Maharashtra Breaking News LIVE : 2014 ते 2019 च्या काळात आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार, आरोग्यमंत्र्यांचा आरोप

| Updated on: Sep 15, 2024 | 9:07 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 14 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : 2014 ते 2019 च्या काळात आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार, आरोग्यमंत्र्यांचा आरोप
Maharashtra Live News

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. अशातच बऱ्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. कोण किती जागा लढवणार? कोणत्या जागेवर कोण उमेदवार असणार? याबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. तसंच सध्या गणेशोत्सव सुरु आहे. बाप्पाची मनोभावे पूजा केली जात आहे. याबाबतचे अपडेट्स आज दिवसभर तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. आमच्या वेबसाईटवर वाचू शकता. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Sep 2024 03:52 PM (IST)

    बासमती तांदळावरील किमान निर्यात शुल्क हटवले: कृषिमंत्री

    कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, शेतकरी हितासाठी संवेदनशील असलेल्या मोदी सरकारने बासमती तांदळावरील किमान निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यात शुल्क हटवल्याने बासमती उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळेल आणि बासमती तांदळाची मागणी वाढल्याने निर्यातही वाढेल.

  • 14 Sep 2024 03:37 PM (IST)

    ‘पोर्ट ब्लेअरचे नाव बदलल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार’

    पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजय पुरम करण्याबाबत मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या डावात भाषणात सांगितले होते की, ते गुलामगिरीच्या सर्व खुणा संपवू. त्या दिशेने हे एक पाऊल आहे आणि मी तुमचे आभारी आहे.”

  • 14 Sep 2024 03:25 PM (IST)

    हरियाणा: अंडरपासमध्ये एसयूव्ही बुडली, 2 जणांचा मृत्यू

    हरियाणातील फरिदाबादमध्ये रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथील पाण्याने भरलेल्या अंडरपासमध्ये महिंद्रा XUV700 ही गाडी बुडाली. यामुळे एचडीएफसीचे बँक व्यवस्थापक आणि रोखपाल यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून कारमधून एक मृतदेह बाहेर काढला, तर दुसरा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

  • 14 Sep 2024 03:16 PM (IST)

    सीतापूर : कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली

    उत्तर प्रदेशातील सीतापूर येथील मिठाच्या कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

  • 14 Sep 2024 02:57 PM (IST)

    कोल्हापुरात पोलीस ऍक्शन मोडवर

    कोल्हापुर शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या चार महिलांसह मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मिरवणुकीत अश्लील नृत्य करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.

  • 14 Sep 2024 02:42 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात जमावबंदीचे आदेश

    आगामी काळातील सण, उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९७१ चे कलम ३७(१)(३) अन्वये जमाव बंदी व शस्त्र बंदीचे आदेश छत्रपती संभाजीनगरात अपर जिल्हादंडाधिकारी विनोद खिरोळकर यांनी जारी केले आहेत.

  • 14 Sep 2024 02:28 PM (IST)

    जळगावात 113 विद्यार्थ्यांना विषबाधा

    जळगावच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयांच्या तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. या घटनेतील 100 विद्यार्थी उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी हलवण्यात आला आहे.

  • 14 Sep 2024 02:05 PM (IST)

    आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार

    2014 ते 2019 च्या काळात आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला , असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला. शिवसेनेचेच माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचे नाव न घेता त्यांनी हा आरोप केला. 2022 नंतर आमच्या काळात आम्ही भ्रष्टाचारमुक्त भरती केली, असे ते म्हणाले.

  • 14 Sep 2024 01:50 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांच्या पैठण दौऱ्यावरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात

    उद्धव ठाकरे यांच्या पैठण दौऱ्यावरून आरोप प्रत्यारोपाला सुरुवात, ठाकरे यांच्या पैठण दौऱ्याला भारतीय जनता पार्टीने विरोध दर्शवला आहे.  कारखान्याच्या उदघाटनांना परवानगीच नसल्याचा भाजपचा दावा आहे. भाजपचे तुषार सिसोदे यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केला. कारखान्याच्या उद्घाटनांची शहानिशा करून उद्धव ठाकरेंनी यावं, असं आव्हान तुषार सिसोदे यांनी दिलं आहे.

  • 14 Sep 2024 01:40 PM (IST)

    जेपी नड्डा यांच्या सोबत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सोबत भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू. त्यापूर्वी नड्डा यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जाऊनही गणरायाला वंदन केलं.

