निवडणूक आयोगाकडे सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली आहे. उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मते मिळाल्यास त्या मतदारसंघातला निवडणूक निकाल रद्द करून नव्याने मतदान घ्यावं का? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? याकडे देशाचे लक्ष. पुढील 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळू शकतो. उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही अवकाळी पावसाचा इशारा. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. जम्मू काश्मीर, उत्तराखंडमध्येही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता. मान्सून दाखल होण्यापूर्वीच देशातल्या अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
केंद्राने बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली.. नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड (NCEL) ही देशांना कांदा निर्यात करणारी एजन्सी आहे.. भारत सरकारने 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा विशेषतः मध्य-पूर्व आणि काही युरोपीय देशांमधील निर्यात बाजारासाठी निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.
येत्या आठवड्याभरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांबाबत निर्णय होणार आहे. राज ठाकरे कुठे, किती आणि कधी सभा घेणार लवकरच जाहीर होणार आहे.चौथ्या आणि पा चव्या टप्प्यातील मतदानासाठी मनसेची रणनीती ठरवली जाणार आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला आहे.शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केले, त्यातून त्यांची संपत्ती समोर आली आहे, त्यांच्याकडे 9 गाड्या आहेत. मठ आणि गुरुकुल आहेत. एकूण 38 कोटींचे ते मालक आहेत.
राहुल गांधीच्या इंजिनमधील बोगीमध्ये सोनिया गांधी, प्रियांका गांधी बसू शकतात. शरद पवार यांच्या बोगीमध्ये सुप्रिया सुळे बसू शकतात आणिउद्धव ठाकरेच्या बोगीत फक्त आदित्य ठाकरेंच बसू शकतात. तिथे सर्वसामान्यांना प्रवेश नसल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरात तळ ठोकून आहे. गेल्या ५ तासांपासून कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी पंचशील हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. सभेचं नियोजन आणि इतर घडामोडींबाबत चर्चा होणार असल्याचे समजते.
निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा निर्याताचा मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारची ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी दिली. बांग्लादेश, युएई, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत कांदा निर्यात होणार आहे.
भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कडेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा संपन्न होत आहे.
ईडीच्या आरोपांवर केजरीवाल यांच्याकडून उत्तर सादर. ईडीच्या चारही साक्षीदारांचा संबंध भाजपशी, केजरीवाल यांचा आरोप. मंगूता श्रीनिवासन रेड्डी हे भाजपचे लोकसभा उमेदवार
भाजप आणि शिंदे गटात वाद असल्याने याचा फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला होऊ शकतो. भाजप उमेदवार डॉ. हिना गावित यांनी शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली…
अमरावती लोकसभेत 64.02 टक्के मतदान. मागील वेळी पेक्षा मतदानाची टक्केवारी वाढली.
नाशिक- भाजप पदाधिकारी योगेश बोर्डेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पक्षविरोधी आणि पक्षाला वेठीस धरण्याचे काम केल्याने हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याने भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी योगेश बर्डे यांची हकालपट्टी केली. कालच भारती पवारांवर योगेश बर्डे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील ‘रोशन सिंह सोढी’ची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह मागील चार दिवसांपासून बेपत्ता आहेत. गुरुचरण सिंह हे बेपत्ता असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सिंह यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. तर, सोढी यांनी चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने एक पोस्टही केली होती.
जलवाहिनी बदलण्याच्या कामामुळे पुढील आठवड्यात कांदिवली आणि बोरिवली परिसरात 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार, 2 मे रोजी रात्री 10 वाजल्यापासून शुक्रवार 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आर. दक्षिण आणि आर. मध्य विभागातील काही परिसरांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
रेल्वे रुळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असल्याने रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही.
मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्ट/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल.
डॉ.हिना गावित यांच्या प्रचार सुरू असताना रुग्णवाहिकेला वाट करून दिली. नंदुरबार शहरातून प्रचार रॅली जात असताना सोनार गल्लीत रुग्णवाहिका अडकली होती. यावेळी प्रचार रॅली थांबून रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. रुग्णवाहिका रुग्णालयात जात होती. त्यामुळे रॅलीतील कार्यकर्त्यांनी वाट करून दिली.
