Maharashtra Political News Headlines 9 August 2024 : राज ठाकरे उद्या मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करणार
TV9 Marathi, Maharashtra Political News Headlines 9 August 2024 : आज 9 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांची खलबत सुरु आहेत. शरद पवार आज पुण्यातून विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेची सुरुवात शिवनेरीवरुन केली जाणार आहे. तर दुसरीकडे काल कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली होती. यामुळे मोठे नुकसान झाल आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅली दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. आज कोल्हापुरात ही रॅली असणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
राज ठाकरे उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ते मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करणार आहेत.
-
‘शरद पवार यांच्यावर मोदींनी बोलू नये, अशी विनंती केली पण त्याचवेळी भटकती आत्मा म्हणून…’
नाशिक : महायुतीच्या येवला लासलगाव मतदारसंघातील नेत्यांची छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात बैठक सुरू झालीय. या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभेत नाशिक जिल्हयातून जास्तीत जास्त जागा कशा आणायच्या याबाबत चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या? याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थितांना निवडणुकीचा प्रचारावेळीचा किस्सा सांगितला. पुणे शहरात मोदी यांच्या सभेवेळी शरद पवार यांच्यावर मोदींनी बोलू नये, अशी विनंती मी स्वतः केली होती. मात्र नेमकं त्याचवेळी भटकती आत्मा म्हणून शरद पवारांचा उल्लेख केल्यामुळे फटका बसल्याची कबुली अजित पवारांनी कार्यकर्त्यांसमोर दिली.
-
-
पुण्यात व्हाट्सअप क्रमांकावर एका महिन्यात रिक्षा चालकांच्या विरोधात 77 तक्रारी
पुणे : आरटीओने सुरु केलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर एका महिन्यात रिक्षा चालकांच्या विरोधात 77 तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारल्याच्या आहेत. 77 तक्रारींपैकी 44 रिक्षा चालकांना नोटीस बजावून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांना चाप बसण्याची शक्यता आहे. रिक्षा, कॅब आणि खाजगी ट्रॅव्हल्स यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी आरटीओने व्हाट्सअप क्रमांक सुरु केला आहे.
-
शिवसेना आक्रमक, ताफ्यासमोरच घोषणाबाजी
मनसेप्रमुख राज ठाकरे हे बीडमध्ये दाखल झाले आहेत. मनसेप्रमुखांच्या ताफ्यासमोर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंसमोरच घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
-
वारकरी पाईक संघटनेच्या मागणीला यश
वारकरी पाईक संघटनेच्या मागणीला अखेर यश आलं आहे. शासनाकडून 1000 बेडचे रुग्णालय मंजूर करण्यात आलं आहे. शिर्डी प्रमाणे पंढरपुरात देखील भाविकांना मोफत हॉस्पिटल असावे यासाठी वारकरी पाईक संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी पाईक संघटनेच्या मागणीची दखल घेत 1000 बेडच्या रुग्णालयाला मंजुरी दिली .वारकरी पाईक संघटनेच्या महाराज मंडळींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानत एकमेकांना पेढे भरवत निर्णयाचे स्वागत केले.
-
-
लाडकी बहीण योजनेवरुन रोहिणी खडसे-रुपाली पाटील आमनेसामने
लाडकी बहीण योजनेवरुन रोहिणी खडसे-रुपाली पाटील आमनेसामने आल्या आहेत. रुपाली पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली आहे. “लाडकी बहीण योजनेचा रोहिणी खडसे यांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी त्रास करून घेऊ नये अन्यथा हा त्रास कायम होईल. तुम्ही राजकीय घराण्यातील आहात, तुमच्या राजकीय अस्तित्वासाठी तुम्ही लढत आहात. सर्वसामान्य महिलांना मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमुळे तुम्ही जळू नका”, अशा शब्दात रुपाली पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केली आहे.
