Maharashtra Breaking News LIVE 16 September 2024 : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची कोल्हापूरकरांची प्रतिक्षा आज संपणार

| Updated on: Sep 16, 2024 | 10:08 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 16 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 16 September 2024 : वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची कोल्हापूरकरांची प्रतिक्षा आज संपणार
Maharashtra Live News

Maharashtra News Live : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यामुळेच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष रंगणार आहे. त्यामुळे सध्या जागावाटप, मतदारसंघ यावर चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. उद्या अनंत चतुर्दशी असल्याने आज मुंबईसह ठिकठिकाणच्या मंडळात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच मोदी 3.0 सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. सध्या मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांचा लेटमार्क लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Sep 2024 05:49 PM (IST)

    संजय शिरसाठ यांची सिडकोच्या अध्यक्षपदी निवड

    मंत्रिपदाचा प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाठ यांची महामंडळावर वर्णी. शहर व औद्योगिक विकास महामंडळाच्या अर्थात सिडकोच्या अध्यक्षपदी निवड

  • 16 Sep 2024 05:31 PM (IST)

    धनगर आरक्षणावर सकारात्मक भूमिका – देवेंद्र फडणवीस

    काल बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून रोड मॅप बनवला आहे. मी दुसऱ्या बैठकीत असल्याने त्या बैठकीला नव्हतो. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या दिशेने आपण पुढे चाललो आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणावर बोलताना म्हटले आहे.

  • 16 Sep 2024 05:29 PM (IST)

    वंदे भारत ट्रेन भारताची शान – देवेंद्र फडणवीस

    आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ट्रेनची भेट दिली आहे. महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा सुखकर प्रवासासाठी फायदा होणार आहे. वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 16 Sep 2024 04:52 PM (IST)

    ‘आप’ची आज संध्याकाळी पीएसीची बैठक, नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा

    आम आदमी पार्टीने आज संध्याकाळी 5.30 वाजता पीएसीची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार आहे. पीएसीच्या बैठकीत दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा होणार आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर पीएसीची ही पहिलीच बैठक आहे.

  • 16 Sep 2024 04:37 PM (IST)

    कोलकाता: ममतांनी पुन्हा बोलावली कनिष्ठ डॉक्टरांची बैठक, सांगितलं ही शेवटची संधी आहे

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. आंदोलक डॉक्टरांशी बोलण्याची ही शेवटची संधी असल्याचे ममता म्हणाल्या. सभेचे कोणतेही लाईव्ह स्ट्रीमिंग होणार नाही. अशा स्थितीत आंदोलक डॉक्टर या बैठकीला हजर राहतात की नाही हे पाहावे लागेल.

  • 16 Sep 2024 04:25 PM (IST)

    UP: पोटनिवडणुकीत 10 पैकी 10 जागांवर भाजपचा पराभव करू – अजय राय

    उत्तर प्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षासोबत युती करण्याच्या बातमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय म्हणाले की, आम्ही एकत्र लढू. आम्ही केंद्रीय नेतृत्वाला 5 जागांचा प्रस्ताव दिला आहे. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. आम्ही एकत्र लढू आणि 10 पैकी 10 जागांवर भाजपचा पराभव करू.

  • 16 Sep 2024 04:10 PM (IST)

    काश्मीरमध्ये कधीही दोन झेंडे असू शकत नाहीत, इथे फक्त आमचा तिरंगा असेल – शाह

    जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे एका सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस म्हणतात की त्यांचे सरकार स्थापन झाल्यास ते कलम 370 पुन्हा लागू करतील. कलम 370 परत करावे का? कलम 370 आता इतिहासाचा भाग बनले आहे. भारतीय राज्यघटनेत कलम 370 ला स्थान नाही. काश्मीरमध्ये दोन पंतप्रधान, दोन संविधान आणि दोन ध्वज कधीच असू शकत नाहीत. एकच ध्वज असेल आणि तो म्हणजे आपला तिरंगा.

