Maharashtra Breaking News LIVE 12 September 2024 : सीताराम येचुरी यांचे निधन, दिल्ली एम्समध्ये घेतला अखेरचा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 12 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
Maharashtra News Live : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यामुळे सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. घरोघरी विराजमान असलेल्या लाडक्या बाप्पाचे आज विसर्जन पार पडणार आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गौरी-गणपतींचे विसर्जन पार पडणार आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. तर नागपुरात भरधाव वेगात आलेल्या एका ऑडी कारने शहरातील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. यात काही जण जखमी झाले. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ऑडी कारमुळे हा अपघात झाला त्या कारची नोंदणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या नावे आहे. या घटनेनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
शिमला मशीद वादावरून काँग्रेस हायकमांड सखू सरकारवर नाराज
शिमल्याच्या संजौली मशीद वाद प्रकरणी काँग्रेस हायकमांड सखू सरकारवर नाराज आहे. सरकारच्या चुकीच्या कारभारामुळे भाजपला संधी मिळाल्याचे काँग्रेस सूत्रांचे मत आहे. वाद नीट न सोडवल्याने नाराजी आहे. सीएम सखू यांनी परिस्थिती सामान्य करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. प्रभारी राजीव शुक्ला यांनी संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे.
-
मध्य प्रदेशः दतियामध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, 7 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील दतिया येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे येथे भिंत कोसळली, त्यात ७ जणांचा चिरडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
-
-
अहमदाबाद-भुज दरम्यान धावणार देशातील पहिली वंदे मेट्रो
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी गुजरातच्या जनतेला मोठी भेट देणार आहेत. ही भेट अहमदाबाद ते भुज दरम्यान धावणारी वंदे मेट्रो ट्रेन असेल. विशेष म्हणजे ही देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन असेल. 16 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी याला हिरवा झेंडा दाखवतील.
-
सीताराम येचुरी यांचे निधन, दिल्ली एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले. जिथे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.
-
मुंबईसाठी हा गेम चेंजर प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोस्टल हायवे आपण सुरू केलेला आहे. आज सिलिंगला पण तो जोडलेला आहे. मरीन ड्राईव्ह ते बांद्रापर्यंत दहा मिनिटात मुंबईकरांचा प्रवास होईल. अतिशय सुखकर आणि जलद प्रवास मुंबईकरांना या ठिकाणी करण्याची संधी मिळेल. लोकांचा वेळ इंधन व प्रदूषण ही कमी होईल लोक घरी व कार्यालयात लवकर पोहोचतील. घरी जास्त वेळ ही देऊ शकतील. मुंबईमध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. वर्सोवा ते विरार हा प्रकल्प देखील आम्ही पुढे नेतोय अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
-
-
शेतकऱ्यांवर आस्मानी संकट
दोन दिवसाच्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान केले. नदी आणि नाला काठाचा भात पीक ,भाजीपाला पावसाच्या प्रवाहात वाहून गेला. शेतामध्ये इलेक्ट्रिक मोटर पाईप आणि शेतीची अवजार ठेवली होती हीच अवजार आणि पाईप सुद्धा या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्या. शेतकऱ्यांचे हजारो एकर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
-
जुगार क्लबवर टाकला छापा
जळगावचे एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग लगत एका हॉटेल जवळ सुरू जुगाराच्या क्लब वर विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने छापा टाकला. कारवाईत १ लाख ३१ हजार १४० रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. एरंडोल पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे.
-
काँग्रेसचे नाशिकमध्ये आंदोलन
नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीने महापालिका आणि स्मार्ट सिटीच्या कार्यप्रणाली विरोधात आंदोलन करण्यात आले. प्रतिकात्मक दुर्बिणी घेऊन काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. चार फूट दुर्बिनीतून शोधूया स्मार्ट नाशिक अशा प्रकारचे आंदोलन चर्चेचा विषय ठरले. स्मार्ट सिटी कंपनी विरोधात काँग्रेसच पदाधिकाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी केली.
-
आकाश इन्स्टिट्यूटमध्ये मराठा कार्यकर्त्यांची तोडफोड
छत्रपती संभाजीनगर येथील आकाश इन्स्टिट्यूटमध्ये मराठा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मराठा विद्यार्थ्यांची फीस परत देत नसल्यामुळे ही तोडफोड करण्यात आली.आकाश इन्स्टिट्यूटच्या कार्यालयामध्ये काचा खुर्च्या आणि साहित्याचे मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. कार्यालयातच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
-
राजेंद्र राऊत यांच्याविरोधात निवडणूक लढवा
मनोज दादा जरांगे पाटलांनी आमदार राजाभाऊ राऊतांच्या विरोधात भूमिका घेऊ नयेय आमदार राऊत यांनी घेतलेली भूमिका योग्य असून मनोज जरांगे यांनी त्याला पाठिंबा द्यायला हवा. जर आमदार राजेंद्र राऊत यांची भूमिका पटत नसेल तर मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.
