Maharashtra Breaking News LIVE : कल्याण नेतीवली टेकडीवरील घरे पावसामुळे कोसळली

| Updated on: Jul 18, 2024 | 11:06 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : कल्याण नेतीवली टेकडीवरील घरे पावसामुळे कोसळली

मुंबई शहर आणि उपनगरात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतो. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर पुन्हा वाढला असून आता त्याचा परिणा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही दिसत आहे. लोकल सेवा 10 ते 15 मिनिट उशीराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वेही 6 मिनिटे उशीराने धावत आहे. दरम्यान मुंबईत आज पावासचा यलो अलर्ट असून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. नीट परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. नीट परीक्षेबाबत दाखल करण्यात आलेल्या तब्बल 45 याचिकांबाबत एकत्रितपणे सुनावणी होणार असून विद्यार्थी व पालकांचं त्याकडे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये धक्का बसल्यानंतर अजित पवार ॲक्शन मोडवर आले असून पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रात झिका रुग्णसंख्येचा वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने रुग्ण आढळलेल्या तीन ते पाच किलोमीटर परिसरात स्क्रीनिंग करण्यास सुरुवात केली आहे. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jul 2024 07:54 PM (IST)

    जालना-राजूर रोडवर भीषण अपघात

    जालना-राजूर रोडवर वसंतनगर येथे काळी-पिवळी गाडी दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्न करताना रोड लगत असलेल्या विहिरीत गेली आणि या अपघातात 6 जणांचा दुर्दवी मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काहीजण पंढरपूरहुन येत होते. जखमींना जालना येथे उपचारसाठी पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन पथक पोहचले असून अजून कोणी या विहिरीत आहे का? यासाठी या विहिरीचे पाणी उपसण्यात येत आहेत.

  • 18 Jul 2024 06:49 PM (IST)

    ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच पुण्यात 3 ऑगस्टला शिबिर

    ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच पुण्यात 3 ऑगस्टला शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. पुण्यातील शिबिराला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 18 Jul 2024 06:45 PM (IST)

    विहिरीत काळी पिवळी जिप पडून मोठा अपघात

    जालना ते राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्याजवळ एका विहिरीत काळी पिवळी जिप पडून मोठा अपघात झाला आहे. जीपमध्ये अनेक प्रवाशी होते. खडेश्वर बाबा मंदिर ते वसंत नगर (राजूर जवळील) येथे दुचाकी आणि काळी पिवळी चा अपघात झाला तर चारचाकी वाहन विहिरीत गेले त्यात 15-20 लोकं बसलेली होती.

    अपघातामुळे काही माणसे मरण पावल्याची माहिती आहे. चनेगावचे काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते. जालना येथून काळी पिवळी जालना वरून राजूरकडे जात होते.

  • 18 Jul 2024 05:55 PM (IST)

    इम्तियाज जलील यांचा कोल्हापूर दौरा रद्द

    19 तारखेला इम्तियाज कोल्हापुरात आंदोलन करणार होते. विशाळगड प्रकरणी इम्तियाज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करणार होते. कोल्हापूर पोलिसांच्या मागणीवरून इम्तियाज यांचा कोल्हापूर दौरा रद्द मात्र आगामी काळात जलील कोल्हापूरला जाण्यावर ठाम आहेत. कोल्हापूरला जाण्या संदर्भात जलील लवकर घेणार निर्णय मात्र उद्याचा कोल्हापूर दौरा रद्द आहे.

  • 18 Jul 2024 05:30 PM (IST)

    NEET पेपर लीक प्रकरणा वर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

    शनिवारी दुपारी12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करा, असा एनटीएला आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांची ओळख लपवावी, सर्वोच्च न्यायालयात 22 जुलै रोजी निर्णायक सुनावणी होणार आहे. पुनर्परीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल ,पेपर ब्रीच झाला होता यात शंका नाही, अशी सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे.

  • 18 Jul 2024 05:15 PM (IST)

    वसईत दारूच्या नशेत चालकाने इनोव्हा कार घुसवली घरात

    भराधाव वेगात कारचालकांचे नियंत्रण सुटल्याने त्या कारने दुसऱ्या कारला उडवून, चक्क घरात घुसल्याची घटना उघड झाली आहे. वसई तहसील समोरील सिद्धार्थ नगर येथे MH 14, DR 7145 या इनोव्हा कार चालकाने मध्यरात्री दीड च्या सुमारास हा अपघात केला आहे. प्रतीक दवे असे कार चालकांचे नाव असून, कार सह चालकाला वसई पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • 18 Jul 2024 05:04 PM (IST)

    घरांचे मोठं नुकसान ,सुदैवाने जीवितहानी नाही

    कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. नेतीवली टेकडीवरील धक्कादायक घटना घडली आहे. पावसामुळे टेकडीवरील घरे कोसळली आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टेकडीवरील कोसळलेल्या घरात कुणीही नसल्यान जीवितहानी टळली. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तीन दिवसांपूर्वी नेतीवली टेकडीवर दगड कोसळल्याची घटना घडली होती.

