Maharashtra Political News Headlines 8 Aug 2024 : राज ठाकरे यांचा सोलापूर दौरा जाहीर

| Updated on: Aug 01, 2024 | 9:37 PM

TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 8 Aug 2024 : आज 1 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 8 Aug 2024 : राज ठाकरे यांचा सोलापूर दौरा जाहीर

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे. या वाहन हल्ल्यात फरार असलेले 9 आरोपी अकोला सिव्हिल लाईन पोलिसांसमोर आत्मसर्मपण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर पोलीस त्यांना न्यायलयात हजर करणार आहेत. तर दुसरीकडे एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. तसेच सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळताना दिसत आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2024 08:10 PM (IST)

    साताऱ्यात यवतेश्वर घाटात स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळली

    सातारा : यवतेश्वर घाटात स्कॉर्पिओ गाडी दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. स्कॉर्पिओमध्ये सात प्रवासी असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले आहेत.  छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

  • 01 Aug 2024 07:37 PM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे ४ आणि ५ ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार ४ ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ४ ऑगस्टला सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम आहे. राज ठाकरे ५ ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी तुळजापूर मार्गे धाराशिव येथे जाणार आहेत.

  • 01 Aug 2024 07:12 PM (IST)

    सांगलीत कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा यासाठी आंदोलन

    सांगली : “कर्नाटक आणि राज्य सरकारच्या समन्वयाअभावी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे. त्यामुळे पाटबंधारे विभाग मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी कर्नाटक सरकारशी समन्वय साधून तातडीने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवावा, पुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढावा”, अशा मागणीसाठी आज कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्यावतीने सांगलीतील टिळक चौक येथे मानवी साखळी आंदोलन केले.

  • 01 Aug 2024 06:52 PM (IST)

    वायनाड दुर्घटनेवर प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या..

    “आम्ही संपूर्ण दिवस या दुर्घटनेशी झगडत असलेल्या लोकांना भेटण्यात घालवला. लोकांना शक्य ती सर्व मदत करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. अशा वेळी पीडित लोकांच्या मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. प्रशासन आणि राज्य सरकार आपल्या स्तरावर काम करत असून त्यांना त्याच परिसरात राहायचे आहे, त्यांच्या पुनर्वसनासाठी उपाय शोधला पाहिजे.”, असं काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सांगितलं.

  • 01 Aug 2024 06:37 PM (IST)

    हिमाचल प्रदेशातील ढगफुटीवर अनुराग ठाकुर म्हणाले…

    हिमाचल प्रदेशातील ढगफुटीच्या घटनेवर भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, “ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी मुख्यमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशीही बोललो आहे आणि त्यांना आश्वासन दिले आहे की जे काही आवश्यक आहे ते केले जाईल. केंद्र सरकार नक्कीच मदत करेल. ”

  • 01 Aug 2024 06:25 PM (IST)

    सीएम धामी यांनी रुद्रप्रयागमधील भागाचे केलं हवाई सर्वेक्षण

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागाचे हवाई सर्वेक्षण केले.

  • 01 Aug 2024 06:10 PM (IST)

    श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाचा मोठा विजय

    श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाने मोठा विजय मिळवला आहे तर मुस्लिम पक्षाला धक्का बसला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या एकल खंडपीठाने मुस्लिम पक्षाचा आक्षेप फेटाळून लावला.

  • 01 Aug 2024 05:37 PM (IST)

    कांबळवाडीतील कुटुंबियांशी साधला संपर्क, काय म्हणाले?

    नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना दिला आहे. पॅरीस ऑलिम्पिक 2024स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे एकनाथ शिंदेनी कॉल करुन अभिनंदन केले. यावेळेस त्यांनी कुसाळे कुटुंबियांना हे आश्वासन दिलं.

