Maharashtra Breaking News LIVE 11 October 2024: उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 11 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. यंदा महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच काही पक्षांकडून उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. त्यातच आता इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आम्ही छत्रपतींच्या मार्गापासून दूर होणार नाही : देवेंद्र फडणवीस
जळगाव : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवरायांचा जय भवानी, जय शिवाजी म्हणत जयघोष करण्यात आला. अशा प्रकारची सुंदर आणि भव्य अशा पुतळ्याला कल्पनासाठी अनावरणासाठी आम्हाला बोलावलं. त्याबद्दल मी आमचे मित्र गिरीश महाजन यांचे आभार मानतो. छत्रपती शिवरायांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावरच महायुतीचे सरकार चालेल. कुठेही आम्ही छत्रपतींच्या मार्गापासून दूर होणार नाही. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. छत्रपतींच्या मार्गानेच यापुढे वाटचाल करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते जामनेरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जामनेर तालुक्यातील नेरी येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळेस फटाक्यांची आतिषबाजी करत आणि शिवरायांचा जयघोष करत पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला उदयनराजे भोसले आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
-
-
नांदेडच्या शासकीय विश्रामगृह येथे आगमन
राज्यपाल सी पी राधाकृष्णन आज नांदेड दौऱ्यावर आहेत. राधाकृष्णन यांचं नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात आगमन झालं आहे. राधाकृष्णन नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, व्यवसायिक, उदयोजक, यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
-
व्यंगचित्राचा वापर करून उबाठावर शिवसेनेची जोरदार टीका
शिवसेना दसरा मेळावा म्हणजे केवळ महाराष्ट्राच्याच नाहीतर राष्ट्रीय राजकारणातील महत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. व्यंगचित्र हा हुकुमी अस्त्राचा वापर करत उबाठावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचा वाघ उबाठा काळात बांधला गेला होता, त्याला एकनाथ शिंदेनी सोडवला अशा थीमलाईनवर हा टिझर बनवला असून शिवसेनेकडून पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात हिंदुत्व हाच प्रमुख मुद्दा असणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.
-
नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी
भाजप नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. एका पत्रातून अश्लील भाषेचा वापर करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
-
-
पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
दसरा मेळाव्याला जातोय अभूतपूर्वपूर्ण भावना आहे अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यावर दिली आहे. तर वाद झाला नाही हे खोटं आहे, दादांना काम होतं. मुख्यमंत्री शिंदे – अजित पवार वादावर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-
ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांनी घेतली शरद पवार यांची भेट
ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांनी घेतली शरद पवार यांची भेट घेतली आहे. ते श्रीगोंदा विधानसभेतून लढण्यास इच्छूक आहेत.
-
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तीन आमदार करणार पक्ष प्रवेश
अजित पवार यांच्या पक्षात आज काँग्रेस आमदारांचा प्रवेश होणार आहे. तीन आमदार राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार आहेत. झिशान सिद्धीकी सोबत इतर दोन राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
-
नितीश यांनी एनडीएचा पाठिंबा काढून घ्यावाः अखिलेश
अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांना एनडीएचा पाठिंबा काढून घेण्यास सांगितले. उत्तर प्रदेशातील भाजप सरकार समाजवाद्यांना जयप्रकाश नारायण यांना श्रद्धांजली वाहण्यापासून रोखत असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
नोएल टाटा टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष
टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल यांची नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
-
पंतप्रधान मोदी लाओहून मायदेशी रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर आज लाओ पीडीआर येथून भारताकडे रवाना झाले. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी 21व्या आसियान-भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी झाले होते. एवढेच नाही तर त्यांनी अनेक द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.
-
निहोन हिडांक्यो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार
नॉर्वेजियन नोबेल समितीने 2024 चा नोबेल शांतता पुरस्कार निहोन हिडांक्यो या जपानी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्या या तळागाळातील चळवळीला आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. अण्वस्त्रांपासून मुक्त जग निर्माण करण्याच्या हेतूसाठी हा शांतता पुरस्कार देण्यात आला.
