Maharashtra Breaking News LIVE 3 January 2025 : ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार : मंत्री भरत गोगावले
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 3 जानेवारी 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
LIVE NEWS & UPDATES
-
ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार : मंत्री भरत गोगावले
रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं. गोगावलेंनी मंत्रालय येथे पदभार स्वीकारल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली.
-
राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे बजरंग सोनावणे यांची तक्रार
नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची भेट घेतली. बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे या प्रकरणात तक्रार दाखली केली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी, अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
-
-
हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी इंडस्ट्रीज इस्टेट येथे केमिकल फॅक्टरीला आग
कोल्हापुरातून मोठी बातमी समोर आली आहे. हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मी इंडस्ट्रीज इस्टेट येथे केमिकल फॅक्टरीला आग लागली आहे. या आगीमध्ये कारखाना जळून खाक झाला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या आहेत. फॅक्टरीचे कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहेत. आगीची लोट दोन किलोमीटर पर्यंत दिसू लागले आहेत. त्यामुळे आसपासच्या परिसरात भीतीचं वातावरण झालं आहे.
-
राजन साळवी यांनी साधला पदाधिकाऱ्यांशी संवाद- राजन साळवी
माझ्यावर अन्याय झाल्याचं राजापूरमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, असं राजन साळवी याने सांगितलं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असं राजन साळवी यांनी सांगितलं.
-
आका आणि आरोपींचं बोलणं झालं असेल- धस
आकांच्या आदेशानुसार ही लोकं शुक्रवारी तिथे गेली होती. दोन महिन्यांपूर्वी 2 कोटींमधले 50 लाख दिले होते, असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. दीड कोटी अद्याप देण्याचे बाकी होते. आता आकाला पकडण्याकडे फोकस गेला आहे. आका आणि आरोपींचं बोलणं झालं असेल, असा आरोपही सुरेश धस यांनी केला आहे. वॉन्टेड असलेल्या लोकांना लवकरच पकडलं जाईल.
-
-
विष्णु चाटेच्या फोनवरून कराडने अवदा कंपनी अधिकाऱ्यांशी साधला होता संवाद
विष्णु चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडने अवदा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. सीआयडी चौकशीत आरोपी विष्णु चाटेने हा खुलासा केला आहे. वाल्मिक कराडने सुनील शिंदेंना फोनवरून धमकी दिली होती. याच फोन कॉलवरून प्रकल्प बंद पाडण्याची धमकी देण्यात आली होती, असं चौकशीत विष्णु चाटेने सांगितलं आहे.
-
केजरीवाल दुपारी 4 वाजता पीएम मोदींच्या आरोपांवर पत्रकार परिषद घेणार
पीएम मोदींच्या आरोपांवर आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. पीएम मोदींनी ‘आप’ला आपत्ती म्हटले आहे.
-
-
महिलांच्या प्रश्नावरती सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका – सुषमा अंधारे
“राज्य सरकारकडून अपेक्षा असेल महिलांच्या प्रश्नावरती सिलेक्टिव्हली व्यक्त होऊ नका. सेलिब्रिटी आणि वलयांकित व्यक्तीसाठीच फक्त लक्ष देऊ नका. खऱ्या पिडीत महिलांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. कल्याणमध्ये दोन महिलांवरती दुष्कर्म करून त्यांची हत्या झाली. त्यावर व्यक्त न होणाऱ्या संविधानिक पदावरील अनेक लोकांना सेलिब्रिटी आणि वलायंकित व्यक्तित्व सापडले की त्याच्यावर व्यक्त होण्यासाठी लोंढे येतात. हा सिलेक्टिव्हनेस निश्चितपणे त्रासदायक आहे” असं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या.
-
ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचे उपकार विसरु शकत नाही – देवेंद्र फडणवीस
“सावित्रीबाई फुलेंना अतिशय वाईट वागणूक सहन करावी लागली. फुलेंनी विषमता दूर करुन समतेच बीज रोवलं. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंचे उपकार विसरु शकत नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
सावित्रीबाई फुलेंचे उपकार सर्वांवर – छगन भुजबळ
सावित्रीबाई फुलेंचे उपकार सर्वांवर आहेत. विरोध करणारे ब्राह्मण होते, तर समर्थन करणारेही ब्राह्मण होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने सातारा नायगाव येथील कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत आहेत.
-
SIT चे पथक प्रमुख बसवराज तेली दुसऱ्या दिवशी ही केजमध्ये
SIT चे पथक प्रमुख बसवराज तेली दुसऱ्या दिवशी ही केजमध्ये. केजच्या शासकीय विश्राम गृहात बसवराज तेली दाखल. काल संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे यांच्या नातेवाईकांची केली होती चौकशी. SIT च्या पथकाकडून संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील तपासाला गती देण्याचा प्रयत्न. तपासाच्या अनुषंगाने अंतर्गत कामाला सुरुवात. CID च्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी तेली यांची चर्चा सुरू.