-
पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एक अपघाताच प्रकरण समोर
पिंपरी- चिंचवड मध्ये पुन्हा एकदा अपघाताच प्रकरण समोर आलं आहे. पिंपळे गुरव पोलीस चौकीच्या समोरच हा अपघात घडला आहे. काही फूट अंतरावर दुचाकीसह चालकाला फरपटत नेहल आहे. हा अपघात सात ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडलेला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत. दोन दिवसानंतर या प्रकरणी सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघात घडल्या दिवशी गुन्हा दाखल नसल्याने कार चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिले आहे. आता त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
-
शिवस्वराज्य यात्रेला अजितदादांच्या शिलेदारांची रसद?
अजित पवार यांनी आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेला प्रतिउत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केलीय ,या यात्रेचं ठिकठिकाणी भव्य नियोजन केलं जातय,मात्र शरद पवारांच्या शिव-स्वराज्य यात्रेला अजित पवारांचे शिलेदार रसद पुरवत असल्याचं चित्र समोर आलय,आज पिंपरी चिंचवड मध्ये देखील शिवस्वरज्य यात्रा दाखल होतीय मात्र या यात्रेचं सगळं नियोजन अजित पवार यांचे खंदे समर्थक विलास लांडे यांनी केल्याची चर्चा आहे.
-
शिंदे गटातील शरद सोनवणे जयंत पाटलांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शरद सोनवणेंनी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली अन त्यांच्या सोबत जेवणाचा आस्वाद ही घेतला. शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात झाली अन जुन्नरमधील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. तिथं सोनवणेंनी हजेरी लावली अन जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच खासदार अमोल कोल्हेसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
-
परवानगी नाकारली, तरी बच्चू कडू यांच्या सभेची तयारी
पोलिसांनी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेला परवानगी नाकारली आहे. पण तरीही सभा घेण्यावर ते ठाम आहेत. सभा ठिकाणी भोंगे लावण्याचे काम सुरू झाले आहे. सभेला विरोध झाल्यास स्फोट होईल, असा इशारा त्यांनी अगोदरच दिला आहे.
-
कपडे घातले काय नाही काय, सारखाच दिसतो
खासदार नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत जहाल टीका केली आहे. कपडे घातले काय नाही घातले काय जरांगे सारखाच दिसतो, अशा भाषेत त्यांनी टीका केली. दाढी वाढून कोणी शिवाजी महाराज होत नसते, असा टोला पण त्यांनी लगावला.
-
मुंबई- नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे, जवळपास ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, पडघ्यापासून वासिंदपर्यंत ट्रॅफिक जॅम झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या नाशिक महामार्गावर प्रवास करत मुलुंड ते शहापूरपर्यथ महामार्गाचा आढावा घेणार आहेत.
-
परभणी विधानसभेची एकही जागा जाहीर केली नाही
परभणी दौरा संपल्यानंतर बीड येथे आज मुक्काम असणार त्यानंतर राज ठाकरे हे जालना आणि संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेणार.
-
पैसे जमा करण्याच्या फाईलवर मी कालच सही केली- अजित पवार
अजित पवार यांनी मोठे भाष्य करत म्हटले की, पैसे जमा करण्याच्या फाईलवर मी कालच सही केली आहे.
-
आजीच्या पेन्शनवरून नातवंड भिडले
भर रस्त्यात बँकेच्या बाहेर चाकू हल्ला. दोन जण गंभीर जखमी. जखमेवर उपचार सुरू तर हल्ला करणारे हल्लेखोर झाले फरार…
-
आज मुंबई विधानभवन येथे होणार आदिवासी दिन साजरा
आदिवासी लोकांच्या हक्काचे संरक्षण व आदिवासी संस्कृतीची जनजागृती व्हावी यासाठी केला जातो हा दीन साजरा
-
राज ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू
परभणीमध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरू. आगामी निवडणूकीबद्दल होणार चर्चा
-
Maharashtra News: भारतीय जवान किसान पार्टीच्या ट्रॅक्टर मोर्चाला वाघोलीतून सुरुवात.
