Maharashtra Political News live : अमोल कोल्हे यांचा अजित पवार गटावर निशाणा; म्हणाले…
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी देशभरात पार पडले. महाराष्ट्रातही पाच जागांवर मतदान झाले. नक्षलग्रस्त गडचिरोलीत सर्वाधिक टक्के मतदान, तर नागपुरात सर्वात कमी टक्के मतदान झाले. 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल. येत्या 2 महिन्यांमध्ये शिंदे दिसणार नाहीत, भारतीय जनता पक्षावर टीका करताना बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हे वक्तव्य केलं. वसंत मोरे यांच्याकडून पुणे लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल. शुक्रवारी शक्तीप्रदर्शन टाळत, एकटे जात वसंत मोरे यांनी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये सभा होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी आज मोदी यांची सभा पार पडेल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
मविआचे उमेदवार अमोल कोल्हे म्हणतात…
महाविकास आघाडीचे शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. भाजपमध्ये जे गेले त्यांची अडचण झालेलीच आहे. भाजपसोबत अजित दादा गेल्यानंतर त्यांचा दरारा बघायला मिळत नाही, हे खेदजनक आहे. संजय राऊत यांचं विधान मी ऐकलं नाही. अशी विधान माझ्या बाबत झाली, तेव्हा हाच प्रश्न सत्ताधार्यांना विचारायला हवा होता. पुणे- नाशिक महामार्गावरील परिस्थिती बदली आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
-
धुळ्यात महाविकास आघाडीची बैठक संपन्न
धुळ्यात काँग्रेसच्या वतीने महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर पहिल्यांदा काँग्रेस भावनात बैठक पार पडली. काँग्रेस भवनात विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. डॉक्टर शोभा बच्छाव यांना निवडून आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलं.
-
-
अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर
अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर झाला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. अजित पवारांनाही उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक आयोगाकडून अर्जाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अजित पवारांचा अर्ज नामंजूर झाला आहे.
-
वाशिममध्ये भीषण अपघात
वाशिमच्या मानोरा – दिग्रस रस्त्यावर वापटा घाटात टाटा टेम्पोचा अपघात झाला आहे. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. या अपघातात २० जण जखमी तर ३ गंभीर झालेत. लग्नाचे वऱ्हाड घेवून जात असताना अपघात झाला. हे सगळे कारंजाकडे लग्नाला जात होते.
-
नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकर यांचा केला लहान भाऊ म्हणून उल्लेख
परभणीच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी केला महादेव जानकर यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख
-
-
मी गरीबांचे दु:ख जाणतो- नरेंद्र मोदी
मी गरीबांचे दु:ख जाणतो असे मोठे विधान नरेंद्र मोदी यांनी परभणीच्या सभेत केले.
-
लोकसभा निवडणूक देशाच्या विकासासाठी- नरेंद्र मोदी
लोकसभा निवडणूक देशाच्या विकासासाठी असल्याचे मोठे विधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
-
छगन भुजबळ यांना उमेदवारी डावलल्याने महात्मा फुले समता परिषदेचे काही कार्यकर्ते नाराज
राज्यात ओबीसी बांधवांवरचा हा अन्याय आहे. लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळ यांना माघार घेण्यास भाग पाडण्यात आलं. महायुतीविषयी समता परिषदडेच्या मनात नाराजी.
-
Live Update | काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही – पंतप्रधान मोदी
इंडिया आघाडीचे लोक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत… काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही… विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला नाही…
-
Live Update | ‘इंडिया’च्या नेत्यांमध्ये निवडणूक लढण्याची हिंमतच राहिली नाही – मोदी
‘इंडिया’च्या नेत्यांमध्ये निवडणूक लढण्याची हिंमतच राहिली नाही.. इंडिया आघाडीचे लोक स्वतःला वाचवण्यासाठी एकत्र आले… काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच पराभव मान्य केला आहे… पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
Live Update | मतदान कुणालाही करा, पण मतदान करा… मोदी यांचं नागरिकांना अवाहन
देशातील नागरिकांना अवाहन करतो जे लोक मतदान ककर नाहीत, त्यांनी मतदान करावे, मतदान कुणालाही करा पण मतदान करा… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नागरिकांना अवाहन
-
Live Update | 10 वर्षात मोदींनी जे काम केलं ते कॉंग्रेसने 50 वर्षात नाही केलं – मुख्यमंत्री
10 वर्षात मोदींनी जे काम केलं ते कॉंग्रेसने 50 वर्षात नाही केलं… विदेशात जाऊन गांधींनी देशाची बदनामी केली… मोदीच फक्त देशाला महासत्ता बनवू शकतात… असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे…
-
Live Update | आमच्याकडे मेदी गॅरंटी आहे, असं जनता म्हणतेय – मुख्यमंत्री
आमच्याकडे मेदी गॅरंटी आहे, असं जनता म्हणतेय… चिखलीकर आणि बाबुराव कदमांचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होईल… काँग्रेसने गरिबी हटवली नाही, त्यांनी गरीब हटवले… असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे केलं आहे.
-
पंतप्रधान पद महाराष्ट्राला का मिळू नये -संजय राऊत
उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत,याचा निर्णय आघाडीत बसून घेतला जाईल, असे संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील.महाराष्ट्राला का मान मिळू नये, असे ते म्हणाले.
-
प्रकाश आंबेडकर उत्तम भविष्यवाणी करतात- संजय राऊत
प्रकाश आबेडकर हे कधी कधी खरे बोलतात ते उत्तम भविष्य वाणी करतात, असे संजय राऊत म्हणाले. लोकसभा निवडणुकी नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाही,भाजपा ढेकर देईल..पंतप्रधान यांना भीती आहे त्यामुळे आता ते सभा घेत आहेत. 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या मोदींना आता घाम गाळावा लागतोय, असा टोला पण त्यांनी हाणला.
