Maharashtra Breaking News LIVE 13 January 2025 : बीड: हत्येच्या एक महिना आधी संतोष देशमुखना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी

| Updated on: Jan 13, 2025 | 11:35 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 13 January 2025 : बीड: हत्येच्या एक महिना आधी संतोष देशमुखना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 13 Jan 2025 11:20 AM (IST)

    बीड: हत्येच्या एक महिना आधी संतोष देशमुखना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी

    बीड: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक महिना आधी त्यांना वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेकडून धमकी देण्यात आली होती. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संतोष देशमुख होते अस्वस्थ असा जबाबा पत्नी अश्विनी देशमुख यांनी cid कडे दिला आहे. देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यात धमकी मिळाली होती.

  • 13 Jan 2025 11:15 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार भाजप महायुतीच्या आमदारांशी संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत.  15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असून नौसेनेच्या दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

    लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार तसेच आमदारांसोबत स्नेहभोजन देखील करणार आहेत.  मोदी महायुतीच्या आमदारांना काय कानमंत्र देणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

  • 13 Jan 2025 11:08 AM (IST)

    मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आजपासून औषधपुरवठा बंद

    मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांत आजपासून औषधपुरवठा बंद,  थकबाकी न मिळाल्याने वितरकांनी निर्णय घेतला आहे.

    पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची १२० कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत असून त्यामुळेच सर्व पुरवठादारांचा सोमवारपासून औषधपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    ४८ पुरवठादारांकडे १०० कोटी रुपयांची थकबाकी आणि २० कोटी रुपयांची नियमित थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. औषधपुरवठा बंद झाल्यास रुग्णांना बाहेरून चढ्या दराने औषधे खरेदी करावी लागतील.

  • 13 Jan 2025 10:50 AM (IST)

    राज्यातील पालकमंत्र्यांची यादी तयार, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला

    राज्यातील पालकमंत्र्यांची यादी तयार असून पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची माहिती समोर येत आहे. येत्या दोन दिवसांत यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. संवेदनशील जिल्ह्याबाबत राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यादी तयार आहे. काल रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 13 Jan 2025 10:40 AM (IST)

    मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलावली

    नाशिक- मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि आरटीओ विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आरटीओ विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिकच्या उड्डाण पुलावर रात्री झालेल्या अपघात प्रकरणी ही तातडीची बैठक आहे. या अपघातात वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि कारवाई करण्यासंदर्भात गिरीश महाजन पोलीस आणि आरटीओ विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

  • 13 Jan 2025 10:30 AM (IST)

    नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पानिपतमध्ये

    नवी दिल्ली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पानिपतमध्ये दाखल होणार आहेत. पानिपतमध्ये उद्या मराठा शौर्य दिन असून पानिपत शौर्य स्मारक समितीमार्फत उद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. फडणवीस यांच्यासह माजी मंत्री रावसाहेब दानवेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पानिपत मधील काला आम स्मारकाजवळ उद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी 14 जानेवारीला पानिपतमध्ये शौर्य दिन साजरा होतो.

  • 13 Jan 2025 10:20 AM (IST)

    कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार रुपयांची मोठी घसरण

    लासलगाव (नाशिक)- कांद्याच्या बाजारभावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे सरासरी बाजार भाव तेराशे रुपयांपर्यंत कोसळले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे. लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले आहेत. कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द करा, कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या, अशा मागण्या कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

  • 13 Jan 2025 10:10 AM (IST)

    मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी

    मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली असून हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा आहेत. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका

  • 13 Jan 2025 10:01 AM (IST)

    Maharashtra News: भ्रष्टाचाराला मोदी – शहांनी खतपाणी घातलं – संजय राऊत

    भ्रष्टाचाराला मोदी – शहांनी खतपाणी घातलं… गद्दारांना सोबत घेऊन सरकार बनवलं… इंडिया आघाडी टिकायला हवी, काँग्रेसनं जबाबदारी घ्यायला हवी… पालिका स्वबळावर लढणार… लोकसभेत पुन्हा एकत्र येणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 13 Jan 2025 09:56 AM (IST)

    Maharashtra News: मकरसंक्रांती निमित्त विठ्ठल मंदिरात स्वच्छतेला सुरुवात…

    नवीन वर्षातील पहिला सण असल्याने विठ्ठल मंदिरात विठ्ठल सभागृह,रुक्मिणी सभागृह तसेच मंदिराच्या इतर भागांची केली जात आहे स्वच्छता…. मकर संक्रांती निमित्त राज्यभरातून लाखो महिला भाविक येत असतात वाण वसा करण्यासाठी… पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे विठ्ठल मंदिराची स्वच्छता…

  • 13 Jan 2025 09:23 AM (IST)

