्यकर्ते सुभेदारी गेस्ट हाऊस येथे राज्यपालांच्या भेटीसाठी आले होते. सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये राज्यपालांची बैठक असल्याने मराठा कार्यकर्ते तिथे पोहचले. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना भेट होऊ शकत नसल्याचा निरोप दिला. पोलिसांकडून मराठा कार्यकर्त्यांना हटवण्याचे प्रयत्न सुरू होते.त्यानंतर अखेर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
-
शरद पवार बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे दाखल
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे दाखल झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील मोहिते आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पवार यांची बैठक सुरू झाली आहे.
-
विरोधकांनी अपप्रचार करुनही महिलांनी लाडकी बहीणीचे अर्ज केले – एकनाथ शिंदे
विरोधकांनी अपप्रचार केला तरीसुद्धा या महिलांनी माझ्यावर विश्वास ठेवून फॉर्म भरला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
नाफेड कांदा घोटाळा, शेतकऱ्याची पंतप्रधानांकडे थेट तक्रार
नाफेड कांदा घोटाळ्याची शेतकऱ्याने पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रार निवारणासाठी नाफेडचे वरिष्ठ अधिकारी पथक पिंपळगाव येथे दाखल झाले असून नाफेडच्या वीणा कुमारी यांनी तक्रारदार शेतकऱ्यांशी संवाद केला
-
विरोधकांकडून खोटा प्रचार- गिरीश महाजन
लाडकी बहीण योजनेसाठी एससी एसटी विभागाच्या निधी कमी करण्यात आलेला नसून, काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काही ठराविक लोक चुकीचा नॅरेटिव्ह सेट करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केलेला आहे.
-
चार जण जखमी, उपचार सुरू
फटाके गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहे. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत फटाक्यांचे गोदाम आणि ट्रक जळून पूर्णपणे खाक झाला आहे. फटाके गोदामाला लागलेल्या आगीत चार कामगार जखमी दोन कामगारांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे.
-
रवी राणा यांचा अजितदादांना सल्ला
ज्या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे. त्याठिकाणी उमेदवाराला थांबवणे यात पक्षाचे मोठे नुकसान होते. म्हणून 25 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत हा भाजपने जो प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव अजित दादाने स्वीकारला पाहिजे. अजित पवार यांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उतरवावा भाजपचे जे मजबूत उमेदवार आहे ते मैत्रीपूर्व निवडणूक लढवतील, असे मत रवी राणा यांनी व्यक्त केले.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेंभी नाका नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीच्या पाट पूजनासाठी कळव्यात पोहोचले आहे. नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीच्या पाट पूजा करून माजी नगरसेवक साळवी याच्या घरी देखील गणेश दर्शनाला मुख्यमंत्री गेले आहे.
-
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जोरात -गिरीश महाजन
महिला मुलींसाठी विविध योजना आणल्या. सर्वसामान्य गरीब माणसाचा जीवनमान बदलण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला. अर्थव्यवस्था दहाव्या अकराव्या नंबर वर होती तिला तिसऱ्या नंबरला आणायचे आहे. दहा वर्षात मोठ्या गतीने काम कुठल्याही देशात एवढ्या गतीने कामे नाहीत, असे ते म्हणाले.
-
अजितदादांच्या फोटोला काळं कापड
बारामतीमधील बुनोडी चौकातील गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला आले नाहीत, त्यामुळे अजितदादांच्या फोटोला काळं कापड टाकण्याचा प्रकार घडला. जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी हा प्रकार केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेवरे यांचा फोटो असलेले बॅनर फाडून टाकले आहे.
-
शिवसेना-भाजपमध्येच जुंपली
शिवसेना नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाठ यांच्या वक्तव्यानंतर भाजपने देखील आक्रमक भूमिका जाहीर केली. नाशिक मधील तिन्ही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे तिन्ही जागा भाजप लढवणार असल्याचे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी जाहीर केले. नाशिकमधून अजय बोरस्ते आमदार होतील असा दावा संजय शिरसाठ यांनी काल केला होता. अजय बोरस्ते नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
-
सुशिलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याने मोठा वाद
युपीए सरकारमध्ये गृहमंत्री असताना सुशिलकुमार शिंदे यांना कश्मीरला जायला भीती वाटत होती अशा आशयाचं विधान सुशिलकुमार शिंदे यांनी केलं आहे. ते म्हणाले की, जेव्हा मी गृहमंत्री होतो तेव्हा मी विजय धर यांची भेट घेत होतो. त्यांनी मला सल्ला दिला… सुशिल तू इकडे तिकडे भटकू नको…
-
पहिल्या टप्यात 25 लाख लाखपती दीदी बनवणार- देवेंद्र फडणवीस
पहिल्या टप्यात 25 लाख लाखपती दीदी बनवणार तर पुढे एक कोटीपेक्षा अधिक लखपती तयार करणार. 10 लाख मुलांना रोजगार देणार आहेत. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार बोनस देणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
-
गिरीश महाजन यांनी केले अत्यंत मोठे विधान
1999 ला सुलवाडे जामफळ प्रकल्पला प्रशासकीय मान्यता त्यानंतर कामं झाले नाही. युती शासन आले तेव्हा 2500 कोटीला मान्यता. आघाडीच्या काळात फक्त 26 कोटी मिळालेलं, युती शासन काळात या प्रकल्पला गती मिळाली, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
-
Maharashtra News: नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग
नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग… आग कशामुळे लागली कारण अस्पष्ट… पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल… आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू…
-
सरकारी वकील ॲड तुषार भणगे यांनी काय माहिती दिली?