-
नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत
पुण्यात नाना पाटोलें यांच्या बॅनर्सची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राला नाना भाऊच मुख्यमंत्री हवेत. लवकरच नाना पर्व अशा अश्याचे बॅनर्स झळकले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर्स लावले.
-
…तर माफी नाही -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अक्षय शिंदे गोळीबार प्रकरणात ही ढोंगीपणा करणार्यांना चपराक आहे. माझ्या मायबहीणकडे वाकड्या नजरेने पाहीले तर माफी नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
-
गुजरातची लाडकी भ्रष्टयुती
मुंबई युवक काँग्रेसने महायुतीविरोधात “गुजरातची लाडकी भ्रष्टयुती” या थीमवर पोस्टर अभियान सुरू केले आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रातोरात अशी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
-
आम्हाला जनादेश मान्य आहे -रावसाहेब दानवे
हार जित होत असते. हा जनादेश आम्हाला मान्य आहे, असे माजी खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे म्हणाले. आम्ही जनतेत जाऊ. आमची दहा वर्षातील कामगिरी उत्तम आहे. नारायगडावरील दसरा मेळाव्याशी काही संबंध नाही, असे ते म्हणाले.
-
लाडकी बहीण कार्यक्रमावर पावसाचे सावट
महिला बाल विकास विभाग अंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा कार्यक्रम अमळनेरमध्ये होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रताप कॉलेज मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर अमळनेरमध्ये जोरदार पाऊस झाला.
-
दसरा मेळाव्यासाठी नारायणगडावर येण्याचे आवाहन
दसरा मेळाव्यासाठी मी सकाळी आठ वाजता नारायण गडावर निघणार आहे, तो पारंपारिक मेळावा असल्याने बरोबर बारा वाजता सुरू होईल. त्या ठिकाणी भाविक भक्त येणार आहेत राज्यभरातून लोक आजच नारायण गडावर येण्यासाठी निघाले आहेत आणि लाखो गाड्या जरी आल्या तरी गडावर गाड्या पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मेळाव्याला येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
नोएल टाटा झाले टाटा ट्रस्टचे अध्यक्ष
रतन टाटा यांचे बंधु नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. नुकतीच याविषयीचा निर्णय घेण्यात आला.
-
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती
नवी मुंबई महापालिका आणि सिडकोच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन, उदघाटन आणि लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न होत आहे.
-
शिरुर हवेलीत उद्धव ठाकरेंचा शिलेदार अजित पवारांच्या गळाला ?…
अजित पवार बारामतीतुन लढणार असल्याने अशोक पवारांविरोधात महायुतीकडुन माऊली आबा कटके शिरुरच्या मैदानात उतरू शकतात अशी चर्चा आहे.
-
अमळनेर येथील प्रताप कॉलेजच्या मैदानावर महिला मेळावाचा आयोजन
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन. मंत्री अनिल पाटील यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचा आयोजन…
-
अजित पवार यांनी केले अत्यंत मोठे विधान
आम्ही कामाची माणस, बिनकामाचे नाही. नाशिकने मला कायमच चांगले आमदार दिले आहेत आपसातील वाद इथे अणू नका. ही आपल्यासाठी महत्वाची निवडणूक, असे अजित पवार यांनी म्हटले.
-
शिर्डीत साईदर्शनासाठी भाविकांची मांदियाळी
साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमीत्त साईदर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसून येते आहे. साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर मुंबई येथील द्वारकामाई मित्र मंडळाच्या वतीने भव्य असा 60 फुट उंचीचा साई – बालाजी देखावा साकारण्यात आला आहे.
-
अजित पवारांचा शेतकरी मेळावा
नाशिकमधील पांचाळे गावातील चौकात भर उन्हात अजित पवार यांचा शेतकरी मेळावा सुरू झाला. यावेळी माणिकराव कोकाटे यांची अजित पवारांना सिन्नरमधून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली.
-
नवी मुंबई विमानतळावर दोन विमानांचे लँडींग
‘सी 295’ विमानानंतर सुखोई 30 विमानसुद्धा धावपट्टीवर उतरले. या चाचणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलवण्यात आले. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थिती ही चाचणी घेण्यात आली.
