MahaVikasAghadi Protest LIVE 1 September 2024 : विरोधक हे जातीतील तेढ निर्माण करण्याचं काम करतात: श्रीरंग बारणेंची टीका

| Updated on: Sep 02, 2024 | 11:09 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 1 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

MahaVikasAghadi Protest LIVE 1 September 2024 : विरोधक हे जातीतील तेढ निर्माण करण्याचं काम करतात: श्रीरंग बारणेंची टीका

MahaVikasAghadi Protest LIVE : सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. या प्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Sep 2024 04:51 PM (IST)

    जातीतील तेढ निर्माण करण्याचं काम विरोधक करतात: श्रीरंग बारणे

    विरोधक हे जातीतील तेढ निर्माण करण्याचं काम करतात, असं श्रीरंग बारणे म्हणाले आहेत. विरोधक आमच्या लाडकी बहीण योजनेवर विरोधक टीका करतात. आमच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक योजना आणल्या आहेत, असंही बारणेंनी म्हटलं.

  • 01 Sep 2024 04:11 PM (IST)

    पुतळ्याच्या निर्मितीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई मागणी

    मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यावरुन राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाने या घटनेविरोधात गोंदियात निषेध आंदोलन केलंय. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करून महायुती सरकार बरखास्तीची मागणी केली, शरद पवार गटाने केली आहे. तसेच पुतळ्याच्या निर्मितीमध्ये दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

  • 01 Sep 2024 03:55 PM (IST)

    Marathi News: जळगावात मुसळधार पाऊस

    जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये गेल्या एक तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर विजेच्या कडकडासह मुक्ताईनगर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • 01 Sep 2024 03:41 PM (IST)

    Marathi News: परभणीत मुसळधार पाऊस

    परभणीत सततच्या पावसानंतर शहरातील सखलभागात हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 24 तासांत 65 ते 70 मिलिमीटर पाऊस झाला आहे. अनेक नागरी वसतात पाणी शिरले आहे.

  • 01 Sep 2024 03:32 PM (IST)

    Marathi News: नांदेडमध्ये मुसळधार पाऊस, २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी

    नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ६३ पैकी २६ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.

  • 01 Sep 2024 03:10 PM (IST)

    Marathi News: खासदार नवनीत राणांचे चंकी पांडेसोबत नृत्य

    आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडी स्पर्धेला अभिनेता चंकी पांडेने हजेरी लावली. यावेळी माजी खासदार नवनीत राणांनी अभिनेता चांकी पांडे सोबत नृत्यावर ठेका धरला.

  • 01 Sep 2024 02:58 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर यांचे मोठे विधान

    राज्यामध्ये लोकांच्या प्रश्नला महत्व देण्यापेक्षा भाजपा सरकार इतर गोष्टीवर लक्ष देत आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वखाली सरकार आहे. लाडकी बहीण योजना कायम करण्याच सरकार म्हणत आहे दीड हजार रुपयात घर चालत का ?, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

  • 01 Sep 2024 02:40 PM (IST)

    संत्रा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल- प्रफुल्ल पटेल

    रक्षाबंधनची खरी भेट ही अजित दादांनी दिली आहे. अख्ख्यामहाराष्ट्र मध्ये एकच ओळख आहे एकच दादा अजित दादा, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.

  • 01 Sep 2024 02:18 PM (IST)

    कल्याणमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे जोरदार आंदोलन

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारणाचा आरोप.

  • 01 Sep 2024 02:07 PM (IST)

    अमरावतीत राणा दाम्पत्याकडून दही हंडी स्पर्धेचे आयोजन

    अनेक नामवंत सिनेकलाकार राहणार उपस्थित. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून राणा दाम्पत्याच्या दहीहंडीची ओळख.

  • 01 Sep 2024 01:38 PM (IST)

    नगर येथे नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाचा मोर्चा

    नगर शहरात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाला सुरुवात झाली आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेश येथील हिंदूंवर झालेल्या अत्याचार विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

  • 01 Sep 2024 12:50 PM (IST)

    हा महाराष्ट्राचा अपमान, दोषींवर कारवाई झाली पाहिजे- शाहू महाराज

    “मालवणमध्ये काय झालं हे आपण पाहिलं. भारताच्या बाहेरही लोक संतप्त झाले आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. ज्यांनी हे केलं त्यांना कोणीही मोकळं सोडणार नाही. महाराष्ट्रात हा संताप झाला आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी खासदार शाहू महाराजांनी केली.

