Maharashtra Breaking News LIVE 22 December 2024 :योगेश कदम यांची खेडमध्ये राजेशाही मिरवणूक

| Updated on: Dec 22, 2024 | 3:02 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 22 डिसेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 22 December 2024 :योगेश कदम यांची खेडमध्ये राजेशाही मिरवणूक
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 22 Dec 2024 03:02 PM (IST)

    मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वांद्रे रेक्लमेंशन येथील रोषणाईचा शुभारंभ

    राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे रेक्लमेंशन येथे सायंकाळी सहा वाजता रोषणाईचा शुभारंभ होणार आहे.

  • 22 Dec 2024 02:43 PM (IST)

    योगेश कदम यांची खेडमध्ये राजेशाही मिरवणूक

    योगेश कदम यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या रत्नागिरीतील आपल्या मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यांची खेड शहरात मिरवणूक निघाली असून त्यात मावळे, घोडे, ऊंटाचा समावेश असल्याने राजेशाही मिरवणूक निघाली आहे.

  • 22 Dec 2024 02:36 PM (IST)

    विरोधकांना केवळ राजकारण करायचंय – आनंद परांजपे

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी फोन केल्याच्या बातमीवर विरोधकांना केवळ बीड-परभणीवर राजकारण करायचं आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद पराजंपे यांनी म्हटले आहे.

  • 22 Dec 2024 02:24 PM (IST)

    शहापुर येथे ज्वेलर्सवर गोळीबारानंतर व्यापाऱ्यांचा बंद

    शहापूर येथे ज्वेलर्सवर गोळीबार झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे.

  • 22 Dec 2024 02:18 PM (IST)

    मंत्री झाल्यानंतर धनंजय मुंडे प्रथमच पत्रकार परिषद घेणार

    वाल्मिक कराड यांच्याबाबत पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे.

  • 22 Dec 2024 01:54 PM (IST)

    एकनाथ शिंदे दरेगावी जाणार

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील निवासस्थानावरून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. ते थोड्याच वेळात राजभवनावरून त्यांच्या दरेगाव गावी जाणार आहे.

  • 22 Dec 2024 01:44 PM (IST)

    मांजामुळे शिक्षक जखमी

    येवला शहरातील शिक्षक अजहर शहा हे आपल्या कामानिमित्त मोटरसायकलवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. यावेळी हा मांजा पकडण्याच्या नादात त्यांचा तोल जाऊन ते मोटरसायकलवरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. उजव्या हाताला तीन टाके देखील पडले आहेत.

  • 22 Dec 2024 01:33 PM (IST)

    राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर

    संसदेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येत आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची पाहणी करणारे दिल्ली येथील अधिकारी परभणीत दाखल झाले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांच्या घरी सुरक्षेची चाचपणी केली जात आहे.

  • 22 Dec 2024 01:24 PM (IST)

    त्या सहा जणांवर अंत्यसंस्कार

    पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर व्होल्व्हो कार व कंटेनर ट्रकचा भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. आज त्याच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होेत.

  • 22 Dec 2024 01:11 PM (IST)

    वर्षभरात ३८ हजार पुणेकरांच्या तक्रारी ६६९ कोटी लुबाडले

    शिक्षणाचे माहेरघर आणि आयटी हब अशी ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मागील वर्षभरात सायबर चोरट्यांनी पुणेकरांचे ६६९ कोटी रुपये लांबवले आहेत. याप्रकरणी तब्बल ३८ हजार पुणेकरांनी तक्रारी दिल्या आहेत.

  • 22 Dec 2024 12:59 PM (IST)

    मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुकीची कोंडी

    मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुलीवर हजारो वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. महामार्ग पोलीस महामार्गावर नसल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

  • 22 Dec 2024 12:55 PM (IST)

    सीना कुंडलिका नदी अतिक्रमण मुक्त करा; अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची रॅली

    जालना शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या सीना आणि कुंडलिका नदीच्या पात्रात मागील अनेक दिवसांपासून अतिक्रमण होत असल्यामुळे आज जालना शहरातील मोतीबाग ते गांधी पुतळ्यापर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने रॅली काढण्यात आली.

  • 22 Dec 2024 12:45 PM (IST)

    नितेश राणे यांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

    हा क्षण मला माझ्या कार्यकर्त्यांमुळे मिळाला स्वतःच्या भविष्याचा विचार न करता आमच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा हा क्षण आहे त्यामुळे यापुढे त्यांचे सर्व हट्ट पुरवीने हे माझं आज पासूनच काम आहे. सर्वांनी मला साथ दिली म्हणून मला मंत्री पद मिळालं. कार्यकर्त्यांना माझ स्वागत ज्या पद्धतीने करायचं आहे ते स्वीकारणार अगदी मला ड्रोन वर बसा असं बोलले असते तरी मी बसलो असतो, असे नितेश राणे म्हणाले.

