Maharashtra Breaking News LIVE : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात शांतता रॅली आहे. राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाचा अंशत: दिलासा. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रारदाराने सादर केलेली अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारण्याचा भिवंडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केली. वरळी हिट अँण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याचा वाहन परवाना रद्द होणार आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू
पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून कधी जोरात तर कधी रिमझिम पाऊस सुरू आहे. तलासरी तालुक्यातील महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणाऱ्या तलासरी उंबरगाव राज्यमार्ग वरील झरी खाडी पूल पाण्याखाली गेला आहे. पुलावरून पानी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.पावसाने विश्रांती घेल्याने पुलावरून पाणी ओसरू लागले आहे. परंतु नागरिकांनी वाहतूक करू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
-
राज्याकडे गौरवशाली इतिहास – पंतप्रधान मोदी
राज्याकडे गौरवशाली इतिहास आहे. राज्याकडे सशक्त वर्तमान आहे. आणि राज्याकडे समृद्धी भविष्याचं स्वप्न आहे. विकसित भारताच्या निर्मितीत मोठं योगदान असलेलं राज्य आहे.
-
-
वसई विरारमध्ये दिवसभर पावसाचा जोर कायम
विरार:- वसई विरार मध्ये दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरूच आहे. आज रात्रभर असाच पाऊस पडला तर उद्या सकाळ पासूनच वसई विरार नालासोपारा परिसरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. सध्या काही सकल भागात पाणी साचले आहे. मात्र याचा वाहतुकीवर काही परिणाम झाला नसून, पश्चिम रेल्वे, शहरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
-
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नाले तुडूंब भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी घरात पाणी साचले आहे.
-
क्रांती चौक परिसरात मनोज जरांगे पाटील मराठा बाधवांशी साधणार संवाद
छत्रपती संभाजीनगर- क्रांती चौक परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. क्रांती चौक परिसरात मनोज जरांगे पाटील हे मराठा बाधवांसोबत संवाद साधणार आहेत. महिला/ पुरुष भरपावसात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात एका जागेवर बसून आहेत.
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील विमानतळावर दाखल झाले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं उद्घटान करणार आहेत. गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रम असून मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
-
मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला अतिक्रमण विभागाची नोटीस
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मनोरमा खेडकर यांच्या बंगल्याला नोटीस लावली आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर अतिक्रमण झालं आहे ते ७ दिवसात काढून घ्या अन्यथा कारवाई करणार असल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे.
-
कोल्हापूर जिल्ह्यात 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू
किल्ले विशाळगड येथील अनाधिकृत अतिक्रमणविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारल्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
-
कल्याण कोर्ट ते स्टेशनं रोड वर पाणीच पाणी
कल्याण स्टेशन परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं आहे. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना तारेवरेतची कसरत करावी लागत आहे. कल्याण कोर्ट ते स्टेशनं रोड वर पाणीच पाणी साचलंय. रेल्वे प्रवाशांना देखील गुडघ्यावर पाण्यातून जावे लागत आहे.
-
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात सर्वदूर पाऊस
धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. चार दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरात सर्वदूर पाऊस होत आहे. शहरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाची पिकांना आणि पाणीसाठा होण्यासाठी मदत होत आहे.
-
थोड्याच वेळात नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. थोड्याच वेळात नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होतील. ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याच्या कामाची आज पायाभरणी केली जाणार आहे. तर मुंबई इंडियन न्यूज पेपर्स सोसायटी टॉवर्सचं मोदींच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे.
-
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय
वर्ध्याहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे भाविकांना त्रास होत आहे. वर्धा बसस्थानकावर विलंबाने बस लागल्याने भाविकांना त्रास होतोय. सकाळपासून येऊन वारकरी बसकरिता ताटकळले आहेत. बस लावण्यासाठी चार ते पाच विलंब झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी बसस्थानकात भेट दिली. चार ते पाच तासांनंतर भाविकांना जाण्याकरीता बसेस उपलब्ध केल्या आहेत.
-
दोन एसटी बसचा भीषण अपघात
चिपळूणमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला आहे. पेढांंबे भराडे इथे हा अपघात झाला आहे. स्वारगेट-गुहागर आणि खेड-कोल्हापूर बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसटी चालक जखमी झाला आहे.
-
विधानसभा पोटनिवडणुकांचा निकाल काय सांगतो?
