Maharashtra Breaking News LIVE 9 September 2024 : बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन झापलं
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात प्रचंड वेगाने हालचाली सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आले आहेत. अमित शाहा हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यानंतर त्यांनी तातडीने भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली. त्यानंतर आज ते लालबागचा राजाचे दर्शन करणार आहेत. त्यासोबतच अमित शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही भेट देणार आहेत. तर दुसरीकडे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल पदाचा पदभार घेतल्यानंतर सी पी राधाकृष्णन पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर जात आहेत. तसेच सध्या गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार
इगतपुरी : नवीन कसारा घाटात बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात कोंबड खत घेऊन जाणाऱ्या ट्रकची दोन कारला धडक बसली आहे. धडक दिल्यानंतर ट्रकने पेट घेतला आहे. अपघातात कारमधील एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रसंगावधान राखत ट्रक चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारल्याने तो बचावला आहे. महामार्ग पोलिस केंद्र घोटी, कसारा पोलिस, रूट पेट्रोलिंग टीम, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल महिंद्रा अँड महिंद्रा अग्निशमन दल व टोलनाक्याच्या अग्निशमन दलाने एक तासाच्या अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे.
-
दारु घोटाळा प्रकरणात व्यापारी समीर महेंद्रूला जामीन
दिल्लीच्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने आरोपी व्यापारी समीर महेंद्रू आणि चनप्रीत सिंग यांना जामीन मंजूर केला.
-
-
यूपीमध्ये निवडणूक ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा अतिरिक्त पगार मिळणार
निवडणूक ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार मिळेल, असा आदेश उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने जारी केला आहे. यासाठी 11 कोटी 54 लाख रुपये खर्च होणार असून 2217 राज्य कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. प्रधान सचिव निवडणूक नवदीप रिनवा यांनी हा आदेश जारी केला.
-
दिल्लीत यंदाही दिवाळीत फटाक्यांवर बंदी असणार
हिवाळ्यातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या दिवाळीतही फटाक्यांची बंदी कायम राहणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले की, हिवाळ्याच्या काळात दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केजरीवाल सरकारने गेल्या वर्षीप्रमाणेच फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वापरावर पूर्ण बंदी घातली आहे.
-
NEET परीक्षा पुन्हा आयोजित करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
सुप्रीम कोर्टाने NEET परीक्षा पुन्हा घेण्याबाबतची याचिका पुन्हा फेटाळली आहे. 7 विद्यार्थ्यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती. सीजेआय खंडपीठाने याचिका फेटाळली आणि सांगितले की आता समुपदेशन झाले आहे. आता आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही.
-
-
बच्चू कडुंचा शेती बांधावरून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, घरी घुसण्याचा इशारा
परभणीत आमदार बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं आहे. बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन झापलं. “नदी काठावरचं पहिलं घर, तरी त्याला सानुग्रह अनुदान नाही. तलाठ्याकडून 3 तारखेला केलेले पंचनामे 9 तारखेपर्यंत दाखल नाहीत. अन्यथा तुमच्या घरी येऊन बसावं लागेल”, असा इशारा कडुंनी दिला. बच्चू कडू मानवतमधीलर रामेटाकळीमधील नुकसानीची पाहणी करत होते. यावेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन झापलं. यावेळेस कडुंसोबत संभाजीराजे आणि राजु शेट्टीही उपस्थित होते.
-
राजेंद्र राऊत यांचा आमदार रोहीत पवारांवर गंभीर आरोप
आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार रोहीत पवारांवर गंभीर आरोप केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे रोहीत पवारांचा हात आहे, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच बार्शीतील तरुणावर झालेल्या हल्ल्याबाबत मला कल्पना नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
-
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार
नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्री अनिल पाटिल आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मला मुख्यमंत्री आणी उपमुख्यमंत्री यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात येणार असून त्याचा अहवाल सरकारकडे पाठवणार आहे.
-
चोरी करताना चार महिलांना अटक
मजले गावच्या हद्दीत लक्ष्मी मागासवर्गीय संस्थेत चोरी करत असताना चार महिलांना रविवारी मध्यरात्री दोन वाजता हातकलंगले पोलीस ठाण्यातील गस्ती पथकाने पकडून कारवाई केली. याबाबतची तक्रार रविवारी सकाळी हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.
-
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत मेळावा
बीड विधानसभा मतदारसंघात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्यांक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थिती लावलीय.
-
अमोल मिटकरी यांच्याकडून मोठा खुलासा
काल अजित पवार यांचे बारामतीत ठरलेले कार्यक्रम होते. आज अजित पवार मुंबईत आले आहेत. अजित पवार हे अमित शहासोबत त्यांना सोडायला विमानतळवर जातील, असे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
-
शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा
एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची शरद पवार यांच्यावर टीका
-
तीनही गॅजेटची मागणी केली आहे, तिन्ही गॅजेट हे सरकारी नोंदीतले आहेत- जरांगे पाटील
सरकारी नोंद घ्यायला तुम्हाला हरकत काय अस मी अब्दुल सत्तार यांना बोललो. नोंदी सापडत आहेत तुम्ही रेकॉर्ड शोधले नाही असे मी सांगितलं. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र म्हणजे 83 क्रमांका नुसार द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
-
गणपती दर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा
गणपती दर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. या दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर आहेत.
