Maharashtra Breaking News LIVE 07 October 2024: हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार गटात करणार प्रवेश

| Updated on: Oct 07, 2024 | 10:44 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 7 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 07 October 2024: हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार गटात करणार प्रवेश
महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लाईव्ह अपडेट्स

LIVE NEWS & UPDATES

  • 07 Oct 2024 10:44 AM (IST)

    सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर

    उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत.  लोणंद येथील पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

    कार्यक्रम ठिकाणी लावलेल्या अजित पवारांच्या बॅनर शेजारी शरद पवार समर्थकांचा आम्ही निष्ठावंत साहेबांचे असा लक्षवेधी बॅनर लावला असून बॅनरवॉर रंगण्याची चिन्हे आहेत.

  • 07 Oct 2024 10:25 AM (IST)

    नवी दिल्ली – नक्षल प्रभावीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू

    नवी दिल्ली येथे नक्षल प्रभावीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

  • 07 Oct 2024 10:09 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडून भाजपची खरडपट्टी

    राष्ट्रीय स्वयंसवेक संघाकडून भाजपची खरडपट्टी काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  हिंदुत्ववादी मुद्यांना बगल दिल्याने संघ नाराज असून दक्षिण मुंबईमधील पदाधिकारी, नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 07 Oct 2024 09:55 AM (IST)

    Maharashtra News: आरे ते बीकेसी मेट्रो स्थानकांचा प्रवास आजपासून सुरू

    आरे ते बीकेसी मेट्रो स्थानकांचा प्रवास आजपासून सुरू… थोड्या वेळात पहली मेट्रो सुटणार … शनिवारी मेट्रोचं लोकार्पण झाल्यानंतर मुंबईकरांना या भुयारी मेट्रोचा प्रवास करण्याची लागली होती उत्सुकता… प्रवास साडे बारा किलोमीटरचा असून ही सेवा सकाळी ६ ते रात्री १०:३० वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे..

  • 07 Oct 2024 09:47 AM (IST)

    Maharashtra News: कसारा घाटात चार वाहनांचा भीषण अपघात: तीन गंभीर जखमी

    नाशिक-मुंबई महामार्गावर कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चार वाहनांना धडक, तीन जण गंभीर जखमी… दुर्घटनेत दोन लहान मुलांसह कंटेनर चालक जखमी… कसारा रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

  • 07 Oct 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News: हर्षवर्धन पाटील आज पवार गटात प्रवेश करणार

    गेल्यावेळी आम्ही निवडणूक जिंकता जिंकता हरलो… हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पवारांच्या पक्षात प्रवेश करणार… इंदापूरच्या विकासासाठी पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला… हर्षवर्धन पाटील आज पवार गटात प्रवेश करणार… इंदापूरमध्ये आद शरद पवार गटाची सभा…

  • 07 Oct 2024 09:22 AM (IST)

    Maharashtra News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आंबेडकर संघटनांच्या वतीने मोर्चा

    बौद्ध लेणीच्या बचावासाठी काढण्यात येणार मोर्चा… शहराच्या क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत असेल मोर्चा… जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा,महाविद्यालयांना सुट्टी जाहीर.. मोर्चासाठी हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी होणार सहभागी… मोर्चाच्या अनुषंगाने पोलिसांकडून शहरात तगडा बंदोबस्त…

  • 07 Oct 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाचा अखेर वाद मिटला…

    अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाचा अखेर वाद मिटला… काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांना अर्धे अर्धे कार्यालय… खासदार बळवंत वानखडे नंतर आता खासदार अनिल बोंडे यांच्या नावाचेही लागले फलक… कार्यालय मिळाव यासाठी काँग्रेसने केले होते ताला तोडो आंदोलन..

  • 07 Oct 2024 09:02 AM (IST)

    Maharashtra News Live : राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का

    रत्नागिरी : राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. लांजा तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या उपस्थितीत भांबेड जिल्हा परिषद गटातील १८ गावातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. किरण सामंत यांनी भांबेड जिल्हा परिषद गटाला सुरुंग लावला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले आहेत.

    उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा युवाअधिकारी विनय गांगण यांच्यासहित माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती.उपसभापती, काही गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य तर भांबेड ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याचे उदय सामंत यांच्याकडून संकेत देण्यात आले.

  • 07 Oct 2024 08:58 AM (IST)

    Maharashtra News Live : कल्याणमध्ये महेश गायकवाडांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी

    कल्याण पूर्वेत शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. एकीकडे महेश गायकवाडवर गोळीबार करणाऱ्या आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांनी भाजपकडून विधानसभेची तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे महेश गायकवाड यांचे वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत बॅनर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

  • 07 Oct 2024 08:54 AM (IST)

    Maharashtra News Live : लाडकी बहिण योजनेनंतर आता ‘सक्षम भगिनी’ योजना सुरु केली जाणार

    लाडकी बहिण योजनेनंतर आता ‘सक्षम भगिनी’ योजना सुरु केली जाणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात ही महिलांना रोजगार मिळावा यासाठी बचत गटांच्या माध्यमातून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महिलांसाठी अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यात सुमारे पाच हजाराहून अधिक महिला सहभागी होणार आहेत.

  • 07 Oct 2024 08:49 AM (IST)

    Maharashtra News Live : वाशिम विधानसभेसाठी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्या, उद्धव ठाकरेंना आवाहन

    आगामी निवडणुकीत वाशिम विधानसभेसाठी पक्षनिष्ठ कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विनायक राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांच्या सह्यांचे पत्रही दिलं आहे. यामध्ये शशिकांत पेंढारकर, राजाभैया पवार, डॉ सुधीर विहलेकर, सचिन डोफेकर, राजू मानमोठे या इच्छुक उमेदवारांचा समावेश होता.

    दरम्यान वाशिम विधानसभेमध्ये शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र पक्ष बाहेरील व्यक्तीला उमेदवारी देण्याची चर्चा होत आहे. त्यामुळे पक्षनिष्ठ असलेले शिवसैनिक अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी वाशिम-मंगरुळपीर विधानसभेची उमेदवारी निष्ठावान शिवसैनिकालाच देऊ असा शब्द पदाधिकाऱ्यांना दिला.

  • 07 Oct 2024 08:46 AM (IST)

    Maharashtra News Live : मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आझाद मैदानात धडकणार

    मुंबई – मराठा क्रांती ठोक मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आज आझाद मैदानात धडक देणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि मराठा आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.

Published On - Oct 07,2024 8:42 AM

Follow us
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.