Maharashtra Breaking News LIVE : समृध्दी महामार्ग झाला, मात्र अपघात वाढले – नाना पटोले

| Updated on: Sep 16, 2024 | 10:07 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 15 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : समृध्दी महामार्ग झाला, मात्र अपघात वाढले - नाना पटोले
Maharashtra Live News

सध्या गणेशोत्सव सुरु आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. त्याबाबतचे अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. ठाण्यात आनंद आश्रमातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिथे आनंद दिघे यांच्या फोटोसमोर पैशांची उधळण करण्यात आली आहे. यावरून वातावरण तापलं आहे. याबाबतचे अपडेट्स आज दिवसभर तुम्ही टीव्ही 9 मराठीवर पाहू शकता. आमच्या वेबसाईटवर वाचू शकता. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Sep 2024 07:33 PM (IST)

    पुण्यातील गर्दीमुळे मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय

    पुण्यातील गर्दीमुळे मेट्रो प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यात रात्री २ पर्यंत मेट्रो सेवा सुरु राहणार आहे. गणपती पाहण्यासाठी मोठी गर्दी रात्रीच्या वेळी होत आहे. गणेश भक्तांची गैरसोय होवू नये म्हणून मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

  • 15 Sep 2024 03:52 PM (IST)

    मेरठ दुर्घटना: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये

    मेरठमध्ये 3 मजली घर कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देणार आहे. प्रत्येक मृतांना 4 लाख रुपये,  घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार आणि गुरांसाठी भरपाई दिली जाईल.

  • 15 Sep 2024 03:37 PM (IST)

    कलम 370 नंतरही दहशतवाद का?– फारुख अब्दुल्ला

    नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये केंद्रावर हल्ला चढवत म्हटले आहे की, “ते जम्मू-काश्मीरमध्ये 5 वर्षांपासून राज्य करत आहेत, त्यांनी नेहमीच कलम 370 ला दहशतवादासाठी जबाबदार धरले होते, पण आता कलम 370 नाही, तरीही दहशतवाद का आहे? सगळी शस्त्रे कुठून येतात?”

  • 15 Sep 2024 03:25 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत: कैलाश गेहलोत

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याच्या घोषणेनंतर दिल्लीचे मंत्री कैलाश गेहलोत म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी सहमत आहोत. अरविंद केजरीवाल यांनी लोकांचे प्रेम, आदर आणि आशीर्वाद मिळवले आहेत. विधानसभा विसर्जित करण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.”

  • 15 Sep 2024 03:10 PM (IST)

    दिल्लीत बुटांच्या कारखान्यात भीषण आग

    दिल्लीतील लॉरेन्स रोड येथील एका कारखान्यात भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दिवसभरात 12.15 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली.

  • 15 Sep 2024 02:58 PM (IST)

    जळगावात बिबट्याच्या हल्ल्यात 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

    जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरु असून गणेशपुर-पाटणादेवी रस्त्यावर धावणाऱ्या 14 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  • 15 Sep 2024 02:32 PM (IST)

    समृध्दी महामार्ग झाला, मात्र अपघात वाढले – नाना पटोले

    समृध्दी महामार्गावर छोट्या नव्हे तर मोठ्या गाड्यांचे देखील टायर फुटत आहे, रस्त्याच्या दर्जाबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसचे नेते नाना पटाले यांनी केली आहे.

  • 15 Sep 2024 01:51 PM (IST)

    मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

    मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी ९ च्या सुमारास एसटी बसचा अपघात घडला. बसचे स्टेरिंग अचानक फ्री झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि पार्किंग करुन ठेवलेल्या ट्रकवर बस आदळली. या अपघातात २० ते २५ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

  • 15 Sep 2024 01:41 PM (IST)

    फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

    विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमध्ये खडाजंगी उडत आहे. या बॅनरवार मधून देखील आपलाच मुख्यमंत्री राहणार आशा आशयाचे बॅनर लागत आहेत. नांदेड मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले आहेत.

  • 15 Sep 2024 01:36 PM (IST)

    मी सत्तेतून रिटायर होणार नाही : उद्धव ठाकरे

    आपल सरकार आणा मी तुमची जुनी पेंशन योजनेची मागणी पूर्ण करतो, सरकारला घाम फुटणार आणि कदाचित कॅबिनेट घेऊन घोषणा करतील. मला किती पेंशन मिळणार माहित नाही…मी अजून रिटायर नाही, पण मी सत्तेतून रिटायर होणार नाही. माझा महाराष्ट्र म्हणजे तुम्हासारखी हाडा माणसाची आहे. आम्ही कंत्राटी तुम्ही सरकार चालवता. कोविड मध्ये तुम्ही नसता तर महाराष्ट्र टिकला नसता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 15 Sep 2024 01:32 PM (IST)