भारतीय जवान किसान पार्टीच्या ट्रॅक्टर मोर्चाला वाघोलीतून सुरुवात…. २८ ट्रॅक्टर व इतर चार चाकी वाहनांचा समावेश… विभागीय कार्यालयावर धडकणार मोर्चा… मोर्चात पार्टीचे अध्यक्ष रघुनाथ पाटील सहभागी… वाघेश्वर मंदीर चौकातून मोर्चाला सुरुवात… तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या शासना विरोधात जोरदार घोषणा… सुमारे 300 शेतकऱ्याचा सहभाग… मोठा पोलीस बंदोबस्त…
-
Maharashtra News: कोल्हापूरमध्ये केशवरान भोसले नाट्यगृहाला भीषण आग
कोल्हापूरमध्ये केशवरान भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. खासदार शाहू महाराजांकडून नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली. आगीत नाट्यगृहाचं मोठं नुकसान… ऐतिहासिक वारसा असलेल्या नाट्यगृहाचं विदारक चित्र…
-
Maharashtra News: ‘भाजपची औकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का?’ – संजय राऊत
‘भाजपची औकात काय? दिल्ली तुमच्या बापाती आहे का?’ उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर… राऊतांनी आपल्या औकातीत बोलालं, नाहीतर हिशोब मांडू… ठाकरेंवर खर्गे आणि राहुल गांधींच्या दाराच उभं राहण्याची वेळ… भाजप नेते रावसाहेब दानवेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती टीका
-
Maharashtra News: मविआत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद
मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा समोर ठेवून विरोधी पक्ष कधी लढत नाही… ज्या पक्षाला जास्त जागा असतील त्या पक्षाचा सीएम हे सूत्र असले… असं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे….
-
Maharashtra News: अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आढावा बैठक
राज ठाकरे मुक्कामी असलेल्या सावली विश्रामगृह येथे अमित ठाकरे दाखल… अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार परभणी मनसे पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक… बैठकीत विधानसभेसाठी काही नाव जाहीर होतात का? हे पाहणे महत्त्वाचे… काही क्षणात बैठकीला होणार सुरुवात….
-
Maharashtra News : चिपळूण संगमेश्वर मतदार संघात ट्विस्ट
चिपळूण संगमेश्वर मतदार संघावर शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी दावा केल्यानंतर संगमेश्वर भाजपची देखील केली उमेदवारीची मागणी. दादा गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम रिंगणात आहेत. महायुतीमधील तीनही पक्षांकडून मागणी जोर धरू लागल्याने चिपळूण संगमेश्वर मतदार संघात ट्विस्ट.
-
Maharashtra News : वक्फ बोर्डाच्या विषयावर संजय राऊत काय म्हणाले?
वक्फ बोर्डाच्या विषयावर संजय राऊत म्हणाले की, “आमचे नेते दिल्लीत होते. त्यामुळे आम्ही सभागृहात नव्हतो. हे बिल अजून चर्चेला आलं नाही. ते JPC कडे चर्चेला गेलं आहे. त्यात आमच्या पक्षाचे देखील सदस्य असतील. ज्यावर चर्चाच झाली नाही, मग त्यावरून आमच्यावर कसले आरोप करता?” असा सवाल त्यांनी केला.
-
Marathi News : शिर्डीत विदेशी साईभक्तांची साई दरबारी मांदियाळी
शिर्डीच्या साई दरबारी सिंगापूर येथून १२ पुरुष आणि २८ महिला अशा एकूण ४० विदेशी भक्त आले. या साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा साईबाबा संस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी सत्कार केला.
