Maharashtra Political News Headlines 12 August 2024 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

| Updated on: Aug 12, 2024 | 11:27 PM

TV9 Marathi, Maharashtra Political News Live 12 August 2024 : आज 12 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 12 August 2024 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. यामुळे सर्वच नेते विविध जिल्ह्यांचे दौरे करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आज धुळे दौऱ्यावर आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर असणार आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागात संततधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यासोबतच मराठा आंदोलक आज पुण्यातील शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 12 Aug 2024 11:26 PM (IST)

    अमळनेरमध्ये महिलांनी अजित पवारांना व्यासपीठावर जावून बांधल्या राख्या

    जळगाव : अमळनेरच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात महिलांनी व्यासपीठावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राख्या बांधल्या. यावेळी अजित पवार यांनी व्यासपीठावर बसल्या जागी महिलांकडून राख्या बांधून घेतल्या.
  • 12 Aug 2024 09:09 PM (IST)

    रत्नागिरीत जिल्हा नियोजन समिती सभागृहात सिंधुरत्न समृद्ध योजनेची बैठक

    रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती सभागृहात सिंधुरत्न समृध्द योजनेची बैठक झाली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे या बैठकीला हजर होते. जिल्ह्यातील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून आणि जास्तीत जास्त लाभार्थी निर्माण करण्यासाठी स्पाईस व्हिलेजची निर्मिती करावी, कासव महोत्सव घ्यावेत, खेकडा पालन, कोंबडी पालन, देशी गाईंची योजना, मधमाशी पालन याबाबत विविध विभागांनी एकत्र येवून नियोजन करावे, असे निर्देश सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

  • 12 Aug 2024 06:52 PM (IST)

    थेट शस्त्रक्रियेच्या प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी, CJI म्हणाले…

    शस्त्रक्रियेच्या थेट प्रसारणावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले. CJI म्हणाले की, ही अत्यंत गंभीर बाब आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. उत्तर दाखल करण्यासाठी वेळ देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे.

  • 12 Aug 2024 06:37 PM (IST)

    मंत्री गोपाल राय यांनी केजरीवाल यांची भेट घेतली

    आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री गोपाल राय यांनी तिहार तुरुंगात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

  • 12 Aug 2024 06:22 PM (IST)

    मुख्यमंत्री योगी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली

    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत पोहोचले आहेत, जिथे त्यांनी राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बैठक घेतली.

  • 12 Aug 2024 06:18 PM (IST)

    दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 12 वी ची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे.

  • 12 Aug 2024 06:03 PM (IST)

    एकत्र बसण्याची गरज काय? शरद पवार यांच्या आवाहनाला जरांगेचा विरोध

    सरकारला माहिती आहे आऱक्षण कसं द्यायचं? ते देत नाहीत. नुसती ढकलाढकली सुरु आहे. चर्चेला बसण्याची गरज काय आहे ? असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांच्या आवाहानाला विरोध केला आहे.

  • 12 Aug 2024 05:32 PM (IST)

    पुण्यातील मोदीबागेत एमसीएच्या कार्यालयाचं पवारांच्या हस्ते होणार उद्घाटन

    पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या नवीन कार्यालयाचं थोड्याच वेळात उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी एसपी गटाचे प्रमुख शरद पवार आणि भाजप आमदार-बीसीसीआय खजीनदार आशिष शेलार एकत्र येणार आहेत. पुण्यातील मोदीबागेत या नवीन कार्यालयाचे पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवारही उपस्थित असणार आहेत.

  • 12 Aug 2024 05:04 PM (IST)

    आंदोलकांकडून करण्यात आला रास्ता रोको

    नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. पेसा कायद्याअंतर्गत पदभरतीच्या मागणीसाठी करण्यात आलेलं आंदोलन हे चिघळलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर ठिय्या दिला आहे. तसेच आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे.

  • 12 Aug 2024 03:57 PM (IST)

    सोलापूर शहर मध्य मतदारसंघावरून काँग्रेस आणि माकपमध्ये जुंपली

    सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि माकपमध्ये जुंपली आहे. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. कष्टकऱ्यांना तीस हजार घरे मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीची वागणूक देणं चुकीचं आहे. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर मध्यची जागा आडम मास्तर यांना देण्यास नकार दिला आहे. सोलापूर शहरमध्ये विधानसभेची जागा मिळावी यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन तिकीट फायनल करून आणणार आहे. कोणती जागा कोणाला द्यायची याचे सर्वस्वी अधिकार काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहेत. त्यामुळे सोलापूर शहर मध्येची जागा माकपला सुटेल याचा विश्वास आम्हाला आहे, असं चेतन नरोटे म्हणाले आहेत.

