Maharashtra Breaking News LIVE : अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र यावे: अमोल मिटकरी
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 22 जून मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आज सकाळी 11 वाजता राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. यानंतर दुपारी 2 वाजता जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. आदित्य ठाकरे आज राज्यपाल दुपारी रमेश बैस यांची घेणार भेट. राज्यातील विद्यार्थ्यांचा प्रश्नासंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत विधान परिषदेच्या नावावर चर्चा झाली. विधान सभा निवडणुकीत फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार. अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफीसमध्ये चोरी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. डी एन नगर पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मनसे तयारीला लागली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 जागांवर विधानसभा निवडणुक लढण्यासाठी मनसेची तयारी सुरू आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
संजीव बल्यान यांनी अमित शहा यांना पत्र लिहून आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची केली मागणी
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री संजीव बल्यान यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. वास्तविक संगीत सोम यांनी संजीव बालियान यांच्यावर परदेशात जमीन खरेदी-विक्रीचे गंभीर आरोप केले होते.
-
अभिनेता दर्शन थुगुडेपा याला 4 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
अभिनेता दर्शन थुगुडेपा याला 4 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेणुकास्वामी यांच्या कथित हत्या प्रकरणात आर्थिक गुन्हे विशेष न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
-
-
तेलंगणा: काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा
तेलंगणातील काँग्रेस सरकार 2 लाख रुपयांचे कृषी कर्ज माफ करणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची कर्जमाफी लवकरच लागू केली जाईल.
-
NEET पेपर लीक प्रकरणात सॉल्व्हर टोळीच्या सिंटूला अटक
NEET पेपर लीक प्रकरणी सॉल्व्हर गँगच्या सिंटूला अटक करण्यात आली आहे. सिंटूसह अन्य चार गुन्हेगारांनाही झारखंडच्या देवघर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही संजीव मुखिया टोळीशी संबंधित आहेत.
-
अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र यावे: अमोल मिटकरी
अजित पवार-प्रकाश आंबेडकर एकत्र यावे, असं कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत. तसेच महायुतीतील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये, असं म्हणत टीकाही केली आहे.
-
-
गडचिरोलीतील पूर परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आढावा बैठक
गडचिरोलीतील पूर परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा बैठक घेत आहेत. या सभेत कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम गैरहजर राहिलेत. धर्मराव आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत.
-
कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काय?
कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज- उद्या (२३) कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
-
जाहीर सांगतो मराठ्यांशिवाय राज्यात पान हलणार नाही- जरांगे पाटील
जाहीर सांगतो मराठ्यांशिवाय राज्यात पान हलणार नाही. हक्काच्या कुणबी नोंदी घेऊ नका म्हणतात. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. सरकारला सांगतो आम्हीही घरात बसणार नाही- मनोज जरांगे पाटील
-
ओबीसींचं आंदोलन सरकारकडून मॅनेज- मनोज जरांगे पाटील
ओबीसींचं आंदोलन सरकारकडून मॅनेज केलं गेलं आहे. दोन समाजामध्ये तेढं करणं तुम्हाला पटतं का? असं मनोज जरांगे म्हणाले.
-
हाके यांनी केलेल्या मागण्या बरोबर आहेत – पंकजा मुंडे
परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये म्हणून सरकारने तशा उपाययोजना केल्या पाहिजे. हाके यांनी केलेल्या मागण्या बरोबर आहेत. चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट देण्यात आले. यात कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही.
-
आंदोलन थांबवलं नाही फक्त स्थगित केलंय – लक्ष्मण हाके
आंदोलन थांबवलं नाही फक्त स्थगित केलंय असं लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्यानंतर म्हटलं आहे. आपल्या आंदोलनाची सरकारने नोंद घेतली आहे.
-
लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्यानंतर सांगोल्यात जल्लोष
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडल्यानंतर सांगोल्यात जल्लोष करण्यात आला. सरकारच्या शिष्टमंडळाला अखेर उपोषण सोडण्यास यश आले आहे. फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत लक्ष्मण हाके यांच्या सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील घरी कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.
-
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण अखेर मागे
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केले आहे. सरकारचं शिष्टमंडळ आज ओबीसी नेत्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे.
