Maharashtra Breaking News LIVE 29 August 2024 : शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो : मुख्यमंत्री

| Updated on: Sep 04, 2024 | 7:03 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 29 ऑगस्ट जुलै 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 29 August 2024 : शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो : मुख्यमंत्री

बदलापूरमधील शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. एसआयटीने दोन पीडित मुलींचा जबाब नोंदवून दोन वेगवेगळे गुन्हे बनवले.कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर अटक केली जाण्याची शक्यता. दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जळगावच्या पाचोऱ्यातील जखमी गोविंदाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. राज्य सरकारने दुधाला पाच रुपये दिलेले अनुदान अद्यापही न मिळाल्यामुळे जनहित शेतकरी संघटना आक्रमक. वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार. जा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर निर्णय होईल. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 29 Aug 2024 08:48 PM (IST)

    महेश मांजरेकर, शरद केळकर, सुभोध भावे, चिन्मय मांडलेकर गप्प का? सचिन खरात यांचा सवाल

    महाराष्ट्र राज्यामध्ये मालवण येथे राजकोट किल्ल्यावर रायतेचे राजे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जनतेमध्ये संतापाची लाट निर्माण झालेली आहे, महाराष्ट्र राज्यातील जनता यावरून सोशल मीडियातुन व्यक्त होताना दिसत आहे. पण ज्या कलाकारांनी मालिकामध्ये आणि चित्रपटांमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आणि या कलाकारांनी वेळोवेळी मोठ्या स्टेजवरून सांगितले शिवाजी महाराजांचा अभिमान आहे मग महेश मांजरेकर, शरद केळकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर गप्प का? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी केला.

  • 29 Aug 2024 07:47 PM (IST)

    कल्याण गुन्हे शाखेचे पथक जयदीप आपटे यांच्या घरी दाखल

    कल्याण गुन्हे शाखेचे पथक जयदीप आपटे यांच्या घरी दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचे पथकही आपटेच्या कल्याणच्या घरी दाखल झाले आहेत. याप्रकरणी आज सकाळपासून जयदीप आपटे यांची पत्नी आणि त्यांच्या नातेवाईकांची शहापूरमध्ये चौकशी सुरू होती. सायंकाळी चौकशी संपल्यानंतर जयदीप आपटे यांची पत्नी आणि आई घरी परतल्यानंतर आता घरात पोलिसांनी चौकशी सुरू आहे. त्यामुळे जयदीप आपटे याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे.

  • 29 Aug 2024 06:45 PM (IST)

    वाशिममध्ये चाकूने वार करत जीवघेणा हल्ला, तरुणाचा मृत्यू

    वाशिम शहर पोलीस स्टेशन मागे भर दिवसा एकावर 8 ते 10 जणांचा चाकूने वार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राहुल वाघ वय 29 या तरुणाचा मृत्यू झालाय. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस स्टेशन मागे घटना घडल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

  • 29 Aug 2024 06:30 PM (IST)

    पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी खुशखबर

    पुणे विमानतळावर आणखी 16 चेक इन काऊंटर्स जुन्या टर्मिनलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणेकरांची चेक इन प्रक्रिया अधिक जलद गतीने व्हावी या दृष्टीकोनातून निर्णय घेतला गेला. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम वेगाने होणार आहे. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती दिली.

  • 29 Aug 2024 06:15 PM (IST)

    नागपूरमध्ये शिवप्रेमींचे महाराज आम्हाला माफ करा म्हणत आंदोलन सुरू

    मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला याविरोधात नागपूरच्या महाल परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केलं जातं आहे. महाराज आम्हाला माफ करा म्हणत शिवप्रेमींचे आंदोलन सुरू आहे.

  • 29 Aug 2024 05:52 PM (IST)

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. राष्ट्रपती भवन आणि गृहमंत्रालयाकडेही तक्रार करण्यात आली आहे. बंगाल पेटला तर आसाम आणि दिल्लीही जळतील, असे ममता म्हणाल्या होत्या.