  • 22 Dec 2024 12:35 PM (IST)

    सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा -प्रकाश शेंडगे

    आम्ही आज ओबीसीच्या सर्व प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. नव्या सरकारकडून आम्हाला अपेक्षा आहेत आमच्या मागण्याचा मसुदा आम्ही तयार करणार आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यावर निर्णय घेणार.महायुती सरकारमध्ये १७ ओबीसी नेते मंत्री झालेत पण चळवळीचा माणूस छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात नाहीत. मंत्रिमंडळात असलेले ओबीसी नेते म्हणजे सारा गाव मामाचा पण एक नाही कामाचा अशी अवस्था आहे असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले.

  • 22 Dec 2024 12:24 PM (IST)

    राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांची बैठक

    मुंबईत ओबीसी समाजाच्या प्रमूख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक होत आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षेतखाली राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे. ओबीसींचे प्रश्न आणि छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने पुढची रणनीती ठरवणार आहेत

  • 22 Dec 2024 12:12 PM (IST)

    विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

    जालन्यात चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचा पेपर अचानक रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याच दिसून आलंय.परीक्षेसाठी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आल्यामुळे आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय समोर काही वेळ ठिय्या आंदोलन केलं आहे.

  • 22 Dec 2024 12:00 PM (IST)

    शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न – दादा भुसे

    गरीबातील गरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या प्रयत्न करू, असे शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले. विद्यार्थी, पालक, संस्था यांना विश्वासात घेऊन काम करू. अनेक गावांनी शाळा साठी चांगले काम केले आहेत. त्यांना विश्वासात घेऊन काम करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • 22 Dec 2024 11:55 AM (IST)

    लग्नसोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद

    लग्नसोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला. आज दादरमध्ये राज ठाकरेंच्या बहिणीच्या मुलाचं लग्न पार पडतंय. या लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरेही उपस्थित आहेत.

  • 22 Dec 2024 11:46 AM (IST)

    कोल्हापूर ते माणगाव 2000 बाईक रॅली काढणार

    कोल्हापूर ते माणगाव 2000 बाईक रॅली काढणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. माणगाव इथं डॉक्टर बाबासाहेब यांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. पुढच्या रविवारी 29 तारखेला सकाळी दसरा चौकातून ही बाईक रॅली काढणार आहेत. माणगाव येथे अमित शहा यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करणार आहेत.

  • 22 Dec 2024 11:36 AM (IST)

    राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आज दोघे भाऊ पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भगिनी जयवंती यांच्या मुलाच्या लग्नसोहळा निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र येणार आहे. या लग्नसोहळ्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आज दोघे भाऊ पुन्हा एकत्र येणार आहेत. दादर येथील राजे शिवाजी महाराज विद्यालय येथे पार पडणाऱ्या या लग्न सोहळ्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

  • 22 Dec 2024 11:24 AM (IST)

    कोल्हापूर बिंदू चौकामध्ये काँग्रेसची निदर्शने

    कोल्हापुरातील बिंदू चौकामध्ये काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. खासदार शाहू महाराज, आमदार सतीश पाटील यांनी निदर्शनं केली. अमित शहा यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी केली.

  • 22 Dec 2024 11:14 AM (IST)

    शरद पवार भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी दाखल

    पुणे- शरद पवार भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी दाखल झाले आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण गावगाड्याचं आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन घडवणारी, ग्रामीण भागातील महिला व्यवसायिकांना चालना देणारी भिमथडी जत्रा पुणेकरांचं आकर्षण ठरत आहे. २० डिसेंबरपासून सुरू झालेली भिमथडी जत्रा २५ डिसेंबरपर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे.

  • 22 Dec 2024 11:08 AM (IST)

    कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नेते के. पी. पाटील यांची पुन्हा कोलांटी उडी?

    कोल्हापुरातील ठाकरे गटाचे नेते के. पी. पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांचा के. पी. पाटील यांच्याकडून घरी येऊन सत्कार करण्यात आला. के. पी. पाटील यांनी ठाकरे गटाकडून राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी के. पी. पाटील यांचा पराभव केला. निवडणुकी आधी महाविकास आघाडीत गेलेले के. पी. पाटील पुन्हा महायुतीकडे येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

  • 22 Dec 2024 10:55 AM (IST)

    छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्याने ओबीसी संघटना आक्रमक, अजित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी

    जालना : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे राज्यभरात ओबीसी संघटना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज जालनाच्या बदनापूर मधील डावरगाव येथे सकल ओबीसी समाज आणि ग्रामस्थांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने केली जात आहेत.