सात राज्यांमधील तेरा विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल… पंजाबात जालंधरमध्ये ‘आप’ची विजयी घोडदौड सुरु आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसकडून भाजपाचा पराभव करण्यात आलाय. उत्तराखंडच्या दोन्ही जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. मध्यप्रदेशातील अमरवाड्यात काँग्रेस आघाडीवर आहे. बंगालात चारही मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजयी ‘खेला’ पाहायला मिळत आहे.
-
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या पत्नीसह घेतली सोनिया गांधींची भेट
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पत्नी कल्पना सोरेन हिच्यासह काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली. हेमंत सोरेन यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Jharkhand CM Hemant Soren along with his wife Kalpana Soren met Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi, in Delhi
(Pic: Hemant Soren’s ‘X’ handle) pic.twitter.com/H1vBjBYDyB
— ANI (@ANI) July 13, 2024
-
छत्तीसगडचे मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह घेणार प्रभू रामाचे दर्शन
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय आपल्या मंत्रिमंडळाच्या सदस्यांसह अयोध्येला आले आहेत. त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह अयोध्येत प्रभू रामांचं दर्शन घेणार आहेत.
#WATCH | Chhattisgarh Chief Minister Vishnu Deo Sai says, “It is our good fortune that we have come to Ayodhya. Our entire cabinet has come today to have darshan of Lord Ram and seek his blessings. Lord Ram had spent most of his exile in Chhattisgarh, today as prasad we have… https://t.co/UAgJR1PSUw pic.twitter.com/M4lG5lMOxG
— ANI (@ANI) July 13, 2024
-
घाटकोपर होर्डिंग प्रकरणी 3299 पानी आरोपपत्र दाखल
मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने न्यायालयात 3299 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. आरोप पत्रात चार अटक आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपपत्रानुसार, जीआरपी आणि बीएमसी अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्यासाठी सीआरपीसीच्या कलम 173(8) अंतर्गत तपास सुरू राहील.
13th May Ghatkopar hoarding case | Special Investigation Team of the Mumbai Crime Branch filed a 3,299-page long chargesheet in the court. A case has been registered against 4 arrested accused in the chargesheet. According to the chargesheet, the investigation will continue under…
— ANI (@ANI) July 13, 2024
-
मी नजरकैदेत आहे, घराबाहेर पडू दिले जात नाही… मेहबुबा मुफ्तींचा आरोप
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आरोप केला आहे की, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, त्यांना घराबाहेर पडू देत नाही.
-
आम्ही आरक्षण मिळेपर्यंत लढणार- जरांगे पाटील
संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची रॅली आहे. यावेळी त्यांनी मोठे भाष्य करत म्हटले की, आम्ही आरक्षण मिळपर्यंत लढणार आहोत.
-
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडील दिलीप खेडकरांचा नवा कारनामा
दिलीप खेडकर यांनी खाजगी वाहनावर ‘भारत सरकार’ बोर्ड वापरल्याबद्दल छाननीत समोर. थर्मोवेरिटा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या पजेरो गाडीवर लावला भारत सरकारच्या बोर्ड. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ट्विट करत केली चौकशीची मागणी
-
परभणीत सकल ओबीसी समाजाकडून गोंधळ आंदोलन
मनोज जरांगे पाटलांच्या अल्टिमेटच्या पार्श्वभूमीवर परभणीत ओबीसीकडून आंदोलन. परभणीत सकल ओबीसी समाजाकडून गोंधळ आंदोलन. सग्या सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने अजिबात काढू नये.
-
उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवारांनी भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. भेट घेऊन अजित पवार तातडीने मुंबईला रवाना
-
दादर आणि सिद्धिविनायक परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात
दादर आणि सिद्धिविनायक परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आज ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
-
IMD Alert : मुंबईत 200 मिमी पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा
मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे आहेत.हवामान विभागाने मुंबईत आज शनिवारी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे.
-
संरक्षक भिंत कोसळून चिपळूणच्या कॉलेजचा विद्यार्थी ठार
चिपळूणच्या डीबीजे कॉलेजचा सिद्धांत घाणेकर हा 20 वर्षांचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी कालपासून मिसिंग होता. फोन ट्रेस केला आज त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. भिंत कोसळून काल तो गाडला गेला कुणालाच कळाले नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
-
विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी संभाजीराजे यांचे आंदोलन
विशाळगडावरील अतिक्रमण काढावं अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. उद्या कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे विशाळगडाकडे निघणार आहेत.
-
Maharashtra News: वसई, विरार, नालासोपाऱ्यात जोरदार पाऊसाची सुरुवात
वसई, विरार, नालासोपाऱ्यात जोरदार पाऊसाची सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे… संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरु आहे… या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे…
-
Maharashtra News: मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे – जयंत पाटील
मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे… आधी असं राजकारण चालत नव्हतं… पराभवाचं आत्मचिंतन करत आहे.. काँग्रेसनं दुसऱ्या पसंतीची मतं समान वाटायला हवी होती… असं वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी केलं आहे.