  • 29 Aug 2024 05:37 PM (IST)

    दिल्ली: नगरसेवक राम चंद्रा यांनी ‘आप’मध्ये पुन्हा प्रवेश केला

    आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत नगरसेवक राम चंद्र यांनी आम आदमी पक्षात पुन्हा प्रवेश केला. रामचंद्र आणि अन्य चार आप नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. आम आदमी पक्षात परत येताना रामचंद्र म्हणाले की भाजपमध्ये प्रवेश करणे ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आणि ते आयुष्यभर आम आदमी पक्षातच राहतील.

  • 29 Aug 2024 05:25 PM (IST)

    छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये चकमक, तीन महिला नक्षलवादी ठार

    छत्तीसगडमधील नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. डीआरजी-एसटीएफ आणि बीएसएफने संयुक्तपणे ही कारवाई केली होती.

  • 29 Aug 2024 05:10 PM (IST)

    राहुल गांधींनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून विशाल सिंह यांच्या अटकेची केली मागणी

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. रायबरेलीच्या पिछवारिया गावातील अर्जुन पासीच्या हत्येबाबत राहुल गांधी यांनी एक पत्र लिहिले आहे. 11 ऑगस्ट रोजी अर्जुन पासी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अर्जुन पासीचा मुख्य मारेकरी विशाल सिंह याच्या अटकेसाठी राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिले आहे.

  • 29 Aug 2024 05:03 PM (IST)

    विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायाचां पुतळा पडल्याप्रकरणी मी माफी मागतो, असं म्हटलं आहे. तसेच शिवरायांच्या चरणावर डोकं ठेवून माफी मागेन, एकदा नाही 100 वेळा माफी मागेन, असं शिंदे म्हणाले. तसेच विरोधकांनी या प्रकरणाचं राजकारण करु नये, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

  • 29 Aug 2024 04:23 PM (IST)

    अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काढले बदलीची आदेश

    सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची बदली करण्यात आली आहे. मनीषा आव्हाळे यांची पुणे येथील स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली गेली आहे. कुलदीप जंगम हे सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्विकारणार आहेत.

  • 29 Aug 2024 02:58 PM (IST)

    Marathi News: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई

    पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले….सविस्तर वाचा…

  • 29 Aug 2024 02:41 PM (IST)

    Marathi News: पुणे ससून रुग्णालयातील एमआरआय मशिन बंद

    पुणे येथील ससून रुग्णालयातील एमआरआय मशीन गेल्या २० दिवसांपासून बंद आहे. यामुळे प्रदेश काँग्रेसच्या युवक सरचिटणीसांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मशीन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 29 Aug 2024 02:27 PM (IST)

    Marathi News: फडणवीस यांचा काटा काढणार- मनोज जरांगे

    भाजप नेते देवेंद्र फडवणीस हे डेंजर व्यक्ती आहे. त्यांना हलक्यात घेऊ नका. ते मोठ्या जाती संपवायला निघाला आहेत. त्यामुळे आता सर्व लोक त्यांचा काटा काढणार आहेत, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

  • 29 Aug 2024 02:07 PM (IST)

    Marathi News: वैभव खेडेकर राजकोट किल्ल्यावर

    मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर राजकोट किल्ल्यावर पोहचले आहे. कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणची त्यांनी पाहणी केली. यावेळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील मनसेचे पदाधिकारी सोबत होते.

  • 29 Aug 2024 01:51 PM (IST)

    ससून रुग्णालयातील MR मशिन बंद

    गेल्या २० दिवसापासून मशिन बंद असल्याची माहिती. प्रदेश काँग्रेसच्या युवक सरचिटणीसानी दिल निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.मशीन लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी

  • 29 Aug 2024 01:34 PM (IST)

    सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप

    नितेश राणे यांनीच जयदीप आपटेला कंट्रॅक्ट देण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून नितेश राणे हे त्याच्या स्टुडिओत जात होते, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

  • 29 Aug 2024 01:17 PM (IST)

    कडक कारवाई करणार- अजित पवार

    शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना घडली.कोणी म्हणतो नेव्हीने कामं केले, कोणी म्हणतो पीडब्ल्यूडीने कामं केले.  पण चूक ती चूक आहे, त्यात कोणीही दोषी असो त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करणार, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

  • 29 Aug 2024 01:06 PM (IST)

    शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडाचा म्हणून 5 रुपये अनुदान दिले- अजित पवार

    बारावी पास झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना 6 हजार, डिप्लोमावाल्याना 8 हजार आणि डिग्री वाल्याना 10 हजार प्रतिमाह मानधन देणार,उपमुख्यमंत्री अजित पवार

  • 29 Aug 2024 01:00 PM (IST)

    राणेंची भाषा योग्य नव्हती- सुनील तटकरे

    नुकताच सुनील तटकरे यांनी मोठे भाष्य केले आहे. सुनील तटकरे हे म्हणाले की, राणेंची भाषा योग्य नव्हती.

