Maharashtra News live : ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधातही कठोर कारवाई होणार – फडणवीस

| Updated on: May 21, 2024 | 9:39 PM

Maharashtra News LIVE in Marathi : आज 21 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News live : ड्रिंक अँड ड्राईव्ह विरोधातही कठोर कारवाई होणार - फडणवीस

शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेना पडदाधिकाऱ्यांची लोकसभा निवडणुकीची माहिती म्हणून आढावा बैठक सुरू केली आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून विधानसभा मतदार संघात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल पाच आमदार ठाकरे गटाला सोडून गेले. त्यामुळे विधानसभेसाठी दानवे संघटनात्मक बांधणी करत असल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिला.करमाड, शेकटा आणि करंजगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तर बिडकिन शिवारात अवकाळीचा फटका शेतकऱ्यांच्या पपईच्या बागांना बसला असून हे पीक आडवे झाले. पुणे जिल्हाच्या शिरूर तालुक्यातील धामारी परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतीसह अनेक घरांची, झाडांची पडझड झाली. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 May 2024 07:14 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत 59.89 टक्के मतदान

    भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी सकाळी 7.00 ते सायंकाळी 6.00 वाजता पर्यंत एकूण 6 विधानसभा मतदार संघात 59.89 टक्के मतदान झाले आहे.

    भिवंडी मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-

    • भिवंडी ग्रामीण – 72.66 टक्के
    • शहापूर – 70.26 टक्के
    •  भिवंडी पश्चिम – 55.17 टक्के
    • भिवंडी पूर्व – 49.87 टक्के
    • कल्याण पश्चिम – 52.98 टक्के
    • मुरबाड – 61.12 टक्के

    पुरुष मतदार – 1129714

    स्त्री मतदार – 0957191

    इतर मतदार – 0000339

    एकूण मतदार – 2087244

    यापैकी पुरुष मतदार – 687497 – 60.86% स्त्री मतदार – 562525 –  58.77% इतर मतदार – 000054 –  15.93%

    एकूण – 1250076

    एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे .

  • 21 May 2024 07:04 PM (IST)

    पुणे शहरातील दोन पब बंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश

    पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलांना दारू पुरविल्याप्रकरणी कोरेगाव पार्क येथील हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल व परमिट रूम तसेच पबचे आस्थापना विषयक व्यवहार जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने तात्काळ प्रभावासह बंद केले आहेत.

    राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. परवानाधारक हॉटेल, पबमध्ये अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. पहाटे १.३० नंतर कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करण्यात येवू नये. नोकरनामधारक महिला वेटर्समार्फत रात्री ९.३० नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करु नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 21 May 2024 05:47 PM (IST)

    पबच्या वेळेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत. – फडणवीस

    नियम मोडणाऱ्या पबवर कारवाई केली जाणार आहे. पबच्या वेळेसंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 21 May 2024 05:39 PM (IST)

    पुणे – वरिष्ठ कोर्टात जाण्याची पोलिसांची तयारी – फडणवीस

    पोलिसांना या प्रकरणात दोषी ठरवणं चुकीचं आहे. पोलिसांनी ३०४ कलम लावला आहे. पोलिसांची वरिष्ठ कोर्टात जाण्याची तयारी आहे असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 21 May 2024 05:37 PM (IST)

    पुण्यातल्या घटनेनंतर लोकांनी देखील नाराजी व्यक्त केली – देवेंद्र फडणवीस

    रहिवाशी भागात पबला परवानगी नसावी. पुण्यातल्या या घटनेनंतर लोकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 21 May 2024 05:36 PM (IST)

    कोर्टाने दिलेला निर्णय पोलिसांसाठी ही धक्कादायक – फडणवीस

    बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णय प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे पोलिसांना ही धक्का बसला आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • 21 May 2024 05:34 PM (IST)

    ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात येणार – फडणवीस

    ड्रिंक अँड ड्राईव्हच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांना दारु दिल्याने पब मालकांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

  • 21 May 2024 05:32 PM (IST)

    मुलगा अल्पवयीन असताना गाडी चालवायला देणं चुकीचे – फडणवीस

    मुलगा अल्पवयीन असताना गाडी चालवायला देणं चुकीचे असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांन म्हटले आहे. पोलिसांनी अपघात प्रकरणात सगळे पुरावे दिले आहेत.

