Maharashtra Breaking News LIVE : अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

| Updated on: Jun 20, 2024 | 10:05 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 20 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीनगरमधील एका महत्वपूर्ण कार्यक्रमात ते सहभागी होतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज इंडस्ट्री चेंबर्ससोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जुलै महिन्यात सादर होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर आजा त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये येणार असून नागरिकांची भेट घेतील. आज किल्ले रायगडावर तिथी प्रमाणे शिवराज्यभिषेक सोहळा होणार असून या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jun 2024 08:36 PM (IST)

    मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातून चार बांगलादेशी महिलांना अटक

    मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातून चार बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. अनधिकृतरित्या देशात प्रवेश आणि वास्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस, गावदेवी पोलीस आणि व्ही पी रोड पोलिसांची संयुक्त कारवाई केली आहे. अवैधरित्या देशात वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधातील विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. चौघांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

  • 20 Jun 2024 08:07 PM (IST)

    अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या राऊज अवेण्यू कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा दिला आहे.

  • 20 Jun 2024 08:06 PM (IST)

    मुरलीधर मोहोळ यांचं संरक्षणमंत्र्यांना पत्र

    केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षणमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.  पुणे विमानतळाची धावपट्टी विस्ताराची शक्यता तपासावी, असं मुरलीधर मोहोळ पत्राद्वारे म्हणाले आहेत.  मोहोळ सोमवारी संरक्षणमंत्र्यांना भेटणारही आहेत. मोठी विमाने उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी सुमारे १००० मीटरने वाढवणे आवश्यक आहे, असं मोहोळ यांचं म्हणणं आहे.

  • 20 Jun 2024 06:55 PM (IST)

    जळगावातील सर्व विधानसभा लढविण्याची कॉंग्रेसची तयारी – प्रदीप पवार

    जळगाव जिल्ह्यात सर्व 11 विधानसभा जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी कॉंग्रेसने केल्याचे काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी म्हटले आहे.

  • 20 Jun 2024 06:39 PM (IST)

    मोदी साहेबांनी विधानसभेला जास्त ठिकाणी प्रचाराला यावं – शरद पवार

    पंतप्रधान मोदींनी लोकसभेला 12 ठिकाणी प्रचाराला आले आणि 10 ठिकाणी त्यांचे उमेदवार पडले. त्यांनी विधानसभेला जास्त ठिकाणी प्रचाराला यावे असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार शरद पवार यांनी बारामतीतील मोरगाव येथ लगावला आहे.

  • 20 Jun 2024 06:23 PM (IST)

    माळी महासंघ आता न्याय हक्क परिषद घेणार

    माळी महासंघ आता न्याय हक्क परिषद घेणार आहे. राज्यात दुसऱ्या नंबरची लोकसंख्या असलेल्या माळी समाजाची राजकीय उपेक्षा होत असल्याने 23 जून रोजी भुसावळ येथे माळी समाज न्याय हक्क परिषद घेणार आहे.

  • 20 Jun 2024 05:55 PM (IST)

    लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली

    ओबीसी आरक्षणासाठी उपोषणास बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक उपोषणस्थळी दाखल झाले आहे. दोघांच्याही प्रकृतीची तपासणी सुरू आहे. हाके आणि वाघमारे यांचा बीपी वाढला आहे. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. उपचार न घेतल्यास त्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.

  • 20 Jun 2024 05:27 PM (IST)

    पुण्यात पावसाला सुरुवात

    गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्याने पावसाने पुण्यात पुन्हा हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण झाल्यानंतर ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

  • 20 Jun 2024 05:26 PM (IST)

    अन्याय दूर करण्याची वेळ आली – खासदार प्रणिती शिंदे

    आता काँग्रेसची सत्ता आली आहे. आता त्रास सहन करण्याची वेळ नाही तर त्रास देण्याची वेळ आहे. मागील दहा वर्षात जो अन्याय झाला तो दूर करण्याची वेळ आता आली आहे, असे विधान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केले. सोलापुरातील एम. के. फाऊंडेशनच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना 2 लाख वाह्यांचे वाटप करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

  • 20 Jun 2024 05:10 PM (IST)