  • 22 Dec 2024 10:48 AM (IST)

    नाशिकमध्ये पुन्हा नागरिकांना बिबट्याचे दर्शन, व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद

    नाशिकमध्ये पुन्हा नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. नाशिकच्या मखमलाबाद शिवार परिसरात वन विकास महामंडळाच्या रोपवाटिकेजवळ नागरिकांना बिबट्या दिसून आला. या बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी नर मादी आणि दोन बछडे असल्याची चर्चा रंगली आहे. बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल कॅमेरात बिबट्याच्या संचाराचा व्हिडिओ कैद केला आहे.

  • 22 Dec 2024 10:40 AM (IST)

    नाशिक शहरावर धुक्याची चादर

    नाशिक : नाशिक शहरावर धुक्याची चादर पसरली आहे. रामकुंड परिसरातील पुरातन मंदिर, जुने वाडे रस्ते धुक्यात हरवले आहे. संपूर्ण नाशिक शहरावर आज धुक्याची चादर पसरली आहे. गुलाबी थंडीसह धुक्याची चादर निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळत आहे. तीर्थस्थान आणि पर्यटनासाठी आलेल्या भाविकांना गुलाबी थंडीसह धुक्यांची चादर भुरळ पाडत आहे.

  • 22 Dec 2024 10:35 AM (IST)

    अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, नागरी सत्कार कार्यक्रमाला राहणार हजर

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी बारामतीकरांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बारामती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. नागरी सत्कार कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार ,आमदार अमोल मिटकरी आणि पार्थ पवार देखील उपस्थितीत असणार आहेत. सायंकाळी सहा वाजता नागरी सत्काराचा कार्यक्रम असून उपमुख्यमंत्री अजित पवार सत्काराच्या कार्यक्रमानिमित्त नागरिकांना संबोधित करणार आहेत.

  • 22 Dec 2024 10:34 AM (IST)

    राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुणे विमानतळावर स्वागत

    पुणे : राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे पुणे विमानतळावर स्वागत करण्यात आले. काल रात्री उशिरा राज्यमंत्री माधुरी मिसाळ पुण्यात दाखल झाल्या. माधुरी मिसाळ यांचे कार्यकर्ते आणि कुटुंबियांकडून स्वागत करण्यात आले. पुण्यातील पर्वती मतदारसंघातून सलग चौथ्यांदा आमदार झाल्यानंतर माधुरी मिसाळ यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर माधुरी मिसाळ पहिल्यांदाच पुण्यात दाखल झाल्या.

  • 22 Dec 2024 10:16 AM (IST)

    मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये परतणाऱ्या मंत्र्यांचे बॅनर

    नाशिक : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये परतणाऱ्या मंत्र्‍यांचे बॅनर लागले आहेत. नाशिकमध्ये दादा भुसे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ यांचे बॅनर लागले आहेत. अनेक समर्थक आणि कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आमदार आणि नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे मतदारसंघाकडे परतणार आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी परतणाऱ्या मंत्र्यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक शहरात देखील मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

  • 22 Dec 2024 10:10 AM (IST)

    पुण्यातील येरवड्यामध्ये गुटख्याचा टेम्पो पोलिसांकडून जप्त

    पुणे : पुण्यातील येरवड्यामध्ये गुटख्याचा टेम्पो पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. गुटखा विक्रीवर बंदी असताना बेकायदा गुटखा वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. पोलिसांनी टेम्पोतून आठ लाख ५८ हजारांचा गुटखा, तसेच टेम्पो असा एकूण १८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली आहे. सौरभ उर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (२४, रा. थोरवे शाळेसमोर, कात्रज), संग्राम बाळकृष्ण निंबाळकर (२६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यामध्ये गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि वापरास बंदी घालण्यात आली आहे. गुटखाबंदी असताना शहरातील पानपट्टयांवर गुटखा विक्री होत आहे.

Maharashtra Political News LIVE : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. आता काल रात्री उशिरा या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले. महायुतीच्या खातेवाटपात देवेंद्र फडणवीसांनी स्वत:कडे गृह, ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), विधी आणि न्याय, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क विभाग आणि इतर मंत्र्यांना नेमून न दिलेली उर्वरित खाती ठेवली आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास आणि गृहनिर्माण या दोन महत्त्वाच्या खात्यांसह सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) हे महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ आणि नियोजनसह राज्य उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे. आता सध्या महायुतीत पालकमंत्रिपदावरुन रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळ हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहेत. त्यांनी आज ओबीसी नेत्यांची आज महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. यांसह अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.

Published On - Dec 22,2024 10:05 AM

Follow us
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.