  • 21 May 2024 05:02 PM (IST)

    पुण्यातील ब्लॅक पब आणि कोझी पबच्या मालकांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यातील ब्लॅक पब आणि कोझी पबच्या मालकांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी दोन्ही पबच्या मालकांना अटक केली असून त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते.

  • 21 May 2024 04:52 PM (IST)

    दिल्ली-एनसीआरमध्ये ईडीचा छापा, निवृत्त आयएएसवर कारवाई

    अंमलबजावणी संचालनालय (ईडी) दिल्ली-एनसीआरमध्ये छापे टाकत आहे. ईडीचे निवृत्त आयएएस रमेश अभिषेक यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रमेश अभिषेक हे 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये निवृत्त झाले. यापूर्वीही सीबीआयने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी रमेश अभिषेक यांच्यावर कारवाई केली होती.

  • 21 May 2024 04:37 PM (IST)

    निवडणुकीत हिंसेला जागा नाही… छपरा गोळीबाराच्या घटनेवर तेजस्वी यादव बरसले

    छपरा गोळीबाराच्या घटनेवर बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले, “आम्हाला दोन जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची माहिती मिळाली. ही घटना निवडणुकीनंतर घडली. प्रशासनाने दोघांना अटक केली आहे. इतर दोन फरार आरोपींनाही अटक केली जाईल. निवडणुकीत हिंसेला जागा नसावी, काही लोक आपल्या पराभवाने इतके निराश होतात की ते अशा घटना करतात.

  • 21 May 2024 04:25 PM (IST)

    हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टातही सुनावणी होणार

    लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अंतरिम जामिनावर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. बुधवारीही या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  • 21 May 2024 04:10 PM (IST)

    भारताला कोणी डोळे वटारून दाखवले तर परिणाम भोगायला तयार राहा – राजनाथ सिंह

    भाजप नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सरकार स्थापनेनंतर कोणी भारताकडे डोळे वटारून पाहात असेल तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे. पाकिस्तानलाही आपला दृष्टिकोन बदलावा लागेल.

  • 21 May 2024 04:02 PM (IST)

    राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांची माहिती

    कल्याणी नगर अपघात प्रकरणात आता राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग दोन्ही पबवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  कोझी आणि ब्लॅक हे दोन्ही पब राज्य उत्पादन विभागाकडून सील करण्यात येणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती देण्यात आली आहे. नियमबाह्य मद्य विक्री केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोन्ही पब सील करण्यात येणार आहेत.

  • 21 May 2024 03:10 PM (IST)

    विशाल अग्रवाल याला आज सकाळी संभाजीनगरमधून अटक

    कल्याणी नगर अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याला पुणे पोलीस कोर्टात उद्या हजर करणार आहे. विशाल अग्रवाल याला आज संध्याकाळी 5 वाजता पोलिस आयुक्तालयात चौकशीसाठी आणलं जाणार आहे.  विशाल अग्रवाल याला आज सकाळी संभाजी नगरमधून अटक करण्यात आली होती.

  • 21 May 2024 03:00 PM (IST)

    विमानाच्या धडकेने ३६ पक्षी गतप्राण

    फ्लेमिंगोच्या थव्याला घाटकोपर मध्ये विमानाची धडक बसल्यामुळे एक-दोन नव्हे, तर तब्बल ३६ पक्ष्यांना प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

  • 21 May 2024 02:50 PM (IST)

    अजित पवारांचा पुणे पोलिस आयुक्तांना फोन

    कल्याणी नगर अपघात प्रकरणात अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवर संवाद साधला. ड्रंक अँड ड्राईव्ह केस मध्ये राजकीय हस्तक्षेप न करता योग्य कायदेशीर निर्णय घ्यावे अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्त यांना आदेश दिले.