  • 18 Jul 2024 04:41 PM (IST)

    मनोज जरांगे यांचा प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल

    मराठा आरक्षणासाठी आग्रही आणि आक्रमक असलेले मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जरांगेंनी लाड यांना माझ्या नादी लागू नका, असा इशारा दिला आहे. तसेच कोण प्रसाद लाड? असंही जरांगे म्हणालेत.

    “हे कोण आहे बांडगुळ, मनोज जरांगे यांच्या नादी लागू नये, देवेंद्र फडवणीस यांचे तू पाय चाट, त्यांचा थुका चाट, तू माझ्या नादी लागू नको”,असा शब्दात जरांगे यांनी लाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

  • 18 Jul 2024 04:13 PM (IST)

    सोलापुरात जयंत पाटील यांच्या मेळाव्यानंतर जिल्हाध्यक्ष-उपाध्यक्षांमध्ये बाचाबाची

    सोलापुरात जयंत पाटलांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याच्या बॅनरवर उपाध्यक्षाचा फोटो नसल्याने बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मेळावा पार पडल्यानंतर जिल्हाध्यक्ष काका साठे आणि उपाध्यक्ष महेश माने यांच्यात बाचाबाची झाली. जिल्हा उपाध्यक्ष महेश माने यांनी कार्यक्रमाच्या बॅनरवर फोटो नसल्याने उघड नाराजी दाखवली. यावेळेस महेश माने आणि जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यात झाली शाब्दिक चकमक झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची पत्रकार परिषद संपताच सुरु हा सर्व गोंधळ झाला.

  • 18 Jul 2024 03:57 PM (IST)

    बारामतीतील शारदा प्रांगणमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त

    बारामतीतील अहिल्याबाई होळकर जयंतीच्या कार्यक्रमाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज जयंतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद पवार गट शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे शारदा प्रांगणमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

  • 18 Jul 2024 03:45 PM (IST)

    नाशिकचा घोटी टोल नाक्यावर शरद पवार गटाचं आंदोलन

    राष्ट्रवादी शरद पवार गटाने नाशिकचा घोटी टोल नाका बंद पाडला आहे. नाशिक मुंबई महामार्गाची झालेली दुरवस्था या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील वाहने टोल न भरता सोडले आहेत. नाशिकच्या घोटी टोलनाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरु आहे.

  • 18 Jul 2024 03:38 PM (IST)

    मनोरमा खेडकर कोर्टात हजर

    मनोरमा खेडकरला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. खेडकर यांच्यावरील सुनावणीला सुरुवात होणार आहे. पुणे पोलीस मनोरमा खेडकरची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागणार आहे.

  • 18 Jul 2024 01:54 PM (IST)

    बदलापुरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं नाल्यात उतरून आंदोलन

    भिंत बांधताना नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप करीत बदलापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाल्याच्या भिंतीवर मारला हातोडा मारीत आंदोलन केले

  • 18 Jul 2024 01:31 PM (IST)

    निवडणूकांना असल्याने लाडकी बहिण भाऊ योजना, विश्वजित कदम यांची टीका

    लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका आजोबा अशा अनेक योजना येतील,या योजना निवडणुकीसाठी आहेत. हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल अशी टीका माजीमंत्री काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे.

  • 18 Jul 2024 01:07 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार लवकर करणार महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात

    राष्ट्रवादीकडून दौऱ्याच्या आखणीला सुरुवात. अजित पवार मुंबईत 2 दिवस आणि मुंबईबाहेर राज्यात 5 दिवस राहणार. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांचा महाराष्ट्र दौरा

  • 18 Jul 2024 12:55 PM (IST)

    ठाकरे गटाने धरले मनपा आयुक्तांना धारेवर

    मनपा मधे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची दिली यादी. डेंग्यूसाठी आयुक्तांना धरलं जबाबदार शहरात फक्त सत्ताधाऱ्यांचे कामं होत असल्याचा आरोप

  • 18 Jul 2024 12:28 PM (IST)

    मनोरमा खेडकर यांची होणार वैद्यकीय तपासणी

    मनोरमा खेडकरला घेऊन पौड पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल वैद्यकीय तपासणीसाठी मनोरमा खेडकर यांना ग्रामीण रुग्णालयात आणला आहे.

  • 18 Jul 2024 12:20 PM (IST)

    वरिष्ठ अधिकारी पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

    पुणे ग्रामीण पोलिसाचे वरिष्ठ अधिकारी पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

  • 18 Jul 2024 12:11 PM (IST)

    मनोज जरांगे यांना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय- आमदार प्रसाद लाड

    मनोज जरांगे यांनी चर्चेला यावे, मराठा समाजासाठी कोणी काय केले यावर चर्चा करू, असे आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे.