    फोडाफोडीचे राजकारण तुमच्याही सोबत होईल, उद्धव ठाकरेंचा घणाघात

    Maharashtra News Live :  जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, आपण सर्व कुटुंब आहोत, आमच्या बहिणींना भावांना न्याय द्या असं साईबाबांकडे साकड घातलं. माझा पक्ष चिन्ह आणि वडील पण चोरलेत. मला दिवारचा डायलॉग आठवला? मेरे पास ईमान है …विश्वास है…एकजूट ठेवा…फोडाफोडीचे राजकारण जे आमच्यासोबत झाल ते तुमच्या सोबतही होईल, यांना टेंशन द्या , उपोषणाची हाक दिली पण ते करू नका आधीच उपाशी यांना सत्तेवाचून उपाशी ठेवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले

  • 15 Sep 2024 01:30 PM (IST)

    सोने, चांदीच्या दरात वाढ

    जळगावात गेल्या पाच वर्षांच्या काळात पहिल्यांदाच 48 तासांमध्ये चांदीच्या दरात चार हजार रुपये पेक्षा जास्त तर सोन्याच्या दरात दोन हजार रुपये पेक्षा जास्त वाढ झाली आहे
  • 15 Sep 2024 01:27 PM (IST)

    मनीष सिसोदियाही देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

    “माझ्यासह मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे पद तेव्हाच सांभाळतील, जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत. माझा आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू – अरविंद केजरीवाल

  • 15 Sep 2024 01:24 PM (IST)

    त्यानतंर पुन्हा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर बसणार – अरविंद केजरीवाल

    जर केजरीवाल प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर माझ्या पक्षाला भरघोस मतदान करा. मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन – अरविंद केजरीवाल

  • 15 Sep 2024 01:23 PM (IST)

    अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार

    नवी दिल्ली : मी दोन दिवसांनंतर माझ्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देईन. तोपर्यंत माझ्याऐवजी आप पक्षाचा दुसरा नेता मुख्यमंत्री होईल. येत्या दोन दिवसात विधीमंडळाची पक्षाची एक बैठक होईल. या बैठकीत पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित केले जाईल- अरविंद केजरीवालांकडून मोठी घोषणा

  • 15 Sep 2024 11:55 AM (IST)

    उद्धव ठाकरे शिर्डीत दाखल

    उद्धव ठाकरे शिर्डीत दाखल झाले आहेत. ते संभाजीनगर दौऱ्यावर असून जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील आंदोलनाला भेट देणार आहेत.

  • 15 Sep 2024 11:47 AM (IST)

    पंधराशे रुपयांपेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी- शरद पवार

    “पंधराशे रुपयांपेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी. सत्तेचा उन्माद चढला त्यांना खड्यासारखं बाजूला टाकण्याचं काम करा. नाशिकच्या आसपासच्या परिसरात विकास पण नाशिकमध्ये गेल्यावर वेगळं चित्र दिसतं,” असं शरद पवार म्हणाले.

  • 15 Sep 2024 11:45 AM (IST)

    जळगावात शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षकांचा हृदयविकारानं मृत्यू

    जळगावात शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षकांचा हृदयविकारानं मृत्यू झाला आहे. योजनेच्या कामाच्या तणावामुळे मृत्यू झालाचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. कारवाई करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.

  • 15 Sep 2024 11:30 AM (IST)

    पंतप्रधान मोदींनी टाटानगर-पाटणा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला

    टाटानगर जंक्शन रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान मोदींनी टाटानगर-पाटणा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. टाटानगर इथं ते प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीणच्या (PMAY-G) 20,000 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटपदेखील करणार आहेत.

  • 15 Sep 2024 11:16 AM (IST)

    महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलं गणपतीचं दर्शन

    महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचं स्वागत केलं आणि त्यांना ‘शासन आपल्या दारी’ या पुस्तकाची प्रत भेट दिली.

  • 15 Sep 2024 10:58 AM (IST)

    कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

    कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्क मध्ये बदल केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग आला. श्रीलंका,बांग्लादेश,गल्फ कंट्री, मलेशिया या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली. कांदा निर्यात देखील वेगाने सुरू होण्याची शक्यता, त्यामुळे कांद्याचे दर आणखीन वाढणार आहे. कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  • 15 Sep 2024 10:50 AM (IST)

    पुणे मेट्रोला गणपती पावला

    पुणे मेट्रोतून एका दिवसात तब्बल दोन लाख प्रवाशांची वाहतूक झाली.शनिवारी सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत एक लाख 75 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला. शहरातील मध्यभागी गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी झाली आहे. मेट्रोचे डबे प्रवाशांनी फुल्ल झाले होते तर स्थानकेही गजबुजून गेली होती.