  • 29 Aug 2024 12:57 PM (IST)

    बीड- अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

    बीड- स्वाभिमान संघटनेकडून अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीडमध्ये अजित पवारांचा तरुणांकडून निषेध करण्यात आला. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान ही घटना घडली. ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या बँकेवर कारवाई करा, अशी मागणी संघटनेनं केली आहे. यावेळी स्वाभिमान संघटनेच्या सचिन उबाळेंना पोलिसांनी अटक केली.

  • 29 Aug 2024 12:48 PM (IST)

    नाशिक- आंदोलनादरम्यान पोलीस आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की

    नाशिक- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने मनसेकडून नाशिकमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान मनसेनं रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलीस आणि मनसैनिकांमध्ये धक्काबुक्की झाली. मनसेकडून होणारा रास्ता रोको पोलिसांनी थांबवला.

  • 29 Aug 2024 12:40 PM (IST)

    नवी दिल्ली- ब्रीजभूषण सिंहाला कोणताही दिलासा नाही

    नवी दिल्ली- ब्रीजभूषण सिंहाला कोणताही दिलासा नाही. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेला FIR आणि आरोपपत्र रद्द करण्यासाठी ब्रिजभूषण उच्च न्यायालयात गेला होता. महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणी आरोपी ब्रिजभूषण शरण सिंह याने दाखल केलेला एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करण्याच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून सध्या कोणताही दिलासा मिळालेला नाही. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या याचिकेच्या योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या न्यायालयात येण्यास झालेल्या विलंबावर दिल्ली उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. उच्च न्यायालयाने सांगितले की, “हे संपूर्ण प्रकरण गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सुरू झाले, खटलाही सुरू झाला आणि आरोपही निश्चित झाले. तुम्ही आता कोर्टात आला आहात?”

  • 29 Aug 2024 12:30 PM (IST)

    नाशिक- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मूक आंदोलन

    नाशिक- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मूक आंदोलन करण्यात येतंय. मालवणमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मूक निदर्शने करण्यात येत आहेत. अजित पवार गटाचे कार्यकर्ते खाली मांडी घालून मूक आंदोलन करत आहेत.

  • 29 Aug 2024 12:19 PM (IST)

    मालवण पुतळा दुर्घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक, पुण्यात आंदोलन

    मालवण पुतळा दुर्घटनेनंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. “राणेंनी त्यांचे संस्कार, इतिहास दाखवला. राणेंनी पोलिसांनाही दमदाटी केली. त्यांच्याकडून गुंडगिरीची भाषा वापरली गेली”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

  • 29 Aug 2024 12:11 PM (IST)

    जयदीप आपटेप्रकरणी ठाणे आणि कल्याण क्राईम ब्रँचची टीम ॲक्शन मोडवर

    जयदीप आपटेप्रकरणी ठाणे आणि कल्याण क्राईम ब्रँचची टीम ॲक्शन मोडवर आली आहे. तीन ते चार वेगवेगळ्या टीम बनवून क्राईम ब्रँचने जयदीपचा शोध सुरू केला. कल्याणमधील क्राइम ब्रांच टीम शहापूरमधील जयदीपच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन जयदीपच्या पत्नीचा शोध काढत पत्नीचा जवाब नोंदवाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सध्या क्राईम ब्रँचची टीम ॲक्शन मोडवर येत जयदीपच्या नातेवाईकांच्या घराचा शोध घेत जयदीपचा शोध सुरू केला आहे.

