Maharashtra Breaking News LIVE 6 January 2025 : धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला

| Updated on: Jan 06, 2025 | 3:58 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 6 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 6 January 2025 : धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला
महत्वाची बातमीImage Credit source: tv9

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Jan 2025 03:58 PM (IST)

    धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या भेटीला

    सरपंच संतोष देशमुख प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणाच्या पटलावर आहे. बीडचं राजकारण यामुळे ढवळून निघालं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे धनंजय मुंडे रडारवर आहे. त्यांच्या राजीनाम्याचा जोर वाढत आहे. असं असातना त्यांनी अजित पवारांनी भेट घेतल्याने काहीतरी मोठं घडत असल्याची चर्चा आहे.

  • 06 Jan 2025 03:53 PM (IST)

    बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4590 पानांचे आरोपपत्र दाखल

    बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4590 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात अनमोल बिश्नोईच्या नावाचा समावेश आहे.

  • 06 Jan 2025 03:46 PM (IST)

    छत्तीसगडच्या विजापूरमध्ये IED स्फोट, 7 जवान शहीद

    छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये IED स्फोट झाला आहे. या स्फोटात 7 जवान शहीद झाले असून 8 जवान गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला लक्ष्य करून हा स्फोट करण्यात आला आहे.

  • 06 Jan 2025 03:17 PM (IST)

    विष्णू चाटे, प्रतीक घुलेसह दोन आरोपींना कोर्टात केलं हजर

    विष्णू चाटे, प्रतीक घुलेसह दोन आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. एसआयटीने आरोपींची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागितली आहे. या गुन्ह्यात मोक्का लावता येतो का? याचा अभ्यास सुरु असल्याचं डीव्हायएसपी गुजर यांनी सांगितलं. दुसरीकडे, तपास अधिकाऱ्यांकडे कोठडी मागण्याची वेगळी कारणं नाहीत, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.

  • 06 Jan 2025 03:08 PM (IST)

    धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा- धस

    धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं सुरेश धस यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. अजितदादांवर नकळत माझ्याकडून टीका झाली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. निलेश घायवाळ याचे अनेकासोबत फोटो आहेत. त्यामुळे त्याचा आणि माझा काही प्रश्न येतच नाही.

  • 06 Jan 2025 02:33 PM (IST)

    धाराशिवमध्ये शेताला विहिरीचे पाणी देण्यावरून भांडण, तिघांचा मृत्यू एक गंभीर जखमी

    धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील बावी शिवारात आदिवासी समाजातील दोन गटांमध्ये झालेल्या भांडणात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण गंभीर आहे, विहिरीचे पाणी शेतातील पिकांना देण्याच्या कारणावरून हे भांडण झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा हे भांडण झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतले आहे.

  • 06 Jan 2025 02:05 PM (IST)

    बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल

    बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आरोपपत्र दाखल केलं आहे. एकूण 4 हजार 590 पानांचं हे आरोपपत्र आहे.

  • 06 Jan 2025 01:59 PM (IST)

    एकाच नंबरच्या दोन कार

    मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या दोन खाजगी कार आल्या. पोलिसांनी बनावट नंबरप्लेट असलेल्या कारला पोलीस ठाण्यात आणले आहे.

  • 06 Jan 2025 01:51 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

    मनोज जरांगे पाटील यांचे आक्षेपार्ह विधान विरोधात राज्यभरात ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. शिरूर कासार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, बजरंग सोनावणे, अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • 06 Jan 2025 01:34 PM (IST)

    देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न-नितेश राणे

    वक्फ बोर्ड कायदा आपल्या देशात आहे, तो आपल्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमच्या जवळ असलेली माहिती आम्ही लोकांसमोर आणली. हा फार मोठा धोका आहे. सुदैवाने देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

  • 06 Jan 2025 01:28 PM (IST)