-
धनंजय मुंडेंचा राजीनामा 100 टक्के झाला पाहिजे- प्रणिती शिंदे
“धनंजय मुंडेंचा राजीनामा 100 टक्के झाला पाहिजे. काँग्रेसच्या काळात राजीनामे मागितले जायचे तेव्हा दिले जायचे. राज्यातलं सरकार अतिशय निगरगट्ट आहे,” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
-
अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची सूत्रांची माहिती
अजित पवार पुन्हा पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अजित पवार हे दोन मोठ्या जिल्ह्यांचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती आहे. पुण्यासह आणखी एका जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवारांकडे जाणार असल्याचं कळतंय.
-
सामनातून माझं कौतुक केलं हे चांगलंय, धन्यवाद- फडणवीस
“सामनातून माझं कौतुक केलं हे चांगलंय, धन्यवाद. फुलेंचं कार्य पुढे कसा नेता येईल यावर छगन भुजबळांसोबत चर्चा केली,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस हे साताऱ्यातील नायगावमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. यानिमित्त नायगावमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
-
नवी मुंबईच्या सानपाडा डी-मार्ट परिसरात गोळीबार
नवी मुंबईच्या सानपाडा डी-मार्ट परिसरात गोळीबार झाला. दोन अज्ञात आरोपीकडून सात ते आठ राऊंड फायर झाले. यात एक जण जखमी झाला. गोळीबार करून आरोपी फरार झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
मुंब्र्यात एका फळ विक्रेत्याला तरुणाने मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग
मुंब्र्यात एका फळ विक्रेत्याला तरुणाने मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग आल्याने स्थानिकांनी माफी मागण्यास सांगितलं. मुंब्र्यात मराठी-हिंदी वाद का करतो, असा सवाल स्थानिकांनी केला. इतकंच नव्हे तर स्थानिकांनी मराठी तरुणाला पोलीस ठाण्यातही नेलं. मुंब्र्यात मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली. “महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. मुंब्रा शांत आहे, शांत राहू दे… असं म्हणत स्थानिकांनी मला घेराव घातला. मला मुंब्र्यात जाण्याची भीती वाटतेय, मला धमक्या येत आहेत,” अशी तक्रार मराठी तरुणाने केली.
-
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांचा एकाच वाहनातून प्रवास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातील नायगावमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. यानिमित्त नायगावमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
-
जळगावमध्ये कोंबड्याचा वाढदिवस साजरा
जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागातील विक्रम कापडणे परिवाराने मात्र आपल्या कोंबड्याचा पाचवा वाढ दिवस साजरा करून सगळ्याचे लक्ष वेधले आहे.
-
सानपाडा डिमार्ट जवळ फायरिंग
सानपाडा डिमार्ट जवळ गोळीबाराची घटना घडली. पाच ते सहा राऊंड फायरिंग करून आरोपी फरार झाले. त्यात एक जण जखमी झाला. सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन आरोपींकडून फायरिंग करण्यात आल्याचे समोर आले.
-
खासदार प्रणिती शिंदेंची धनंजय मुंडेंवर खोचक टीका
धनंजय मुंडे यांचा १०० टक्के राजीनामा झाला पाहिजे, कारण ते यात आहे असे दिसते. काँग्रेसच्या काळात जेव्हा राजीनामे मागितले जायचे त्यावेळी नैतिकता स्वीकारून आम्ही राजीनामे देत होतो. लोकांच्या दबावापोटी दोष नसला तरी राजीनामे दिले जात होते मात्र हे निगरवट्ट आणि अहंकारी सरकार आहे ते राजीनामा देणार नाही, असा खोचक टोला खासदार प्रणिती शिंदेंची धनंजय मुंडेंना लगावला.
-
पाळधी येथील संचारबंदी उठवली
जळगावच्या पाळधी येथील दोन दिवसांपासून सुरू असलेली संचार बंदी उठवल्यानंतर आजपासून पाळधी गावातील जनजीवन हे पूर्व पदावर आले आहे. दोन दिवसांपासून बंद असलेली दुकाने, शाळा उघडल्या असून नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
-
देवेंद्र फडणवीसच सक्रिय दिसतात – सुप्रिया सुळे
या सरकारमध्ये केवळ देवेंद्र फडणवीस हेच सक्रिय दिसत असल्याचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. सामना अग्रलेखानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सुद्धा त्यांचे कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
-
रब्बी पिकांसाठी आवर्तन द्या- युवा सेना आक्रमक
उजनी धरणातून उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्याला रब्बी पिकांसाठी पाणी सोडावे या मागणीसाठी युवा सेना आक्रमक झाली आहे. माळशिरस तालुक्यातील उजनीच्या उजव्या कालव्या मध्ये युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे.
-
संजय राऊत यांनी केले फडणवीसांचे कौतुक
मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही सरासरी टीका व्हायला लागली आहे तरीही आपण काही देणं लागतो. त्यांनी एखाद्या चांगलं पाऊल उचललं असेल आणि राज्याची कायदा सुव्यवस्था सामाजिक समीकरणे यांना दिशा देणार असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचा कौतुक केले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. त्यांनी गडचिरोलीचा चेहरा बदलत असल्याबाबत फडणवीसांचे कौतुक केले.