-
राहुल गांधींची ATS चौकशी करा; गुणरत्न सदावर्ते यांची मागणी
राहुल गांधी यांचा अमेरिका दौरा भारतात चांगलाच गाजला. त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक प्रश्न, मुद्यांवर दिलखुलास वक्तव्य केल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली. आता गुणरत्न सदावर्ते पण मैदानात उतरले आहेत. त्यांनी राहुल गांधी यांची एटीएसकडून चौकशीची मागणी केली आहे.
-
कोस्टल रोड ते वांद्रे सी-लिंक टप्पा आजपासून खुला, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
कोस्टल रोड ते वांद्रे सी-लींक आजपासून खुला होत आहे. या मार्गाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारमधून पाहणी केली आहे. यावेळी कारचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
-
गोपालदास अग्रवाल यांची काँग्रेसमध्ये उद्या घरवापसी
गोंदियाचे माजी आमदार भाजपा नेते गोपालदास अग्रवाल यांची कॉंग्रेसमध्ये घरवापसी होणार आहे. या कार्यक्रमाला काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला , नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार, बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी काँग्रेसचे उपस्थित राहणार आहेत.
-
रायगड ब्रेकिंग : जिल्ह्यातील धाटाव एमआयडीसीत केमिकल कंपनी स्फोट, तीन ठार
रायगड जिल्ह्यातील धाटाव MIDC मधील साधन नायट्रो केमिकल कंपनीत स्फोट होऊन तीन कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
-
संजय राऊत यांचे नांदेडच्या लोहा येथे जंगी स्वागत
क्रेन आणी जेसीबीच्या साह्याने हार घालून फटाके फोडुन स्वागत. नांदेडच्या लोहा येथे शिवसंवाद मेळाव्यास करणार मार्गदर्शन
-
अजित पवार यांचे मोठे विधान
काही दिवस आम्हाला द्या, चुकलो तर आमचं कान पकडून जाब विचारा. तुमचा तो अधिकार आहे. मात्र भावनिक होऊन काही वेगळा निर्णय घेऊ नका. तुमचा आशीर्वाद द्या, पाठिंबा द्या, अजित पवार यांचे विधान
-
अजित पवार यांनी व्यक्त केली चिंता
देवांच्या आळंदीत चुकीचे धंदे चालतायेत, वेडे-वाकडे प्रकार होतात. आपण तिथं नतमस्तक झाल्याशिवाय पुढं जात नाही. मागे आलो तेंव्हा दोन तास दर्शन रांग थांबवावी लागली, लोकं म्हणतील हा कोण लागून गेला. जे ह्याला डायरेक्ट दर्शन दिलं जातं. असं भाविक म्हणणार. म्हणून मी आज बाहेरून दर्शन घेतलं. पण आळंदीत घडणारे प्रकार ही चिंताजनक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
-
योगेश केदार यांचे मोठे विधान
दिलीप सोपल यांनी मराठ्याना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतची भूमिका जाहीर करावी. हे आंदोलन सुरूय यात येऊन भूमिका जाहीर करावी, असे योगेश केदार यांनी म्हटले आहे.
-
आढळराव पाटील अजित पवार यांच्या दौऱ्यात अनुपस्थित
ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. आज पुण्यातील खेड-आळंदी विधानसभेत अजित पवारांचा दिवसभर दौरा सुरु आहे. पण आढळराव पाटील मात्र कुठे ही दिसून आलेले नाहीत. मात्र हेच आढळराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात.
-
राहुल गांधी विरोधात तक्रार दाखल करणार
राजू वाघमारे, ज्योती वाघमारे आणि जयदीप जोगेंद्र कवाडे हे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जात आहेत.
-
शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांचा महिलांशी संवाद
शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पुण्याच्या वाघोलीतील काही सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला यांच्याशी घरी जावून संवाद साधला.
-
अहेरी येथे शिवस्वराज्य यात्रा
गडचिरोलीमधील अहेरी येथे गांधी चौक येथून शिवस्वराज्य यात्राला प्रारंभ यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाग्यश्री आत्राम अन्य मान्यवर उपस्थित आहे ही यात्रा शहरातून मार्ग करीत सभागृह कळे जात आहे.
-
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने स्थानिक शिवसेनेच्या वतीने लाभार्थी महिलांच्या घरी भेट
धुळे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने स्थानिक शिवसेनेच्या वतीने लाभार्थी महिलांच्या घरी भेट…
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का ? अजून अपेक्षा आहे का?
मेल परिसरात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने लाभार्थी महिलांच्या घरी गृहभेट..
शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी साधला लाभार्थी महिलांशी संवाद..