-
नवी मुंबई विमानतळावर विमानाची चाचणी यशस्वी
नवी मुंबई विमानतळावर हवाई दलाच्या विमानाची चाचणी यशस्वी झाली. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
-
महाराष्ट्र राज्य सरकारची दिल्लीत जाहिरात
महाराष्ट्र राज्य सरकारची दिल्लीत जाहिरात केली जात आहे. दिल्लीतल्या बस स्टॉप राज्य सरकारची जाहिरातबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जाहिरात चर्चेत आली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचेही फोटो आहेत.
-
छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला?
काँग्रेस नेते दत्ता आव्हाड यांनी घेतली दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट. काँग्रेसचे विचार विभागाचे राष्ट्रीय सचिव दत्ता आव्हाड छगन भुजबळ यांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत. काँग्रेस नेते दत्ता आव्हाड यांनी येवला विधानसभा मतदारसंघा संदर्भात राजधानी दिल्ली इथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि मधुसुदन मिस्री यांची भेट घेतली.
-
दवंडी पिटून दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन
मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 12 वाजता नारायण गडावर दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे म्हणून गावागावात दवंडी देत आवाहन करण्यात येत आहे.
-
शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील नाराज असल्याची चर्चा
शिवसेना शिंदे गटाचे हेमंत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. माझं राजकीय पुनर्वसन झालं नाही, असे पाटील म्हणाले.
मला राज्यसभा किंवा विधानपरिषद देण्याचा शब्द देण्यात आला होता. वरिष्ठ शब्द पाळतील याची खात्री आहे, असे हेमंत पाटील म्हणाले.
-
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील गाडी पोलीस ठाण्यात झाकू ठेवली
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील हिट अँड रन प्रकरणातील गाडी मुंढवा पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून पोलिसांनी ती गाडी झाकून ठेवली आहे.
एका आलिशान ऑडी कारने बाईकस्वाराला धडक दिली. त्यामध्ये डिलीव्हरी बॉयचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. आरोपी कारचालकाल अटक करण्यात आली असून त्याची कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
-
अमरावतीत आमदार सुलभा खोडके समर्थकांकडून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न….
अमरावतीत आमदार सुलभा खोडके समर्थकांकडून काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अमरावतीच्या काँग्रेस भवनावासमोरच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले होते. काँग्रेस कार्यालयासमोर सुलभा खोडकेंचे बॅनर लागल्याची माहिती होताच काढून टाकण्यात ते फलक काढून टाकण्यात आले.
येत्या 13 तारखेला सुलभा खोडके या अजित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
अमित शाह यांना महाराष्ट्र, मराठी माणसाला कमजोर करायचं आहे – संजय राऊत
हे सरकार पहिल्या दिवसापासून एकमेकांच्या छाताडावर बसलं आहे, कुणाचाही पायपोस कुणाच्याही गळ्याच- पायात नाही, अशी परिस्थिती आहे. अमित शाह यांना फक्त महाराष्ट्र, मराठी माणसाला कमजोर करायचं आहे, म्हणून त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडला, अशी टीका राऊतांनी केली आहे.
-
फडणवीसांपेक्षा अमित शाह शिंदेंच्या जास्त प्रेमात – संजय राऊत
अमित शाह हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या जास्त प्रेमात. शाह-शिंदेमध्ये प्रेम नव्हे अफेअर, लवकरच तुटेल – संजय राऊतांची घणाघाती टीका
-
महादेव बॅटिंग ॲप मधील मुख्य आरोपी सौरभ चंद्रकारला अटक
महादेव बॅटिंग ॲप मधील मुख्य आरोपी सौरभ चंद्रकारला दुबईमध्ये तपासयंत्रणाकडून अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधल्या करोडो रुपयांच्या घोटाळ्यातला सौरभ चंद्रकार हा मुख्य आरोपी आहे.