आरोपी जयदीप आपटे विसंगत माहिती देतोय. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी मागीतली होती, परंतु न्यायालयाने 13 तारखेपर्यंत (तीन दिवसांची)पोलीस कोठडी सुनावली आहे, तर आरोपी चेतन पाटील याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. नवीन कायद्यानुसार पोलिसांना जेव्हा हा आरोपी हवा असेल त्यावेळी न्यायालयाच्या परवानगीने पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात.
-
गोंदिया जिल्ह्यात पूर, तिघांना वाचवण्यात यश
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. शिरपूर जवळील गावात पुरात दोन पुरुष आणि एक महिला हे अडकले होते. त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम ही दाखल झाली असून या तीनही पूर पीडितांना वाचवण्यात यश प्राप्त झाले आहे. त्यांना सुखरूप स्थळी सोडण्यात आले आहे.
-
जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
काही दिवसांपूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या प्रकरणात आरोपी चेतन पाटील याची न्यायालयीन कोठाडीत रवानगी करण्यात आली आहे, तर जयदीप आपटे याला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
-
जयदीप आपटे, चेतन पाटील यांना मालवण दिवाणी न्यायालयात केलं हजर
सिंधुदुर्ग- जयदीप आपटे आणि चेतन पाटील या आरोपींची पाच दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्यांना मालवण दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आलं. जयदीप आपटे यांची पत्नी आणि आई, तर चेतन पाटील यांचे बंधूही सुनावणीसाठी आले आहेत.
-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा, फळे, भाजीपाल्याचे लिलाव बंद
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा, फळे, भाजीपाल्याचे लिलाव बंद झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या निर्णयाविरोधात हमाल, माथाडी कामगारांनी संप पुकारला आहे. हमाल आणि माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारला आहे.
-
भाजपात प्रवेश देण्याची कधी विनंती केली नाही- खडसे
“भाजपात प्रवेश देण्याची कधी विनंती केली नाही. काहींनी माझ्या प्रवेशाला विरोध केला. महाजन आणि फडणवीसांकडून विरोध असू शकतो,” असं एकनाथ खडसे म्हणाले.
-
मी भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे कोअर कमिटीत जाण्याचा प्रश्न नाही- खडसे
“नड्डा मोठे की भाजपचे राज्यातील नेते मोठे असा मनात प्रश्न आहे. मी भाजपमध्ये कधीही प्रवेश केला नाही. मी शरद पवारांच्या पक्षातच आहे. मी भाजपचा सदस्य नाही, त्यामुळे कोअर कमिटीत जाण्याचा प्रश्न नाही,” असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलंय.
-
नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता
नाशिक, नगर आणि मराठवाड्यातील पाणी वाटपाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. जायकवाडीसाठी नाशिकमधून पाणी न सोडण्याच्या याचिकेवर एका महिन्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समन्यायी पाणीवाटपाच्या प्रश्नावर गोदावरी अभ्यास गटाला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
जायकवाडी धरणात नाशिकमधून पाणी सोडण्याच्या मेंढीगिरी समितीच्या अहवालातील शिफारशी कालबाह्य ठरवण्यात आल्या आहेत. नव्यानं अभ्यास करून अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने अभ्यास गटाला दिले आहेत. तर नवीन अहवाल आल्याशिवाय जायकवाडीला पाणी देणार नाही असा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे.
-
गोंदिया जिल्ह्यातील खाजगी, सरकारी शाळांना सुट्टी जाहीर
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने जिल्हाधिकारी यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. काल रात्रीपासून गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
-
मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार सुरू
मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी ते लावून धरणार आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून जरांगे हे पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत.
