Maharashtra Breaking News LIVE 25 December 2024 : नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे झाले जमा
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 25 डिसेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
अमरावती-भातुकली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखली
अमरावती भातुकली मार्गावर संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखली. उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद केल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत.
-
नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे झाले जमा
नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा झाले आहेत. पैसे बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज आले आहेत.
-
-
उत्तराखंड : भीमतालमध्ये रोडवेजची बस खड्ड्यात पडली, अनेक जखमी
उत्तराखंडमधील नैनितालच्या भीमतालमध्ये रोडवेजची बस खड्ड्यात पडल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. एसएसपी नैनीताल प्रल्हाद मीणा यांनी सांगितले की, एक मदत पथक घटनास्थळी पाठवले जात आहे.
-
वाल्मिक कराडनं सरेंडर करावं- अंजली दमानिया
वाल्मिक कराडनं सरेंडर करावं, असा सल्ला अंजली दमानिया यांनी दिला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
-
संतोष देशमुख याची निर्घृण हत्या – मनोज जरांगे पाटील
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. 28 तारखेला आपण मोर्चा काढणार असल्याचेही जरांगे यांनी म्हटले आहे.
-
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीने मढविण्याचे काम सुरू
पंढरपूरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरूआहे. या योजनेनुसार पितळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीने मढविण्याचे काम झाले सुरू आहे.
-
न्याय दिला नाही तर रस्त्यावरची लढाई लढू – मनोज जरांगे
परभणीत तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचा अहवाल आहे. न्याय दिला नाही तर यांना रस्त्यावरची काय लढाई आहे हे आपण दाखवून देऊ असे मराठा नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
-
-
सुर्यवंशी यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्या – मनोज जरांगे
परभणीत पोलिस कोठडीत मृत्यूमुखी झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी भेटून त्यांचे सांत्वन केले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे.
-
काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या वाहनाला अपघात, चंद्रपुरातील जवानाचा मृत्यू
चंद्रपूर : काश्मीरात झालेल्या सैन्य दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात चंद्रपूर जिल्ह्यातील अक्षय निकुरे या जवानाचा मृत्यू झाला आहे. यामुळे वरोरा तालुक्यातील पिंपळगाव -मारुती या गावावर शोककळा पसरली आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या दिगंबर निकुरे यांचे दोन्ही पुत्र आहेत सैन्यात आहेत. त्यामुळे उद्या गावीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
-
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदा करणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
नाशिक – शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कायदा करणार असल्याची मोठी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. नाशिकमध्ये कृषिमंत्र्यांनी ही घोषणा केली. या नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचे ते म्हणलाे. येत्या मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनातच नवा कायदा आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. नाशिकमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या शेतकरी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी घोषणा केली.
-
ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांचा थेट वनमंत्री गणेश नाईकांना फोन, कारण…
सोलापूर – बार्शीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी थेट वनमंत्री गणेश नाईकांना फोन केला आहे. बार्शीत आढळून आलेल्या वाघाच्या वास्तव्यानंतर आमदार दिलीप सोपलांनी मदतीसाठी वनमंत्री गणेश नाईकांना फोन लावला. बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरातल्या ढेंबरेवाडी येथे तलावावर वाघ आढळून आला आहे. वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ आढळून आल्याने बार्शीतील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.
या वाघाचा बंदोबस्त करून त्याला जेरबंद करावे, अशी मागणी आमदार दिलीप सोपल यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. आमदार दिलीप सोपल यांनी गणेश नाईकांना थेट कॉल लावत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघ थेट बार्शीत दाखल झाला. मागील पंधरा दिवसापासून हा वाघ आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.
-
वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी घेतली तळेगावातील शेतकऱ्यांची भेट
लातूर : वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आणि आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधोडा येथील शेतकऱ्यांची भेट घेतील. वक्फ ट्रीबूनलने बुधोडा येथील काही शेतकऱ्यांना नोटीस पाठण्यात आली होती. त्यावर गावकऱ्यांशी चर्चा केली. वक्फ बोर्ड आणि शेतकरी ट्रीबूनल (वक्फ न्याय प्राधिकरण ) समोर स्वतःची बाजू मांडणार आहेत. जमिनीच्या दाव्यात शेतकऱ्यांना काळजी करण्याचे कारण नसल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी आज तळेगाव येथील शेतकऱ्यांचीही भेट घेणार आहेत.
-
EVM मध्ये छेडछाड करता येत नाही, काँग्रेसलाही हे माहित आहे- फडणवीस
“EVM मध्ये छेडछाड होत नाही, हे अब्दुल्ला, बॅनर्जींनी सांगितलंय. EVM मध्ये छेडछाड करता येत नाही, काँग्रेसलाही हे माहित आहे. काँग्रेसच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काँग्रेसने डॉ. आंबेडकर, सावरकरांचा वारंवार अपमान केलाय. काँग्रेसने माफी मागायला हवी,” असं फडणवीस म्हणाले.