    चित्रा वाघ यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    ब्रॅंड आणि ब्रॅंडीसारखे पाचकळ विनोद करून सर्वज्ञानी संजय राऊत तुम्ही पेपरवाले नाही तर पडेल कॅामेडी शोचे पडेल कलाकार असल्याचं सिद्ध केलं. त्यामुळे आता ‘सामना’चं नाव बदलून ‘टोमणा’ ठेवा. पण, त्या टोमण्यांमध्ये किमान धार तरी ठेवा. की पहिल्या धारेचा एवढाच असर होतो? इतक्याशा विजयाची इतकी हवा डोक्यात जाऊ देऊ नका. नाही तर ‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ अशी अवस्था होईल लवकरच असा टोला भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

  • 20 Jun 2024 04:43 PM (IST)

    जमीन घेणाऱ्या एजेंटांना गावात फिरू देउ नका शरद पवारांचा सल्ला

    काही करा पण जामीन विकू नका, असा सल्ला शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पुणेकर मुंबईकर येतील पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल तर त्याला गावात येऊ देऊ नका, असंही शरद पवार म्हणाले.

  • 20 Jun 2024 04:07 PM (IST)

    “दोन समाजात सरकार पुस्कृत आग लावलेली आहे”

    विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं पाप महायुती सरकारनं केलंय. धनगर विरूद्ध आदिवासी भांडण कुणी सुरू केलं? मराठा समाजाला अनेक वेळी लेखी आश्वासन दिलं. जे होऊ शकतं नाही ते मराठा समाजाला का लेखी दिलं? दोन समाजात सरकार पुस्कृत आग लावलेली आहे”, असं वडेट्टीवार म्हणाले.

  • 20 Jun 2024 03:55 PM (IST)

    बीएएसएफ टीमने गुजरातच्या कच्छ येथील खाडी क्षेत्रातून ड्रग्स केलं जप्त

    गुजरातच्या कच्छ भागात बीएसएफने धडक कारवाई केली. या भागातील खाडी भागात बीएसएफचे जवान घुसले होते. सदर चिखलात पडलेली गोण उघडताच त्यात ड्रग्स असल्याचं निष्पन्न झालं आहे.

  • 20 Jun 2024 03:47 PM (IST)

    पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी कटिबद्ध: जयवीर सिंग

    यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याच्या आणि सीबीआयकडून तपास करण्याच्या आदेशावर, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयवीर सिंह म्हणाले, “परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाल्याची माहिती मिळताच, ती रद्द करण्याचा निर्णय तात्काळ घेण्यात आला. चौकशी करण्यात येईल. तसेच परीक्षांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकार कायदे बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

  • 20 Jun 2024 03:37 PM (IST)

    दिल्लीत गेल्या 24 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू

    दिल्लीत उष्णतेची लाट कायम आहे. अतिउष्मा आणि उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या 24 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  • 20 Jun 2024 03:19 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून दिली प्रतिक्रिया, म्हणाले..

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आपली प्रतिक्रिया दिली. ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लक्ष्मण हाके यांचा जरांगे यांच्या सगेसोयरे मागणीला विरोध आहे. सगेसोयरांच्या मागणीवर तुम्ही लेखी लिहून द्या, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्या शिष्टमंडळ पाठवतो, असं त्यांना सांगितलं.

  • 20 Jun 2024 03:14 PM (IST)

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हाकेंच्या भेटीला उपोषण स्थळी

    काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी लक्ष्मण हाकेंची भेटी घेतली. यावेळी त्यांनी घटनास्थळावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉल केला. वडीगोद्रीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे.

  • 20 Jun 2024 03:10 PM (IST)

    उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा बुलडोजर कारवाई, जैनब फातिमाचं घर पाडलं

    प्रयागराज विकास प्राधिकरणाने पुन्हा एकदा धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गँगस्टर अतिक अहमदचा भाऊ अशरफची पत्नी जैनब फातिमा हीचं घरं पाडलं.

  • 20 Jun 2024 01:57 PM (IST)

    NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाच्या घडामोडी

    NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाने आज पुन्हा एकदा त्यावर बंदी घालण्यास नकार दिला. परीक्षा रद्द झाल्यास काउंसलिंग आपोआप रद्द होईल, असं कोर्टाेने म्हटलं आहे. आज कोर्टात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या. परीक्षा रद्द करून पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. कोर्टाने आजही NTA ला नोटीस बजावली. या प्रकरणी 8 जुलै रोजी इतर याचिकांसोबत याही याचिकेवर सुनावणी होणार आहे.