    जरांगे ठोकशाहीची भाषा बोलताय- छगन भुजबळ

    जरांगे ज्या पद्धतीने बोलत आहे, ते बरोबर नाही. ही लोकशाही आहे. ठोकशाही नाही. दोषी असतील तर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची गरज नाही. मनोज जरांगे यांचं चार पाच वेळा उपोषण सोडवायला मुंडे गेले होते. ते दोघे एकमेकांना ओळखतात. ते पाहून घेतील काय करायचे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

  • 06 Jan 2025 01:20 PM (IST)

    दोन गटाच्या भंडणात तिघांचा मृत्यू

    धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातील बावी शिवारात आदिवासी समाजातील दोन गटातील भांडणात तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर आहे . शेतीतील पाण्याच्या वादातून हे भांडण झाल्याची माहिती आहे.

  • 06 Jan 2025 11:59 AM (IST)

    नवी दिल्ली- एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार

    नवी दिल्ली- एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात अर्थसंकल्प मांडला जाणार असून त्यापूर्वी आज अर्थखात्याची महत्त्वपूर्ण बैठक पार पडतेय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थ मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे.

  • 06 Jan 2025 11:49 AM (IST)

    धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावं- आव्हाड

    “याआधी बीडमध्ये झालेले सर्व प्रकार उघड व्हायला हवेत. मारणाऱ्यांचं उदात्तीकरण झाल्यास महाराष्ट्राचं वाटोळं होईल. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा आणि वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावं,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.

  • 06 Jan 2025 11:41 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात दोन गटात हाणामारी

    धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत दोन जणांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. वाशी तालुक्याीतल बावी पिडीमधील ही घटना आहे.

  • 06 Jan 2025 11:32 AM (IST)

    उद्धव ठाकरे हे टाचणी इतकीही मोदींशी बरोबरी करू शकत नाहीत- बावनकुळे

    “आम्ही जनसेवक आहोत. मतदारांसमोर नतमस्तक होऊन कारभार करायला हवा. पालकमंत्रीपदाचा काहीच तिढा नाही. आज चर्चा पूर्ण होईल. उद्धव ठाकरे हे टाचणी इतकीही मोदींशी बरोबरी करू शकत नाहीत”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

  • 06 Jan 2025 11:25 AM (IST)

    ऑल इंडिया सिव्हील सर्व्हीसच्या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंसोबत अन्याय?

    नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत होत असलेल्या ऑल इंडिया सिव्हील सर्व्हीसच्या सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंसोबत अन्याय होत असल्याचा खेळाडूंनी दावा केला. राजधानी दिल्लीत सर्व राज्यातील सिव्हील सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांच्या बास्केट बॉल, कबड्डी आणि बॅडमिंटनचे सामने होत आहेत. या खेळात आयोजक असलेल्या सेंट्रल सिक्रेटीयट दिल्ली यांच्याकडून खेळाचे नियम डावलले जात असल्याचा आरोप महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केला आहे.

    महाराष्ट्रातील खेळाडूंच्या मते लॉटस पद्धत चुकीच्या पद्धतीने पाडल्या आहेत. तसंच जे खेळाडू सरकारचे कर्मचारी नाहीत. ज्यांच्याकडे सरकारी आयकार्ड नाही, त्यांना देखील खेळात सहभागी करून घेतले जात आहे, असा आरोप केला आहे.

  • 06 Jan 2025 11:14 AM (IST)

    मतदारांना असं संबोधणं चुकीचं, संजय गायकवाडांच्या वक्तव्यावर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया

    “मतदारराजाच्या जीवावर आपण सत्तेवर येतो. मतदारांना अस संबोधणं चुकीचं आहे. ते नेमकं काय बोलले याचा संदर्भ घेणं गरजेचं आहे. याबाबत पक्षनेते त्यांच्याशी चर्चा करतील,” आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार नरेश मस्के यांनी हे वक्तव्य केलंय.