  • 21 May 2024 02:40 PM (IST)

    विजय तर माझाच-श्रीरंग बारणे

    मावळ लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कुठे ही ताकद नाही. मतदारांचा कौल पाहता माझा अडीच लाखांच्या मताधिक्याने विजय होईल.चिंचवड आणि पनवेल येथून मला लाखा पेक्षा अधिक लीड मिळणार आहे. हे लीड विरोधक तोडू शकणार नाही, असा दावा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला.

  • 21 May 2024 02:30 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात फळबागांना दुष्काळाच्या झळा

    फळबागांना दुष्काळाचा फटका बसला आहे. फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. डाळिंब फळबाग वाचवण्यासाठी फळबागांवर शेतकऱ्यांकडून आच्छादन टाकणे सुरु आहे. फळबागा आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखी कल्पना लढवली.

  • 21 May 2024 02:20 PM (IST)

    चोरट्यांचा धुमाकूळ

    पर्यटन नगरीत सोन साखळी चोरांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे, लोणावळ्यातील बाबरनगर येथील एका जनरल स्टोअर्स मध्ये दोन साखळी चोरांनी महिला दुकानदार यांची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला.मात्र तो प्रयत्न निष्पळ झाला त्यामुळे चोरांनी धूम ठोकली. या महिलेच्या गळ्यात अनेक साखळ्या असल्याने पितळी नकली मंगळसूत्र चोरांच्या हाताला लागले आणि खरे सोन्याचे मंगळसूत्र तुटून खाली पडले.

  • 21 May 2024 02:10 PM (IST)

    सांगलीत पावसाची जोरदार हजेरी

    सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शिराळा तालुक्यातील चरण, कोकरूड, मोहरे, नाठवडे, पानुंबरे, काळुंद्रे इत्यादी गावामध्ये गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे व कवले देखील उडाले. अनेक ठिकाणी झाडे देखील उन्हाळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

  • 21 May 2024 02:00 PM (IST)

    वादळाने शाळेचे 30 लाखांपेक्षा अधिकचे नुकसान

    शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील शाळेला अवकाळी वादळी वाऱ्याचा व पावसाचा फटका श्री शरदचंद्र पवार पब्लिक स्कुलच्या छतावरील पाच वर्ग खोल्यांचे सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये पत्रे उडून गेलेत वर्ग खोल्यांमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटर्स, शालेय वस्तूंसह पुस्तकांचे मोठे नुकसान शाळेचे 30 लाखांपेक्षा अधिक मोठी वित्तहानी झाली.

  • 21 May 2024 01:48 PM (IST)

    पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दबाव नाही – पोलिस आयुक्त अमितेश कुमार

    हिट अँड रन प्रकरणात पोलीस कुठल्याही दबावात नाही, मी सामोरा समोर चर्चा करायला तयार आहे, कोर्टाने जरी जामिन दिला असला तरी आम्ही वरच्या कोर्टाला त्याला सज्ञान म्हणून वागवावे असे अपिल केले असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे.

  • 21 May 2024 12:57 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा पुणे पोलीस आयुक्तांना फोन

    कल्याणीनगर अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता, राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याने कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांनीही कडक भूमिका घेतली आहे.

  • 21 May 2024 12:45 PM (IST)

    रविंद्र धंगेकर काय म्हणाले?

    पुण्यात सर्रासपणे आशा घटना घडत आहेत. वडगाव शेरी म्हणजे अम्ली पदार्थाचा अड्डस झाला आहे. या सगक्या प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ले आहेत. संबंधित पोलीस आधिकार्यना अटक करा. सगळे पब बेकायदेशीर आहेत पोलिसांच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे. कारवाई करा अन्यथा उद्यापासून पुन्हा आंदोलन करू, असं रविंद्र धंगेकर म्हणालेत.

  • 21 May 2024 12:30 PM (IST)

    कापसाच्या दरात घसरण मात्र कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ

    अमरावतीत कापसाच्या दरात घसरण मात्र कपाशीच्या बियाण्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 457 ग्रॅमच्या कपाशी बियाण्याच्या पॅकेट वर 14 रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी 850 ला मिळणारी कपाशी बियाणे बँग यावर्षी 864 रुपयाला मिळत आहे. कापसाला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडून आहे. मागील वर्षी कापसाच्या उत्पादन खर्चही निघेना.