  • 20 Jun 2024 01:45 PM (IST)

    ड्रगची तस्करी करणाऱ्या तीन भावांना अटक

    नागपुरात एमडी ड्रगची तस्करी करणाऱ्या तीन भावांना अटक करण्यात आली आहे. दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ यात सहभागी आहेत. गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. दुचाकींचा वापर करत तस्करी करत होते. 71.11 ग्राम एमडी ड्रग मिळून आलं त्याची किंमत 7 लाखाच्या घरात आहे.

  • 20 Jun 2024 01:30 PM (IST)

    बदलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग

    बदलापूर शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. बदलापूरच्या रेल्वे स्थानका बाहेर पाणी साचल्याने प्रवाशांना वाट काढावी लागत आहे. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. नगरपालिका प्रशासनाच्या नालासफाईची पोलखोल झालीय. अवघ्या एका तासाच्या पावसात बदलापूर जोरदार पाऊस झालाय.

  • 20 Jun 2024 01:15 PM (IST)

    नवी मुंबईतील रस्ते जलमय

    नवी मुंबईत पावसामुळे काही सखल भागातील रस्ते जलमय झाले आहेत. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर पाणीच पाणीस झालंय. रस्ता जलमय झाल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • 20 Jun 2024 12:55 PM (IST)

    पवार साहेबांना भेटण्यासाठी आलो

    साहेबाला साजेल अशी निवडणूक तुम्ही केली. मी स्वतः चिंतेत होतो. इंदापूर, बारामती मी स्वतः दौरे केले. बारामती गड टिकला पाहिजे ही भावना आमची होती.

  • 20 Jun 2024 12:27 PM (IST)

    धुळे लोकसभेच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात भाजप आक्रमक

    धुळ्यात भाजप महानगरच्या वतीने शोभा बच्छाव यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन. शोभा बच्छाव यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपचं जोडे मारो आंदोलन…

  • 20 Jun 2024 12:17 PM (IST)

    राजधानी दिल्लीत आतापर्यंत उष्माघातामुळे 9 जणांचा मृत्यू

    राजधानी दिल्लीतल्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड.गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उत्तर भारतात उष्णतेची प्रचंड लाट

  • 20 Jun 2024 12:02 PM (IST)

    नवनीत राणा यांच्या पराभवावर अमरावतीत भाजपची चिंतन बैठक..

    भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्या उपस्थित स्थानिक भाजपच्या कार्यालयात पार पडणार बैठक..बैठकीच्या पूर्वी पदाधिकारी यांच्याकडून भरून घेतले जात आहे फ़ॉर्म.

  • 20 Jun 2024 11:59 AM (IST)

     NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी

    नवी दिल्ली – NEET परीक्षेतील घोटाळ्याबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात काउंसलिंग बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. कोर्टाने आज पुन्हा एकदा त्यावर बंदी घालण्यास नकार दिला आहे. परीक्षा रद्द झाल्यास काउंसलिंग आपोआप रद्द होईल, असं कोर्टाने म्हटलंय. आज कोर्टात आठ नवीन याचिका दाखल झाल्या होत्या. परीक्षा रद्द करून पेपरफुटीची चौकशी करण्याची मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली आहे. कोर्टाने आजही NTA ला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 8 जुलै रोजी इतर याचिकांसोबत याही याचिकेवर सुनावणी होणार आहे.

  • 20 Jun 2024 11:56 AM (IST)

    पाटणा हायकोर्टाचा नितीश कुमार सरकारला दणका

    बिहार- पाटणा हायकोर्टाने नितीश कुमार सरकारला दणका दिला आहे. एससी, एसटी आणि ओबीसींना 65 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द केला आहे. नितीश कुमार सरकारने घेतलेला निर्णय पाटणा हायकोर्टाने रद्द केला आहे. नितीश कुमार सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 20 Jun 2024 11:49 AM (IST)

    विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता

    विधान परिषदेच्या निवडणुकीवरून ठाकरे गट कोर्टात जाण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणूक घेणं घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. येत्या 12 जुलैला 11 जागांसाठी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत.

  • 20 Jun 2024 11:42 AM (IST)

    अंबाजोगाई-परळी महामार्गावर रास्ता रोको

    अंबाजोगाई-परळी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे. रस्त्यावर टायर जाळून हा रास्ता रोको करण्यात आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाचा रास्ता रोको सुरू आहे.

