विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. सध्या भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षातील अनेक नेते महाराष्ट्राचे दौरे करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विविध बैठका पार पडत असून यात जागावाटप आणि विधानसभा निवडणुकीची रणनिती आखली जात आहे. त्यासोबत सध्या पक्षातंर्गत इनकमिंग आऊटगोईंगही सुरु झाले आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली अहमदनगर इथे पार पडणार आहे.
लोकसभा पराभवानंतर ठाण्यात विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भगवा सप्ताह साजरा होत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभे आधी सकाळ पासून ठाण्यात राजकीय वातावरण तापले असून ठाकरे व शिंदेच्या शिवसेनेमध्ये बॅनर वार सुरू आहे.
एकीकडे ठाण्यातील तापलेलं वातावरण तर दुसरीकडे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील माझ्या नादी लागू नका नाहीतर तुमची ही सभा होऊ देणार नाही असा इशारा दिल्याने ठाण्यामध्ये मोठे तणावाचे वातावरण तर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी मुलुंड चेक नाका ते गडकरी रंगायतन पर्यंत मोठ्या प्रमाणात फोज फाटा तैनात आला आहे. राजकीय वातावरण तापले असून नेमकं आज उद्धव ठाकरे यांची तोफ कोणावरती धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. थोड्यावेळात उद्धव ठाकरे यांची ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे सभा होणार आहे. मात्र आज पहाटेपासूनच झाल्यास सुरू असलेला बॅनर वार वॉर आणि मनसेप्रमुखांच्या इशाऱ्यानंतर कायदा सुव्यवस्था पाहता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला आहे. मुलुंड चेक नाका ते गडकरी रंगायतन पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात आहे.
तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील स्वागतासाठी रस्त्यावर उभे आहेत.
जालना ते जळगाव या नवीन लोहमार्गासाठी केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळानेही ‘ग्रीन सिग्नल’ दिला आहे. तसेच रेल्वे बोर्डाच्या प्रस्तावावर केंद्राने शिक्कामोर्तब करून, जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज उध्दव ठाकरेंचा मेळावा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा हा महत्त्वाचा दौरा आहे.
ठाकरेंच्या दौऱ्यात पक्षाकडून मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाणेकरांचा कौल कुणाला? हे स्पष्ट होणार आहे.
देशात सहकार रुजवण्यासाठी महाराष्ट्र आणि अनेक राज्यांनी योगदान दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि सहकार मंत्रालय तयार केलं. 10 वर्षात देशात मोठी प्रगती झाली. आज देशात 60 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड केली जात आहे. देशातील इथेनॉल निर्मिती वाढली आहे, याचा थेट फायदा शेतकऱ्याला होत आहे. यापूर्वी गल्फ देशांतून इंधन येतं होत, आज इथेनॉलमुळे यात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्र राज्य खूप मागण्या करत, आम्ही त्या मान्य करण्यासाठी सज्ज आहोत. देशात दरवर्षी 1 हजार कोटी लिटर इथेनॉल गरज आहे, आणि देशात त्याची तितकी निर्मिती केली जाईल. शेतकरी विकास हेच आमचं लक्ष आहे. इथेनॉल उत्पादन इतकं करा की सहकारी साखर उत्पादक संघ ऐवजी सहकारी इथेनॉल उत्पादक संघ लिहावं लागेल. असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातून आणखी एक प्रकल्प गुजरातला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. महिंद्रा कंपनीचा चीनच्या कंपनीसोबत 25 हजार कोटींचा करार झाला आहे. इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रकल्प असल्याची माहिती आहे. महिंद्रा कंपनीचे मदर युनिट नाशिकला तर प्रकल्प गुजरातला असणार आहे. प्रारंभी हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाण्याची चर्चा होती. मात्र नंतर हा प्रकल्प अचानक गुजरातला उभारण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती. या प्रकारामुळे नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक संघटना आक्रमक. प्रकल्प गुजरातला न जाऊ देण्याची मुख्यमंत्र्यांना करणार विनंती.