  • 14 Sep 2024 01:27 PM (IST)

    आनंद दिघेंनी पैसे उधळणाऱ्या हंटरने फोडून काढलं असतं – संजय राऊत

    आनंद दिघे असते तर पैसा उधळणाऱ्यांना फोडून काढल असतं.  बारमध्ये पैसे उधळतात तसेच पैसे गुरूच्या खुर्चीसमोर उधळले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 14 Sep 2024 01:21 PM (IST)

    एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू – गिरीश महाजन

    एकनाथ खडसे यांचा दिवाळीनंतर भाजप पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू,  दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू, असे गिरीश महजान म्हणाले.

    देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशा बाबत सांगत आहे तर मग कोणाचा विरोध राहील ? थोडे जास्तीचे फटाके आम्ही घेऊन ठेवू.

  • 14 Sep 2024 12:55 PM (IST)

    Maharashtra Live News : धनगर समाजाचे पंढरपुरात आमरण उपोषण, शेकाप नेत्यांचा पाठिंबा

    पंढरपूर – धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी धनगर समाजाचे पंढरपुरात सुरू आहे आमरण उपोषण

    शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी उपोषण स्थळी दिली भेट

    उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची केली विचारपूस

    देवेंद्र फडणवीस पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं म्हणत 14 वर्षापासून समाजाची फसवणूक करत आहेत

    तसेच योजना समाजासाठी काढून समाजाची या सरकारने फसवणूक केली असल्याचे वक्तव्य शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी केले

    पंढरपुरात सुरू असलेल्या उपोषणाला शेकाप नेते बाबासाहेब देशमुख यांनी पाठिंबा दिला

  • 14 Sep 2024 12:53 PM (IST)

    Maharashtra Live News : विदर्भातील काँग्रेस नेत्यांमधील वाद दिल्ली दरबारी, नेत्यांचा बोलण्यास नकार

    विदर्भातील काँग्रेस नेत्यांमधील वाद दिल्ली दरबारी

    विदर्भातील काँग्रेसच्या दोन नेत्यांचा वाद दिल्ली दरबारी

    चंद्रपूर मधील खासदार प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या दरम्यान सुरू झालेला वाद

    विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली

    बैठकीला विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल, राज्य प्रभारी रमेश चेनिथळला उपस्थित होते

    वादा बाबत बोलण्यास नेत्यांचा मात्र नकार

  • 14 Sep 2024 12:52 PM (IST)

    Maharashtra Live News : आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदेंच्या भेटीला

    – मराठा आरक्षणाबाबत विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दृष्टीने हालचालींना वेग

    – बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

    – आमदार राऊत हे स्वतः आंदोलनात असल्याने त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार

    – आमदार राजेंद्र राऊत यांचे शिष्टमंडळ 200 गाड्यांचा ताफा घेऊन घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

    – तर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेणार आमदार राजेंद्र राऊत यांची भेट

    – संध्याकाळी 5 वाजता बार्शी येथील आंदोलनस्थळी घेणार भेट

    – मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांचे ठिय्या आंदोलन सुरूय

    – आमदार राजेंद्र राऊत यांची मागणी सरकार मान्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष.

  • 14 Sep 2024 12:45 PM (IST)

    Maharashtra Live News – पुण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन

    पुणे -एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा राहुल गांधी यांच्या विरोधात निषेध आंदोलन

    राहुल गांधी यांनी आरक्षण बंद करण्याबाबतच्या संविधान विरोधी वक्तव्य विरोधात आंदोलन

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोर शिंदे शिवसेनेचे आंदोलन

  • 14 Sep 2024 12:43 PM (IST)

    Maharashtra Live News : संजय राऊत खासदार राजाभाऊ वाजेंच्या भेटीला

    नाशिक – संजय राऊत खासदार राजाभाऊ वाजे यांच्या भेटीला – राजाभाऊ वाजे यांना मातृशोक झाल्यानंतर राऊत वाजे यांच्या भेटीला – मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित

  • 14 Sep 2024 12:02 PM (IST)

    विधानसभेसाठी मविआचा जागा वाटपाचा फॉर्म्युला

    काँग्रेस 100 ते 105 जागा लढण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर शरद पवार गट 85 ते 90 जागा लढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासाठी काँगेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू आहे.

  • 14 Sep 2024 11:50 AM (IST)

    धनगर समाजाचं उपोषण, सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार भेट

    धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा सहावा दिवस असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेतली आहे. चंद्रकांत पाटील, अतुल सावे आणि शंभूराजे देसाई यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी रवाना झाले आहेत. मुंबई रेसकोर्सवरून हेलिकॉप्टरचा प्रवास करत मंत्री शंभूराजे देसाई आणि प्रकाश अण्णा शेंडगे या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी निघाले आहेत.

  • 14 Sep 2024 11:40 AM (IST)

    धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला धक्का

    धाराशिवमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कळंब तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परंडा इथं ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. धाराशिव विधानसभा मतदारसंघात शिवाजी कापसे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

  • 14 Sep 2024 11:30 AM (IST)

    अमरावती- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात?