  • 06 Jan 2025 11:00 AM (IST)

    शिक्रापूर – चाकण मार्गावर पिंपळे जगताप येथे भीषण अपघात

    शिक्रापूर – चाकण मार्गावर पिंपळे जगताप येथे भीषण अपघात झाला असून दुचाकीवरून चाललेल्या वडिलांसह दोन चिमुकल्यांना ट्रकने चिरडले आहे. गणेश खेडकर असे मृत वडिलांचे नाव असून तन्मय आणि शिवम अशी या अपघातात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची स्थानिक नागरिकांनी माहिती दिली.

  • 06 Jan 2025 10:50 AM (IST)

    भारतात ह्यूमन मेटन्यूमोचा पहिला रुग्ण आढळला

    भारतात ह्यूमन मेटन्यूमोचा पहिला रुग्ण आढळला. बंगळुरुत एका आठ महिन्याच्या बाळामध्ये HMPV व्हायरस आढळला आहे. चीनमधून हा खतरनाक व्हायरस भारतात पोहोचला आहे.

  • 06 Jan 2025 10:41 AM (IST)

    वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? – संभाजी राजेंचा सवाल

    “धनंजय मुंडेंना प्रश्न एवढाच आहे की, आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल. त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत. धनंजय मुंडेंच वटमुखत्यार पत्र वाल्मिक कराडकडे. हे वटमुखत्यार पत्र कोणाला देतात? विश्वासू असतो त्यालाच देतोना” असं संभाजी राजे म्हणाले.

  • 06 Jan 2025 10:38 AM (IST)

    …तर न्याय मिळेल – संभाजीराजे

    “एसआयटीच्या एका पीएसआयचा वाल्मिक कराडसोबत फोटो आहे. मग चौकशी कशी होणार? चांगले आयपीएस अधिकारी द्या, तर न्याय मिळेल, निष्पक्ष चौकशी होईल” असं संभाजी राजे म्हणाले.

  • 06 Jan 2025 10:36 AM (IST)

    मग, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे नाव का घ्यायच? – संभाजीराजे

    “पंकजा मुंडे बोलल्या पाहिजेत. हा जातीचा विषय नाही. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. पंकजा मुंडे बोलल्या आहेत. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही. मग, आज गप्प का? बोलायला पाहिजे. हा एकट्याचा विषय नाही. महाराष्ट्राचा विषय आहे. अशाच पद्धतीने चालेल मग महाराष्ट्रात. महाराष्ट्राला हे परवडणार आहे का?. मग, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे नाव का घ्यायच?” असा सवाल संभाजी राजे यांनी विचारला.

  • 06 Jan 2025 10:33 AM (IST)

    सगळ्याचा बॉस धनंजय मुंडे त्याने राजीनामा दिला पाहिजे – संभाजी राजे

    “या सगळ्यांचा मास्टरमाईंड धनंजय मुंडे सगळ्याचा बॉस धनंजय मुंडे त्याने राजीनामा दिला पाहिजे. आधी अंतुले, मग आबा आर.आर.पाटील, अशोक चव्हाण आणि मनोज जोशी यांनी लोकांचा आक्रोश पाहून राजीनामे दिले आहेत. मग हे सरकार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देतय? अजितदादा का संरक्षण देतायत? आम्ही हे राज्यपाल महोदयांसमोर मांडणार आहोत” असं सभाजीराजे म्हणाले.

  • 06 Jan 2025 10:31 AM (IST)

    जे गुन्हे लावलेत, त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात – संभाजी राजे

    “जे गुन्हे लावलेत, त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात. मुख्यमंत्री महोदय विधानसभेच्या पटलावर वाल्मिक कराड आणि या सगळ्यांना कनेक्टेड करुन बोलले आहेत. वाल्मिक कराडला सुद्धा खंडणीच्या आरोपात आत घेतलय. या केसशी कनेक्टेड असल्यामुळे त्या पद्धतीने गुन्हे नोंदवावेत म्हणून आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत” असं संभाजीराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

  • 06 Jan 2025 10:19 AM (IST)

    धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे – संभाजी राजे

    बीड हत्या प्रकरण हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागमी संभाजी राजे यांनी केली.