  • 01 Aug 2024 05:11 PM (IST)

    पुजा खेडकरला दुसरा मोटा झटका, कधीही अटक होणार

    वादग्रस्त प्रोबशनरी आयएएस पुजा खेडकला दुसरा मोठा झटका लागला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकरचं आयएएस पद रद्द केलं. त्यानंतर आता पूजा खेडकरचं अटकपूर्व जामी फेटाळण्यात आलं आहे. त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

  • 01 Aug 2024 04:30 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील पुण्याकडे रवाना, न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढलं

    नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजार राहणार  आहेत.  दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकेचे वॉरंट काढले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.

    छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते. आंदोलनामुळे जरांगे पाटील न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

  • 01 Aug 2024 04:16 PM (IST)

    संभाजीराजेंवर केलेल्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला

    संभाजीराजेंच्या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला  करण्यात आला आहे. ठाण्याच्या दिशेने जात असलेल्या आव्हाडांच्या ताफ्यातील गाडीवर हल्ला  केला गेलाय.

  • 01 Aug 2024 03:57 PM (IST)

    चंद्रपुरात घडली अजब घटना

    चंद्रपूर शहराच्या रय्यतवारी कॉलनी भागात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोळसा खाणी सभोवताल असलेल्या या भागातील शिवणकर यांच्या घरी वीस फूट खोल खड्डा पडला आहे. घरातील मंडळी दोन दिवसानंतर घरी आल्यावर दरवाजा उघडताच घरातील महिला थेट 20 फूट खड्ड्यातच पडली. अचानक झालेल्या या प्रकारानंतर शिडीचा वापर करून महिलेला कसंबसं बाहेर काढलं. गेली दहा दिवस चंद्रपूर शहर -जिल्ह्यात होणारी अतिवृष्टी आणि कोळसा खाणीमुळे पोकळ झालेला भुभाग यामुळे हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस आणि वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • 01 Aug 2024 03:53 PM (IST)

    मनोरमा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट

    मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू झाली आहे. खेडकरवर लावलेली सगळी कलम बेलेबल आहेत. पोलिसांनी 307कलम नंतर लावलं. त्या पिस्टलच लायसन्स आमच्याकडे होतं. त्या जमिनी आम्ही 2006 मध्येच खरेदी केल्या होत्या. बचावासाठी त्यांनी पिस्टल दाखववल होतं. पोलिसांनी मुद्दाम 307 कलम लावलं आहे. तक्रार दारांची सविस्तर तक्रार सरकारी वकिलांनी कोर्टात वाचून दाखवली, असं खेडकरच्या वकीलांनी म्हटलंय.

  • 01 Aug 2024 03:40 PM (IST)

    18 लाखांचं एमडी ड्रग्स जप्त

    पुणे ग्रामीणमध्ये कामशेत आणि लोणावळ्यात दोन वेगवेगळ्या केलेल्या कारवाईत मुद्देमालासह एकूण 18 लाखांचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आल आहे. पुणे- मुंबई जुन्या महामार्गालगत 5.5 ग्रॅम तर कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7.1 ग्राम असा एकूण 12.15 ग्रॅम एम.डी ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी योगेश गायकवाड, नारायण दाभाडे यासह दुसऱ्या कारवाईतील शाहरुख असलम शेख, नितीन कालेकर आणि साजिद अकबर शेख यांना अटक करण्यात आली आहे.

  • 01 Aug 2024 02:58 PM (IST)

    उपायुक्त अजित मुठे यांच्यावर भूमाफियांने हल्ला

    वसई विरार महापालिकेच्या अनधिकृत विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांच्यावर भूमाफियांने हल्ला केला आहे. बुधवारी संध्याकाळी नायगाव पूर्वेच्या पोमण शिलोत्तर भागात ही घटना घडली आहे. मुठे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 01 Aug 2024 02:50 PM (IST)

    खासगी बस-डंपरची समोरासमोर धडक

    जळगावच्या वावडदे गावाजवळ खाजगी बस आणि डंपरच्या समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. पाचोरा जळगाव रोडवर वावडदे गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात खाजगी बसमधील 20 प्रवासी जखमी झाले. जखमींवर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 01 Aug 2024 02:40 PM (IST)

    वाढदिवस हा आनंदाचा दिवस, मी मृत्य नंतर देहदान करणार

    वाढदिवस हा आनंदाचा दिवस, मी मृत्य नंतर देहदान करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी वाढदिवसाच्या दिवशी केली.