    अमरावती- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पदाधिकाऱ्यांच्या आग्रहास्तव नवीन चेहरा म्हणून सलील देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे.

    वरुड मोर्शी मतदारसंघ काटोल मतदारसंघाला लागून असल्याने सलील देशमुख यांना फायदा होण्याची शक्यता आहे. सलील देशमुख उभे राहिल्यास राष्ट्रवादी समर्थक विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात सलील देशमुख सामना होण्याची शक्यता आहे.

  • 14 Sep 2024 11:20 AM (IST)

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी

    लासलगाव (नाशिक): कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कांदा निर्यातीवरील 550 डॉलर निर्यातमूल्य रद्द  झाल्यानंतर कांदा निर्यात शुल्क निम्म्यावर आलं आहे. कांदा निर्यात शुल्क 40 टक्केवरून 20 टक्क्यांवर आला आहे.

    केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी एकाच दिवसात दोन मोठे निर्णयामुळे लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात चारशे रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याला जास्तीतजास्त 4800 रुपये , कमीतकमी 2500 रुपये तर सरासरी 4400 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला आहे.

  • 14 Sep 2024 11:10 AM (IST)

    चेंबूरमध्ये 13 वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाकडून लैंगिक अत्याचार

    चेंबूरमध्ये 13 वर्षीय मुलीवर रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केला. पडक्या इमारतीत नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रिक्षा चालकाचा शोध सुरू आहे.

  • 14 Sep 2024 10:59 AM (IST)

    धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

    सोयाबीनची 90 दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

  • 14 Sep 2024 10:51 AM (IST)

    रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच

    भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरीत लावलेल्या बॅनरची चर्चा सुरू आहे. विघ्नहर्ता चे स्वागत, आनंदाचे आगमन रत्नागिरीत परिवर्तन होणार अशा आशयाचा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार उदय सामंत आहेत. भाजपकडून रत्नागिरी आणि गुहागर विधानसभा मतदारसंघावरती दावा करण्यात येत आहे. अशावेळी भाजपकडून रत्नागिरीत होणार परिवर्तन असे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

  • 14 Sep 2024 10:42 AM (IST)

    अखेर वंदे भारत ट्रेन कोल्हापुरात दाखल

    पुणे कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची आज ट्रायल रन होत आहे. थोड्याच वेळात ट्रायल रनसाठी वंदे भारत कोल्हापुरातून सुटणार आहे. कोल्हापूर ते पुणे दरम्यान आज विना प्रवासी वंदे भारत ट्रेन धावणार आहे. वंदे भारत ट्रेनची प्रवाशांना देखील उत्सुकता आहे. रेल्वे स्थानकावरील प्रवासी वंदे भारत ट्रेन पाहण्यासाठी रेल्वे बोगीत दाखल झाले आहेत.

  • 14 Sep 2024 10:30 AM (IST)

    पुण्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत तरसाची दहशत

    चाकणच्या वाढत्या औद्योगीकरणामुळे परिसरातील जंगलातील पशु खाद्यासाठी मानवी वस्तीकडे येत आहेत.कंपनीत बिबट्या अनेकदा शिरल्याने रेस्क्यू करण्यात आले परंतु आता चक्क तरस कंपनीत शिरल्याने मोठी धावपळ उडाली.वन विभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने तरसाचे रेस्क्यू करण्यात आले.

  • 14 Sep 2024 10:20 AM (IST)

    अजितदादा परांड्यात येतील का?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या परांडा विधानसभा मतदारसंघात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीबाबतच्या विधानानंतर अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 14 Sep 2024 10:10 AM (IST)

    ३ मंत्र्यांचे शिष्टमंडळ देणार उपोषणस्थळी भेट

    धनगर आरक्षणबाबत मुख्यमंत्र्यांकडून दखल, ३ मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज ऊपोषणकर्त्यांची भेट घेणार.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते पांडूरंग मिरगळ, यशवंत गायके यांच्याशी फोनवर चर्चा केली. प्रकृतीची विचारपूस केली. कॅबिनेट मंत्री अतूल सावे, चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यासोबत आजी माजी धनगर समाजाचे नेते ऊपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत. प्रकाश अण्णा शेंडगे ही मंत्र्यांसोबत असतील.

  • 14 Sep 2024 10:00 AM (IST)

    सहकारी बँक घोटाळ्यात चौघांना अटक

    यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक अपहार प्रकरणात एसआयटी कडून चार जणांना अटक करण्यात आली आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, विलास महाजन, नवलकिशोर मालानी, ऍड वसंत मोहर्लीकर या चार जणांना अटक करण्यात आली आहे. महिन्याभरानंतर एसआयटी कडून कारवाई करण्यात आली.