    Maharashtra News: मुंबईत थंडीचा कडाका वाढला, प्रदूषातही मोठी वाढ

    मुंबईत थंडीचा कडाका वाढला असून प्रदूषातही मोठी वाढ झाली आहे… शिवडी परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून मुंबईत होणाऱ्या विकासकामांमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे…

  • 13 Jan 2025 09:16 AM (IST)

    Maharashtra News: ठाणे पालिकेवर आज धडकणार दिव्यांगांचं आंदोलन

    ठाणे पालिकेवर आज धडकणार दिव्यांगांचं आंदोलन… बच्चू कडूंच्या नेतृत्त्वाखाली दिव्यांगांचं आंदोलन…

  • 13 Jan 2025 09:05 AM (IST)

    Maharashtra News: पालघरमध्ये 500 रुपये बनवणारी बनावट नोटांचा कारखाना

    पालघर मध्ये 500 रुपये बनवणारी बनावट नोटांचा कारखाना भायखळा पोलिसांनी केला पर्दाफाश… वाडा तालुक्यातील नेहाल पाडा येथे शेतात पत्र्याचा शेड बांधून सात महिन्यापासून सुरू होता बनावट नोटांचा कारखाना… निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बनावट नोटांची वितरण केल्याची तपासात प्राथमिक माहिती… भायखळा पोलिसांची पालघरच्या वाडा तालुक्यातील बनावट नोटांच्या कारखान्यावर मोठी कारवाई… बनावट नोटा छापण्याचे प्रिंटर, सहित अनेक साहित्य पोलिसांनी केलं जप्त… चार आरोपींना पोलिसांनी केली अटक, मोहरक्या फरार…

  • 13 Jan 2025 09:00 AM (IST)

    नवी मुंबईत आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराची निर्मिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन

    आशियातील दुसऱ्या सर्वात मोठ्या मंदिराचे नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे, अजित पवार हजेरी लावणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १५ जानेवारीला आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. नवी मुंबईतील खारघरमध्ये गेल्या १२ वर्षांपासून निर्माणाधीन असलेले इस्कॉन मंदिर अखेर पूर्णपणे तयार झाले आहे. भगवान कृष्णाला समर्पित या भव्य मंदिराचे नाव ‘श्री श्री राधा मदन मोहन जी मंदिर’ असे आहे. ९ एकरात पसरलेले हे आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे. मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित राहणार आहेत.

  • 13 Jan 2025 08:34 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार

    मनोज जरांगे पाटील आज संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत. आज देशमुख कुटुंबीयांनी टावर चढून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यातच जरांगे पाटील देशमुख कुटुंबाची भेट घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

  • 13 Jan 2025 08:32 AM (IST)

    मस्साजोगच्या ग्रामस्थांचे आज मोबाईल टॉवर चढून आंदोलन

    बीड – आज मस्साजोगचे ग्रामस्थ करणार मोबाईल टॉवर चढून आंदोलन करणार आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपीला मकोका लावण्यात यावा व हत्या प्रकरणात त्याचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सहभागी होणारआहेत. सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे.

  • 13 Jan 2025 08:30 AM (IST)

    पुण्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार; वडगावात ६१ गॅस टाक्या जप्त

    पुणे : घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्याची अवैधरित्या सुरू असलेली विक्री सिंहगड रस्ता पोलिसाच्या पथकाने उघडकीस आणली. गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एकाला अटक करून त्याच्याकडून टेम्पोसह ६१ गॅसच्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. विकास आकळे (३१, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आकळे याच्यावर दोन महिन्यांपूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. पोलिस गस्तीवर होते. त्यादरम्यान वडगाव बुद्रूक भागात एकाने सिलिंडरचा साठा केला असून त्याची चोरून विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला

  • 13 Jan 2025 08:28 AM (IST)

    सारथी मार्फत तरुणांना ड्रायव्हिंग प्रशिक्षण, मराठा-कुणबी समाजातील तरुणांना फायदा

    पुणे : सारथीमार्फत सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण’ कार्यक्रमांतर्गत १ हजार ५०० विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिली. महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील तरुणांना याचा लाभ होणार आहे.

  • 13 Jan 2025 08:27 AM (IST)

    आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ, पहिलं शाही स्नान आज पार पडणार

    आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस हा महाकुंभ मेळावा प्रयागराजमध्ये सुरु असणार आहे. या मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र आक्रमक झाला आहे. संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींना फाशी द्या, अशी आक्रमक मागणी केली जात आहे. त्यासोतच वाल्मिक कराडला मोक्का लावा, या मागणीसाठी आज मस्साजोगमध्ये आंदोलन केले जाणार आहे. आज 13 जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे. तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभ 2025 चा शुभारंभ होत आहे. पुढील 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यांसह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा

Published On - Jan 13,2025 8:12 AM

Follow us
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.