  • 01 Aug 2024 02:30 PM (IST)

    विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती

    मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडून बदनाम करण्यात येतंय. मात्र सत्ताधारी पक्षातील नेते जेवढे आरोप करतील तेवढे आमच्यासाठी चांगले आहे. कारण लोकसभेला असेच आरोप केले आणि त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला आता विधानसभेला त्याची पुनरावृत्ती होईल, असे मराठा आंदोलकांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांची 7 ऑगस्ट रोजी सोलापुरात निघणार शांतता रॅली होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच रॅली सोलापुरातून निघणार आहे. सोलापुरात मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली सोलापुरातील जरांगे पाटलांच्या सभेला लाखो मराठा बांधव एकवटणार आहेत.

  • 01 Aug 2024 02:20 PM (IST)

    व्यक्तीची खात्री पटल्यानंतर विमान प्रवास -राम मोहन नायडू

    आधार कार्ड आणि नावाची ओळख तपासली जाते, सीआयएसएफ कडून गेटवर याबाबतची तपासणी केली जाते, आम्हाला संशय आला तर पासपोर्टचाही आधार घेतला जातो. चेहरा आणि नाव हे दोन्ही तपासले जाते, या दोन्हींची ओळख झाल्यानंतरच प्रवाशाला प्रवेश दिला गेला, असे उत्तर केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी दिले.

  • 01 Aug 2024 02:10 PM (IST)

    नाव बदलून कसा केला प्रवास

    अजित पवार यांचं नाव बदलून केलेल्या प्रवासावर सुप्रिया सुळे यांचा लोकसभेत सवाल विचारला. विमान प्रवास करताना आधारकार्ड बंधनकारक आहे, असं असताना देखील नाव बदलून असा प्रवास कसा केला, असा रोकडा सवाल त्यांनी केला.

  • 01 Aug 2024 02:00 PM (IST)

    सुनील केदार यांच्याकडून रक्कम वसूल करा-आशिष देशमुख

    मागील दहा वर्षात भूतो न भविष्यती असा विकास देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झाला. आता पुन्हा एक नवीन प्रोजेक्ट आला आहे त्यातून रोजगार निर्मिती होईल. जिल्हा परिषद मधील सत्ता असलेले काँग्रेस ने आपल्या फायद्यासाठी निधी खर्च केला नाही. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील रक्कम या प्रकरणातील आरोपी सुनील केदार यांच्या कडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.

  • 01 Aug 2024 01:56 PM (IST)

    ताई माई अक्काच या मतदार आहेत, राऊतांना माहिती नाही का ? गुलाबराव पाटील

    ताई माई अक्काच या मतदार आहेत, हे संजय राऊत यांना माहिती नाही का? त्याचं डोकं खराब झाल आहे, त्यांच्या बाजूलाच ठाणे मेंटल हॉस्पिटल आहे तेथे त्यांनी उपचार घ्यावे अशी टिका शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे

  • 01 Aug 2024 01:42 PM (IST)

    जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लागली रिघ

    मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेतल्यानंतर आज वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून शुभेच्छा स्वीकारण्यास सुरूवात केली आहे आणि त्यांना खोबऱ्याच्या हाराद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

  • 01 Aug 2024 01:23 PM (IST)

    भाजपाविरोधात मुंबईत कॉंग्रेस कार्यकर्ते निदर्शने करणार

    राहुल गांधी यांचा जात विचारून त्यांचा अपमान करणाऱ्या भाजपाविरोधात मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते राजीव गांधी भवन येथे निषेध आंदोलन करणार आहेत.