-
ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांची कबुली- सुप्रिया सुळे
“कालच्या दिवसात महाराष्ट्र सरकारकडून दोन विधानं आली. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की सरकारमध्ये फाईल गोगलगाईप्रमाणे चालते, हात लावून त्याला धक्का मारावा लागतो. हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द आहेत. हा गमतीचा भाग आहे. हात लागल्याशिवाय या सरकारमध्ये फाईल चालत नाही. ट्रिपल इंजिन सरकारमध्ये कामं होतं नाहीत ही देवेंद्र फडणवीस यांची कबुली आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
-
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पाऊस
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे पामुलागौतम आणि इंद्रावती नदीला पूर आला आहे. जिल्हा मुख्यालयाशी भामरागड तालुक्यातील जवळपास 100 गावांच्या संपर्क तुटला आहे. आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद पडला आहे.
-
मी कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही- छगन भुजबळ
“ओबीसीचं काम मी आज नाही तर गेल्या 35 वर्षांपासून करतोय. मंडल आयोगासाठी मी त्यावेळी शिवसेना पण सोडली होती. मी ते काम करत असतानाही कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही. आता पुढील काम तुम्ही करायचं आहे. कोणाला तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे.. हे सगळे मी तुमच्यावर सोपवतो”, असं असं छगन भुजबळ म्हणाले.
-
अण्णासाहेब शिंदे यांचं मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ठिय्या आंदोलन
सोलापूर- बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांचं मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांना विचारलेल्या अकरा प्रश्नांची उत्तरे त्यांनी न दिल्याने अण्णासाहेब शिंदे आक्रमक झाले आहेत. अण्णासाहेब शिंदे आपल्या हजारो मराठा कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. बार्शी शहरातील नगरपरिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी इथं आंदोलन सुरू आहे.
-
अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे , मंगलप्रभाल लोढा हेही उपस्थित आहेत.
#WATCH | Union Home Minister Amit Shah and his wife Sonal Shah have the darshan of Lord Ganesh and offer prayers to him at Lalbaugcha Raja in Mumbai. pic.twitter.com/ZM5ENm3aFv
— ANI (@ANI) September 9, 2024
-
पिंपरी-चिंचवडमध्ये अज्ञात व्यक्तीची ठेचून हत्या
पिंपरी- चिंचवड मध्ये अज्ञात व्यक्तीची सिमेंटच्या गट्टूने ठेचून हत्या करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली असून अज्ञात आरोपीचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. काळेवाडीच्या भागात फुटपाथवर ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.
-
सातपुडा पर्वतरांगेत सतत पाऊस झाल्याने वडोदा मच्छिंद्र तलाव शंभर टक्के भरला
मुक्ताईनगर जळगाव – सातपुडा पर्वतरांगेत सतत पाऊस झाल्याने वडोदा मच्छिंद्र तलाव शंभर टक्के भरला.
सातपुडा पर्वत रांगेतील सिंचनाचा पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला. यामुळे शेतकऱ्यांसह, सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
-
अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल
वर्षा येथे गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर भाजप नेते अमित शहा याचा ताफा नेपियन्सी रोड वरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाला.
-
Maharashtra News: अपघातात मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद अवस्थेतील ड्रायव्हरची गाड्यांना धडक… धडकेत मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू
-
Maharashtra News: सिंचन संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ट्रॅक्टर मोर्चा
सिंचन संघर्ष समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज ट्रॅक्टर मोर्चा… ट्रॅक्टर मोर्चात सर्वपक्षीय नेते होणार सहभागी… खरबी येथील कयाधू नदीवरील बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी ट्रॅक्टर मोर्चा… खरबी येथे बंधारा उभारून हिंगोलीचे पाणी नांदेडला पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा हिंगोलीकरांचा आरोप… मोर्चात हजारो ट्रॅक्टर घेऊन हिंगोलीकर होणार सहभागी..
-
Maharashtra News: कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दोन दिवसापासून पावसाची संततधार
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात दोन दिवसापासून पावसाची संततधार… सततच्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ… पंचगंगा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर… तर जिल्ह्यातील 23 बंधारे पुन्हा पाण्याखाली… राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाजातून चार हजार क्यूसेक चां विसर्ग भोगावती नदीपात्रात… जिल्ह्याला पुढचे दोन दिवस येलो अलर्ट…
-
फुल मार्केटचा राजा फुलांनी सजला
सालाबादप्रमाणे यंदाही माटुंगा फुल मार्केटचा राजा फुलांना सजलेला आहे फुलांची आरस करून मंडप तयार करण्यात आलेला आहे. यंदाच्या ५२ वं वर्ष आहे. विविध रंगांच्या फुलांनी तयार केलेले मोर सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. आज सकाळपासूनच भक्त या ठिकाणी पोहोचत आहेत.फुल मार्केटच्या अगदी समोरच्या रस्त्यावर मंडप उभारून बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. फुलांची आरास आणि गणपती माटूंगात सध्या आकर्षणाचं केंद्र ठरतंय.