-
सरकारचे शिष्ठमंडळ हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला
सरकारचे शिष्ठमंडळ ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या वडीगोदीतील उपोषण स्थळावर भेटीला आले आहे. या शिष्ठमंडळात छगन भुजबळ यांच्या सह अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.
-
कॉंग्रेसने दडपशाही करून कार्यालय उघडले – अनिल बोंडे
राज्यसभा खासदार म्हणून मला देखील ते कार्यालय मिळावं यासाठी मी पत्र दिल आहे अशी मागणी भाजपा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केली आहे. दोघांमिळून कार्यालय दिल्यास मला हरकत नाही. दडपशाही करून काँगेसने कार्यालयाचे कुलूप उघडले आहे. जो पर्यत तोडगा निघत नाही तो पर्यत कार्यलय सील केले पाहिजे अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.
-
कामगार मंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडविला
राज्याचे कामगार आणि सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवल्याचा आंदोलकांनी अडविल्याचा प्रकार घडला आहे. शक्तीपीठ महामार्ग विरोधात काँग्रेस आणि शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निघालेल्या मंत्री खाडे यांच्या गाडीचा ताफा अडविण्यात आला आहे.
-
चारकोप सेक्टर 8 मध्ये रस्ता खचला
चारकोप सेक्टर 8 मध्ये रस्ता खचल्याने त्यात एक डंपरही अडकला होता. हा रस्ता काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आला असून आज हा अपघात झाला आहे.
-
युवक काँग्रेसचं पुण्यात आंदोलन
पोलीस भरतीचे विद्यार्थी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे गेल्या तासभरापासून आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी आंदोलनावर अजूनही ठाम आहेत. पोलीस आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात आंदोलन सुरू आहे. आमदार रविंद्र धंगेकरही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
-
अजित पवार गटाला आठवड्यात दुसरा धक्का
कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला आठवड्यात दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. विधानसभेला महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनो कामाला लागा, अशा सूचना ए वाय पाटील यांनी दिल्यात. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ए वाय पाटील यांनी घोषणा केली आहे. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी कडून लढण्यावर ए वाय पाटील ठाम आहेत. महाविकास आघाडीत येण्यासाठी के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे. विधानसभेला महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी दोघेही इच्छुक आहेत. म्हेवणे-पावणे असूनही ए वाय पाटील आणि के पी पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर आहे.
-
मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे रवाना
जळगावातील श्रीराम संस्थेची 152 वर्षाची परंपरा असलेली आदिशक्ती मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. पालखीच्या मार्गावरती ‘झाडे लावा, झाडे जगवा’ संदेश देत वृक्षरोपण देखील केले जाते. पालखी सोहळ्यात ज्येष्ठांसह चिमुकल्यांची देखील मोठा उत्साह पाहायला मिळाला. भजन, कीर्तन आणि फुगड्या खेळून भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे.
-
भाजपच्या चिंतन बैठकीत गोंधळ
सोलापुरात भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळाला. भाजपचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक यांच्यासमोर गोंधळ झाला. खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. मात्र जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच बैठक होतेय. दरम्यान गोंधळ सुरू होताच माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आलं. गोंधळानंतर बंद दाराआड बैठक सुरू झालीय.
-
यशोमती ठाकूर यांनी तोडले कार्यालयाचे कुलूप
यशोमती ठाकूर यांनी कुलूप तोडून कार्यालयात प्रवेश केलाय. काँग्रेसचे अमरावतीमध्ये आंदोलन सुरू आहे.
-
सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल
सरकारचे शिष्टमंडळ संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी अवघ्या काही वेळातच पोहचेल.
-
सरकारचे शिष्टमंडळ काही वेळात विमानतळावर होणार दाखल
ओबीसी कार्यकर्त्यांची विमानतळावर मोठी गर्दी. ओबीसी कार्यकर्त्यांची विमानतळावर घोषणाबाजी सुरू
-
सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान
या कार्यक्रमाला आज 3 वर्ष होतायत आणि या महिला धोरणाला तीन दशके पूर्ण होतायत. गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम 8 मार्चला महिला दिनाच्या दिवशी असायचा पण एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा 365 दिवस मान सन्मानं ठेवला पाहिजे, असे सु्प्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
-
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग
मुसळधार पावसामुळे सकळ भागात पाणी साचण्यास सुरुवात. वंदना डेपो जवळ रोड पाण्याखाली. साचलेल्या पाण्यामुळे मोठी वाहतूक कोंडी
-
Maharashtra News : शरद पवार गट पुन्हा शिवस्वराज्य यात्रा काढणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट पुन्हा शिवस्वराज्य यात्रा काढणार. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काढणार शिवस्वराज्य यात्रा. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असणार शिवस्वराज्य यात्रा. काल पुण्यात झालेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत यासंदर्भात झाली चर्चा
-
Maharashtra News : वडगाव शेरी परिसरात किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड
पुण्यातील वडगाव शेरी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी वाहनांची तोडफोड केली. शुक्रवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये दोन अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.
-
Maharashtra News : श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये वयोवृद्ध भाविकांचे लिफ्ट वाचून हाल
अद्यावत पद्धतीने बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास मध्ये गेल्या सहा वर्षापासून सी आणि डी या दोन विंग मध्ये लिफ्ट नसल्याने भाविकांचे होतायत हाल. अंदाजे 50 लाख रुपये खर्च करून मंदिर प्रशासनाने 2018 साली लिफ्ट आणून ठेवले आहेत. मात्र त्या धुळखात पडले असल्याने भाविकातून तीव्र संताप.
-
Maharashtra News : खासदार धैर्यशील माने शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटूच पण संसदेमध्ये सुद्धा याबाबत आवाज उठवू. खासदार धैर्यशील माने यांची सांगलीत आंदोलकांना ग्वाही. देवांच्या नावाखाली आमच्या घरावर कोणी नांगर फिरवत असेल तर देव सुद्धा त्याला माफ करणार नाही. धैर्यशील माने यांचा सरकारला घरचा आहेर.
-
Maharashtra News | चंद्रपूरमध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून वृद्धाची हत्या…
चंद्रपूरमध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून वृद्धाची हत्या… चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मौशी गावातील घटना… चंद्रपूर पोलिसांनी 3 आरोपींना ठोकल्या बेड्या…
-
Maharashtra News | चांदीच्या दरात अडीच हजाराने वाढ तर, सोने 800 रुपयांनी वधारले
जळगावच्या सराफ बाजारात तीन दिवसांत चांदीच्या दरात अडीच हजाराने वाढ तर, सोने 800 रुपयांनी वधारले… चांदीचा भाव 91,500 रुपयांवर तर सोन्याचे दर पुन्हा 73 हजारांवर पोहोचले… आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचं म्हणणं आहे.
-
Maharashtra News | रायगड जिल्ह्यात सर्वदूर सकाळपासून मुसळधार पाऊस
रायगड जिल्ह्यात सर्वदूर सकाळपासून मुसळधार पाऊस… पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळण्यचा अंदाज… महाडमध्ये एनडीआरएफचं पथक तैनात…
-
Maharashtra News | चुकीचं प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे दोषी – भुजबळ
चुकीचं प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे दोषी… सरथीच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना सवलती… हाके आणि ससाणेंचं उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करणार… असं वक्तव्य देखली भुजबळ यांनी केलं आहे.
-
Maharashtra News | जातीयवाद कोण वाढवत आहे, आणि आम्हाला म्हणता…., जरांगे पाटील
सरकार आमच्यावर अन्याय करणार नाही आणि केले तर महागात पडेल… आमची प्रमाणपत्र खोटे नाहीत… येवल्याच्या येड्याकडून तुम्ही बोलणार… जातीयवाद कोण वाढवत आहे, आणि आम्हाला म्हणता आणि जातीयवाद तुम्ही वाढवता… असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
Maharashtra News | तळेगावच्या चौराई देवी मंदिरात चोरी, सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
मावळच्या तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चौराई देवी मंदिरात रात्री चोरी झाली. रात्रीच्या वेळी दानपेटीच चोरून नेली. नेमके या दानपेटीत किती दान गोळा झालं होतं हे अजून कळू शकलेलं नाही….
-
Maharashtra News | कुणाच्या ताटातलं कुणाला काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका – संजय राऊत
मुंबईतील एका लोकसभेच्या जागेवर भाजपचा दरोडा… कुणाच्या ताटातलं कुणाला काढून देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका… विधानसभेच्या जागांबाबत अद्याप चर्चा नाही… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.
-
शारीरिक चाचणी आता 13 जुलै रोजी
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती सुरू असून आज २२ जून रोजी होणारी शारीरिक चाचणी रद्द करण्यात आलेली आहे.काल रात्री झालेल्या रिमझिम पावसामुळे क्रीडांगण खराब झाले असून ही आजची शारीरिक चाचणी रद्द करून 13 जुलैला ठेवण्यात आली आहे. 24 जूनला होणारी शारीरिक चाचणी फेरबदल नसून त्याच तारखेला राहणार असे माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली
-
निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये
संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. नाशिक मध्ये पालखी दाखल झाल्यानंतर पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर होऊन प्रस्थान झाले होते.
-
डावखरेंविरोधात आठवले गट आक्रमक
निरंजन डावखरे यांच्या विरोधात आरपीआय आठवले गट आक्रमक झाला आहे. भगवान भालेराव यांनी निरंजन डावखरे यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
-
नाना पटोले घेणार लोकसभा निवडणुकीचा आढावा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुण्यात घेणार लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना देणार लोकसभेचा अहवाल सादर करतील. आज दुपारी काँग्रेस भवन मध्ये नाना पटोले सर्व स्थानिक नेत्यांची बैठक घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आढावा घेण्यात येत आहे.
-
तानाजी सावंत यांना अश्रू अनावर
मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाशी संवाद साधताना आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना अश्रू अनावर झाले. बार्शी तालुक्यातील मराठा आहोरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबीयांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बार्शीतील देठे कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
-
राज्य सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांच्या भेटीला
ओबीसी आंदोलकांच्या भेटीसाठी आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ वडी गोद्री आणि पुणे या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. आधी छत्रपती संभाजीनगरला जाणार, नंतर वडी गोद्रीला शेवटी पुणे आणि मुंबई असा त्यांचा दौरा आहे. या शिष्टमंडळात छगन भूजबळ , गिरीश महाजन, अतूल सावे, ऊदय सामंत, धनंजय मुंडे , प्रकाश अण्णा शेंडगे आणि गोपीचंद पडळकर हे असतील.
-
सोने-चांदीची जोरदार मुसंडी
सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. या आठवड्याच्या शेवटी इतक्या दिवसाची दरवाढीची कसर भरुन काढली. मौल्यवान धातूच्या किंमतीत मोठी दरवाढ झाली. सोन्याने आणि चांदीने जोरदार मुसंडी मारली.
-
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाचा दणका
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबई विशेष सत्र न्यायालयाचा दणका. सुनावणीला गैरहजर राहिल्याने 3 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोना काळात वीज दरवाढीविरुद्ध भाजपने आंदोलन केले होते. बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याचाही आरोप असून भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरू आहे.
मात्र या खटल्याच्या सुनावणीला नार्वेकर गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून 8 जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
-
राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज घेणार ओबीसी आंदोलकांची भेट
राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलकांची भेट घेणार असून त्यासाठी ते वडी गोद्री आणि पुणे या ठिकाणी सकाळी ११.३० वाजता पोहोचणार. त्याआधी ते संभाजीनगरला जाणार , तेथून वडी गोद्रीला जाणार यानंतर पुण्यात रवाना होणार. वडी गोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ यांचं ऊपोषण सोडविणार यानंतर ओबीसी ऊपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचं ऊपोषण सोडवणार. या शिष्टमंडळात छगन भुजबळ , गिरीश महाजन, अतूल सावे, ऊदय सामंत, धनंजय मुंडे , प्रकाश अण्णा शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे.
-
नवी दिल्ली – आज जीएसटी कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक, अनेक राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार
राजधानी दिल्लीत आज जीएसटी कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीसाठी अनेक राज्यांचे अर्थमंत्री उपस्थित राहणार आहेत. मात्र महाराष्ट्राच्या वतीने सचिव उपस्थित राहणार, अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित राहणार.
-
ठाण्यात गोखले रोड परिसरातील अर्जुन टॉवरमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
ठाण्यातील गोखले रोड परिसरातील अर्जुन टॉवरला लागली आग आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
Published On - Jun 22,2024 8:13 AM