-
ठाण्यात बस मेट्रोच्या पिलरला धडकली, 11 किरकोळ जखमी
ठाण्यात ओवळा सिग्नलजवळ एसटी बस मेट्रोच्या पिलरला धडकली, या अपघातात 11 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यांच्यावर वेदांत, रमानंद आणि टायटन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही बस आहे. अग्निशामक दल, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बस बाजूला काढली, त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
-
गणेशोत्सवानंतर जागावाटपाबाबत चर्चा होणार – जयंत पाटील
मविआच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत उत्सुकता आहे. गणेशोत्सवानंतर जागावाटपाबाबत चर्चा होणार असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
-
अमित शाहांशी काय चर्चा झाली, अजित पवार काय म्हणाले ?
अमित शाह मुंबईत आले म्हणून भेट घेतली, त्यांच्याशी मुख्यमंत्रीपदाबाबत कुठलीही चर्चा झाली नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ती बातमी धादांत खोटी आहे. जागावाटपाचं फायनल ठरलं की मी तुम्हाला सांगणार, असंही ते म्हणाले.
-
नागपूर अपघात : त्यावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होता
नागपूर अपघाताप्रकरणी चौकशी सुरू आहे. अपघात झाला तेव्हा अर्जुन हावरे हा ड्रायव्हिंग सीटवर होता, संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर तर रोहित हा कारमध्ये मागच्या बाजूस बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
-
संजय राऊत 12 तारखेला नांदेड व सोलापूर दौऱ्यावर
संजय राऊत 12 तारखेला नांदेड व सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. तर 15 तारखेला उद्धव ठाकरे व संजय राऊत पैठणमध्ये असतील.
-
शिवसेना, राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर
शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आजची सुनावणी आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता आहे.
-
Maharashtra News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेतंर्गत बंदिस्त नलीका वितरण प्रणालीचं भूमिपूजन… सकाळी 11.00 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडणार…
-
Maharashtra News: ठाण्यात पवसाची जोरदार हजेरी
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ठाण्यात आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे… सकाळपासूनच ठाण्यात ढगाळ वातावरण सह रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र मागील पंधरा मिनिटांपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे… पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे…
-
Maharashtra News: चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी
सकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाची सर्वत्र हजेरी… गौरी, गणपतीच्या ऐन उत्सवात पावसाचा जोर वाढला… सामान्य जनजीवन विस्कळीत… गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर खरिपातील सोयाबीन, कापूस, मीरची या शेतीपिकांना बसला फटका…
-
Maharashtra News: गाडीचा मालक बावकुळेंचा मुलगा, मग FIR मध्ये नाव का नाही? संजय राऊत
गाडीचा मालक बावकुळेंचा मुलगा, मग FIR मध्ये नाव का नाही? विरोधी पक्षाच्या नेत्याचा मुलगा असता तर? नागपुरातील अपघातावेळी कार कोण चालवत होतं? बारमधील सीसीटीव्ही फुटेज गायब, नंबरप्लेट काढली… लाहोरी बारचं सीसीटीव्ही तपासा, कोण दारू पीत होतं? असे अनेक प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आहे.
-
जायकवाडी धरण भरलं; गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मराठवाड्याची तहान भागविणारे पैठणचे जायकवाडी धरण 98 टक्के भरलं आहे. त्यामुळे काल एकूण 27 दरवाज्या पैकी 12 दरवाजे उघडण्यात आले. त्यामधून गोदावरी नदी पात्रात 6288 क्यूसेकने पाणी सोडण्यात आलं आहे. जुलै महिन्यात याच धरणाचा जलसाठा हा 4 टक्क्यावर आला होता. मात्र नाशिक आणि नगर जिल्ह्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे त्याबरोबरच जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात दमदार हजेरी लावल्यामुळे मागील 46 दिवसात नाथ सागर हा तुडुंब भरल्याने जलसंकट दूर झाले.दरम्यान धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
-
डिझेलचा टँकर रस्त्यावरून जात असतानाचा व्हीडिओ व्हायरल
गोंदिया जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वाघनदी काठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे. लोहारा जवळील वाघ नदीपात्रामध्ये एक डिझेलचा टँकर रस्त्यावरून जात असताना पाण्यात वाहत असलेला व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला आहे. वारंवार प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा देऊ नये, या ट्रक चालकाने पुलावरून पाणी वाहत असताना आपला ट्रक टाकला आणि पाण्यामध्ये वाहून गेला आहे. अशी माहिती प्राप्त झाली आहे आणि हा व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
-
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजितदादा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाची मागणी करणार नाहीत. कुणीतरी ही खोटी बातमी पसरवली असेल, असं जयंत पाटील म्हणाले.
-
जयदीप आपटेबाबत महत्वाची अपडेट
राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणातील अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलची आज पोलीस कोठडी संपणार आहे. मालवण राजकोट येथील छत्रपतींचा पुतळा दुर्घटना प्रकरणी पोलीस कोठडी संपत असल्याने सल्लागार चेतन पाटील याला तिसऱ्यांदा मालवन पोलीस न्यायलायासमोर हजर करणार आहेत.