  • 06 Jan 2025 09:43 AM (IST)

    संतोष देशमुख हत्याप्रकरणातील SIT च्या टीममधून तिघांना काढलं

    संतोष देशमुख हत्याप्रकरणातील SIT च्या टीममधून तिघांना काढण्यात आलं आहे. एपीआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांच्यासह आणखी एकालाही एसआयटीतून बाजूला केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर उचलबांगडी झाली आहे. हे अधिकारी वाल्मिक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप करण्यात आला होता.

  • 06 Jan 2025 09:31 AM (IST)

    बीड हत्या प्रकरण – आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार

    बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला आजा न्यायालयासमोर हजर केल जाईल. विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडे औदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली होती, असा खुलासा सीआयडीच्या चौकशीत विष्णू चाटे याने केला होता.

  • 06 Jan 2025 09:04 AM (IST)

    अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर कोसळले

    अमरावतीच्या भाजीपाला मार्केटमध्ये हिरव्या भाजीपाल्याचे ठोक दर कोसळले. वांगी ,पालक ,टोमॅटो, कोथिंबीर , कोबी हे  फक्त दहा रुपये किलोवर आले आहेत.  भाव घसरल्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघेना. बाजारपेठेमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्याचे भाव घसरले.

  • 06 Jan 2025 08:42 AM (IST)

    सांताक्रुझ मधील बिल्डरकडे मागितली 11कोटींची खंडणी, गुन्हा दाखल

    सांताक्रुझ येथील बांधकाम व्यावसायिकाला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून 11 कोटींची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

  • 06 Jan 2025 08:30 AM (IST)

    लोकलमधील स्टंटबाज तरुणाला पाच महिन्यांनी अटक

    लोकलमध्ये स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत रील तयार करणाऱ्या फैयाज असगर अली मन्सूरी या तरुणाला घाटकोपर आरपीएफ आणि शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल पाच महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे

    या तरुणाविरोधात ९ सप्टेंबरला तक्रार दाखल झाली होती.

  • 06 Jan 2025 08:15 AM (IST)

    सलग सुट्ट्यामुळे परिवहनचे उत्पन्न घटले, दररोज तीन ते चार लाखांचा फटका

    सलग सुट्ट्यामुळे परिवहनचे उत्पन्न घटले ,दररोज तीन ते चार लाखांचा फटका बसला आहे.

    नाताळनिमित्त आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक प्रवासी बाहेर फिरण्यासाठी गेल्याने त्याचा परिणाम परिवहन उत्पन्नावर झाला आहे

    ठाणे परिवहन सेवेला पाच दिवसात सुमारे 20 लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. यापूर्वी गणेशोत्सव आणि दिवाळीत प्रवासी संख्या कमी होती, त्याचा देखील फटका उत्पन्नालाबसला होता.

  • 06 Jan 2025 08:04 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगरात दुकानाला भीषण आग, जीवितहानी नाही पण लाखोंचे नुकसान

    छत्रपती संभाजी नगरातील शहागंज परिसरात दुकानाला आग लागली.  शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आगीची अंदाज व्यक्त होत आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाले.  अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली.

  • 06 Jan 2025 08:01 AM (IST)

    पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के

    पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पालघर जिल्ह्यात पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पालघर जिल्ह्यात पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यातील वातावरण तापलं आहे. याप्रकरणी विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसेच आज याप्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. दरम्यान या हत्याप्रकरणातील आरोपी विष्णु चाटेची पोलीस कोठडी आज संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चीनमध्ये ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’चे (एचएमपीव्ही) रुग्ण आढळून येत असल्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. राज्यात आतापर्यंत ‘एचएमपीव्ही’ विषाणूचे रुग्ण आढळून आलेले नाही; तसेच श्वसनविकाराच्या आजारांमध्ये वाढ झाली नसल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे. वसई विरार महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपा 2025 सदस्य नोंदणी अभियानातून भाजपाने रणनीती आखली आहे. यासोबतच आज दिवसभरातील राजकीय, सामाजिक, क्रीडा आणि इतर घडामोडींसाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.

Published On - Jan 06,2025 8:01 AM

Follow us
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.