  • 01 Aug 2024 01:02 PM (IST)

    नवी दिल्ली – राजस्थानचे नवे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

    राजस्थानचे नवे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.  कालच बागडे यांनी राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला

  • 01 Aug 2024 12:51 PM (IST)

    कर्णबाळा दुनबळेंनी राज ठाकरेंची घेतली भेट

    मनसे नेते कर्णबाळा दुनबळेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. जय मालोकरच्या मृत्यूने मनसेवर आघात झाला आहे. मिटकरींवरील हल्ला हा क्रियेला प्रतिक्रिया असा होता, असे दुनबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

  • 01 Aug 2024 12:42 PM (IST)

    नाशिक – ठाकरे गटाचे शिष्ट मंडळ महापालिका आयुक्तांच्या भेटीला

    – ठाकरे गटाचे शिष्ट मंडळ महापालिका आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. आयुक्त मनमानी करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. शिष्टमंडळ कार्यालयात दाखल, मात्र आयुक्त उपस्थित नसल्याने ठाकरे गटाकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 01 Aug 2024 12:23 PM (IST)

    संजय राऊत यांची संघावर बोलायची पात्रता आहे का – गिरीश महाजनांची टीका

    संजय राऊत यांची संघावर बोलायची पात्रता आहे का ? संघ काय आहे हे सर्व देशाला माहिती आहे. तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला, संघाला तुमच्या प्रमाण पत्राची गरज नाही, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

    संजय राऊत यांना उठता बसता देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस पाच पाच वेळा निवडून आलेत, संजय राऊत तुम्ही साधे नगरसेवक म्हणून तरी निवडून आलात का ? असा टोला गिरीश महाजन यांनी हाणला.

  • 01 Aug 2024 12:08 PM (IST)

    मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी अमोल मिटकरी आक्रमक, आंदोलन सुरू

    वाहनांवरील हल्ला प्रकरणातील आरोपी मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्या अटकेच्या मागणीसाठी अमोल मिटकरी आक्रमक झाले असून ते अकोल्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन करत आहेत. मुलीसह मिटकरी यांचं एसपी कार्यालयांच्या पायऱ्यावर आंदोलन सुरू आहे.

    मुख्य आरोपी कर्णबाळा दूनबळे यांना पोलीस पाठिशी घालत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे.

  • 01 Aug 2024 11:50 AM (IST)

    केंद्रीयमंत्री अनुराग ठाकुर यांच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन

    केंद्रीयमंत्री अनुराग ठाकुर यांच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.

  • 01 Aug 2024 11:40 AM (IST)

    अमोल मिटकरींची सुरक्षा वाढवली

    अमोल मिटकरींच्या वाहनावरील हल्ला प्रकरणानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कर्णबाळा दुनबळे आरोपी आहे तर त्यांना अटक का होत नाही? कर्णबाळा दुनबळेंना अकोला पोलिसांचं संरक्षण आहे का? असा सवाल मिटकरींनी केला आहे.

  • 01 Aug 2024 11:30 AM (IST)

    समुद्रकिनारी विशेषत: बंदर परिसरातील नागरिक, मच्छिमार, पर्यटकांसाठी आवाहन

    राज्याच्या किनारपट्टीवरील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ३ ते ८ ऑगस्टदरम्यान समुद्राला उधाण येणार आहे. उच्चतम भरतीची वेळ आणि उंची लक्षात घेऊन समुद्रकिनारी विशेषत: बंदर परिसरात असणाऱ्या नागरिक, मच्छिमार, पर्यटकांना आवाहन करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जलआलेखक कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे.

  • 01 Aug 2024 11:20 AM (IST)

    मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे राज ठाकरेंच्या भेटीला

    मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. अकोल्यामध्ये अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर दुनबळे हे राज ठाकरेंना भेटणार आहेत.

  • 01 Aug 2024 11:10 AM (IST)

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता

    नाशिक- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या परिषदेत गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसंच या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत.