-
Maharashtra News LIVE : ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, सकाळपासूनच मुसळधार
ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ठाण्यात आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे .
सकाळपासूनच ठाण्यात ढगाळ वातावरण सह रिमझिम पाऊस सुरू होता, मात्र मागील पंधरा मिनिटांपासून पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पाऊस पडण्यास सुरवात झाली आहे .
-
Maharashtra News LIVE : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा १० नोव्हेंबरला, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु
राज्य शिक्षक पात्रता परीक्षा होणार १० नोव्हेंबरला
शिक्षक भरतीसाठी पात्रता म्हणून ही परीक्षा घेतली जाते
सध्या राज्य परीक्षा परिषदेकडे याच काम देण्यात आलं आहे
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे
३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे
२८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत हॉल तिकीट मिळणार आहे
-
Maharashtra News LIVE : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच
पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच
हडपसर गावात दोन तरुणाना हातात कोयता घेवून फिरत असताना तरुणांनी पकडला
पोलिसांच्या ताब्यात दिलं
दोन जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गेल्या आठवड्यात कोयट्याने हल्ला करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे
-
Maharashtra News LIVE : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेक घरात घुसले पाणी
गोंदिया जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस…. पावसामुळे गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसरात पाणीच पाणी… अनेक घरात घुसले पाणी… अनेक गणपती मंडळायुक्तही पाणी साचला… नागरिकांची रात्रीपासूनच मोठी तारांबळ…
-
Maharashtra News LIVE : पुणे मेट्रोला बाप्पा पावला, एक लाख 48 हजार प्रवाशांचा मेट्रोने प्रवास
पिंपरी चिंचवड -पुणे मेट्रोला बाप्पा पावला सुट्टीच्या दिवशी एक लाख 48 हजार प्रवाशांचा मेट्रोने प्रवास
-पिंपरी चिंचवड शहरातून पुणे शहरातील देखावा पाहण्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मेट्रो प्रशासनाने गणेशोत्सव काळात मध्ये रात्री बारापर्यंत मेट्रो चालू ठेवण्याचा निर्णय घेतला
-याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रविवारी पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनास ते रामवाडी या दोन्ही मेट्रो मार्गावर 1 लाख 48 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला
-
Maharashtra News LIVE : बनावट दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल
अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी पाथर्डी तालुक्यातील चार जणांवर गुन्हा दाखल
जिल्हा रुग्णालयाचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून शासकीय पोर्टलवर खोटी माहिती भरत मिळवले प्रमाणपत्र
प्रसाद बडे ,सुदर्शन बडे ,गणेश पाखरे,सागर केकाण अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे
जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल
-
Maharashtra News LIVE : सोलापूर महापालिकेची थकीत कर वसुलीची धडक मोहीम सुरु
– सोलापूर महानगरपालिकेची थकीत कर वसुलीची धडक मोहीम सुरू
– मनपाकडून कुमठा नाका येथील पेट्रोल पंप करण्यात आला सील.
– पेट्रोल पंप मालक अर्जुन नागदेव यांची 13 लाख 28 हजार रुपयांची थकबाकी आहे
– थकबाकी न भरल्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पंप सील करण्यात आला
– मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मजरेवाडी, कुमठा नाका परिसरात थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करण्यात आली
-
Maharashtra News LIVE : गडचिरोली भामरागड तालुक्यात पूरस्थिती, राष्ट्रीय महामार्ग बंद
गडचिरोली भामरागड तालुक्यात गंभीर पूर परिस्थिती, 60 ते 70 घरे पाण्याखाली
सध्या भामरागडमध्ये पाऊस नसला तरी छत्तीसगडमध्ये सुरु असलेला मुसळधार पावसाचा फटका इंद्रावती आणि पर्लाकोटा नदीला बसत आहे
आलापल्ली भामरागड छत्तीसगड जाणारा राष्ट्रीय महामार्ग दोन ठिकाणाहून बंद
सिरोंचा छत्तीसगडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग सोमनपल्ली पासुन बंद
-
मुख्यमंत्री ‘लाडक्या बहिणीं’च्या दारी; आजपासून कुटुंब भेट मोहीम सुरू
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट’ मोहिमेची आज सुरुवात केली. यामाध्यमातून राज्य सरकारच्या दहा महत्त्वपूर्ण योजनांचा प्रचार घरोघरी होणार आहे. शिवसैनिक दररोज १५ कुटुंबांना भेट देणार असून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींसह योजनेत सामावून न घेतलेल्या कुटुंबांनाही मदत मिळणार आहे.
Published On - Sep 10,2024 8:31 AM