जरांगे पाटील यांनी म्हटले की, राजकीय नेत्यांना बळी पडू नका. तुम्ही घरी बसू नका. नाहीतर आरक्षण हातून जाईल. सातारा ही शूरवीरांची भूमी आहे. फडणवीस यांनी हा लढा बंद पडावा म्हणून अनेक प्रयत्न केले पण मी हाणून पाडले. संकटाना मराठ्यांनी घेरले आहे. त्यामध्ये मराठी नेते पण आहेत सत्ताधारी पण आहेत.
आमदार अशोक पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कारखान्याला १५० कोटी रुपये देतो म्हणतात मात्र इकडे ये म्हणतात, असं नाव न घेता अजित पवारांसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी आमच्या कारखान्याला मदत करा म्हणून मुख्यमंत्र्यांना दोन वेळा भेटले. दिल्लीवरून मंजूर होवून आलेल्या संग्राम थोपटे आणि कोल्हेंचं कर्ज थांबवलं. ते द्यायला तयार आहेत मात्र इकडे ये म्हणतात. आपण तिकडं जायच का? असा सवाल अशोक पवारांनी भर सभेत कार्यकर्त्यांना केला. आता आपलं सरकार आलं की जयंत पाटील १०० काय ३०० कोटी रूपये द्या, असंही ते यावेळी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. शिवस्वराज्य यात्रा आज पुणे शहरात आहे. पुणे शहरातील 2 मतदार संघात शिवस्वराज्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात सभेचं आयोजन करण्यात आलंय. जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा पार पडत आहे. हडपसर मतदार संघातील पाहिल्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच कोल्हापुरात पोहचणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री कोल्हापुरात येणार आहेत.
पुण्यात ठाकरे गटाच्या नगरसेवकाने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.काल मुंबईत नाना पटोले यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. अविनाश साळवे यांच्या पक्ष प्रवेशावेळी रमेश चेन्निथला आणि नाना पटोले उपस्थित होते. कॅंटनमेंट विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. कॅंटनमेंट विधानसभा हा राखीव आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहे, असं अविनाश साळवे म्हणाले. माजी मंत्री रमेश बागवे यांनी या आधी या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
राज्यात ईव्हीचं धोरण आम्ही आणलं होतं. चाकण येथे हा प्रकल्प होणार होता. या प्रकल्पाला राज्य सरकारने कोणत्याही स्वरूपात मदत केली नसल्याने हा प्रकल्प परराज्यात गेल्याचा आरोप शिवसेना नेते सचिन अहिर यांनी केला आहे.
खेड मतदारसंघातून एकदा शिवसेनेचा आमदार निवडून आला तो अपघात होता असं वक्तव्य भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेल्या अतुल देशमुख यांनी केल्याने महाविकास आघाडीत मीठाचा खडा पडला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांची सातरा येथे भर पावसात महा शांतता रॅली सुरु आहे.
ठाण्यात बॅनर वॉर सुरु झाले आहे. परंतू ठाणेकर जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी म्हटले आहे.
निवडणूकांमध्ये दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
छोटे मोठे उद्योजक इंडस्ट्री उभी करतात, त्यांना कुशल कामगार उपलब्ध करून देणार आहे.
जर्मनी, जपान आणि फ्रान्स मध्ये रोजगाराच्या संधी आहेत.
दौऱ्यादरम्यान कागलमधील निपाणी वेस राष्ट्रवादी अजित पवार गटाचा भव्य मेळावा. याच मेळाव्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार. 50 हजार लोकांच्या उपस्थितीत मेळाव्याचं मुश्रीफ गटाचे नियोजन
राज्यातील यात्राचा आजचा तिसरा दिवस आहे. यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकार मध्ये सहभागी झाल्यानंतर काय कामे केली हे सांगत आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वायनाड दौऱ्यावर असून तिथल्या नुकसानग्रस्त भागाची त्यांनी हवाई पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री पिनराई विजयनसुद्धा होते.
#WATCH | Kerala: Prime Minister Narendra Modi conducts an aerial survey of the landslide-affected area in Wayanad
CM Pinarayi Vijayan is accompanying him
(Source: DD News) pic.twitter.com/RFfYpmK7MJ
— ANI (@ANI) August 10, 2024
छत्रपती संभाजीनगर शहरात मराठा समन्वयकांना ताब्यात घेतलंय. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना ताब्यात घेतलंय. पाच ते सहा समन्वयकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन करण्याची शक्यता असल्यामुळे कारवाई करण्यात आली.
नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आभार मानले आहेत. नार-पार-गिरणा नदीखोऱ्यातून 10.64 टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. नाशिक, जळगावमधील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.
पुण्यात पुन्हा ड्रग्जचा साठा सापडल्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम तातडीने मुंबईकडे रवाना झाली आहे. अटक केलेल्या तीन आरोपींच्या चौकशीत मोठी माहिती उघड झाली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. इगतपुरीहून खातीवलीच्या दिशेनं पाच किलोमीटरपर्यंत रांगा आहेत. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.
“उद्धव ठाकरे, अनिल देशमुख आणि संजय राऊत तुम्ही खरंच मर्द असाल तर परमबीर सिंह यांच्यासोबत नार्को टेस्ट करा. तुमचा बुरखा फडण्याचं काम परमबीर सिंह करत आहे. 90 टक्के गोष्टी बाहेर येतील, तेव्हा जनता चपला मारेल” असं आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
“बच्चू कडू यांच्या गेल्या पाच ते दहा वर्षातल्या सगळ्या राजकीय भूमिका सकाळी एक संध्याकाळी एक असतात, त्यांची कोणती राजकीय भूमिका ठाम नसते. गेल्या अडीच वर्षात त्यांनी सरकारला अनेकदा अल्टीमेटम दिला आहे, त्याचं काय झालं, प्रत्यक्षात जेव्हा भूमिका घेईल तेव्हा बघू” असं ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.
“जे करतो ते सांगून करतो, छाताडावर पाय ठेवून करतो सत्तांतर सुद्धा तसंच केलं सांगून. छाताडावर पाय देऊन सत्तांतर केलं. आपण आपल्यापुरता बोलतो, त्यामागं बरंच काही असतं. बाप दाखवं नाहीतर श्राद्ध घाल हीच माझ्या कामाची पद्धत हाय” असं तानाजी सावंत म्हणाले.
“उद्धव ठाकरे सहकुटुंब लोटांगण दौरा पार पडला. मला मुख्यमंत्री करा असा कटोरा घेऊन ते दिल्लीत आले होते, पण काँग्रेसने त्यांना अजिबात भाव दिला नाही. संजय राऊत यांनी स्वतःच राजकीय महत्व वाढवणं आणि उद्धव ठाकरे यांना मी कसं नाचवू शकतो हे दाखवणारा हा दौरा होता” असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
डोंबिवलीची ग्रामदेवता श्री गणेश मंदिराच्या जीर्णोद्वारासाठी 30 किलोची चांदीची विट दान करण्यात आली. नांदेडच्या व्यावसायिकाकडून विट दान करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थितीत होते.
माझं मराठा बांधवांना आव्हान आहे कुठल्याही नेत्याला अडवू नका.मराठ्यांची ताकद कमी झाले असे म्हणत होता ना, त्यांना जर जाब विचारायचा असेल तर मुंबईत जाऊन त्यांना गचांडीला धरून जाब विचारू एवढी आपली ताकद आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या मुद्यावर दिली.
महिला सक्षमीकरण अंतर्गत लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार आज धुळ्यात साक्री येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून साडेचारशे बसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळी मोफत बस भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे बांगलादेश पीडित हिंदूंची थट्टा करत आहेत. अर्धवटराव ठाकरे यांना या परिस्थितीतही विनोदबुद्धी सुचते. काँग्रेसच्या दारात लोटांगण घालून घालून उद्धव ठाकरेंचा बौद्धिक विकास खुंटला, अशी टीका त्यांनी केली.
आम्ही रिकाम्या हाती परत आलो नाही तर देशासाठी कांस्य पद आणल्याचे आणि देशासाठी मेडल जिंकणं ही मोठी गोष्ट असल्याची प्रतिक्रिया भारतीय हॉकी टीमचे कर्णधार हरमननप्रित सिंग यांनी दिली. भारतीय हॉकी टीमचे दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले.