-
पोलिसांचं मनोबल कमी होईल असं वक्तव्य कोणी करू नये – चंद्रशेखर बावनकुळे
मुख्यमंत्री फडणवीस हे आरोपींना सोडणार नाहीत. पोलिसांचं मनोबल कमी होईल असं वक्तव्य कोणी करू नये – चंद्रशेखर बावनकुळे
-
नवी मुंंबई – सानपाड्यातील डी मार्ट परिसरात गोळीबार, 1 जखमी
नवी मुंंबई – सानपाड्यातील डी मार्ट परिसरात गोळीबार, 1 जखमीर झाला असून 1 जण जखमी झाला आहे. अज्ञात आरोपीने 5-6 राऊंड फायर केल्या . गोळीबार करून आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू.
-
कोल्हापूर – जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटाच्या डायलॉगवर रील, शाळेतील साहित्याचं केलं नुकसान
कोल्हापूर – जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटाच्या डायलॉगवर रील, करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील माजी विद्यार्थ्यांचा प्रताप समोर. रील बनवण्यासाठी शाळेतील साहित्याचं नुकसान केल्याचाही आरोप आहे.
-
पुण्यातील 3 माजी नगरसेवकांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी
पुण्यातील 3 माजी नगरसेवकांची शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. बाळा ओसवाल, विशाल धनवडे आणि पल्लवी जावळेंची हकालपट्टी करण्यात आली आहे.
-
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमी संवाद होतो – संजय राऊत
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमी संवाद होत असतो. संवादाची अनेक साधन आहेत. भाजपच्या चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक केलंय. देवेंद्र फडणवीसांचे कौतुक का करु नये, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
-
शरद पवार आणि छगन भुजबळ आज चाकणमध्ये एकत्र येणार
शरद पवार आणि छगन भुजबळ आज चाकणमध्ये एकत्र येणार आहेत. चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महात्मा फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र येणार आहेत. नाराजीनाट्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार एकत्र येणार असल्याने एकाच व्यासपीठवरुन काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. मंत्रीपदावरुन छगन भुजबळांनी जाहिरपणे नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर छगन भुजबळ भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा रंगली होती. आता छगन भुजबळ हे शरद पवारांसोबत चाकणमध्ये एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. त्यामुळे शरद पवारांसमोर भुजबळ काय बोलतात हे पहावे लागणार आहे
-
जळगावात रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ, हरभरा, मका, ज्वारीला पसंती
जळगाव जिल्ह्यात 2023 या गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेरणी क्षेत्रात तब्बल २३ हजार हेक्टरवर वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा २ लाख ५० हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची लागवड झाली असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांची हरभरा, मका, ज्वारीला पसंती असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण ज्वारीची ११४ टक्के , हरभरा १०९ टक्के , मक्याची ११९ टक्के लागवड झाली आहे. गेल्यावर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे पेरणीचे क्षेत्र वाढले.
-
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाला झटका, शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु
कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाला झटका बसला आहे. आगामी पालिका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरु आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे आणे गावच्या उपसरपंचांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. लवकरच आणे ग्रामपंचायत ताब्यात येईल, अशा विश्वास जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आक्रमक अभियान सुरू झाले आहे.
-
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा 13 फेब्रुवारीपासून
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १३ फेब्रुवारीपासून असणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित २३ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा दि. १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉ. जब्बार पटेल यांनी माहिती दिली.
पीव्हीआर, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स बंडगार्डन आणि सिनेपोलीस-औंध येथे ११ स्क्रीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यामध्ये सुमारे १५० हून अधिक देशी-विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येतील. ‘शोमॅन राज कपूर यांची १०० वी जयंती’ ही या वर्षीची थीम असणार आहे. यासाठी १५ जानेवारीपासून नोंदणी सुरू होणार आहे.
-
ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात वांगी, टोमॅटो स्वस्त; भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना
जालना जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आठवडी बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. 60 रुपये किलो दराने विकणारे वांगे 30 रुपये झाले. तर टोमॅटोच्या दरातही मोठी घसरण झाली. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे
-
इगतपुरी पोलिसांची महत्त्वाची कामगिरी, रेल्वेत लुटमार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या
इगतपुरी लोहमार्ग पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी गेली आहे. कसारा घाटात चालत्या रेल्वेगाडीत लुटपाट करणाऱ्या दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मागील महिन्यात ४,४७,६३४ रुपयांच्या किंमतीची सोने आणि चांदीचा ऐवज असणारी बॅग लांबवली होती. पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना शहापूर तालुक्यातून अटक केली आहे. त्यांच्या जवळून २,८७,२५३ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून अजूनही बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रात सध्या बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी असा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला केज कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता वाल्मिक कराडने पोलीस कोठडीत मदतनीस मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे.तर दुसरीकडे चाकणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका सोहळ्यात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर उपस्थितीत राहणार आहेत. छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच व्यासपीठवरुन काय बोलणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच महाराष्ट्रासह देशातील अन्य महत्त्वाच्या बातम्यांसाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा
Published On - Jan 03,2025 9:20 AM