  • 21 May 2024 12:15 PM (IST)

    धुळे एमआयडीसी परिसरात आग

    धुळे एमआयडीसी परिसरात गोडाऊनला मोठी आग लागली आहे.  फटाके आणि हल्दीरामच्या गोडाऊनला आग लागली आहे. धुळे महापालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झालेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • 21 May 2024 11:51 AM (IST)

    ठाकरे कुटुंब 4 जूननंतर लंडनला पळण्याच्या तयारीत- नितेश राणे

    “उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि संजय राऊत यांचं गाऱ्हाणं बघून पुन्हा मोदीच येणार हे समजलं. ठाकरे कुटुंबीयांचे पासपोर्ट जप्त करावेत. कारण 4 जून नंतर ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत आहे,” अशा शब्दांत नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

  • 21 May 2024 11:40 AM (IST)

    लोणावळ्यात सोनसाखळी चोरांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी

    पर्यटन नगरी लोणावळ्यात सोनसाखळी चोरांनी पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे. लोणावळ्यातील बाबरनगर इथल्या एका जनरल स्टोअर्समध्ये दोन साखळी चोरांनी महिला दुकानदाराची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न निष्फळ ठरल्यामुळे चोरांनी धूम ठोकली.

  • 21 May 2024 11:30 AM (IST)

    पुणे कार अपघाताप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

    पुणे कार अपघाताप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “पोलीस आयुक्तांना निलंबित केलं पाहिजे. त्यांनी आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. एका तरुण जोडप्याचा मृत्यू झाला आणि आरोपीला 2 तासांत जामीन मंजूर झाला. व्हिडिओमध्ये ते पाहू शकतात की तो नशेत होता. पण त्याचा मेडीकल रिपोर्ट निगेटिव्ह आला. हे पोलीस आयुक्त कोण आहेत? त्यांना हटवावं अन्यथा पुण्यातील लोक रस्त्यावर उतरतील,” असं ते म्हणाले.

  • 21 May 2024 11:20 AM (IST)

    दहशतवादी कटाच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून शोधमोहिम

    बेंगळुरूमध्ये नोंदवलेल्या दहशतवादी कटाच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा वेगवेगळ्या राज्यांमध्ये 11 ठिकाणी शोध घेत आहे.

  • 21 May 2024 11:10 AM (IST)

    सांगली- जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

    सांगली- जिल्ह्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शिराळा तालुक्यातील चरण, कोकरूड, मोहरे, नाठवडे, पानुंबरे, काळुंद्रे इत्यादी गावामध्ये गारांसह जोरदार पावसाने हजेरी लावली.

  • 21 May 2024 10:52 AM (IST)

    Live Update : शाळेला अवकाळी वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका

    शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील शाळेला अवकाळी वादळी वाऱ्याचा आणि पावसाचा फटका… श्री शरदचंद्र पवार पब्लिक स्कूलच्या छतावरील पाच वर्ग खोल्यांचे वाऱ्यामध्ये पत्रे उडून गेलेत… वर्ग खोल्यांमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटर्स, शालेय वस्तूंसह पुस्तकांचे मोठे नुकसान…

  • 21 May 2024 10:35 AM (IST)

    Live Update | सत्ताधाऱ्यांमध्ये पराभवाची भीती – संजय राऊत

    सत्ताधाऱ्यांमध्ये पराभवाची भीती आहे. 13 मतदारसंघात यंत्रणा बिघडवण्यात आली. विरोधकांना पैसे वाटप करताना अम्ही पकडलं… मुंब्र्यात एका मतदारसंघात तासाभरात फक्त 11 जणांचं मतदान… मोदींचं डिजीटल इंडिया फेल गेलं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 21 May 2024 10:25 AM (IST)

    Live Update : नागपूर पोलीस ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी उतरली रस्त्यावर

    नागपूर पोलीस ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी उतरले रस्त्यावर… पोलिसांनी सुरू केली नो हॉर्न जागृती मोहीम… हातात फलक घेऊन करत आहे पोलीस जागृती… आवशकता नसताना हॉर्न वाजवू नये ,ध्वनी प्रदूषण करू नये यासाठी पोलिसांनी उचलली पावलं… ही मोहीम सतत राबविण्यात येणार असून ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पोलीस करणार प्रयत्न