-
Maharashtra News: धुळे परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूर यात्रेचे नियोजन…
धुळे विभागातून 256 गाड्यांचे नियोजन… आज पासून पंढरपूर दर्शनासाठी बस रवाना… दररोज 28 गाड्यांचे नियोजन… एका गावातून साधारण 44 प्रवासी असल्यास थेट गावातून पंढरपूरसाठी बसची व्यवस्था… नवमीला 55 बसचे नियोजन… दशमीला 150 बस पंढरपूर साठी निघणार
-
Maharashtra News: शेकापच्या जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली
शेकापच्या जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली… जयंत पाटील पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेणार… हवी तशी एकी दिसली नाही, शेकापच्या पदाधिकाऱ्यांचा सूर…
-
Maharashtra News: विधान परिषदेवर पिंपरी- चिंचवडच्या अमित गोरखे यांची वर्णी लागताच शहरात भाजप कडून जल्लोष
विधान परिषदेवर पिंपरी- चिंचवडच्या अमित गोरखे यांची वर्णी लागताच शहरात भाजप कडून जल्लोष…. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येऊन जल्लोष सुरू केला… अमित गोरखे हे विधान परिषदेत महायुतीचे उमेदवार होते.
-
Maharashtra News : काँग्रेसचे नेते माजी मंत्री डी. पी सावंत महिन्याभरात घेणार राजकीय निर्णय
काँग्रेसचे नेते माजी मंत्री डी. पी सावंत महिन्याभरात घेणार राजकीय निर्णय. काँग्रेस सोडून वर्गमित्र अशोकराव चव्हाण यांना साथ देणार ?. अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्ती म्हणून डी. पी सावंत यांची ओळख. विधानसभा निवडणुकीपूर्वी डी. पी सावंत काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याची शक्यता.
-
Maharashtra News : सगेसोयऱ्याची अमलबजावणी घेणारच – मनोज जरांगे पाटील
“सरकारला दिलेली वेळ आज संपणार. शिंदे समितीने नोंदी शोधायच काम सुरु ठेवावं. विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीत जायला हवं होतं. आम्ही जातीयवादी नाही. सगेसोयऱ्याची अमलबजावणी घेणारच” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
Maharashtra News : अफगाणिस्तानातून कांदा मागवण्याची गरज नाही – संजय राऊत
“बाळासाहेब ठाकरे आणि RSS दोघांनी आणीबाणीच समर्थन केलं होतं. वाजपेयी पंतप्रधान असते, तर त्यांनी सुद्धा आणीबाणी लावली असती. मोदींच्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस. अफगाणिस्तानातून कांदा मागवण्याची गरज नाही. राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा सडतोय त्याला भाव द्या” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
-
Maharashtra News : काही आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी – संजय राऊत
“जे आमदार स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजतात. समाजवादी विचारांचे समजात. मतदानाच्यावेळी काही आमदारांचा भाव 20 ते 25 कोटी होता. ही निवडणूक साधी, सोपी नव्हती. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होती” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
Maharashtra News : काही आमदारांना दोन एकर जमीन दिली- संजय राऊत
“जयंत पाटील यांच्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. शरद पवारांनी जयंत पाटील यांच्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. जयंत पाटील यांचा शेकाप मविआमधील महत्त्वाचा घटक पक्ष आहे. लोकसभेला त्यांनी रायगडमध्ये मविआसाठी प्रामाणिकपणे काम केलं. 23 च्या पुढे ज्या आमदारांना 25 मत पडली. त्या आमदारांचा काय भाव होता? ती माहिती करुन घ्या. काही आमदारांना दोन एकर जमीन दिली” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
-
Maharashtra News : हंडोरेंचा पराभव करणारी हीच काँग्रेसची 7 मत – संजय राऊत
“काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला. शिंदे गट आणि अजित पवार गट विजयाचा कसला उन्माद करतात. 7 मत फुटली यात आश्चर्य वाटण्यासारख काहीही नाही, ते आधीच फुटलेले. हंडोरेंचा पराभव करणारी हीच काँग्रेसची 7 मत होती” असा दावा संजय राऊत यांनी केला.
-
200 ट्रॅक्टरची रॅली
मनोज जरंगे यांच्या शांतता रॅलीसाठी 200 ट्रॅक्टर छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहेत. खुलताबाद येथून 200 ट्रॅक्टरची रॅली निघाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक येथे ही टॅक्टर रॅली दाखल होणार आहे.