-
चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल उशीरा
मालाड- गोरेगाव दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 20 ते 22 मिनिटे उशिराने धावत आहेत. ट्रेनला उशीर झाल्यामुळे कांदिवली मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते.
-
विनोद अग्रवाल भाजपत प्रवेश करणार?
विनोद अग्रवाल हे लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पुन्हा एकदा गोंदिया विधानसभेचे समीकरण बदलणार आहे. विनोद अग्रवाल हे आता भाजपचे की चाबी संघटनेचे उमेदवार सर्वांच्या नजरा राहणार आहे. पुन्हा एकदा गोंदिया विधानसभेमध्ये अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
-
पालेभाज्यांचे दर गगनाला
ऐन गणेशोत्सव पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात कोथिंबीर 80 रुपये तर मेथी चाळीस रुपयांना जुडी आहे. संसदीचे दिवस असल्याने अतिरिक्त खर्च होत असतानाच पालेभाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेलेत. गेल्या महिन्यात पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाल्याने बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. फुलांना आणि फळांना गणेशोत्सवामुळे मागणी वाढली आहे.
-
Maharashtra News Live : आंदेकर खून प्रकरणात शस्त्र पुरवणारा गजाआड, एकाला अटक
पुणे -आंदेकर खून प्रकरणात शस्त्र पुरवणारा गजाआड.
-राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात कोयते, पिस्तूल पुरवल्या प्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केलीय.
-संगम वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे.
-या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आलीय.
-तसेच आंदेकर याचा बहिणीला देखील अटक करण्यात आली असून,तीन अल्पवयीनांना देखील ताब्यात घेतलं आहे.
-
Maharashtra News Live : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिराने सुरु
मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत
पहाटे कल्याण वरून छत्रपती शिवाजी महाराज ट्रमिन्सला जाणाऱ्या गाड्या 8 ते 10 मिनिटे उशिराने सुरु
तांत्रिक अडचणीमुळे लोकल गाड्या उशिरा असल्याची माहिती
पहाटे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल
-
Maharashtra News Live : पुण्यातील हिंजवडीत इलेक्ट्रिक बसने घेतला पेट, सुदैवाने जीवितहानी नाही
पुणे आयटी हब असलेल्या हिंजवडीत इलेक्ट्रिक बसने पेट घेतला
-सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही
-नागरिकांच्या प्रसंगधानामुळे मोठे विघ्न टळल अस म्हणता येईल.
-हिंजवडीच्या विप्रो सर्कल जवळ पीएमपीएलच्या इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. अद्याप याचं कारण पुढे आलेला नाही. मात्र, नागरिकांनी तात्काळ हे आग विझवली आणि मोठ संकट टळलं.
-
Maharashtra News Live : मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांचे जरांगे पाटील यांच्याविरोधात ठिय्या आंदोलन
– बार्शीतील मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे यांचे मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ठिय्या आंदोलन
– मनोज जरांगे यांना विचारलेल्या अकरा प्रश्नांची उत्तरे त्यांनी न दिल्याने अण्णासाहेब शिंदे आक्रमक
– अण्णासाहेब शिंदे आपल्या 9 हजार मराठा कार्यकर्त्यांसह करणार ठिय्या आंदोलन
– बार्शी शहरातील नगरपरिषदेसमोर असलेल्या शिवसृष्टी येथे करणार आंदोलन
– महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का?
– महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या.
– आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात ठिय्या आंदोलनाला बसणार असल्याचा ईशारा दिला होता
– त्यानुसार आज अण्णासाहेब शिंदे हे ठिय्या आंदोलन करणार आहेत
-
Maharashtra News Live : अमित शाहांचा दौरा कसा?
आज सोमवारी सकाळी १०.४५ वाजता अमित शाहा हे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी जातील.
यानंतर ११.१५ च्या सुमारास अमित शाहा हे एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी जातील.
त्यानंतर अमित शाह हे दुपारी १२.१० मिनिटांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतील.
तसेच १२.५० मिनिटांनी अमित शाह हे आशिष शेलार यांच्या वांद्र्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देतील, असे अमित शाह यांच्या दौऱ्याचे नियोजन आहे.
-
Maharashtra News Live : अमित शाह मुंबईत दाखल, लालबागचा राजाचे दर्शन घेणार
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह मुंबईत दाखल
भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहात बैठक
लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
Published On - Sep 09,2024 8:22 AM