  • 18 Jul 2024 12:03 PM (IST)

    मनोरमा खेडकर यांना अटक

    मनोरमा खेडकर यांनी रायगडमधीस एका हॉटेलमधून अटक करण्यात आलीये.

  • 18 Jul 2024 11:55 AM (IST)

    Marathi News: वाहतूक पोलिसांनी घेतली पाचशे रुपयाची लाच

    छत्रपती संभाजी नगरात वाहतूक पोलिसांनी घेतली पाचशे रुपयाची लाच घेतली. फोन पे वरून चक्क 500 रुपयांची लाच घेतली. लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या सेवन हिल परिसरात घटना घडली.

  • 18 Jul 2024 11:41 AM (IST)

    Marathi News: वाघनखावरून सरकारवर जयंत पाटील यांची टीका

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छत्रपती शिवारायांच्या वाघनखांवरून सरकारवर टीका केली आहे. सरकारने आणलेली वाघनखं ही भाड्याने आणली. ती वाघनखं मिळवलेली नाहीत. तात्पुरत्या स्वरूपात आणलेली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

  • 18 Jul 2024 11:27 AM (IST)

    Marathi News: एसीबीकडून दिलीप खेडकर यांची चौकशी

    अहमदनगर एसीबीकडून दिलीप खेडकर यांची ओपन चौकशी सुरु केली आहे. बेहिशोबी मालमत्ता संदर्भात चौकशी सुरु आहे. २०१५ पासून दिलीप खेडकर यांची नगर एसीबीकडे चौकशी सुरू आहे. आता परत पूजा खेडकर प्रकरणानंतर चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

  • 18 Jul 2024 11:09 AM (IST)

    Marathi News: विशाळगड तणाव, ठाकरे गट आक्रमक

    विशाळगडावरील तणाव प्रकरणावरून कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या विरोधात ठाकरे गटाचा मोर्चा निघाला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे शिष्ट मंडळ पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची भेट घेणार आहेत.

  • 18 Jul 2024 10:59 AM (IST)

    बिबट्याच्या दहशतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील चार मोठ्या शाळा बंद

    बिबट्याच्या दहशतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील चार मोठ्या शाळा बंद आहेत. जैन इंटरनॅशनल, गुरुकुल ऑलिम्पिक, पोतदार इंटरनॅशनल आणि इतर शाळा बंद आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात बिबट्याचा वावर सुरू झाल्यामुळे शाळा बंद आहेत. तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असून त्याला पकडण्यात अजूनही यश मिळालं नाही.

  • 18 Jul 2024 10:50 AM (IST)

    प्रवीण दरेकर यांनी मागचे विषय सर्व सोडून चर्चेला यावं- जरांगे पाटील

    जालना- प्रवीण दरेकर यांनी मागचे विषय सर्व सोडून अंतरवाली सराटीमध्ये चर्चेला यावं, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. “जुने सर्व विषय सोडून चर्चा करू. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही ही आमची जबाबदारी असेल. दरेकर यांनी शंभूराज देसाईंसोबत चर्चेला यावं,” असं ते म्हणाले.

  • 18 Jul 2024 10:40 AM (IST)

    छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार- संजय राऊत

    “छगन भुजबळ हे खूप मोठे कलाकार आहेत, त्यांनी चित्रपटात देखील काम केलंय. खूप वेळा आपलं रंग रूप बदलून एक नाट्य निर्माण करण्यात छगन भुजबळ माहीर आहेत. छगन भुजबळ हे शरद पवारांकडे का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहीत आहे. पण शरद पवार हे सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रतिष्ठा आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

  • 18 Jul 2024 10:30 AM (IST)

    मुंबईच्या वरळी सी-लिंकवरून उडी घेऊन व्यावसायिकाची आत्महत्या

    मुंबईच्या वरळी सी-लिंकवरून उडी घेऊन व्यावसायिकाने आत्महत्या केली. भावेश सेठ असं त्या व्यावसायिकाचं नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने मुलाला व्हिडीओ कॉल केला होता. आर्थिक चणचणीतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

  • 18 Jul 2024 10:20 AM (IST)

    मुंबईतील समुद्राला भरती

    मुंबईत पावसाचा जोर कायम असून समुद्रात 3.87 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. आज रात्री साडेनऊ वाजताही भरतीचा इशारा देण्यात आला आहे.

  • 18 Jul 2024 10:10 AM (IST)

    शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल

    शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. आज सातारा जिल्हयाचा ते आढावा घेणार आहेत. वाई विधानसभेची आज बैठक असून वाईचे आमदार मकरंद पाटील हे अजित पवार गटात गेले आहेत. त्यांच्या मतदारसंघात पवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.