  • 01 Aug 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

    अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सर्वोच्च न्यायालयाची मान्यता. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिला. आता राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार.

  • 01 Aug 2024 10:53 AM (IST)

    Maharashtra News : अमोल मिटकरी यांच्या सुरक्षेत आता मोठी वाढ

    अकोल्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्यानंतर अमोल मिटकरी यांच्या सुरक्षेत आता मोठी वाढ. मनसेच्या इशाऱ्यानंतर सुरक्षेत वाढ. अमोल मिटकरी यांच्यासोबत दोन पोलिसांच्या गाड्या राहणार.

  • 01 Aug 2024 10:37 AM (IST)

    Maharashtra News : अमोल मिटकरी हे प्रसिद्धी पिसाट – पंकज साबळे

    “अमोल मिटकरी सातत्याने टिका करत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटला होता. ते लपून बसले होते. आम्ही आमच्या स्टाईलने अमोल मिटकरी यांना उत्तर दिलं. या संपूर्ण घटनेचा जय मालोकर याने धसका घेतला होता. आम्हाला पळपुटे म्हणण्यापेक्षा लपून कोण बसलं होतं हे सांगा, अमोल मिटकरी हे प्रसिद्धी पिसाट आहेत” अशी टीका मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी केलीय.

  • 01 Aug 2024 10:13 AM (IST)

    Maharashtra News : स्वराज्य संघटनेचे रुपेश नाठे यांना आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांचा प्रेमाचा सल्ला

    गनिमी काव्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घरावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या स्वराज्य संघटनेचे रुपेश नाठे यांच्या नाशिकच्या घराबाहेर आव्हाड याच्या कार्यकर्त्यांनी दिला प्रेमाचा सल्ला. रुपेश नाठे याच्या गाडीवरील धूळखात असलेले स्वराज्याचे नाव पुसत आव्हाड यांच्या ठाण्यातील आणि नाशिक येथील कार्यकर्त्यांनी मान राखत शिस्तीचा सल्ला दिला.

  • 01 Aug 2024 09:56 AM (IST)

    संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे अंबडमध्ये आगमन

    संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे आगमन झाले आहे आणि यावेळी नागरिकांकडून गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.

  • 01 Aug 2024 09:47 AM (IST)

    नागपूर ते कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे

    नागपूर ते कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग भंडारा शहरातून गेलेला असून मागील दहा दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावर ठीकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून धावणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

  • 01 Aug 2024 09:35 AM (IST)

    कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण

    गेली पंधरा दिवस झालेल्या दमदार पावसाने कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगराला जोडणारे रस्ते देखील खड्डेमय झाले आहे. काही ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी केलेले रस्ते देखील खराब झाले आहेत.

  • 01 Aug 2024 09:21 AM (IST)

    पुण्यात तरुणावर धारदार शस्त्राने चौघांचा हल्ला

    पुण्यात भाईगिरी काही थांबेना, तरुणावर धारदार शस्त्राने चौघांचा हल्ला

    हल्ल्यानंतर दहशत निर्माण करण्यासाठी रील तयार करून ठेवला सोशल मीडियावर व्हायरल

    पुण्याच्या वाघोलीतील बकोरी फाट्यावरील जय महाराष्ट्र खाऊ गल्लीत तिघांनी एका तरुणावर कोयत्याने केला हल्ला केला,

  • 01 Aug 2024 09:08 AM (IST)

    लोहगड, धालेवाडी गावाला धोका

    मावळ तालुक्यातील लोहगडाच्या पायथ्याशी डोंगराला भेगा पडल्या. यामुळे लोहगड आणि धालेवाडी या गावाला धोका निर्माण झाला आहे.

    डोंगरावर गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना सतर्क केले

    मागील काही दिवसांपासून मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे डोंगराला भेगा पडल्या.