  • 29 Aug 2024 11:57 AM (IST)

    चेतन पाटील याच्या शोधासाठी मालवण पोलीस तळ ठोकून

    चेतन पाटील याच्या शोधासाठी मालवण पोलीस तळ ठोकून. कोल्हापूर पोलीस व मालवण पोलीस चेतन पाटील याचा शोध घेत आहेत. चेतन पाटील याचं घर अजूनही बंदच. राजकोट मालवण किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसवण्याचे, चबुतऱ्याचे काम चेतन पाटील यांनी केले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून चेतन पाटील कोल्हापुरातून फरार.

  • 29 Aug 2024 11:53 AM (IST)

    पूजा खेडकरला किती तारखेपर्यंत अटकेपासून दिलासा?

    पूजा खेडकर जामीन प्रकरण. 5 सप्टेंबर पर्यंत अटकेपासून दिलासा. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय

  • 29 Aug 2024 11:30 AM (IST)

    जळगावातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी उघड

    श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्थ विमानतळ परिसर तसेच ज्या ठिकाणी बैठका होणार आहेत, त्या हॉटेलच्या बाहेर लावलेल्या बॅनरवरून जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांचा फोटोच नाहीच. शिवसेना शिंदे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी तसेच कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर वर जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांचा फोटो वगळला.

  • 29 Aug 2024 11:15 AM (IST)

    रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज विराट मोर्चा

    रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ वैजापूर शहरात आज विराट मोर्चा. मोर्चाला हजारो रामगिरी महाराजांचे समर्थक उपस्थित. महाराणा प्रताप चौकातून तहसील कार्यालयावर निघणार मोर्चा. हिंदुंवरील अत्याचार आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा.

  • 29 Aug 2024 10:55 AM (IST)

    Maharashtra News: सांगलीत पोतराजासह 2 जणांना चोर समजून अज्ञातांकडून मारहाण

    सांगलीत पोतराजासह 2 जणांना चोर समजून अज्ञातांकडून मारहाण… अज्ञात सहा जणांविरुद्ध मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल…

  • 29 Aug 2024 10:47 AM (IST)

    Maharashtra News: उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसमान यात्रा आज बीडमध्ये

    उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसमान यात्रा आज बीडमध्ये…. अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड शहरात गुलाबी रंगाचे झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आले… अजित पवारांच्या उपस्थितीत बीडमध्ये होणार बाईक रॅली… त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर अजित पवार लाडक्या बहिणींशी साधणार संवाद… बीडमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष…

  • 29 Aug 2024 10:30 AM (IST)

    Maharashtra News: राजकोट किल्ल्यावर काल घातलेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी केले गुन्हे दाखल

    राजकोट किल्ल्यावर काल घातलेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी केले गुन्हे दाखल… राडा करणाऱ्या दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्हे दाखल… 42 जणांसह शेकडो अज्ञातांवर देखील गुन्हे दाखल… ठाकरे आणि राणे गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल…

  • 29 Aug 2024 10:20 AM (IST)

    Maharashtra News: सरपंचांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत

    गावातील प्रमुख नागरीक मानले जाणाऱ्या सरपंचांसाठी राज्य सरकार आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत… सरपंचांचं मानधन वाढण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून सरपंचांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत… या मागण्यांमध्ये सर्वात प्रमुख मागणी ही सरपंच्यांच्या मानधन वाढीची आहे. सरकार पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरपंच सदस्यांच्या मानधन वाढीवर निर्णय घेईल, अशी माहिती

  • 29 Aug 2024 10:05 AM (IST)

    Maharashtra News: शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार – संजय राऊत

    शिवरायांचा पुतळा उभारताना मोठा भ्रष्टाचार… पुतळा उभारताना या लोकांनी पैसे खाल्लेत… कुणी किती पैसे खाल्ले समोर येईल… पुतळा उभारताना शिंदे, फडणवीस यांनी शेकडो कोटींचा भ्रष्टाचार केला… राष्ट्रभक्तीचा मुद्दा येतो तिथे हे लोक भ्रष्टाचार करतात… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 29 Aug 2024 09:57 AM (IST)

    राजकोट किल्ला राडा प्रकरणी गुन्हा दाखल

    राजकोट किल्ल्यावर काल घातलेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. राडा करणाऱ्या दोन्ही बाजूच्या 42 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 42 जणांसह शेकडो अज्ञातांवर देखील गुन्हे दाखल झाला आहे. ठाकरे आणि राणे गटातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. कलम 121 (2), 189 (2), 191(2), 190 118 (2), 223, 3, 37 (1) 37 (3) नुसार गुन्हे दाखल झालेत.