  • 18 Jul 2024 09:49 AM (IST)

    Maharashtra News : पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक

    पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक. पौड पोलिसांनी रायगडमधून केली अटक. मुळशी येथील शेतकऱ्याला धमकावल्या प्रकरणी कारवाई.

  • 18 Jul 2024 09:43 AM (IST)

    Maharashtra News : 1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीच घर चालणार कसं? – संजय राऊत

    1500 रुपयांमध्ये लाडक्या बहिणीच घर चालणार कसं? निवडणुका आल्यावर बहिण, भाऊ आठवले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. विधानसभेला महाविकास आघाडी 280 जागा जिंकणार असा संजय राऊत यांचा दावा आहे.

  • 18 Jul 2024 09:29 AM (IST)

    Maharashtra News : नाशिकमध्ये तीन दिवस मध्यम पावसाचा अंदाज

    गुजरात ते केरळ किनारपट्टीलगत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रत मध्यम पावसाचा अंदाज. नागपूर वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे पावसाचा अंदाज. बुधवारपासून तीन दिवस वर्तवण्यात आला पावसाचा अंदाज.

  • 18 Jul 2024 09:15 AM (IST)

    Maharashtra News : लांजा अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली

    रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील अंजणारी येथील प्रसिद्ध दत्त मंदिर पाण्याखाली. काजळी नदी पात्रा बाहेर आल्यामुळे दत्त मंदिराच्या परिसरात पाणी. रात्रीपासूनच लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस. दत्त मंदिर परिसरात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी.

  • 18 Jul 2024 09:14 AM (IST)

    Maharashtra News : अजित पवार गट विदर्भात किती जागा लढणार?

    अजित पवार गट विदर्भात 15 ते 20 जागा लढणार. अनिल देशमुख यांच्या विरोधात उमेदवार देणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते धर्मराव अत्राम यांची माहिती

  • 18 Jul 2024 08:53 AM (IST)

    अजित पवार विशाळगडावर पाहणीसाठी जाणार

    विशाळगडावरील दगडफेक प्रकरणानंतर अजित पवार पाहणीसाठी जाणार आहेत. शाहू महाराज आणि सतेज पाटील गडावर गेले होते. त्यानंतर आता अजित पवार हे गडावर जाऊन परिसराची पाहणी करणार आहेत.

  • 18 Jul 2024 08:40 AM (IST)

    मुंबईत आज यलो अलर्ट, मध्यम ते हलक्या सरी कोसळल्याची शक्यता

    मुंबईत काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून आज पहाटेपासूनच पावसाने जोर धरला आहे. मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आला असून मध्यम ते हलक्या सरी कोसळल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    भारतीय हवामान विभागाच्या (आईएमडी) माहितीनुसार मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

    तर कोकणात, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. पुढील २० तारखेपर्यंत कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

  • 18 Jul 2024 08:29 AM (IST)

    नाशिक मध्ये हुल्लड बजांचा हैदोस सुरूच, दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी

    नाशिक मध्ये हुल्लड बजांचा हैदोस सुरूच असून काल पहीने वॉटरफॉलवर दोन गटात फ्रीस्टाइल हाणामारी झाली. मोहरम आणि आषाढी एकादशीची सुट्टी असल्याने वॉटरफॉलर गर्दी झाली होती. त्यावेळी  त्र्यंबकेश्वर पहिले परिसरात घडलेल्या फ्रीस्टाइल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • 18 Jul 2024 08:24 AM (IST)

    रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत लोकल उशिराने

    रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईत लोकल उशिराने धावत आहेत.

    मध्य रेल्वेवरील लोकल १० ते १५ मिनिटं उशिरा तर पश्चिम रेल्वे ५ ते १० मिनिटांनी उशिरा आणि तर हार्बर मार्गावरील लोकल सेवा  ५ ते १० मिनिटे उशिराने सुरू आहे.

  • 18 Jul 2024 08:11 AM (IST)

    बिहार – नीट परीक्षेतील पेपर घोटाळ्याप्रकरणी तीन डॉक्टरांना अटक

    नीट परीक्षेतील पेपर घोटाळ्याप्रकरणी तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयकडून कारवाई करण्यात आली असून डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. तिन्ही डॉक्टर पाटण्यामधील एम्स रुग्णालयात कार्यरत आहेत.

  • 18 Jul 2024 08:08 AM (IST)

    मुंबईत मुसळधार पाऊस, दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात साचलं पाणी

    मुंबईत काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे दादर रेल्वे स्थानक परिसर , राजगृह परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. साचलेल्या पाण्यातून विद्यार्थी आणि मुंबईकरांना मार्ग काढावा लागत आहे.

Published On - Jul 18,2024 8:07 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.