-
नंदुरबारमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात
सात दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेती कामांना आणखीन वेग येणार आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे काम मंदावले होते. मात्र आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली असल्याने खरीप हंगामाच्या पिकांना फायदा होईल.
-
फोंडाघाटातून अवजड वाहतूक सुरु
फोंडाघाट अवजड वाहनांसाठी खुला झाला आहे. चार दिवसा नंतर अखेर फोंडाघाटातून अवजड वाहनांसाठी वाहतूक सुरू झाली आहे. घाटात ९ तारखेला रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता.तात्काळ लगेच त्या घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली होती.हलक्या ,छोट्या वाहनांना परवानगी देण्यात आली होती.चार दिवसानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने अवजड वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे.
-
नारायण राणे यांच्या खासदारकीला हायकोर्टात आव्हान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
-
पंतप्रधान मुंबईच्या दौऱ्यावर
निवडणुकीच्या प्रचारकाळात मुंबईत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी दाखल होणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या हस्ते गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये रेल्वे, एमएमआरडीए, मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पकामांच लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.
-
शांतता रॅलीमुळे अनेक परीक्षांचे वेळापत्रक बदलले
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे कारागृह पोलीस भरती रद्द करण्यात आली आहे. आज होणारी पोलीस भरती उद्यापासून सुरू होणार आहे. या भरतीचे वेळापत्रक बदलले आहे. तर आज होणारी टीईटीची परीक्षाही रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार आणि सोमवारी होणार आहे.
-
छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात
धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरवणाऱ्या इसिस या संघटनेच्या संपर्कात शहरातील अनेक तरुण असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या समोर आली आहे.फेब्रुवारी महिन्यात एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल बेरीबाग येथील ३५ वर्षीय आयटी इंजिनियर मोहम्मद जोएब खान याला अटक केली होती. त्याने 50 तरुण इसिसच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.
-
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे कारागृह पोलीस भरती रद्द
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे कारागृह पोलीस भरती रद्द. आज होणारी पोलीस भरती रद्द असून उद्यापासून भरतीचे शेड्युल सुरू होणार. तसेच आज होणारी टीईटीची परीक्षाही रद्द करण्यात आली असून आता शनिवार ऐवजी रविवार आणि सोमवारी टीईटीची परीक्षा होणार आहे.
-
नाशिक – सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित
नाशिक मधील सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा संप तूर्तास स्थगित. आज पासून सिटी लिंक कर्मचारी जाणार होते बेमुदत संपावर. वेतन वाढ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी संपाचा इशारा देण्यात आला होता. मात्र सिटी लिंक प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या बैठकीत तोडगा निघाला . येत्या काही दिवसात मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन सिटीलींक प्रशासनाने दिलं आहे.
-
मनोज जरांगे पाटील यांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात शांतता रॅली
मनोज जरांगे पाटलांची आज छत्रपती संभाजीनगर शहरात शांतता रॅली होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला अटींसह दिली परवानगी.
बैलगाडी, ट्रॅक्टर हे रॅलीत न वापरण्याच्या सूचना. सिडको चौकातून मनोज जरांगे यांची रॅली निघणार असून 5 लाखांहून अधिक समाजबांधव रॅलीला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. रॅलीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार . 600 शाळा महाविद्याये आणि खाजगी आस्थापना आज राहणार बंद
-
मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा पुन्हा एकदा झटका
मंत्री अब्दुल सत्तार यांना न्यायालयाचा पुन्हा एकदा झटका. मुलाच्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाची परवानगी केली रद्द.
हिंदुस्थान एज्युकेशन सोसायटीच्या पदवी महाविद्यालयाची परवानगी केली रद्द. पदवी महाविद्यालयाला मिळालेली परवानगी बेकायदेशीर आणि आणि कायद्याशी विसंगत असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली. पदवी महाविद्यालयाची परवानगी रद्द करत न्यायालयाने अब्दुल सत्तार यांना दिला धक्का
-
राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींना दिलासा
राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाकत काँग्रेस नेते राहुल गांधींना मुंबई उच्च न्यायालयाने अंशत: दिलासा दिला आहे. संघाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रारदाराने सादर केलेली अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारण्याचा भिवंडी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली होती. उच्च न्यायालयाने शुक्रवारी ती मागणी मान्य केली. त्यामुळे, राहुल गांधी यांना अंशतः दिलासा मिळाला आहे. अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारली जाऊ शकत नाही , असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता
Published On - Jul 13,2024 8:21 AM