  • 20 Jun 2024 11:35 AM (IST)

    संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात

    नाशिक- संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारच्या सुमारास त्र्यंबकेश्वर इथून पंढरपूरच्या दिशेने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

  • 20 Jun 2024 11:28 AM (IST)

    मध्य रेल्वेचे अपडेट्स

    ठाणे ते कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या 5 मिनिटे उशिराने धावत आहे. तर ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 7 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. ठाणे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे.

  • 20 Jun 2024 11:21 AM (IST)

    धुळे-सोलापूर हायवेवर ओबीसी समाजाकडून रास्ता रोको

    धुळे-सोलापूर हायवेवर ओबीसी समाजाकडून रास्ता रोको करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको सुरू आहे. शेकडो ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे.

  • 20 Jun 2024 11:14 AM (IST)

    भाजपचा डीएनए ओबीसीचा असता तर त्यांनी आतापर्यंत आमची दखल घेतली असती- लक्ष्मण हाके

    “भाजपचा डीएनए ओबीसीचा असता तर त्यांनी आतापर्यंत आमची दखल घेतली असती,” असं ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके म्हणाले. फर्ग्युसन कॉलेजमधली नोकरी सोडल्याची कहाणी सांगताना लक्षण हाके यांना भावना अनावर झाल्या. यावेळी लक्ष्मण हाके ढसाढसा रडले. “भाजपच्या धोरणांना वैतागून मी महादेव जानकर यांना सोडलं. सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून विचार करावा,” असं ते म्हणाले.

  • 20 Jun 2024 11:07 AM (IST)

    मध्य रेल्वे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने

    मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला आहे. अप आणि डाऊन मार्गावर धीम्या गतीने धावणाऱ्या सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने आहेत. तर कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या जलद लोकस वीस मिनिटे उशिरा धावत आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळतेय.

  • 20 Jun 2024 10:54 AM (IST)

    Maharashtra News : रोकॉर्डला आहे ते आरक्षण घेणार – मनोज जरांगे पाटील

    “सरकारने काय ठरवले माहीत नाही. आम्ही आमचा फोकस क्लिअर केला आहे. देश स्वतंत्र नव्हता तेव्हापासून मराठ्यांचे आरक्षण आहे. आमचे रोकॉर्डला आहे ते आरक्षण घेणार आहोत. ओबीसी आणि कुणबी एकाच आहेत आणि आम्ही ते घेणार आहोत. तुमच्या पेक्षा 100 वर्ष पुर्वीचे आरक्षण आहे. सग्या सोयऱ्याचे आरक्षण टिकणार नाही असे महाजन म्हणत असतील तर त्यांचा डाव आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 20 Jun 2024 10:52 AM (IST)

    Maharashtra News : अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात मुसळधार पाऊस

    अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर शहरात मुसळधार पावसाची हजेरी. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारली होती दडी. वातावरणात बदल निर्माण झाला असून गारवा निर्माण. पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. काही भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

  • 20 Jun 2024 10:19 AM (IST)

    Maharashtra News : सरकार काहीही करताना दिसत नाही – प्रकाश आंबेडकर

    “लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने पहाव. सरकार काहीही करताना दिसत नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालन्याच्या वडगोद्रीमध्ये हाके यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या सगे सोयऱ्याच्या मागणीला हाके यांचा विरोध आहे.

  • 20 Jun 2024 10:16 AM (IST)

    Maharashtra News : ओबीसींच्या आरक्षणाच ताट वेगळच असायला हवं – प्रकाश आंबेडकर

    महाराष्ट्रात सामाजिक सलोखा रहायला हवा. ओबीसींच्या आरक्षणाच ताट वेगळच असायला हवं असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज तिथे जाऊन त्यांची भेट घेतली.

  • 20 Jun 2024 10:00 AM (IST)

    मोदी नियम पाळतील, हे सांगता येत नाही- शरद पवार

    लोकसभा अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाबाबत पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी नियम पाळला नाही. मोदी हे मोदी आहेत. मोदी यांच्याकडुन हा नियम पाळला जाईल का सांगता येत नाही, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

  • 20 Jun 2024 09:50 AM (IST)

    वसई विरार नालासोपारा परिसरात रिमझिम पाऊस सुरू

    वसई विरार नालासोपारा परिसरात काळेकुट्ट ढगाळ वातावरण निर्माण झाले असून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. शहरात कुठेही पाणी साचले नसून, विरार चर्चगेट चालणारी पश्चिम रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे पालघर बोईसर, उमरोली, परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने विरार डहाणू लोकल सेवा 20 ते 25 मिनिटं उशिराने धावत आहे.

