Maharashtra Political News live : मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर… सूत्रांची माहिती
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 21 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत असून जलसाठा 22.61 टक्क्यांवर आला आहे. पाणीकपातीबाबत पालिकेची चालढकल सुरू आहे. त्यामुळे राखीव जलसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवून वापरावा लागणार आहे. नालासोपाऱ्यात घराचे छत कोसळून 1 व्यक्ती जखमी झाली आहे तर 9 जणांना रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी सभा होणार आहे. 29 तारखेला मोदींची दुपारी 3 वाजता लातूर तर सायंकाळी 6 वाजता पुण्यात सभा पार पडेल. दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता होणार बैठक. बैठकीला शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रचारासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
भुजबळांच्या माघारीनंतर नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढला
नाशिक : छगन भुजबळांच्या माघारीनंतर नाशिक लोकसभेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते तातडीने रवाना झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आपल्या काही पदाधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. आजच उमेदवारी घोषित करण्याची मागणी करणार आहेत.
-
तेंदू संकलनाला लवकरच सुरुवात होणार
गोंदिया जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या कामाला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. हंगाम सुरू होण्यास काही महिन्यांचा अवधी आहे. बळीराजा कामाला लागला आहे. तेंदू संकलनालाही लवकरच सुरुवात होणार आहे.
-
-
मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर… सूत्रांची माहिती
मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू…
-
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठी मधून निवडणूक लढवणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसमधील हालचाली वाढल्या आहेत. येत्या शनिवारी राहुल गांधी अमेठीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. वायनाडसोबतच अमेठीमधूनही राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
-
सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात शरद पवारांची उपस्थिती
जळगाव जिल्ह्यातील नेरी गावात शरद पवार यांनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली. नेरीचे शेतकरी सुनील खोडपे यांच्या मुलाचं हे लग्न होतं. शरद पवारांनी हजेरी लावत वधू वराला आशीर्वाद दिला.
-
-
पनवेल-नांदेडदरम्यान 40 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या
प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने उन्हाळ्यात पनवेल-नांदेडदरम्यान 40 उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण संकेतस्थालवर सुरू झाले आहे.
-
शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे संकेतस्थळामार्फत सुरू करण्यात आलेली शिक्षक भरती प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबली होती. मात्र आता निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरती प्रक्रियेला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
-
झाडांवरील रोषणाई सात दिवसांत हटवा
मुंबईतील झाडांवर करण्यात आलेली रोषणाई सात दिवसांत हटवावी आणि रोषणाई हटवण्यात येत नाही, तोपर्यंत दिवे बंद ठेवावेत, असे आदेश महापालिका प्रशासनाने आपल्या विभाग कार्यालयांना दिले आहेत. हायकोर्टाने झाडांवरील रोषणाईवरून पालिकेला फटकारलं होतं.
-
मुंबईच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट
वाढणाऱ्या तापमानाबरोबरच मुंबईकरांना पाणी पुरवणाऱ्या जलायशांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या धरणांत केवळ 22.61 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात उन्हाळ्यामुळे धरणांतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन साठा खालावण्याची शक्यता आहे.
-
Live Update | पुण्यात आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
खडकवासला विधानसभा मतदार संघात उभरण्यात येणार सुनेत्रा पवार यांच निवडणूक प्रचार कार्यालय… अजित पवार यांच्या हस्ते होणार सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाच उद्घाटन.. भाजप नेते चंद्रकांत पाटील देखील लावणार उद्घाटन कार्यक्रमला राहणार उपस्थित… नवले पूल परिसरात असणार नव कार्यालय…
-
Live Update | राज्यातील डीआरजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक आज पहाटेपासून सुरू
राज्यातील डीआरजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये पुन्हा चकमक आज पहाटेपासून सुरू… चकमकीत एक नक्षलवाद्यांला कंटस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश.. अजूनही चकमक सुरू असल्याची सूत्रांकडून प्राथमिक माहिती… बिजापूर जिल्ह्यातील भैरमगड जंगल परिसरात ही चकमक सुरू
-
Live Update | पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं – संजय राऊत
देशाचं नेतृत्व करण्यासाठी इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत… उद्धव ठाकरे देखील देशाचं नेतृत्व करू शकतात… पंतप्रधान बनावं असं फडणवीसांचं स्वप्न होतं… नेत्याचं नाव घेतल्याने मिरची लागण्याचं कारण नाही… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
-
Live Update | शरद पवार यांचे जळगाव विमानतळावर रोहिणी खडसे तसेच पदाधिकाऱ्यांसोबत बंद द्वार बैठक सुरू
माजी आमदार संतोष चौधरी व कार्यकर्त्यांची नाराजी असल्याने या नाराजीवर शरद पवार यांची पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती… शरद पवार यांच्यासोबत सुरू असलेल्या बैठकीत रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील यांचीही उपस्थिती.
-
शरद पवार जळगाव दौऱ्यावर
लोकसभा निवडणूक लागल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर शरद पवार यांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.
-
विनायक राऊत यांची राणेंवर टीका
माझं डिपॉझीट जप्त करणार बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे. चार जून पर्यंत त्यांना चांगली झोप लागेल. चार जून नंतर त्यांची झोप उडेल, अशी टीका विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.