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी साधला महिलांशी संवाद
-
भाजप युवा मोर्चा शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक
ठाण्यातील चिंतामणी चौकात भाजप युवा मोर्चा शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक
प्रभू श्री रामाचा अवमानबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रकाराविरोधात भाजपा युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येत आहे
-
धुळे – मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने स्थानिक शिवसेनेच्या वतीने लाभार्थी महिलांच्या घरी भेट
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने स्थानिक शिवसेनेच्या वतीने लाभार्थी महिलांच्या घरी भेट देण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला का ? अजून अपेक्षा आहे का? असे प्रश्न विचारत शहर जिल्हाध्यक्ष मनोज मोरे यांनी लाभार्थी महिलांशी संवाद साधला. स्थानिक पदाधिकारी देखील होते उपस्थित.
-
नांदेड – खासदार नागेश आष्टीकरांची गाडी अडवल्यानं गोंधळ
खासदार नागेश आष्टीकरांची गाडी नांदेड विमानतळावर अडवल्यानं आष्टीकरांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. विमानतळ परिसरात शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरू आहे. पोलिसांकडून आष्टीकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू.
-
आरक्षणाबाबत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन
सोलापूर – ओबीसीतून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. 23 सप्टेंबर ऐवजी आज 12 तारखेपासूनच ते ठिय्या आंदोलन करणार आहेत. बार्शीच्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.
राजेंद्र राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र पाठवून विशेष अधिवेशन बोलावण्यासंदर्भात मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धामुळे आमदार राजेंद्र राऊत चर्चेत आले होते.
-
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का ? प्रसाद लाड यांचा सवाल
मनोज जरांगे पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारणार का? असा सवाल भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विचारला आहे.
लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करणाऱ्या काँग्रेसची खरी आणि संविधान विरोधी भूमिका राहुल गांधींच्या तोंडून आता समोर आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
-
Maharashtra News: ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे आंदोलन
ज्ञानेश महाराव यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे आंदोलन… ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम यांच्या बद्दल केले होते वादग्रस्त वक्तव्य… वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्यभर आंदोलन… छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौकात होणारा आंदोलन… भाजपचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनासाठी दाखल…
-
Maharashtra News: शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर
शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर… सुप्रीम कोर्टात 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी… 17 सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर… निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर 21 ऑक्टोबरला होणार सुनावणी…
-
Maharashtra News Live : रत्नागिरीत आज १ लाखांहून अधिक घरगुती गणपतीचं विसर्जन
रत्नागिरी- जिल्ह्यातील आज १ लाख १५ हजार ३३४ घरगुती गणपतीचं विसर्जन
गौरी सोबत गणरायाच्या विसर्जनाची कोकणातील परंपरा
भावपूर्ण वातावरणात गणरायाला दिला जाणार निरोप
दापोली खेड रत्नागिरी लांजा संगमेश्वर आणि गुहागर तालुक्यातील घरगुती गणपतीचे आज विसर्जन
गणपतीची चाकरमान्यांकडून पाच दिवस गणरायाची मनोभावे आराधना
-
Maharashtra News Live : वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वनराज आंदेकर खून प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असलेला फरार आरोपी सागर पवार याला अटक
तर साहिल दळवी हा पोलिसांच्या ताब्यात
तपासामध्ये ३ पीस्टल व ३ जिवंत राऊंड जप्त
आत्तापर्यंत एकूण ८ पिस्तल आणि १३ राऊंड, ७ दुचाकी, एक क्रेटा कार जप्त,
आरोपी संगम वाघमारे यास १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत वाढ
आजपर्यन्त ३ अल्पवयीन आरोपीसह एकूण २१ आरोपी ताब्यात
-
Maharashtra News Live : एकनाथ शिंदेंकडून वांद्रे-वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार वांद्रे-वरळी सेतूला जोडणाऱ्या पुलाचे लोकार्पण
धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील महत्वाचा टप्पा असलेला हा पूल आहे
दुपारी 2 वाजता बिंदु माधव ठाकरे चौक, वरळी, या ठिकाणी या पुलाचे लोकार्पण होणार आहे
तर दुपारनंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक व अध्यक्ष Prof. Klaus Shwab यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मुंबई महानगर प्रदेश (एम.एम.आर) ला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याबाबत निती आयोग अहवाल प्रकाशन समारंभ आयोजित करणार
-
गोंदिया जिल्ह्यात पावसाची विश्रांती
-गोंदिया जिल्ह्यात पावसाची विश्रांती
-वैनगंगा नदी आणि वाघ नदी मध्ये अद्यापही पूर परिस्थिती कायम….
-पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना काढण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज….
-पुरामध्ये अडकलेल्या अनेक नागरिकांना आतापर्यंत काढण्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला यश….
-
अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा
Maharashtra News Live : उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती….
गेल्या काही दिवसापासून दोन्ही पक्षातील पदाधिकारी एकमेकावर टीका करत असल्यानं या बैठकीला महत्त्व
उद्यय सामंत आणि दादा भुसे देखील बैठकीला उपस्थित
Published On - Sep 12,2024 9:32 AM