-
Marathi News : यंदाही घरोघरी तिरंगा अभियान
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारकडून राज्याचा विकास वेगाने केला जात आहे. तसेच कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. यावर्षी देखील 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा अभियान राबवला जात आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
-
Marathi News : मविआ मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगणार नाही- राऊत
महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार हे भविष्यात काळणार आहे. कोणताही पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगणार नाही, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
Marathi News : लाच घेणाऱ्यास अटक
जळगावात कामगार निरीक्षक चंद्रकांत पंडितराव पाटील याला 36 हजार रुपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक केली. सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे असलेल्या सुनावणीचा निकाल बाजूने लावून देण्याकरता कामगार निरीक्षकाने ही लाच घेतली.
-
Marathi News : मनोज जरांगे यांची आज पुण्यात रॅली
पुण्यात रविवारी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आज सकाळी ११ वाजता सुरु होणार आहे. पुण्यातील सारसबाग या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे. डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकास अभिवादन करून रॅलीची सांगता होईल.
-
Maharashtra News LIVE : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी लागू
केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी आदेश लागू
नाट्यगृहाच्या 100 मीटर परिसरात शासकीय व्यक्तिमतिरिक्त इतरांना बंदी
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री लागली भीषण आग
आगीत केशवराव भोसले नाट्यगृहाच मोठे नुकसान
नाट्यगृह पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मिरजकर टिकटीस् मृतिस्तंभापासून आज होणार आहे जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली ची सुरुवात
रात्री लागलेली आग आणि आज असणारी जरांगे पाटील यांची शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जारी केला जमाबंदी आदेश
-
Maharashtra News LIVE : पुणे पीएमपीएलचे 8 कर्मचारी निलंबित
पुणे PMPL चे 8 कर्मचारी निलंबित
प्रवाशांच्या तिकिटांचे पैसे खिशात घालणाऱ्या वाहकासह चालकांवर पुणे पीएमपीएल प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई
प्रवाशांसोबत गैरवर्तन करणे,पैशांचा अपहार करणे प्रकरणी 7 वाहक तर 1 चालक निलंबित
पीएमपीएल प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाचे 17 प्रकरणे दाखल
याच प्रकरणांमध्ये कारवाई करताना 8 जणांचे करण्यात आले निलंबन
-
Maharashtra News LIVE : नागपुरातील एसटी महामंडळाच्या १५ ई-बस दाखल होणार
एसटी महामंडळाच्या नागपुरातील ताफ्यात 15 ई बस दाखल होणार
चार्जिंगची ट्रायल सुरू, लवकरच ई बस दाखल होणार
नागपूर जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात आता इ बस ची भर पडणार
34 प्रवाशी आसन क्षमता असणाऱ्या या बसेस च्या चार्जिंग स्टेशन ची इमामवादा आगारात व्यवस्था करण्यात आली
यामुळे आता या बसेस येण्याचा मार्ग मोकळा झाला
-
Maharashtra News LIVE : पुणे शहरातील अतिक्रमणावरुन पोलीस आयुक्त आक्रमक
पुणे शहरातील अतिक्रमणांवरून पुणे पोलीस आयुक्त आक्रमक
शहरातील मुख्य रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आयुक्तांचे महापालिका आयुक्तांना पत्र
शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवा पत्रातून पोलीस आयुक्तांची महापालिका आयुक्तांना मागणी
शहरातील 32 मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा दाखला देत पोलीस आयुक्तांचे पत्र
अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक कोंडी वाढल्याचा पोलीस आयुक्तांचा दावा
अनधिकृत व्यावसायिक आणि आस्थापनांवर कारवाई करा पत्रातून पोलीस आयुक्तांची मागणी
-
Maharashtra News LIVE : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पुणे रेल्वे स्थानकातून विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन
मध्य रेल्वे कडून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी 222 गणपती विशेष रेल्वे
पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या होणार एकूण 6 फेऱ्या
गणपतीसाठीच्या विशेष गाड्यांचे रेल्वे बुकिंग कालपासून सुरू
Published On - Aug 09,2024 8:23 AM