-
चालकाच्या सतर्कतेमुळे वाचला प्रवाशांचा जीव
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीवर खोपोली हद्दीत एका खासगी प्रवासी बसला मध्यरात्री दोन च्या सुमारास आग लागली या आगीत बस जळून खाक झाली. खासगी प्रवासी बसला आग शॉर्टसर्किट मुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चालकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
-
पाकिस्तानच्या संसदेत दिवसाढवळ्या दरोडा
जागतिक पातळीवर पाकिस्तानचे नाक कापल्या गेले. पाकिस्तानच्या संसदेत दिवसाढवळ्या दरोडा पडला. या दरोड्याने पाकिस्तानची उरलीसुरली लाज पण गुंडाळल्या गेली. चोरांनी नॅशनल असेम्बलीच्या सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत खासदारांचे चप्पल, बुट, शूज लांबवले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
-
सोने-चांदीच्या किंमती भडकण्याची शक्यता
इराण-इस्त्राईल संघर्षानंतर आतंरराष्ट्रीय पातळीवर सोने आणिच चांदीने मोठी उडी घेतली आहे. Bloomberg च्या आकडेवारीनुसार, जागतिक बाजारपेठेत सोन्याने नवीन उच्चांक केला आहे. सोन्याने 2,400 डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सराफा बाजारात किंमती भडकण्याची भीती आहे.
-
रणजितसिंह मोहिते पाटील प्रचारापासून दूर
भाजपाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने प्रचारापासून दूर ठेवल्याची चर्चा सुरु आहे. रणजि सिंह यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील तुतारी चिन्हावर माढ्यातून निवडणूक लढत आहेत. मोहिते पाटील यांचे संपूर्ण कुटुंब महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते यांचा प्रचार करत आहेत. तर रणजीत सिंह मोहिते पाटील भाजपमध्ये आहेत.
-
पियुष गोयल मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबई लोकसभेचे उमेदवार पियुष गोयल यांनी प्रथमच मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बोरिवलीत भेट घेतली. या भेटीत पियुष गोयल यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चेची माहिती मिळाली आहे
-
कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींचे वसतिगृह येथे ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणी चौकशी व्हावी, युवासेनेची मागणी
मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींचे वसतिगृह येथे ४० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना झालेल्या अन्न विषबाधा प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली आहे.
पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे विषबाधा झाली की तेथे लावण्यात आलेल्या वॉटर कुलरची स्वच्छता न राखल्यामुळे विषबाधा झाली याची चौकशी करण्यात यावी असे निवेदन युवासेनेकडून कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना ई मेल द्वारे पाठवण्यात आले.
-
धाराशिव – अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, पपई या फळबागासह पॉलीहाऊस, शेड नेट, फळभाज्या यांचे मोठे नुकसान. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धाराशिव, उमरगा, कळंब, तुळजापूर भागात मोठे नुकसान झाले.
-
बुलढाणा – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज प्रचार सभा
बुलढाणा – महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आज प्रचार सभा होणार आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे घेणार प्रचार सभा
-
सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांच्या दुरुस्तीसाठी आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांच्या दुरुस्तीसाठी आज पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर सकाळी 10ते दुपारी 3पर्यत ब्लॉक असेल. मध्य आणि हार्बल मार्गांवर आज कोणताही दिवसकालीन ब्लॉक नाही.
-
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा राहणार बंद
मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी, गोरेगाव, मालाड, कांदिवलीमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. गोरेगाव येथील पी दक्षिण विभागातील जलवाहिनी बदलण्याचे काम महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे हाती घेण्यात आले आहे. यामुळे या परिसरातील पाणी पुरवठा हा बंद ठेवण्यात येणार आहे.
येत्या मंगळवारी गोरेगाव, मालाड व कांदिवली येथील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलीआहे. पाण्याचा योग्य आणि जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
-
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता होणार बैठक
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी मनसेची आज सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे. बैठकीला शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे उपस्थित राहणार असून त्यांच्या प्रचारासंदर्भात या बैठकीत चर्चा होईल.
-
तेंदू संकलनाला लवकरच सुरुवात होणार
गोंदिया जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या कामाला शेतकऱ्यांनी प्रारंभ केला. हंगाम सुरू होण्यास काही महिन्यांचा अवधी होता. बळीराजा कामाला लागला आहे. तेंदू संकलनालाही सुरुवात होणार आहे.
-
कल्याण अहिल्याबाई चौकात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी
कल्याण अहिल्याबाई चौकात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठींब्यावर बॅनर व्यंगचित्र काढत लावण्यात आले आहेत. ‘कमाल आहे बिनशर्त सगळं करणार इम्पॅक्ट प्लेयर अशा आशियाचे लागणे बॅनर’ राज ठाकरे ठाकरे हातात चेंडू आणि बॅट घेऊन उभे असून समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार त्याच्या कडे पाहत असतानाचा व्यंगचित्र काढत बॅनर लावले आहेत.
-
काँग्रेस नेते राहुल गांधी अमेठी मधून निवडणूक लढवणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेनंतर काँग्रेसमधील हालचाली वाढल्या आहेत. येत्या शनिवारी राहुल गांधी अमेठीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. वायनाडसोबतच अमेठीमधूनही राहुल गांधी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
-
मिलिंद नार्वेकरांना शिंदेंकडून ऑफर
मुख्यमंत्री शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिंदे गट ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. नार्वेकर ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत.
Published On - Apr 21,2024 7:51 AM