-
सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही- फडणवीस
“सत्ता कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. पारदर्शी कारभार करून महाराष्ट्राला पुढे नेणार. सत्ता हे जनतेची सेवा करण्याचं एक माध्यम आहे. माझ्यासमोर अनेक आव्हानं आहेत, मात्र त्याचा धैर्यपूर्वक मी सामना करतो. मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार.. आम्ही तिघंही एकत्र काम करतोय. आता टेस्ट मॅच सुरू आहे. पण ही जिंकणारी टेस्ट मॅच आहे. मी टी-20 मॅच खेळल्यामुळे आमचा मोठा विजय आहे”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
-
लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार- फडणवीस
“गडचिरोलीसारखं क्षेत्र आपण बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विदर्भात औद्योगिक इकोसिस्टीम उभारणार आहोत. सर्व आवास योजनांमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरांना सोलार देणार. मला मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकर पैसे जमा होणार,” असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय.
-
राज्याच्या कोणत्याही भागावर अन्याय होऊ दिला नाही- फडणवीस
“अडचणी, मर्यादांवर मात करून जनतेची कामं झाली पाहिजेत. 2014 ला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा अनेकांच्या मनात प्रश्न होते. राज्याच्या कोणत्याही भागावर अन्याय होऊ दिला नाही. 2014-19 मध्ये राज्यात चांगली प्रगती झाली. विदर्भात मोठ्या प्रमाणावर काम केलं. पहिल्या पाच वर्षात विदर्भातही अनेक प्रकल्प आणले. ऊर्जा विभागाचा पुढचा 25 वर्षाचा रोड मॅप तयार केलाय. 6 नदीजोड प्रकल्पांची कामं हाती घेतली आहेत. नदीजोड प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात मोठं परिवर्तन होईल,” असं फडणवीस म्हणाले.
-
नागपुरात मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पत्रकार परिषद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. “लोकसभेला महाराष्ट्रात फेक नरेटिव्ह तयार केला गेला होता. फेक नरेटिव्हचा मोठा फटका आम्हाला लोकसभेला बसला होता. विधानसभेला आम्ही फेक नरेटिव्ह ब्रेक केला. महायुतीला विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळालं. जनतेनं आम्हाला बहुमत दिलं, त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे,” असं फडणवीस म्हणाले.
-
सोलापुरात लसणाची आवक घटल्याने दर उतरले
सोलापुरात लसणाची आवक घटल्याने दर उतरले आहेत. सोलापुरातील ठोक बाजारात लसणाला प्रति किलो 170 ते 270 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. तर किरकोळ बाजारात लसूण 400 रुपयांनीच विकला जातोय. लसणाची आवक घटल्यामुळे दर पडल्याचं पहायला मिळत आहे. – सोलापुरात मध्यप्रदेशमधून लसणाची आवक होत असते. मात्र गेल्या आठवडाभरात लसणाची आवक घटल्याने दर देखील उतरल्याचं पाहायला मिळत आहे.
-
“कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपीवर बदलापूर प्रकरणातील आरोपीसारखीच कारवाई करा”
कल्याण अत्याचार प्रकरणी बदलापूरप्रमाणेच या आरोपीवर कारवाई करा, अशी मागणी आमदार सुलभा गायकवाड यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला पकडल्याची माहिती समोर येत आहे.
-
त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी
सलगच्या सुट्ट्यांमुळे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. देशभरातून आलेल्या भाविक आणि पर्यटकांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी तीन ते चार तासांचा वेळ लागत आहे.
-
गणेश नाईक यांचे नागरिकांना आश्वासन
नवी मुंबईतील वाशी सेक्टर 26 येथे मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत झोपडपट्टी आणि तेथून सुरु असलेले अवैध धंद्या विरोधात नागरिकांचे आंदोलन सुरू असताना, वन मंत्री गणेश नाईकांनी ताफा थांबवला आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
-
लैंगिक अत्याचार प्रकरणात विशाल गवळीला अटक
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी अटक केली. आरोपी हा पत्नीच्या गावात लपलेला होता. शेगाव येथून पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतलं.
-
मास्टरमाईंड कोण आहे, त्याचा शोध घ्या
इथल्या पीएसआय, पीआयचे सीडीआर काढा. बीड जिल्ह्यात अनेक पीआय आहेत त्यांच्या बदल्या करा. ते सालगड्या सारखे वागले, त्यांना बदला. मटक्याचे धंदे बंद करा. संतोष देशमुख हत्येतील मास्टरमाईंडला अटक करा, अशी मागणी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करा. बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही, असा आरोप त्यांनी केला.
-
१७ वर्षीय मुलीवर ४ तरुणांचा अत्याचार
छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलालनगर मधील खासगी होस्टेलमधून बेपत्ता झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चौघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडिलांसोबत वाद झाल्याने रागाच्या भरात ह्या मुलीने होस्टेल सोडले होते. वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणत. तिचा जबाब नोंदवला असता तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्याने बलात्कार केल्याचे समोर आले. समाधान शिंदे, निखिल बोर्डे, प्रदीप शिंदे आणि रोहित ढाकरे अशी संशयितांची नावे असून,त्यांना अटक करण्यात आली आहे.