  • 15 Sep 2024 10:40 AM (IST)

    शरद पवार वेळेवर हजर झाल्याने आयोजकांची तारांबळ

    खासदार शरद पवार यांचे शिंदखेडा येथे आगमन झाले. शिंदखेडा येथील शेतकरी मेळाव्याला पुष्पकृष्टी करत स्वागत करण्यात आले. जेसीबी वरून शरद पवारांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शरद पवार वेळेवर कार्यक्रमाला हजर उपस्थित झाल्यामुळे आयोजकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.

  • 15 Sep 2024 10:40 AM (IST)

    संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत

    मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत पोहचले आहेत. उद्यापासून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यापूर्वीच भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आहे.

  • 15 Sep 2024 10:30 AM (IST)

    गडचिरोलीत चोरीच्या घटनेत वाढ

    मूल शहरातील गडचिरोली मार्गावरील टोपाझ बार अँड रेस्टॉरंटचे शटर तोडून २५ हजार रोख रक्कम व तीन बिअर बाटल्या लंपास केल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. गत आठवड्यात तालुक्यातील चिरोली व नांदगाव येथील चोरीच्या घटना घडल्या.

  • 15 Sep 2024 10:20 AM (IST)

    जळगावमध्ये सोने आणि चांदी महागले

    जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने दुसऱ्या दिवशी पण दंगा केला. सोने-चांदीच्या या घौडदौडीमुळे सुवर्णनगरीत खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मोठा झटका बसला. शुक्रवार आणि शनिवारी दोन्ही धातूंनी मोठी भरारी घेतल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले. शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.

  • 15 Sep 2024 10:09 AM (IST)

    नायर रुग्णालयात विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, सहाय्यक प्राध्यापक निलंबित

    कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता मुंबईतील नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे.

  • 15 Sep 2024 10:00 AM (IST)

    संजय राऊत यांनी शिंदे गटावर बोचरी टीका

    कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आली एक तर तुम्ही आनंद आश्रमाचा बेकायदेशीर ताबा घेतला. त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना धाक , दहशत या माध्यमातून तो जो पारशांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा त्यांनी घेतला मुळात .ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे .आनंदी दिघे साहेबांची प्रॉपर्टी आहे. आनंद दिघे साहेब असते तर हे जे लेडीज बार वाले होते आत मध्ये घुसलेले मिंधे सेनेची लोक त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकाने फोडून काढलं असतं टेंभी नाक्यावर, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 15 Sep 2024 09:57 AM (IST)

    झिकाच्या रुग्णसंख्येत वाढ

    पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. आता एकूण रुग्णांची संख्या ही शंभरवर पोहोचली आहे. त्यात रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण अधिक आहे. शहरात आतापर्यंत झिकाच्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांचे वैद्याकीय अहवाल राज्याच्या आरोग्य विभागाला पाठविण्यात आले आहेत. आरोग्य विभागाची मृत्यू परीक्षण समिती या रुग्णांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधणार आहे. त्यानंतर हे मृत्यू कशामुळे झाले हे स्पष्ट होणार आहे.

  • 15 Sep 2024 09:50 AM (IST)

    कंटेनर आणि दुचाकीचा अपघात

    पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि दुचाकीच्यात झालेल्या अपघातात एका अठरा वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील अंगूर वाइनच्या समोर सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सार्थक बाहेती असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • 15 Sep 2024 09:40 AM (IST)

    मुंबईत मुसळधार पाऊस

    मुंबईतील वांद्रे भागात मुसळधार पाऊस होतोय. मुंबई उपनगर वांद्रे अंधेरी बोरिवलीत आज सकाळपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. वांद्र्यातील मातोश्री परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. सध्या कुठेही पाणी साचलेले नाही.

  • 15 Sep 2024 09:30 AM (IST)

    सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ कायम आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात ४,४०० रुपयांनी वाढ झाली. तर सोन्याचे दर 1 हजार रुपयांनी वाढले होते. सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी चांदीमध्ये १६०० रुपयांनी तर सोन्याच्या दरात २०० ची दरवाढ झाली आहे. चांदी ८८ हजार ६०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोने २०० रुपयांनी वधारून ते ७४ हजार १०० रुपये प्रति तोळा झाले आहे.

  • 15 Sep 2024 09:25 AM (IST)

    शरद पवार यांचं शिरपूर विमानतळावर दाखल

    खासदार शरद पवार यांचं शिरपूर विमानतळावर आगमन झालं आहे. राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून स्वागत शरद पवारांचा करण्यात आलं आहे. विधान परिषदेचे भाजपाचे आमदार अमरीश पटेल यांची देखील उपस्थित आहेत. अमरीश पटेल यांनी देखील स्वागत केलं आहे. माजी सभापती अरुण गुजराती यांची उपस्थिती होती.

Published On - Sep 15,2024 9:17 AM

Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.