  • 12 Aug 2024 03:50 PM (IST)

    पंढरपुरात भाजपामध्ये बंडखोरी?

    पंढरपूर भाजपचे नेते प्रशांत परिचारक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रशांत परिचारक यांचे निकटवर्तीय कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली आहे. प्रशांत परिचारक लवकरच निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष सतीश मुळे, नगरसेवक लक्ष्मण पापरकर, उद्योगपती रा.पा. कटेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला होते.

  • 12 Aug 2024 03:43 PM (IST)

    मनोज जरांगेंची महाशांतता रॅली

    मनोज जरांगे पाटील यांची आज अहमदनगरमध्ये महाशांतता रॅली सुरु आहे. जरांगे पाटील यांचे अहमदनगरकडे जाताना केडगावमध्ये भव्य स्वागत होणार आहे. क्रेनच्या साहाय्याने जरांगे पाटील यांना हार घालणार आहे. तर जरांगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांना हार घालत अभिवादन करण्यात येणार आहे.

  • 12 Aug 2024 03:15 PM (IST)

    पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट

    पुण्यातील बार्टीच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.  2022 मधील 763 विद्यार्थ्यांना आधीछात्रवृत्ती मिळाली नाही. यासाठी काँग्रेसने बार्टीच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

  • 12 Aug 2024 02:03 PM (IST)

    जरांगे आणि भुजबळ यांना बैठकीला बोलावे- शरद पवार

    जरांगे आणि भुजबळ यांना बैठकीला सरकारने बोलवावे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 12 Aug 2024 01:39 PM (IST)

    पुण्याच्या लोहगाव येथे बिबट्या

    लोहगाव, वडगाव शिंदे रस्ता, आरआयटी कॉलेजच्या आवारात बिबट्या असून अग्निशमन दल व वनविभाग घटनास्थळी दाखल झाले आहेत.

  • 12 Aug 2024 01:06 PM (IST)

    ठाकरे लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवत आहेत- बावनकुळे

    नुकताच चंद्रशेखर बावनकुळ म्हणाले की, ठाकरे हे लाडकी बहीण योजनेची खिल्ली उडवत आहेत.

  • 12 Aug 2024 01:01 PM (IST)

    ऑलम्पिक कुस्तीपटू विनेश फुगटच्या समर्थनात नागपुरात महिला काँग्रेसच धरणे आंदोलन

    संसदेत विनेश फोगटवर सरकारने किती खर्च केला हे जाहीर करून अपमान केला अस सांगत केलं जातं आहे आंदोलन

  • 12 Aug 2024 11:48 AM (IST)

    विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाचा पुढाकार, महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव राज्यव्यापी दौरा करणार

    विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय नेतृत्वाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव राज्यव्यापी दौरा करणार आहेत.

    राज्यातील विविध भागांमध्ये जाऊन पक्षाची जिल्हानिहाय स्थिती, संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असून – भुपेंद्र यादव स्वतः पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  17 ऑगस्टपासून भूपेंद्र यांचा राज्यात दौरा सुरू होईल.

  • 12 Aug 2024 11:42 AM (IST)

    नाशिक मध्ये आज संध्याकाळी महायुतीची बैठक, बडे नेते राहणार उपस्थित

    नाशिक मध्ये आज संध्याकाळी महायुतीची बैठक होणार असून महायुतीचे बडे नेते उपस्थित राहणार आहेत.  मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील उदय सामंत ,दादा भुसे बैठकीसाठी उपस्थित असतील. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बैठकीसाठी हजर असतील.

  • 12 Aug 2024 11:36 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला अकलूज येथे सुरुवात

    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला अकलूज येथे सुरुवात झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा होत आहे.  अकलूज येथील कृष्णप्रिया हॉलमध्ये शिवस्वराज्य यात्रेसाठी शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल झाले आहेत.

  • 12 Aug 2024 11:24 AM (IST)

    आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार – रमेशे केरे

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं हीच भूमिका. आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, अशी भूमिका रमेश केरे यांनी घेतली आहे.