माढा लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा होत आहे. या सभेसाठी शरद पवार दहिवडीमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, प्रभाकर देशमुख या सभेला उपस्थित आहेत. दहिवडी येथील बाजार पटांगणावर होत असलेल्या सभेसाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांच्या उमेदवारीचा निर्णय आज होणार आहे. आज काँग्रेस पक्षाच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत राहुल यांच्या अमेठीमधील उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. वायनाडसह राहुल गांधी अमेठीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कांदा निर्यातबंदी यावरून प्रचारात सामना करावा लागत आहे. डॉ. भारती पवार यांच्या अडचणीत रोज नवी भर पडते आहे. युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष योगेश बर्डे यांनी आज पक्षाचा राजीनामा दिला आहे. भारती पवार यांच्या मनमानी कारभारला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या अडचणीत रोज नवी भर पडत आहे. त्यामुळे प्रचाराआधीच त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात बस खोल दरीत कोसळली… अपघातात 20 ते 25 जण जखमी… जखमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) तसेच बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू….. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडे पाच वाजता अपघात…
गुजरातचा कांदा मुंबईतील बंदरातून परदेशात जाणार.. ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना मालामाल करत आहेत.. गुजरातच्या ठेकेदारांना मालामाल करण्याचा डाव… भाजपकडून गादीचा अपमान केला जातोय… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं, अशी आमची इच्छा होती… शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी कोल्हापुरात येत आहेत… गुजरातचा कांदा मुंबईतील बंदरातून परदेशात जाणार.. भाजपकडून गादीचा अपमान केला जातोय… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
खाजगी बसने अचानक पेट घेतल्यानं प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला होता… मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवलं.. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर अग्निशमन दल आणि यंत्रणेने नियंत्रण मिळवले आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही खाजगी बस निघाली होती…
माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार यांची आज दहिवडी येथील बाजार पटांगणावर जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभे आहेत. आज 11 वाजण्याच्या सुमारास ही सभा पार पडणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटण येथे जाहीर सभा होणार आहे.
कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज तपोवन मैदान कोल्हापूर येथे होणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) आणि राहिल गुप्ता (आयआरएस) शुक्रवारी ठाणे लोकसभा मतदारसंघात दाखल झाले. अन्य लोकसभा मतदारसंघात एक निरीक्षक नियुक्त केले आहेत. पण ठाणे मतदारसंघात दोन केंद्रीय खर्च निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मीना व गुप्ता हे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. ठाणे लोकसभा मतदार संघातील ठाणे, ऐरोली, बेलापूर या विधानसभा मतदार संघासाठी मीना तर गुप्ता हे उर्वरित विधानसभा मतदार संघासाठी काम पाहतील.
महाराष्ट्रातील लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांकरिता 134 उमेदवारी अर्ज वितरित करण्यात आले आहेत, तर कल्याण लोकसभा मतदार संघाकरिता दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महायुतीच्या रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला आक्षेप फेटाळला. रावेर लोकसभेच्या महायुतीच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या उमेदवारी अर्जावर 26 एप्रिल रोजी एका अपक्ष उमेदवाराने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात लेखी अर्ज देऊन आक्षेप घेतला. परंतु आक्षेप घेताना पुरावे सादर न केल्याने सदर आक्षेप फेटाळण्यात येत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय दिला आहे.
पुण्यात शिवसंग्राम संघटनेची आज महत्वाची बैठक. ज्योती मेटे जाहीर करणार भूमिका. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी की महायुतीला पाठींबा देणार? या संदर्भात करणार घोषणा. सकाळी 11 वाजता सुरु होणार बैठक. दुपारी दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पुण्यात राहुल गांधींची देखील सभा. 3 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा. पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी पुण्यात घेणार सभा. सभेमार्फत काँग्रेस पुणे शहरासह जिल्ह्यात करणार मोठं शक्ती प्रदर्शन. पुण्यातील एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार राहुल गांधींची सभा.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात. संध्याकाळी पाच वाजता कोल्हापूरमध्ये मोदींची जाहीर सभा. कोल्हापूर नंतर मोदी गोव्यातही जाहीर सभा घेणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गुजरात दौऱ्यावर. वडोदरा, भरूच, गोधरामध्ये अमित शाह यांचे रोडशो आणि जाहीर सभा.