-
Maharashtra News: पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात हिट अँड रनची घटना
भरधाव आलिशान कार चालकाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला आहे. 21 वर्षीय डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू… कारचालक दारुच्या नशेत असल्याची माहिती समोर… अपघातानंतर तपास सुरु… सीसीटीव्हीद्वारे पोलिसांनी आरोपी कारचालकाला ताब्यात घेतलं आहे…
-
Maharashtra News: गँगस्टर अबु सालेमच्या भेटीसाठी आलेले दोघे एटीएसच्या ताब्यात
गँगस्टर अबु सालेमच्या भेटीसाठी आलेले दोघे एटीएसच्या ताब्यात… अबू सालेमची मैत्रीण आणि परदेशी इसमाची चौकशी सुरू… गँगस्टर अबू सालेमचा सध्या नाशिकच्या कारागृहात मुक्काम… गँगस्टर अबु सालेम मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी… सालेमच्या भेटीसाठी आलेल्यांच्या चौकशीत काय समोर येतं याकडं लक्ष
-
Maharashtra News: एक देश एक निवडणूकीला केरळचा विरोध
एक देश एक निवडणूकीला केरळचा विरोध… केरळ विधानसभेत ठराव पास… एक देश एक निवडणूक निर्णय लोकशाही विरोधी असल्याचं सांगत केला विरोध
-
Maharashtra News Live : मंडलिक पिता-पुत्रांमध्ये उमेदवारीवरुन वाद
Maharashtra News Live कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्येच मत मतांतर पाहायला मिळत आहेत. माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली जात आहे. माजी खासदार मंडलिक मात्र हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर पाहायला मिळत आहे. राज्यात पुन्हा महायुतीचा शासन यावं आणि त्यात हसन मुश्रीफ असावेत, असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे, त्यासाठी अत्यंत ताकदीने हसन मुश्रीफ यांना मदत करा, असे आवाहन केले जात आहे.
संजय मंडलिक यांचे मौजे सांगाव मधील जाहीर सभेत याबद्दलचे वक्तव्य केले आहे. संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी मात्र महायुतीकडून उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे. हसन मुश्रीफ यांनी लोकसभा निवडणूक मंडलिक यांना प्रामाणिकपणे मदत केला नसल्याचाही आरोप वीरेंद्र मंडलिक यांनी केला आहे.
-
Maharashtra News: कागल विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून मंडलिक पिता-पुत्रांमध्येच मत मतांतर
माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांच्याकडून निवडणूक लढवण्याची तयारी… माजी खासदार मंडलिक मात्र हसन मुश्रीफ यांच्या व्यासपीठावर… राज्यात पुन्हा महायुतीचं शासन यावं आणि त्यात हसन मुश्रीफ असावेत त्यासाठी अत्यंत ताकतीन हसन मुश्रीफ यांना मदत करा… संजय मंडलिक यांचं जाहीर सभेत वक्तव्य…
-
Maharashtra News Live : नवी मुंबईत अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
नवी मुंबई : तळोजा कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी या कर्मचाऱ्याकडून गांजा, चरस 10 लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत.त्यानंतर गेल्या दोन दिवसांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमुळे पोलिसांच्या प्रतिमेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
-
Maharashtra News Live : अमरावतीत शरद पवार गटाला मोठा धक्का, २५ जणांचा राजीनामा
अमरावती जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. प्रदीप राऊत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्याने पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. पाच महिन्यातच जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्याने राऊत समर्थकांची नाराजी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीमधील दुसऱ्या गटाने दबाव आणल्याने पदमुक्त केल्याचा राऊत यांनी केला आहे.
-
Maharashtra News Live : डोंबिवलीत इमारतीच्या पार्किंगमधून गाडी चोरी
डोंबिवलीत इमारतीच्या पार्किंगमधून गाडी चोरीची घटना घडली आहे. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देऊनही अद्याप चोराचा पत्ता लागलेला नाही. 24 दिवस उलटून ही गाडीचा शोध लागत नसल्याने तक्रारदार तरुण संतप्त झाला आहे. यावेळी पोलिसांचा निषेध करत हातात पोस्टर घेत चोराला मूळ कागदपत्रे घेऊन जाण्याचे आवाहन केले जात आहे. तरुणांच्या आव्हानामुळे पोलीस सुरक्षा आणि त्याचा कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Published On - Oct 11,2024 8:46 AM