  • 29 Aug 2024 09:45 AM (IST)

    जीव धोक्यात घालून नदीतून करावा लागतोय प्रवास

    जळगावच्या अमळनेर तालुक्यातील सात्री येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदीतून प्रवास करावा लागतोय. सात्री गावाला नदीवर पुलही नाही आणि रस्ताही नसल्याने गावकऱ्यांना अनेक वर्षांपासून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. आजारी नागरिक , शालेय विद्यार्थी , तथा इतर कामासाठी लोकांना आता पुराच्या जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. पुराच्या पाण्यामुळे विद्यार्थी परीक्षेला जावू नसल्याची माहिती समोर आली आहे. गावकऱ्यांनी पर्यायी रस्त्याच्या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे,

  • 29 Aug 2024 09:30 AM (IST)

    जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी- सुरक्षा दलामध्ये चकमक

    जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात पहाटेपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरु आहे. कुपवाडा जिल्ह्यातही भारतीय सैन्य दलाची दोन महत्त्वाची ऑपरेशन्स सुरु आहेत. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं आहे. राजौरी आणि कुपवाडा या दोन्ही जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ सर्च ऑपरेशन सुरू आहे.

  • 29 Aug 2024 09:15 AM (IST)

    जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम

    पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. निमगाव सावा इथं शंकर काटे या शेतकय्राच्या घरासमोर दोन बिबटे फिरतानाचा व्हिडीओ CCTV कँमेय्रात चित्रीत झालाय. त्यामुळे बिबट्याच्या वाढत्या भीतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं आहे. या बिबट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान वन विभागापुढे असणार आहे.

  • 29 Aug 2024 08:48 AM (IST)

    रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाला मान्यता

    क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने बुधवारी मंजुरी दिली.

    राज्य सरकारने जाहीर केलेल्या परिपत्रकात शिवाजी पार्कच्या गेट 5 जवळ 1.8 मीटर क्यूब स्ट्रक्चर उभारण्याची योजना आहे.

    या स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी बी. व्ही. कामत मेमोरियल क्रिकेट क्लबकडे देण्यात आली आहे.  आणि त्यासाठी सरकारकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही

  • 29 Aug 2024 08:39 AM (IST)

    विधानसभा निवडणूकीसाठी महापालिकेच्या 2000 शिक्षकांना पाठवणार, शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण

    विधानसभा निवडणूकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतील तब्बल 2000 शिक्षक पाठवण्यात येणार आहेत. निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जुलै महिन्यात घेतला होता. मात्र आता पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करीत 2000 शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावर पाठवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 29 Aug 2024 08:34 AM (IST)

    दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोघांमध्ये हाणामारी

    सोलापुरात दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. होटगी रोड येथील सहारा नगर ते विमानतळ रस्त्यावर ही घटना घडली आहे.  मालवाहू ट्रकने दुचाकीस्वारास कट मारल्यामुळे वाद झाला आणि त्या बाचाबाचीचे तुंबळ मारहाणीत रूपांतर झाल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तो वाद मिटला

  • 29 Aug 2024 08:24 AM (IST)

    दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी

    जळगावच्या पाचोरा येथील गोविंदाची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दहीहंडी फोडत असताना गोविंदा पथकातील नितीन चौधरी हा युवक खाली पडून गंभीर जखमी झाला होता. डोक्याला मार लागल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

  • 29 Aug 2024 08:22 AM (IST)

    बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण, आरोपीविरोधात दुसरा गुन्हा दाखल

    बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता. कोर्टाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळाल्यानंतर अटक केली जाण्याची शक्यता. एसआयटीने दोन पीडित मुलींचा जबाब नोंदवून दोन वेगवेगळे गुन्हे बनवले.  हायकोर्टाने सूचना दिल्यानंतर दुसऱ्या पीडितेचा जबाब नोंदवून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Published On - Aug 29,2024 8:20 AM

Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.