  • 01 Aug 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra News LIVE : कृष्णा नदीच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ, पावसाची संततधार सुरु

    सांगलीत कृष्णा नदीची सकाळी पाणी पातळी 40 फूट इंचावर 6 वर

    सांगली कृष्णा नदी पाणी पातळी रात्री होती 39 फूट 6 इंच

    काल रात्री पासून आज सकाळ पर्यंत सांगली कृष्णा नदीची पाणी पातळी एक फुटाने पुन्हा वाढली आहे

    सांगलीत सकाळ पासून ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार कमी प्रमाणात सुरू आहे

    कृष्णा नदीचे पाणी पुन्हा पात्रा बाहेर पडत असून पाणी पुन्हा सखल भागात शिरत आहे

    गेली 4 दिवस झाले कृष्णा नदी पाणी पातळी ही सतत कमी जास्त होत असून नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत

  • 01 Aug 2024 08:51 AM (IST)

    Maharashtra News LIVE : पुणेकरांसाठी गुडन्यूज, धरणात 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा जमा

    पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस

    पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात ९० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा

    पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्य पाणीसाठा ९० टक्के पेक्षा जास्त

    खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने त्यात ७५ टक्के पाणीसाठा

    मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा होता

    यावर्षी याच काळात चार ही धरणं मिळून 89.87 टक्के इतका पाणीसाठा आहे

    धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे

    खडकवासला: 75.60 टक्के

    पानशेत: 91.01 टक्के

    वरसगाव: 90.36 टक्के

    टेमघर: 92.40 टक्के

  • 01 Aug 2024 08:49 AM (IST)

    Maharashtra News LIVE : पुणे शहरातील वाहतुकीत बदल, सारगबागेकडे जाण्यास प्रवेश बंद

    पुणे – अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शहरातील वाहतूकीत बदल

    – जेधे चौकातून सारसबागकडे जाणेस प्रवेश बंद करण्यात आला आहे,

    – कात्रजकडुन सारसबागेकडे जाणा-या वाहनचालकांना फ्लायओव्हरवरुन सारगबागेकडे जाण्यास प्रवेश बंद

    – वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

  • 01 Aug 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra News LIVE : आता नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांवर लागणार बारावीचा निकाल?

    – केंद्रीय शिक्षण मंत्रालय बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता,

    – येत्या काळात नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांवर लागणार बारावीचा निकाल,

    – पारख नावाच्या राष्ट्रीय मूल्यांकन नियामकाने नुकत्याच शिक्षण मंत्रालयाला सादर केला अहवाल

    – अहवाल सादर करण्यापूर्वी पारखने गेल्या वर्षी ३२ शाळांशी या विषयावर केली सखोल चर्चा

  • 01 Aug 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News LIVE : पुणे जिल्ह्यातून 9 लाख 15 हजार 939 महिलांचे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज

    पुणे – लाडकी बहीण योजनेकरिता जिल्ह्यातून नऊ लाख १५ हजार ९३९ महिलांनी केले अर्ज

    – अर्जांची छाननी प्रक्रिया जिल्हा महिला व बालविकास विभागाने सुरू केली आहे.

    – सर्व तालुक्यांमध्ये प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू,

    – ही प्रक्रिया प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे

    – सर्वाधिक 71 हजार अर्ज पुणे शहरातून दाखल

  • 01 Aug 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra News LIVE : जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी अंतरवालीमध्ये गर्दी

    जालना : 1 ऑगस्ट हा जरांगे पाटील यांचा वाढदिवस, शुभेच्छा देण्यासाठी अंतरवाली मध्ये गर्दी

    मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढा देत असलेले जरांगे पाटील यांचा एक ऑगस्टला वाढदिवस असतो. त्यामुळे रात्री बारा वाजल्यापासून जरांगे पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. आतिषबाजी, डोल ताशे वाजवत जरांगे पाटील यांना शुभेच्छा देत आहेत.

Published On - Aug 01,2024 8:41 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.