  • 16 Sep 2024 01:35 PM (IST)

    ठाण्यातील कापुरबावडी पोलीस स्टेशन हद्दीत सुरक्षारक्षकाकडून सुपरवायझरची हत्या

    सुरक्षारक्षक प्रसाद कदम ने केली सुपरवायझर सोमनाथ सादगीर याची हत्या. लोढा हमारा मधील सिग्नेट इमारतीच्या टेरेसवर आढळला धडापासून शिर कापलेला मृतदेह. रात्री दहाच्या सुमाराची घटना

  • 16 Sep 2024 01:29 PM (IST)

    पुण्यातील कोंढव्यात गोळीबाराची घटना

    वाळू व्यवसायिकावर झाला गोळीबार. गोळीबाराच कारण अद्याप अस्पष्ट दोन दिवसात गोळीबाराच्या दोन घटना पुण्यात. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर

  • 16 Sep 2024 01:22 PM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला- यशोमती ठाकूर

    फेक नेरेटिव्हचे बादशाह देवेंद्र फडवणीस आहे फेक नेरेटिव्हचे करून जीव घेण्याची भाषा जर कोणी करत अडानी करत असेल तर जनता त्याला माफ नाही करता येणार त्यावर कारवाई झाली पाहिजे, संजय गायकवाड यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी -यशोमती ठाकूर यांची मागणी

  • 16 Sep 2024 01:16 PM (IST)

    भाजपाला मोठा धक्का

    भाजपचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती..

  • 16 Sep 2024 12:57 PM (IST)

    मुंबई लोकलची जलद वाहतूक मंदावली

    दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानक डाऊन मार्गावरमध्ये तांत्रीक बिघाड झाल्यामुळे दोन्ही बाजूच्या जलद लोकल वाहतूक मंदावली. प्लँटफॉर्म 5 व 6 वरील जलद गाड्यांची वाहतूक मंदावली आहे.

  • 16 Sep 2024 12:50 PM (IST)

    स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन

    पंढरपुरात स्वराज्य संग्राम संघटनेचे पहिले अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याच्या विविध भागातून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये जमा झाले होते. दुपारी पंढरपूर शहरातून रॅली काढून अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी शिंदे, यांनी मराठा समाजाला आरक्षण समान नागरी कायदा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी हे मुद्दे घेऊन अधिवेशनात ठराव संमत केले.

  • 16 Sep 2024 12:35 PM (IST)

    कांदा आणि कोथिंबीर 50 शी पार

    अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणारी भाज्यांची आवक मंदावली आहे. यामुळे भाज्याचे दर वाढले आहे. कांदा आणि कोथिंबीर 50 शी पार गेले आहे. रत्नागिरीत कोथिंबीर जुडी 70 रुपयांवर विकली जात आहे. कांद्याचे दर देखील 60 ते 70 रुपये किलो आहे.

  • 16 Sep 2024 12:21 PM (IST)

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन गडकरींच्या घरी

    महाराष्ट्रचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील घरी भेट देत गडकरी यांची भेट घेतली. ते सध्या नागपूर दौऱ्यावर आहे.

  • 16 Sep 2024 12:06 PM (IST)

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्राथमिक अहवाल दोन दिवसांत

    आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने गोळा केलेला अहवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्राथमिक अहवाल दोन दिवसात सादर होणार आहे. गुरुवारपर्यंत प्रदेश कार्यालयाला अहवाल मिळणार आहे. पक्षाची ताकद आणि संभाव्य उमेदवारांबाबत हा प्राथमिक अहवाल आहे.

  • 16 Sep 2024 11:55 AM (IST)

    कोल्हापूर- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची कोल्हापूरकरांची प्रतिक्षा आज संपणार

    कोल्हापूर- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची कोल्हापूरकरांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आज दुपारी चार वाजता कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिसीद्वारे फ्लॅग ऑफ होणार आहे. कार्यक्रमाआधी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर वंदे भारत आणि कोल्हापूर ते मुंबई याच मार्गावर एक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीदेखील प्रयत्न सुरू असल्याची माहिती धनंजय महाडिक यांनी दिली.

  • 16 Sep 2024 11:44 AM (IST)

    स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

    स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष याप्रकरणी मार्ग काढण्याबाबत हे पत्र लिहिलं आहे. यासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागितली आहे.