  • 12 Aug 2024 11:20 AM (IST)

    शरद पवारांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी – रमेश केरे

    मराठा ठोक मोर्चाचे प्रतिनिधी शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल. शरद पवारांनी बैठक मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी रमेश केरे यांनी केली.

  • 12 Aug 2024 11:08 AM (IST)

    विरार : अर्नाळा गावात पिसाळलेल्या कुत्र्याचा एकाच दिवशी 28 जणांवर जीवघेणा हल्ला, अक्षरश: लचके तोडले

    विरारच्या अर्नाळा गावात पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच दिवशी 28 जणांवर जीवघेणा हल्ला करीत अक्षरश: लचके तोडले आहेत.

    शनिवारी १० ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, लहानापासून मोठ्यांनाही या पिसाळलेल्या कुञ्याने चावा घेतला आहे.

  • 12 Aug 2024 10:55 AM (IST)

    कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या अटकेप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

    नवी दिल्ली- कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. CBI ने केलेल्या अटकेला केजरीवाल यांनी आव्हान दिलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात अर्ज दाखल केला आहे. केजरीवाल यांना ED ने अटक केलेल्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच जामीन दिला आहे.

  • 12 Aug 2024 10:50 AM (IST)

    शरद पवारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला

    शरद पवारांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पवारांच्या घराबाहेर मराठा ठोक मोर्चाचं आज आंदोलन आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला आहे. रमेश केरे हे पवारांच्या घराबाहेर आंदोलन करण्यावर ठाम आहेत.

  • 12 Aug 2024 10:45 AM (IST)

    शरद पवार खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी- रमेश केरे पाटील

    “शरद पवार खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. मग त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का मार्गी लावला नाही? शरद पवारांना आम्ही आज जाब विचारणार आहोत. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आम्ही सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन केली आहेत,” असं रमेश केरे पाटील म्हणाले.

  • 12 Aug 2024 10:35 AM (IST)

    नाशिक-मुंबई महामार्गावर एसटी बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात

    नाशिक-मुंबई महामार्गावर एसटी बसचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. वाडीवरेजवळ एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून बसमधील चालक आणि क्लीनरसहित आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय.

  • 12 Aug 2024 10:25 AM (IST)

    महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित; मंत्री उदय सामंत यांनी दिले संकेत

    कोल्हापूर- महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. 20 ऑगस्टला अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे प्रमुख फॉर्मुल्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. मंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची नुकतीच बैठक झाली आहे. या बैठकीनंतरच हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीची घोषणा झाली असेल. हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्याच्या प्रश्नावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली.

  • 12 Aug 2024 10:16 AM (IST)

    सत्ता आल्यावर बघू तुम्ही कोणत्या बिळात लपता?- संजय राऊत

    “यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत. सत्ता आल्यावर बघू तुम्ही कोणत्या बिळात लपता? बीडच्या आंदोलनाचा पक्षाशी काहीच संबंध नव्हता. धमक्या कुणाला देता?,” अशा शब्दांत राऊतांनी फटकारलं आहे.

  • 12 Aug 2024 10:10 AM (IST)

    भाड्याचे लोक आणून तमाशा करता, आम्हीही तुमचा तमाशा करणार- संजय राऊत

    “सुपारी गँग वर्षामध्ये बसली आहे. भाड्याचे लोक आणून तमाशा करता, आम्हीही तुमचा तमाशा करणार,” असं खासदार संजय राऊत म्हणाले.

  • 12 Aug 2024 10:07 AM (IST)

    मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकं- संजय राऊत

    “मातोश्रीबाहेर आंदोलन करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकं आहेत. आजकाल सुपारीचा कार्यक्रम सुरू आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी फोटो दाखवत केला.