-
पुढच्या सभेला विश्वजीत कदम दिसतील-संजय राऊत
अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित होते.विश्वजित कदम तब्येत ठीक नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत,पण पुढच्या सभेला विश्वजित कदम दिसतील असे संजय राऊत म्हणाले. तर विशाल पाटील यांच्याशी आमचा यावेळेला उत्तम संवाद आहे, असे ते म्हणाले.
-
सिंचन घोटाळ्यावरुन शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल
नागपूरमधील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंचन घोटाळ्यावरुन पुन्हा निशाणा साधल्यानंतर आज, शरद पवार यांनी पण तोफ डागली. मोदी यांनी यापूर्वी पण सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. तो कुणावर केला होता, असा सवाल करत आज ते तर त्यांच्यासोबत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
-
धुळे लोकसभेसाठी श्याम सनेर यांचा दावा
धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारसाठी आपण ठाम असल्याचा निर्धार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केल. धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडी तर्फे देण्यात आलेल्या उमेदवारी बाबत पुन्हा एकदा वाद रंगण्याची चिन्हं आहेत.
-
सखी महोत्सवातून ठाण्यात शिंदे गटाचे शक्ती प्रदर्शन
ठाणे लोकसभेचा उमेदवार भाजपचा कि शिवसेनेचा हे अद्याप जाहीर झाले नसले तरी, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला मात्र सखी महोत्सवाच्या माध्यमातून आपले शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या महोत्सवाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून या निमित्ताने महिला मतदारांशी संवाद साधला जाणार आहे. या महोत्सवाला 50 हजारांहून अधिक महिला सहभागी होतील, असा दावा आयोजकांकडून करण्यात आला आहे
-
बुलेट ट्रेनच्या मार्गावर म्हातार्डी होणार जंक्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनचे जंक्शन म्हणून दिवा ग्रामिणमधील म्हातार्डी स्टेशनला पसंती देण्यात आली आहे. या स्टेशनमुळे दिवा परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
-
ठाण्यात आरटीईअंतर्गत दोन दिवसांत १,३६६ अर्ज
ठाणे जिल्ह्यातील 2,616 शाळा आरटीईसाठी निवडण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांत 1,366 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.
-
नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी
केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी मतदार संघात येणार आहेत. २४ एप्रिलच्या अमित शाह यांच्या सभेत दिग्गज उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील येणार राणेंच्या प्रचाराला आहेत. महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रचारासाठी विशेष रणनीती तयार केली आहे.
-
माढा लोकसभा मतदार संघात शरद पवारांची सभा होणार
माढा लोकसभा मतदार संघात शरद पवारांची सभा २४ एप्रिलला होणार आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब गावात ही सभा होणार आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची सभा घेतली जाणार आहे.
-
जयंत पाटील आज जळगावात
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज जळगावात येत आहेत. जळगावातील एका हॉटेलात कार्यकर्ते पदाधिकारी यांची गोपनीय बैठक ते घेणार आहेत. जळगाव विमानतळावरून थेट हॉटेलमध्ये पोहोचणार आहेत.
-
भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीच संमती नव्हती
भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीच संमती नव्हती आणि यापुढेही नसेल – पहाटेच्या शपथविधीबाबत अजितदादांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचं स्पष्टीकरण
-
आम्ही विधानसभेत अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करणार – शरद पवार
आमचं लक्ष विधानसभेवर अधिक, आम्ही विधानसभेत अधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करणार असं शरद पवार यांनी नमूद केलं.
-
भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना धमकवणारा पोलिसांच्या ताब्यात
भाजपा आमदार देवयानी फरांदे यांना धमकवणारा पोलिसांच्या ताब्यात. आमदार फरांदे यांच्या विरोधात इंस्टाग्रामवर धमकी वजा पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार फरांदे यांच्या जिवाला धोका निर्माण करणारी ऑडिओ क्लिप केली होती प्रसारित
-
एअर इंडियाची तेल अविवमध्ये जाणारी विमान सेवा 30 एप्रिल पर्यंत स्थगित
एअर इंडियाची तेल अविवमध्ये जाणारी विमान सेवा 30 एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. इराण-इस्त्रायलच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे.
-
पिंपरी चिंचवड(मावळ लोकसभा) – मावळमधून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी चिंचवड(मावळ लोकसभा) – मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली असून पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. क्रांतिकारी जयहिंद सेनेकडून यशवंत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून नामनिर्देशन पत्र नेले. तर, शुक्रवारी दुसऱ्या दिवशी 12 जणांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये होणार सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, 20 एप्रिल रोजी नांदेडमध्ये येत आहेत. त्यांच्याच नावे ओळखल्या जाणाऱ्या असर्जन रोडवरील मोदी ग्राउंड येथे भाजप महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे.
-
गोरेगाव पूर्व येथे 23 आणि 24 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार
गोरेगाव पूर्व येथे 23 आणि 24 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. गोरेगाव मधील रहिवाशांनी पाणी जपून वापरणं गरजेच आहे.
पी दक्षिण विभागातील वीरवाणी इंडस्ट्रील इस्टेट,पश्चिम द्रुतगती मार्ग,गोरेगाव पूर्व येथील जलवाहिनी बदलण्याच्या कामास्तव 23 आणि 24 एप्रिल दरम्यान 24 तासांसाठी काही भागात 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे
-
पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर विषप्रयोग
पूर्व द्रुतगती मार्गावरील 50 झाडांवर अज्ञात व्यक्तीने विषप्रयोग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Published On - Apr 20,2024 7:52 AM