  • 16 Sep 2024 11:33 AM (IST)

    मनोज जरांगे यांचं आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुन्हा उपोषण

    मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून पुन्हा उपोषण करणार आहेत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत आजपासून ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

  • 16 Sep 2024 11:22 AM (IST)

    माझं उपोषण म्हणजे सरकारला शेवटची संधी- मनोज जरांगे पाटील

    “मला राजकारण नको, माझ्या मागण्या मान्य करा. माझं उपोषण म्हणजे सरकारला शेवटची संधी आहे. आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आम्हाला बोलू नका. सरकारने इथं यावं अन्यथा येऊ नये, आमचं आंदोलन सुरू राहणार,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.

  • 16 Sep 2024 11:11 AM (IST)

    बांगलादेश ते ओमान जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

    बांगलादेश ते ओमान जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानातील प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. वैद्यकीय निकड लक्षात घेऊन ही लँडिंग करण्यात आली. वैमानिकासह नियंत्रण कक्षाच्या समन्वयामुळे प्रवाशाचे प्राण वाचले.

  • 16 Sep 2024 10:57 AM (IST)

    मुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनरला आग

    मुंबई- आग्रा महामार्गावर थार गाड्या घेऊन जाणारा कंटेनरला भीषण आग लागली आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क हॉटेल जवळी पुलाच्या खाली कंटेनरला आग लागली आहे. नाशिककडून दिल्लीकडे जाणाऱ्या कंटेनरमध्ये सहा थार गाड्या होत्या. शॉक सर्किटमुळे आग लागली. महापालिकेच्या अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवली आहे. कुठलीही जीवित हानी झाली नाही. थार गाड्यांचा देखील नुकसान नाही.

  • 16 Sep 2024 10:45 AM (IST)

    कांद्याचे ट्रक अडकले, का? वाचा…

    किमान निर्यात मूल्य रद्द झाल्यानंतर देखील कांदा व्यापारी आणि निर्यातदारांचे हाल होत आहेत. निर्णय झाल्यानंतर देखील सिस्टीम अपडेट न झाल्याने लाखो टन कांदा बॉर्डरवर अडकला आहे. बांग्लादेश बॉर्डर वर 100 ट्रक अडकले आहेत. तर मुंबई पोर्टवर देखील 300 कंटेनर अडकून पडले आहेत. नाशिकच्या जनोरीमध्ये देखील निर्यातीसाठी साठी जाणाऱ्या 70-80 अडकले आहेत. सिस्टीम अपडेट नसल्याने कस्टमचे कागदपत्र तयार करण्यास अडचण येत आहे. जहाज निघून गेल्यास लाखो टन कांदा सडून जाण्याची भीती आहे. केंद्रीय पातळीवरून हस्तक्षेप करण्याची कांदा निर्यातदारांनी मागणी केली आहे.

  • 16 Sep 2024 10:30 AM (IST)

    संजय राऊतांचा सरकारवर निशाणा

    ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीवर बोलताना शिंदे सरकारवर टीका केली आहे. जिथे पराभव दिसतो तिथे भाजप निवडणुका घेत नाही. हारण्याच्या भीतीने भाजपने 14 महापालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत.

  • 16 Sep 2024 10:15 AM (IST)

    जळगावात दगडफेकीची घटना

    जळगावात गुजराल पेट्रोल पंपाजवळील एका बियर बार मध्ये तोडफोड करत दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.  बिअर फुकटात दिली नाही म्हणून हॉटेलच्या मॅनेजरच्या डोक्यात बाटली फोडून साडेतीन लाख लुटल्याचाही प्रकार यावेळी घडला आहे. फुकटात बियर दिली नाही म्हणून तीन ते चार जणांनी मॅनेजर सोबत वाद घातला. या वादातून हॉटेलमध्ये तोडफोड करत तसेच दगडफेक केली. या घटनेमध्ये बियर बारचे मॅनेजर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान हॉटेलमधील साडेतीन लाख रुपयांची रोकड लांबवून तरुण पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेतील एका संशयीताला पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. जखमी व्यवस्थापकांना घेऊन जात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