  • 20 Jun 2024 09:40 AM (IST)

    परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आज श्रीलंका दौऱ्यावर

    केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आपल्या सलग दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या द्विपक्षीय परदेश दौऱ्यात आज श्रीलंकेला भेट देणार आहेत. ही भेट भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट पॉलिसी’च्या अनुषंगाने आहे आणि श्रीलंका आपला सर्वात जवळचा सागरी शेजारी असल्याने या भेटीचे नियोजन केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

  • 20 Jun 2024 09:30 AM (IST)

    परीक्षेतील गडबडीवरुन विरोधक आक्रमक

    देशातील महत्वाच्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड होत असल्याने देशभरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. इतकेच नाही तर सुप्रीम कोर्टाने पण नाराजी व्यक्त केली आहे. आता विरोधकांनी पण सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले.

  • 20 Jun 2024 09:20 AM (IST)

    विषारी दारु प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू

    तामिळनाडूतील कल्लाकुरिची येथे विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. 60 हून अधिक गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीकडून 200 लिटर विषारी दारू जप्त करण्यात आली आहे. त्या दारूत मिथेनॉल मिसळले जात असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

  • 20 Jun 2024 09:10 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि कश्मीर दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू आणि कश्मीर दौऱ्यावर आहेत.२१ जूनला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर इथं ‘एम्पावरिंग यूथ, ट्रांसफॉर्मिंग जम्मू आणि कश्मीर’ कार्यक्रमात भाग घेणार आहेत. त्याच बरोबर मोदी 1हजार 500 कोटी रूपयांच्या कामाचे उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत.

  • 20 Jun 2024 09:00 AM (IST)

    शरद पवारांचा नागरिकांशी संवाद

    सलग तिसऱ्या दिवशी शरद पवार बारामती दौऱ्यावर आले आहेत. त्यांना भेटण्यासाठी गोविंदबाग येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली आहे. बारामती तालुक्यातील अनेक गावांत शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

  • 20 Jun 2024 08:57 AM (IST)

    1993च्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 105 जणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारचे आवाहन

    1993च्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 105 जणांच्या नातेवाईकांना राज्य सरकारचे आवाहन.  मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी मदत अद्याप त्यांना पोहोचली नसल्याने सरकारकडून मृतांची यादी जाहीर करण्यात आली.  अनेक प्रयत्न करूनही या लोकांच्या नातेवाईकांचा शोध न लागल्याने आता नातेवाईकांनी समोर यावं अस आवाहन यात करण्यात आलंय.

    कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांच्या वतीने 105मृतांची यादी जाहीर केली असून महिनाभराच्या आत नातेवाईकांनी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • 20 Jun 2024 08:37 AM (IST)

    नाशिक – ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर हल्ला

    नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी केला हल्ला.  मोठ्या दगडाने गाडीची काच फोडली. दोन वर्षांपूर्वी देखील कोकणे यांच्यावर झाला होता जीवघेणा हल्ला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 20 Jun 2024 08:20 AM (IST)

    मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाकडे सांस्कृतिक राज्यमंत्रिपद घ्या, राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची मागणी

    मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक राज्यमंत्रिपद घ्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाने अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. बाबासाहेब पाटील यांनी अजित पवारांना पत्र लिहून हे खातं आपल्याकडे घेण्याची मागणी केली.

  • 20 Jun 2024 08:14 AM (IST)

    यवतमाळ – पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेशवे प्लॉटमध्ये चोरी

    यवतमाळ – पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेशवे प्लॉट मध्ये चोरट्यांनी 5 घरे फोडली.हजारो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. वर्दळ असलेल्या या भागात बंद घरे शोधून चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • 20 Jun 2024 08:11 AM (IST)

    पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, 20-30 मिनिटं उशीराने धावत आहेत लोकल

    दिवसाच्या सुरूवातीलाच पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. बोईसर- उमरोळी स्थानकादरम्यान रुळांवर पाणी साचल्याने लोकल 20-30 मिनिटे उशीराने धावत आहेत

Published On - Jun 20,2024 8:11 AM

Follow us
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'
बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी, '...अन्यथा सिद्दीकींपेक्षा वाईट होईल'.
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.