राणे आणि दरेकर यांना फडणवीस यांनी माझ्यावर टीकेचे काम लावल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आमदार काही संघटना जमा करून त्यांनी मला उघडं पाडण्यासाठी अभियान सुरू केलं आहे. मला एकटं पाडण्यासाठी सरकारचा हे षडयंत्र आहे त्याला अभियान असं नाव दिले गेले. मला राजकारण आवडत नाही·· तसं असतं तर मी या आधीच खासदार झालो असतो. राजकारणात काही डाव खेळावे लागतात ते डाव या राजकारण्यांनीच मला आता शिकवले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
आज सकाळीच बच्चू कडू यांनी शरद पवार यांची भेट घेतली. विधानसभेपूर्वी महाविकास आघाडीसोबत जाणार का, असा प्रश्न विचारला असता काही पण होऊ शकते असे संकेत त्यांनी दिले.
प्रत्येक दिवशी 2 विधानसभा मतदारसंघात दौरा करणार… सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार.. वेगवेगळ्या तिर्थक्षेत्रांना भेटी देऊन आशीर्वाद मागणार… आमच्या जनसन्मान यात्रेला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद… असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
ठाण्यातील ऊद्धव ठाकरे यांच्या आजचा सभेपूर्वीच रात्री ठाण्यात लागले डिवचणारे बॅनर्स… दमानी इस्टेट, तीन हातनाका पेट्रोल पंपाबाहेर लागले बॅनर्स…. घालीन लोटांगन वंजीन चरण म्हणत ठाकरेंचं व्यंगचित्र बॅनरवर…
अंबरनाथमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली…. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आदिवासी बांधवांकडून पारंपारिक नृत्य… आदिवासी दिनाला सरकारी सुट्टी जाहीर करण्याची समाजाची मागणी
बच्चू कडू महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते… बच्चू कडू सतत्याने महाराष्ट्रात चांगलं काम करत आहेत… बच्चू कडू यांनी दिव्यांगासाठी उल्लेखनीय काम केलं… असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडीकडे चेहराच नाही… महाराष्ट्रामध्ये एकूण 150 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या शिवसेनेसाठी घेतील… पुन्हा 2024 ला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच बसावेत यासाठी आम्ही कावड यात्रेच्या निमित्ताने भोळ्या शंकराला साकड घालणार…आमदार संतोष बांगर म्हणाले.
– राज्याबरोबरच पुण्यातही झिकाचा संसर्ग वाढताना दिसत आहे,
– पुणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक 66 रुग्ण आढळून आले आहेत.
– तर राज्यात आत्तापर्यंत एकूण ८० रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे,
– झिका व्हायरस हा एडिस इजिप्ती डासांच्या माध्यमातून पसरता.
– लैंगिक संबंध किंवा प्रसूतीदरम्यान संक्रमित आईकडून गर्भातील बाळालाही त्याची लागण होते.
– मुस्लिम समाजाला विधानसभेची उमेदवारी द्या, अन्यथा जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 जागा पाडणार
– काँग्रेसचे पदाधिकारी शौकत पठाण यांचा काँग्रेस शहराध्यक्षाला थेट इशारा
– सोलापूर शहर मध्यची जागा मुस्लिम समाजातील नेत्याला देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने काँग्रेसकडे केली.
– दरम्यान काँग्रेस शहराध्यक्षांनी अकरा जागा पाडू म्हणणाऱ्या शौकत पठाण यांना खडे बोल सुनावले
– सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 4 जागा काँग्रेस, 4 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि 3 जागा शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याचे देखील शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्पष्ट केलं
– सोलापूर शहर मध्यची जागा माकपच्या नरसय्या आडम किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला देणार नाही असेही काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्पष्ट केले
– पुणे शहर काँग्रेस शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली
– शहर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट
– पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या कारभाराबद्दल व्यक्त केली नाराजी
– पुण्यातील सर्किट हाऊस मध्ये घेतली पृथ्वीराज चव्हाण यांची भेट
– पुणे शहर काँग्रेसच्या एका गटाची शहराध्यक्ष बदलाची मागणी
– शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज पुण्यात दाखल होणार
– पुणे शहरातील पाच विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा मार्गस्थ होणार
– आज दिवसभरात हडपसर, सिंहगड रोड, स्वारगेट, गोळीबार मैदान परिसरात सभा होणार
– या यात्रेत खासदार अमोल कोल्हे,जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार