Maharashtra Breaking News LIVE : चेतन पाटील याला जामीन नाहीच, 19 सप्टेंबरपर्यंत राहणार सावंतवाडी जेलमध्येच
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
अमेरिकेतील कार्यक्रमादरम्यान आरक्षासंदर्भात वक्तव्य केल्याने भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे. आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यात चंद्रकांत पाटील, अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळे तर आशिष शेलार व पंकजा मुंड मुंबईत आंदोलन करणार आहेत. भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या वतीनेही राहुल गांधींच्या समर्थनार्थ राज्यात आंदोलन करण्यात येणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविद केजरीवाल यांच्या अटकेला आणि जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. केजरीवाल तुरूंगातून बाहेर येणार की नाही ते आज ठरणार आह. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असून मोठी सभा घेणार आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा मुंबई ते भांडुप लोकलने प्रवास
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबई ते भांडुप असा लोकलने प्रवास केला आहे. भांडुप मधील मराठा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणपती दर्शनाला ते आले होते.
-
पुणे फेस्टिवल कार्यक्रमाल आमदार रवींद्र धंगेकर यांची उपस्थिती
पुणे फेस्टिवल कार्यक्रमाल आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थिती लावली आहे. अजित पवारांना लांबून नमस्कार केला. मात्र अजित पवारांनी नमस्कार केल्यानंतर अजित पवारांजवळ जाऊन धंगेकर यांनी वाकून नमस्कार केला.
-
-
हिमाचल: संजौलीनंतर आता मंडीमध्ये बेकायदेशीर मशीद बांधकामाला विरोध
हिमाचल: संजौलीनंतर आता मंडईमध्ये बेकायदा मशिदीच्या बांधकामाबाबत आंदोलन सुरू आहे. हिंदू संघटना बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी करत आहेत.
-
कोणत्याही धर्माच्या भावना दुखावू शकत नाही – मुख्यमंत्री सखू
हिमाचलमधील मशिदी वादावर मुख्यमंत्री सुखू म्हणाले की, परस्पर सौहार्द राखला गेला पाहिजे. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावता येणार नाहीत. हिमाचलमध्ये सर्व धर्मांचा आदर केला जातो. हा धार्मिक मुद्दा नसून हा रस्त्यावरील विक्रेत्यांचा मुद्दा आहे. मशिदीच्या वादाबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे.
-
हरियाणात भाजपला मोठा धक्का, कर्णदेव कंबोज यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
हरियाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कर्णदेव कंबोज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कंबोज हे हरियाणातील ओबीसी वर्गाचे मोठे नेते आहेत.
-
-
बिहार कॉन्स्टेबल भरती पेपर लीक प्रकरणात माजी डीजीपी एसके सिंघल दोषी
बिहार पोलीस कॉन्स्टेबल भरती पेपर लीक प्रकरणी माजी डीजीपी एसके सिंघल यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
-
गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक
बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबार झाल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच कसारा रेल्वे स्थानकात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या आकाश श्रीवंत नावाच्या तरुणाला कल्याण रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अटक केली आहे. रेल्वे स्थानकावर नियमित गस्तीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला. आकाश श्रीवंत हा सराईत गुन्हेगार आहे.
-
परळीत दागिने लुटणाऱ्यास अटक
परळीत एसटी प्रवासादरम्यान एका महिलेच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाचा महिनाभरानंतर संभाजीनगर पोलिसांनी छडा लावला. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केल आहे.
-
भंडाऱ्यात पूरजन्य परिस्थितीत सुधारणा
भंडारा जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी सातत्यानं मुसळधार पाऊस पडला त्यामुळे गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भंडारा जिल्ह्यात सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. धरण प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग करण्यात आला. मात्र आता पाणी पातळी कमी झाल्याने पाण्याचा विसर्ग काल पेक्षा कमी करण्यात आला आहे.
-
धुळ्यात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन
धुळ्यात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चप्पल मारत आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर मुलाखतीत काँग्रेस सरकार आल्यावर आरक्षण व संविधान संपवणार असे वक्तव्य केले होते.
-
राहुल गांधींच्या विरोधात भाजप आक्रमक, सोलापुरात मोठी बॅनरबाजी
– कॉग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात सोलापुरात भाजपा आक्रमक
– भाजप पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करत राहुल गांधींचा निषेध व्यक्त
– भाजप आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली निदर्शने
– आरक्षणासंदर्भात राहुल गांधीनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ केले आंदोलन
– सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली निदर्शने
-
सातपुडा पर्वत रांगेतील चारठाणा तलाव शंभर टक्के भरला
मुक्ताईनगर – सातपुडा पर्वत रांगेतील चारठाणा तलाव शंभर टक्के भरला
त्यातच वडोदा सातपुडा पर्वत रांगेने सततच्या पावसामुळे हिरवा शालू पांघरला
परिसरात चांगला पाऊस झाल्याने चारठाणा तलाव शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या सिंचनासह वन्य प्राण्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला…
परिसरात मोठा दिलासा तलाव 100% भरल्याने मिळाला आहे
-
सिंधुदुर्ग पुतळा कोसळल्याप्रकरणी चेतन पाटीलला जामीन नाही, जेलचा मुक्काम वाढला
सिंधुदुर्ग- चेतन पाटीलला जामीन नाहीच
19 सप्टेंबर पर्यंत राहणार सावंतवाडी जेल मध्येच.
चेतन पाटीलचा जेल मुक्काम अजून सहा दिवसांनी वाढला.
पोलीसांकडून म्हणन देण्यास मुदत मागितल्याने चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडी वाढली.
सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांची माहिती.
-
जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
सिंधुदुर्ग – मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरण
जयदीप आपटेला २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
-
जयदीप आपटेला मालवण दिवाणी न्यायालयात केलं हजर
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरण. जयदीप आपटे याला मालवण पोलीसांनी मालवण दिवाणी न्यायालयात केले हजर. जयदीप आपटे मागील आठ दिवस मालवण पोलीस कोठाडीत. मुख्य आरोपी असणाऱ्या जयदीप आपटेला पुन्हा पोलीस कोठाडी की न्यायलयीन कोठडी हे काही वेळात समजेल.
-
राहुल गांधी यांच्या आरक्षण विरोधी वक्तव्यावरुन भाजपा आक्रमक
राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षण विरोधी वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्यावतीने आंदोलन सुरु आहे. “जो पर्यंत राहुल गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकडे जाऊन नाक रगडून माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन असेच राज्यभर सुरू राहणार. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या बाबत का बोलत नाहीत?” असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
-
मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घरासमोर गोळीबार
राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याची माहिती. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी गोळीबार झाल्याची माहिती. मी झोपायला गेलो होतो, मला रात्री उशिरा 2 वाजता माहिती मिळाली असं धनंजय सावंत यांनी सांगितलं. घटनास्थळी 3 काडतुसे सापडली
-
तो पर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही – संजय राऊत
“सरन्यायाधीश चंद्रचूड त्या खुर्चीवर आहेत, तो पर्यंत आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही. चंद्रचूड घटनेचे रखवालदार आहेत. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार अमित शाह-नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेन आलं आहे. मोदी चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गेले होते, त्यातून स्पष्ट संदेश मिळतो” असं संजय राऊत म्हणाले.
-
दक्षिण सोलापूरसह राज्यात शिवसेना जिंकेल – संजय राऊत
दक्षिण सोलापूरची तयारी पक्की आहे. दक्षिण सोलापूरची जागा शिवसेनेने अनेकवेळा जिंकली. तोपर्यंत आमच्या मतदार संघात प्रत्येक पक्ष तयारी करतोय. दक्षिण सोलापूरसह राज्यात शिवसेना जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
-
ते केवळ मराठा समाजाचे मुख्यमंत्री -लक्ष्मण हाके
राज्याचे मुख्यमंत्री फक्त स्वजातीच्या आंदोलना कडेच पाहतात, मुख्यमंत्री बारा तेरा कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत का फक्त मराठा समाजाचे आहेत असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. मुख्यमंत्र्यांना फक्त जरांगेचे आंदोलन दिसते इतर समाजाचे आंदोलन का दिसत नाही बाकीच्या लोकांनी केलेल्या आंदोलनाला सरकार जमेत धरत नाही असा आरोप देखील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.
-
हिंदु संघर्ष समितीचे नागपूरमध्ये आंदोलन
प्रभू श्रीराम आणि हिंदू धर्माच्या आराध्य दैवतांचा वारंवार अपमान करणाऱ्यांचे मुख्य सूत्रधार शरद पवार आहेत, असा आरोप करत त्यांचा निषेध करण्यासाठी हिंदु संघर्ष समितीने नागपूरमध्ये आंदोलन सुरू केले आहे.
-
बँक घोटाळ्याप्रकरणी शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा मोर्चा
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं पाच वर्षाची सजादेखील देण्यात आली 22 वर्षानंतर 1444 कोटी रुपयांची वसुली हे त्यांच्या कडून होण्यासंदर्भात सहकार विभागाने आणि सहकारमंत्र्यांनी दिरंगाई केली, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला. त्या विरोधात आज नागपूरच्या रामटेक तालुक्यात पीडित शेतकऱ्यांचा आणि खातेधारकांचा मोर्चा आयोजित होत आहे.
-
जयदीप आपटेला मालवण कोर्टात हजर करणार
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटे याची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आज मालवण कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तर चेतन पाटील याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
-
ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत -अंबादास दानवे
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी जनतेची मनातील इच्छा असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी उद्धव ठाकरे यांनी दोनदा मागणी केलेली आहे.
-
आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी पंढरपुरात धनगर समाज आक्रमक झाला आहे. पाच दिवसांपासून सुरू आहे आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषण स्थळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भेट दिली.
-
Maharashtra News: कोकण रेल्वेच्या आज पासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या गाड्या हाऊसफुल
गौरी गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर आता चाकरमान्यांचा परतीचा प्रवास… कोकण रेल्वेच्या आज पासून अनंत चतुर्दशी पर्यंतच्या सगळ्या गाड्या हाऊसफुल… गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांना देखील आजपासून मोठी गर्दी… गणपतीसाठी परतीच्या 350 हून अधिक फेऱ्या सोडल्याने अनेक गाड्यांना लेट मार्ग… पाच दिवस गणपतीची चाकरमान्यांकडून मनोभावे सेवा
-
Maharashtra News: आज सातव्या दिवसाच्या गणेशाचे विसर्जन…
शहरातील पांझरा नदीवर 12 ठिकाणी करण्यात येणार विसर्जन… सध्या पाजरा नदीला पाणी, पाण्यात प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने 11 ठिकाणी व्यवस्था… महापालिकेच्या वतीने 11 ठिकाणी विसर्जनासाठी पाण्याच्या टाक्या… मोठ्या मुर्त्यांचे हत्तीडोह परिसरात विसर्जन… महापालिकेच्या वतीने 275 कर्मचाऱ्यांची नेमणूक…
-
Maharashtra News: नाशिक महानगरपालिकेकडून मिळणार 127 खेळाडूंना शिष्यवृत्ती
आंतरराष्ट्रीय 5 राष्ट्रीय 15 तर जिल्हास्तरीय 107 खेळाडूंचा समावेश… क्रीडा शिष्यवृत्तीचा प्रस्ताव आयुक्तांसमोर अंतिम मंजुरीसाठी सादर.. महापालिकेच्या अंदाजपत्रकातील पाच टक्के क्रीडाविषयक कामांसाठीच्या राखीव निधीतून शिष्यवृत्ती.. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून क्रीडा धोरणांची अंमलबजावणी… छाननी करून 127 प्रस्ताव मंजुरीसाठी सादर
-
Maharashtra News: गणेशोत्सवात तडीपारांची नाशिक पोलिसांकडून धरपकड
आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा… 3 दिवसांत 62 जणांवर करण्यात आले गुन्हे दाखल.. शहरातील सुमारे साडेतीनशे गुंडांविरोधात करण्यात आली होती तडीपारीची कारवाई… तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करीत शहरात वास्तव्याला असणाऱ्या ६२ गुंडांविरोधात करण्यात आले गुन्हे दाखल.. शहरात तडीपार गुन्हेगार वावरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू…
-
Maharashtra News: जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी गिरणा धरण 100% भरले
जळगाव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी गिरणा धरण 100% भरले… चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेले गिरणा धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे… अर्ध्यापेक्षा जास्त जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा तसेच सिंचनाचा प्रश्न गिरणा धरणावर अवलंबून असतो… 1969 ला गिरणा धरण बांधण्यात आलं होतं. 55 वर्षात शंभर टक्के धरण भरले जाण्याचे हे तेरावे वर्ष आहे… आत्तापर्यंत गिरणा धरणाच्या इतिहासात गिरणा धरण फक्त 13 वेळा 100% भरले आहे….
-
पुण्यातील हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञात टोळक्याने पेटवली बस
पुण्यातील हडपसरमध्ये मध्यरात्री अज्ञात टोळक्याने बस पेटवली. नाना परमेश्वर हंगे यांची टेम्पो ट्रॅव्हल्स बस अज्ञात टोळकाने पेटवून दिल्याने ती पूर्णपणे खाक झाली. हातात कोयते आणि तलवारी घेऊन आलेल्या चार ते पाच जणांनी टेम्पो ट्रॅव्हल्स वरती पेट्रोल टाकून ती पेटवली. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
-
नांदेड – पाण्याच्या टँकरमुळे रस्त्याला पडलं भगदाड
नांदेडमध्ये पाण्याच्या टँकरमुळे रस्त्याला भगदाड पडलं आहे, तरोडा नाका ते सांगवी रस्त्यावर ही घटना घडली. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाच असल्यामुळे ही घटना घडल्याचं उघड झालं आहे.
-
महायुतीच्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, देवेंद्र फडणवीस यांचा भाजप नेत्यांना सल्ला
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारमंथन झालं. फडणवीसांच्या घरातील गणरायाच्या दर्शनासाठी काल आमदार-खासदारांची रीघ लागली होती. देवेंद्र फडणवसी यांनी नेत्यांना कानमंत्रही दिल्याची चर्चा. महायुतीच्या नेत्यांविरोधात अपशब्द टाळा असा सल्ला फडणवीस यांनी दिला.
तसेच सर्वांनी अधिकाधिक वेळ मतदारसंघात घालवा, अशा सूचना देण्यात आल्या.
-
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरूंगातून बाहेर येणार का ? आज काय निर्णय येणार ?
दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. दोन्ही पक्षांची उलटतपासणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता.
-
आरक्षणविरोधी वक्तव्यानंतर भाजप राहुल गांधींविरोधात आक्रमक, राज्यभरात करणार आंदोलन
राहुल गांधींविरोधात भाजपचे राज्यभर आंदोलन. पुण्यात भाजपच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करणार आंदोलन. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता होणार आंदोलन. तर अकोल्यात चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईत आशिष शेलार, पंकजा मुंडे आंदोलन करणार.
-
माजी आमदार संजय घाटगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वीकृत संचालक पदी मिळणार संधी
माजी आमदार संजय घाटगे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वीकृत संचालक पदी संधी मिळणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्याने संजय घाटगे यांची या पदी नियुक्ती होणार आहे. संचालक मंडळाच्या होणाऱ्या पुढील बैठकीत घाटगेंच्या स्वीकृत संचालक पदावर शिक्कामोर्तब होणार .
Published On - Sep 13,2024 8:13 AM