  • 21 May 2024 10:06 AM (IST)

    Live Update | बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्या अटकेच्या कारवाईनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये

    पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकाना पुणे पोलिसांनी केली अटक… प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी केली अटक… या आरोपी विरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता…. गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिन्ही पब मालकांना पुणे पोलिसांनी केली अटकेची कारवाई

  • 21 May 2024 09:58 AM (IST)

    Pune Car Accident : विशाल अग्रवाल यांच्या अटकेच्या कारवाईनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये

    पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकाना पुणे पोलिसांनी केली अटक. प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी केली अटक. या आरोपी विरोधात अल्पवयीन मुलाला दारू दिल्याप्रकरणी पुणे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर या तिन्ही पब मालकांविरोधात पुणे पोलिसांनी केली अटकेची कारवाई.

  • 21 May 2024 09:46 AM (IST)

    Pune car crash : ‘मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे’

    पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने वडिलांनीच मला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं म्हटलय. मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही, वाहन चालविण्याची परवानगी नाही, तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली. मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे, असं पोलीस चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितलय. कल्याणीनगर घडलेल्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले

  • 21 May 2024 09:16 AM (IST)

    Maharashtra News : पुलवामा हल्ल्यात गुन्हा दाखल झाल्याची धमकी देत 32 लाख उकळले

    जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात तुमचा सहभाग आहे. याप्रकरणी तुमच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे, अशी भीती दाखवून सायबर भामट्यांनी एका 82 वर्षीय वृद्ध नागरिकाची सुमारे 32 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार नवी मुबंईत घडला असून याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 21 May 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News : सोलापुरात महिलेचचा आत्महत्येचा प्रयत्न

    शहरातील छत्रपती संभाजी महाराज तलावात एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मात्र तलावानजीक असलेल्या तरुणांनी बुडणाऱ्या तरुणीला वाचवले. वैष्णवी कोंडा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. घरात राहू नको असे सांगितल्याचा राग मनात धरून या युवतीने तलावात उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

  • 21 May 2024 09:12 AM (IST)

    IDFC बँकेला आयोगाचा दणका,  न घेतलेल्या कर्जाचे हप्ते घेतल्याने भरपाईचा आदेश

    IDFC बँकेला आयोगाचा दणका,  न घेतलेल्या कर्जाचे हप्ते घेतल्याने भरपाईचा आदेश. ग्राहकाने जे कर्जच घेतलेले नाही त्याचे हप्ते त्याच्या बँक खात्यातून कापल्याबद्दल मुंबई उपनगर जिल्हा ग्राहक आयोगाने आयडीएफसी बँकेला नुकताच दणका दिला आहे.  ‘सेवेत केलेली कुचराई आणि त्या ग्राहकाला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल बँकेने एक लाख रुपयांची नुकसान भरपाई व्याजासह द्यावी. तसेच न्यायिक खर्चापोटी दहा हजार रुपये अतिरिक्त द्यावेत’, असे निर्देश आयोगाने बँकेला दिले आहेत.

  • 21 May 2024 08:49 AM (IST)

    ठाणे स्टेशनबाहेर जाहिरात फलकाला लागली आग

    ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोरील जाहिरात फलकाला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेतली आणि ही आग विझवण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोणीही जखमी झाले नाही.

  • 21 May 2024 08:45 AM (IST)

    खंडाळा घाटात बॅटरी हिल जवळ भीषण अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

    जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिल जवळ एक कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमध्ये बसलेल्या दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले.  पुण्यावरून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला आहे.

  • 21 May 2024 08:27 AM (IST)

    १२ वीचा निकाल आज लागणार, दुपारी १ वाजता पाहता येणार निकाल

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. सकाळी अकरा वाजता बोर्डाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाला पाहता येईल.

  • 21 May 2024 08:20 AM (IST)

    मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन 20 मिनिटे उशीरा

    मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेन 20 मिनिट उशिरा आहेत. तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहाड, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्टेशवर चाकरमान्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Published On - May 21,2024 8:18 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.