  • 14 Sep 2024 09:54 AM (IST)

    धनगर आरक्षण मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

    धनगर आरक्षणबाबत मुख्यमंत्र्यांकडून दखल. मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज उपोषणकर्त्यांची घेणार भेट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्ते पांडूरंग मिरगळ, यशवंत गायके यांच्याशी फोनवर केली चर्चा. प्रकृतीची केली विचारपूस. कॅबिनेट मंत्री अतूल सावे, चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांच्यासोबत आजी माजी धनगर समाजाचे नेते उपोषणकर्त्यांची घेणार भेट.

  • 14 Sep 2024 09:50 AM (IST)

    कांदा, सोयाबीन खरेदीच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

    कांदा, सोयाबीनबाबत निर्णय घेतल्याने केंद्र सरकारचे आभार. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार. कांद्यावरील 550 डॉलर निर्यातमुल्य रद्द. केंद्र सरकार 90 दिवस हमी भावाने सोयाबीन खरेदी करणार. कापूस उत्पादकांनाही फायदा मिळणार असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 14 Sep 2024 09:27 AM (IST)

    बाबाजी दाते महिला सहकारी बँक अपहार प्रकरण, चौघांना अटक

    यवतमाळ बाबाजी दाते महिला सहकारी बँक अपहार प्रकरणात एसआयटीकडून चार जणांना अटक. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुजाता महाजन, विलास महाजन, नवलकिशोर मालानी, ऍड वसंत मोहर्लीकर या चार जणांना अटक करण्यात आली आहे. महिन्याभरानंतर एसआयटीकडून कारवाई

  • 14 Sep 2024 09:25 AM (IST)

    जळगावात 113 विद्यार्थ्यांना भंडाऱ्यातून विषबाधा

    जळगावच्या पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील सारंग माध्यमिक विद्यालयांच्या तब्बल 113 विद्यार्थ्यांना विषबाधा. गणपती विसर्जनानिमित्त शाळेतच भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या भंडाऱ्यात शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केले. त्यातून सुमारे 50 ते 60 विद्यार्थी विद्यार्थिनींनी जेवण केल्यानंतर उलट्या, चक्कर, मळमळ होणे, हातपाय गळणे आदी त्रास झाला. रात्री उशिरा विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती. उपचारानंतर 100 विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं आहे.

  • 14 Sep 2024 08:57 AM (IST)

    राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी

    पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 41 जण इच्छुक आहेत. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघामधून एकूण 41 जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये मागील वेळी थोडक्यात विजय हुकलेले खडकवासला मतदारसंघाचे माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पक्षाच्या वतीने या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासंबंधीचे नियोजन लवकरच जाहीर करणार आहेत.

  • 14 Sep 2024 08:55 AM (IST)

    सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू होणार

    सोलापूरकरांना लवकरच खुशखबर मिळणार आहे. सोलापूर विमानतळावरून विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे. सोलापुरातील विमानतळावरून दोन आठवड्यात विमान सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. विमानसेवेतील उर्वरित त्रुटी आठ दिवसात दूर होणार आहेत. सोलापुरातील होटगी रोड येथील विमानतळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. डीजीसीएकडून विमान सेवा सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. डीजीसीएच्या चार सदस्यीय पथकाकडून विमानतळाची पाहणी करण्यात आली आहे. दोन दिवस पथकाकडून सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे. विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांना सोलापुरात आणून विमानसेवा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून चर्चा सुरू आहे.

  • 14 Sep 2024 08:53 AM (IST)

    कोल्हापूरच्या भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीबाबत अपडेट्स

    कोल्हापूरच्या भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कामासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी मुंबईतील दोन कंपन्यांकडून आराखड्याचे सादरीकरण केलं जाणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या समोर सादरीकरण झालं आहे. आणखी काही कंपन्यांकडून देखील आराखडे मागवले जाणार आहेत. तर विमा कंपनीकडून जळालेला मलबा हटवायला परवानगी मिळाली आहे.

  • 14 Sep 2024 08:50 AM (IST)

    नाशिक विमानतळवर काल सर्वाधिक प्रवाशांचा प्रवास

    नाशिक विमानतळ सुरू झाल्यापासून काल सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. ओझर विमानळावरून काल 1228 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. 2015 ला नाशिक विमानतळ सुरू झालं होतं. मात्र काही अडचणी मुळे विमानसेवा बंद पडत होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत विमानसेवा सुरू आहे.  सध्या दिल्ली,हैदराबाद,अहमदाबाद, गोवा,बेंगळुरू सह इतर ठिकाणी नियमित विमानसेवा सुरू आहे.

Published On - Sep 14,2024 8:47 AM

Follow us
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.