  • 16 Sep 2024 09:50 AM (IST)

    Maharashtra News Live : नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, वाहतूक मार्गात बदल

    – नाशिक मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी राहणार मोठा पोलीस बंदोबस्त – पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल 900 पोलीस कर्मचारी आणि विशेष सीमा सुरक्षा दल बंदोबस्तासाठी राहणार तैनात – उद्या गणपती विसर्जनासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणात बदल – शहरातून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था – जुन्या नाशिक परिसरातील वाकडी बारव या ठिकाणाहून होणार सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात – मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांची विशेष खबरदारी

  • 16 Sep 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News Live : मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल गाड्या उशिराने सुरु

    मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत

    कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सला येणाऱ्या लोकल गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने सुरू

    धुकं, लांब पल्ल्यांच्या गाड्या व तांत्रिक कारणाने मध्य रेल्वे विस्कळीत असल्याची माहिती

  • 16 Sep 2024 09:36 AM (IST)

    Maharashtra News Live : छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई, वाहने जप्त

    छत्रपती संभाजीनगर : मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे.रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी ३३५ वाहन चालकांची ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली. त्यात २१ वाहनचालकांनी मद्यपान केल्याचे समोर आले.वाहन चालकांनी दारूच्या नशेत वाहन चालविल्याने अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे.त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • 16 Sep 2024 09:34 AM (IST)

    Maharashtra News Live : मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण, एक देश एक निवडणूक संकल्पना राबवण्याची शक्यता

    नवी दिल्ली – मोदी सरकारचा 100 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण

    मोदी सरकार पुन्हा एकदा एक देश एक निवडणूक राबवण्यावर निर्णय घेण्याची शक्यता

    मोदींच्या कार्यकाळातच देशात एक देश एक निवडणूक करण्याचा संकल्प

    वेळ आणि पैशांची बचत करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता

    एक देश एक निवडणुकीला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा

    2029 पासून देशभरात एक देश एक निवडणूक संकल्पना राबवली जाण्याची शक्यता

  • 16 Sep 2024 09:33 AM (IST)

    Maharashtra News Live : उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

    उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

    ध्वजारोहणासाठी मुख्यमंत्री आजच येणार छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर

    17 सप्टेंबर अर्थात मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरवर्षी होतं ध्वजारोहण

    यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

    17 सप्टेंबर रोजी मराठवाड्याला मिळाला होतं स्वातंत्र्य

  • 16 Sep 2024 09:32 AM (IST)

    Maharashtra News Live : पिंपरी- चिंचवड मध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या तस्कराला अटक, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

    पिंपरी चिंचवड -औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी- चिंचवड मध्ये पिस्तूल विक्री करणाऱ्या तस्करासह एकूण पाच जणांना मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या

    -5 जणांकडून एकूण 7 पिस्तूल 14 जिवंत काडतुसासह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

    -नवल झामरे हा पिस्तूल विक्री करणारा तस्कर आहे. झामरे हा मध्यप्रदेशातून पिस्तूल आणून औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड मध्ये विक्री करत असल्याच समोर आलं आहे.

    -अटक करण्यात आलेल्या पाचपैकी पवन शेजवळ याच्यावर हत्येचा गुन्हा दाखलय.कमलेश कानडे याच्यावर पाच घरफोडीची गुन्हे दाखलयत.

  • 16 Sep 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News Live : ससून रुग्णालयात आणखी एक घोटाळा, २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे – सतत वादात असणाऱ्या ससून रुग्णालयातील आणखी एक घोटाळा उघड,

    – ससूनच्या कर्मचाऱ्यांनीच चार कोटी १८ लाख ६२ हजार रुपयांचा केला अपहार

    – याप्रकरणी रुग्णालयाचे अकाउंटंट अनिल माने, रोखपाल सुलक्षणा चाबुकस्वार यांच्यासह २३ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

    – याबाबत ससूनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी फिर्याद दिली आहे,

    – ससून रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर

Published On - Sep 16,2024 9:28 AM

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.