-
संतोष देशमुख हत्येतील आरोपींना फाशी द्या
संतोष देशमुख हत्येतील आरोपींना फाशी द्या. मास्टर माईंडलाही शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. एक दोन आरोपींना अटक करून फायदा काय. अजून तीन आरोपी फरार आहे. त्यांना कधी अटक करणार आहात? असा सवाल त्यांनी केला.
-
बीडमध्ये शनिवारी मोर्चा, शरद पवार होणार सहभागी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या तसच बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती या पार्श्वभूमीवर बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड सहभागी होणार आहेत.
-
पुण्यातील वाघोलीत गोळीबाराची घटना
पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार. घराच्या खिडकीतून हा गोळीबार करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. अज्ञात व्यक्तीने गोळीबार का केला? याच तपास सुरु.
-
कल्याण पूर्वेत काळ्या फिती बांधून मूक मोर्चा
कल्याण पूर्वेत माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि स्थानिक नागरिकांचा तोंडावर काळ्या फिती बांधून मूक मोर्चा. कल्याणच्या शकीला का परिसरातून थेट पोलीस ठाण्यापर्यंत हा मूक मोर्चा काढण्यात आला. मुख्य आरोपींना लवकर अटक करा, त्याचबरोबर गुन्हेगारांना वाचवणाऱ्या राजकीय नेत्यांना सह आरोपी करा अशा आशयाचे पोस्टर हातात घेत काढण्यात आला मोर्चा.
-
1500 रुपये देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा बनवणार – संजय राऊत
“लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्यासाठी लाडक्या बहिणींचे नवरे-भाऊ यांना दारुडे बनवणार. 1500 रुपये देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र दारुडा करण्याची योजना असेल तर हे गंभीर आहे” अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
-
कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्यात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला प्रवेश बंदी
कोल्हापूरच्या दाजीपूर अभयारण्यात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला प्रवेश बंदी. दोन्ही दिवस अभयारण्यातील सफारी राहणार बंद
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वन क्षेत्रात होणाऱ्या मध्य पार्ट्या आणि गोंधळ टाळण्यासाठी वन विभागाने आदेश दिला आहे. ही बंदी डावलून प्रवेश केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
-
कल्याण कोळशेवाडी परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण
कल्याण कोळशेवाडी परिसरात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर तणावाचे वातावरण असून राजकीय पक्ष आणि स्थानिक नागरिकानी आंदोलन करण्याचा इशारा दिला आगे.
नागरिकांच्या आंदोलनानंतर पोलीस सज्ज असून कल्याण कोळशेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरभरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
-
एकनाथ शिंदे हे 26 डिसेंबरला दिल्लीतील NDA च्या बैठकीला राहणार उपस्थित
शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २६ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या NDA च्या बैठकीला उपस्थित रहाणार.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार.
देशपातळीवर NDA च्या राजकिय रणनिती संदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहीती.
-
भगीरथ बियाणी कसे मेले आणि वाल्मिक कराड यांचा काय संबध? जितेंद्र आव्हाड
भगीरथ बियाणी कसे मेले आणि वाल्मिक कराड यांचा काय संबध?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचं सूचक ट्विट
भगीरथ बियाणी कसा मेला ? वाल्मिक कर्हाड चा काय संबंध? ही अशी आहे खुनांनची मालिका … कोण करणार चौकशी #serialkiller https://t.co/wdZGp3bTik
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 23, 2024
-
लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित
लाडकी बहीण योजना राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहे. प्रति फॉर्ममागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे मंजूर झाले होते. मात्र याला आता सहा महिने होत आले तरी एक रुपयाही अंगणवाडी सेविकांना मिळालेला नाही.
लाडक्या बहिणींना 5 महिन्यांचे हप्ते मिळाले असून त्यांच्या खात्यात पैसेही जमा झालेत. मात्र अंगणवाडी सेविका अद्याप पैशांपासून वंचित राहिल्यामुळे नाराजी आहे.
-
बीड: खासदार बजरंग सोनावणे यांची पत्रकार परिषद
बीड: खासदार बजरंग सोनावणे हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलणार आहेत.
खासदार सोनावणे यांची पहिलीच पत्रकार परिषद असून ते काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला 17 दिवस उलटून गेले असून आत्तापर्यंत केवळ चार आरोपी अटकेत असून तीन आरोपी अद्याप फरारच आहेत.
खासदार बजरंग सोनावणे केजमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. खासदार सोनावणे यांची पहिलीच पत्रकार परिषद असून ते काय गौप्यस्फोट करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मनोज जरांगे पाटील आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणीमध्ये ते आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची तर बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. घरासमोरील अंगणात खेळत असणाऱ्या बिबट्याने हल्ला केल्याने चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्याच्या शिरूर तालुक्यात घडली आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.
Published On - Dec 25,2024 9:06 AM