  • 12 Aug 2024 09:52 AM (IST)

    Maharashtra News: मराठा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटीसा

    मराठा कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून नोटीसा… आंदोलनाला परवानगी नाकारली आहे… पुणे पोलिसांकडून आंदोलन न करण्याचं आवाहन… शरद पवार यांच्या घराबाहेरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे…

  • 12 Aug 2024 09:40 AM (IST)

    Maharashtra News: आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज कावड यात्रा

    हिंगोली याठिकाणी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात आज कावड यात्रा… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेत होणार सहभागी… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाने कावड यात्रेचा होणार समारोप… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणासाठी नांदेड नाका परिसरात भव्य दिव्य स्टेज उभारले… स्टेजच्या परिसराची पोलिसांकडून तपासणी

  • 12 Aug 2024 09:30 AM (IST)

    Maharashtra News: शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी केलं बॅरिकेटिंग

    पुणे याठिकाणी शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी केलं बॅरिकेटिंग… शरद पवार मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेट देणार

  • 12 Aug 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News: काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांनी घेतली शरद पवारांची भेट

    काँग्रेसचे नेते मनीष आनंद यांनी घेतली शरद पवारांची भेट… शिवाजीनगर मतदारसंघ काँग्रेसला मिळेल मात्र तुमचा आशीर्वाद राहू द्या… मनीष आनंद शिवाजीनगर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक… मतदारसंघ तुमचा आहे मी काय बोलणार शरद पवारांची प्रतिक्रिया… आज कार्यालयात जाऊन शरद पवारांची घेतली भेट…

  • 12 Aug 2024 09:01 AM (IST)

    Maharashtra News Live : मनोज जरांगे पाटील रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला

    मनोज जरांगे पाटील पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये

    डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला

    मात्र आज नगरचा दौरा करण्यावर जरांगे ठाम

    रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं

  • 12 Aug 2024 08:59 AM (IST)

    Maharashtra News Live : एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर

    सकाळी वर्षा निवास मित्र (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) नियामक मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाची बैठक

    तर सायंकाळी 4 च्या सुमारास हिंगोली मधील भव्य कावड यात्रेत मुख्यमंत्री राहणार उपस्थितीत

  • 12 Aug 2024 08:57 AM (IST)

    Maharashtra News Live : अजित पवारांच्या सुरक्षेत वाढ, विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाची सूचना

    – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ

    – आज अजित पवार मालेगाव, धुळे आणि जळगाव दौऱ्यावर

    – अजित पवार यांची विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

    – गुप्तवार्ता विभागाकडून अजित पवारांच्या मालेगाव, धुळे दौऱ्यावेळी धोकादायक हालचाली होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घेण्याच्या गुप्त वार्ता विभागाच्या सूचना

    – गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलिसांनी वाढवली अजित पवारांची सुरक्षा

  • 12 Aug 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra News Live : अजित पवार आज धुळे दौऱ्यावर

    – आज उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे दौऱ्यावर – राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने धुळे दौऱ्यावर – आज धुळे शहरात जनसन्मान यात्रेची सुरुवात – पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला नेत्या रूपाली चाकणकर मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार – धुळे शहरातील एकवीरा देवीचे दर्शन घेत विविध कार्यक्रमांचा आयोजन – कामगार आणि महिला वर्गासोबतही साधणार संवाद – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळाव्याच्या आयोजन

  • 12 Aug 2024 08:52 AM (IST)

    Maharashtra News Live : साताऱ्यात टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, दोन जणांचा मृत्यू

    सातारा: कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर धडक

    या भीषण अपघातानंतर कंटेनरने घेतला पेट, तर आयशर ट्रकचे मोठे नुकसान

    कंटेनरमधील आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू, इतर 3 जण गंभीर जखमी

    जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

    पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला अपघात, मात्र अग्निशमन दल पोहोचू न शकल्याने अपघातग्रस्त ट्रक जळून खाक

    पोलीस घटनास्थळी दाखल

  • 12 Aug 2024 08:51 AM (IST)

    Maharashtra News Live : बदलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात उंच पुतळा उभारणार – किसन कथोरे

    बदलापूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा उभा राहणार!

    सोनिवली इथल्या स्मारकात पुतळ्याची पायाभरणी

    आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने पुतळ्याची उभारणी

  • 12 Aug 2024 08:49 AM (IST)

    Maharashtra News Live : मुरबाड विधानसभेतून नक्की लढणार, भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील यांचे वक्तव्य

    भाजप नेतृत्त्वाने आदेश दिल्यास मुरबाड विधानसभेतून नक्की लढणार!

    पक्षाने किसन कथोरेंनाच उमेदवार दिली तर त्यांचं काम करणार!

    ‘कोणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही!’

    भाजपाचे भिवंडीचे माजी खासदार कपिल पाटील यांचा स्वपक्षीय आमदार किसन कथोरे यांना टोला

Published On - Aug 12,2024 8:47 AM

Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.