  • 01 Sep 2024 12:45 PM (IST)

    ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? फडणवीसांचा सवाल

    “उद्धव ठाकरेंना माझा सवाल आहे की, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल ते काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला, त्यावर पवार- ठाकरे मूग गिळून बसले आहेत. त्यावर का बोलत नाही,” असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

  • 01 Sep 2024 12:35 PM (IST)

    त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे- एकनाथ शिंदे

    “ते दंगलीच्या भाषा करत होते. त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यांना महाराष्ट्र शांत नकोय. महाराष्ट्रात दंगली व्हाव्यात, जातीजातीत तेढ व्हावी असा प्रयत्न त्यांनी लोकसभेपूर्वीही केला होता. पण राज्यातील जनता संयमी आहे, सूज्ञ आहे म्हणून राज्य सरकारही कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करत आहे,” असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय.

  • 01 Sep 2024 12:30 PM (IST)

    माफी मागताना मोदींच्या चेहऱ्यावर मग्रुरी- उद्धव ठाकरे

    “इथे शिवद्रोही सरकार आहे. घटनाबाह्य सरकार आहे. त्यांना सांगूया गेट आऊट ऑफ इंडिया. गेट आऊट. म्हणूनच इथे बसलो आहोत. देशाचे पंतप्रधान आले. त्यांनी माफी मागितली. माफी मागितली नसती तर तुम्हाला महारााष्ट्राने ठेवलं नसतं. माफी मागताना त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. ही मग्रुरी मान्य आहे का?,” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

  • 01 Sep 2024 12:20 PM (IST)

    मोदींनी माफी पुतळा पडला म्हणून मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून? ठाकरेंचा सवाल

    “मोदींनी माफी कशासाठी मागितली? पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? की भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरूण घालण्यासाठी मागितली,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

  • 01 Sep 2024 12:15 PM (IST)

    “चुकीला माफी नाही”; उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा

    “महाराष्ट्रात जे वातावरण आहे, त्याला मी राजकारण म्हणायला तयार नाही. पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला. शिवद्रोही मंडळी तुमच्या विरोधात रस्त्यावर उतरले. तुम्ही राजकारण करत आहात असा आरोप आहे. मी म्हणेन ते करतात ते राजकारण नाही. गजकरण आहे. खाजवत बसत आहे. खाजवू द्या त्यांना. चुकीला माफी नाही,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

  • 01 Sep 2024 12:10 PM (IST)

    राज्यात-देशात शिवद्रोही सरकार, महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू- नाना पटोले

    “राज्यात आणि देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांची प्रतिमा पडली. ती फक्त महाराजांची प्रतिमा नव्हती, ती महाराष्ट्राचा धर्म आणि राज्याचा अवमान या सरकारने केला,” अशा शब्दांत नाना पटोलेंनी टीका केली.

  • 01 Sep 2024 12:05 PM (IST)

    मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार, म्हणूनच पुतळा पडला- शरद पवार

    “वाऱ्यामुळे पुतळा पडला, असं सांगितलं जातं. गेटवेवर हा पुतळा ५० वर्षांपासून आहे. पण तो अजूनही टिकून आहे. राज्यातही असे अनेक पुतळे आहेत. मालवणमधील पुतळ्याच्या उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे पुतळा पडला. हा शिवप्रेमींचा अपमान आहे,” असं शरद पवार म्हणाले.

  • 01 Sep 2024 11:59 AM (IST)

    पुतळा कोसळल्यप्रकरणी मविआचा संताप

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात महाविकास आघाडीचा संताप दिसून आला. राज्यभरात सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

  • 01 Sep 2024 11:50 AM (IST)

    महाविकास आघाडीवर संताप

    शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचे महाविकास आघाडीच्या आंदोलनावर टीका केली आहे. महाविकास आघाडीचा आजचे आंदोलन म्हणजे फ्लॉप शो आहे. कर्नाटकात शिवरायांचा पुतळा हटवला त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता, असा सवाल शिरसाट यांनी विचारला.

  • 01 Sep 2024 11:49 AM (IST)

    महाविकास आघाडीचे नेते गेट वे ऑफ इंडिया परिसरात

    महाविकास आघाडीचे नेते गेट वे ऑफ इंडिया परिसरात दाखल झाले आहेत. जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला.

  • 01 Sep 2024 11:40 AM (IST)

    भर पावसात महाविकास आघाडीचे जोडो मारो आंदोलन

    अंबादास दानवे यांच्या उपस्थिती नांदेडमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सरकारच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. धो – धो पावसात महाविकास आघाडीचे आंदोलन करत आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

  • 01 Sep 2024 11:30 AM (IST)

    भाजपचं पण आंदोलन

    महाविकास आघाडीचावतीने आज मुंबई मध्ये जोडे मारो आंदोलनं घेतल्या नंतर भाजपच्या वतीने आज महा विकास आघाडीचा निषेध करण्यासाठी ठाणे येथे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आघाडीचा विरोधात घोषणाबाजी केली.भाजपचे आमदार संजय केळकर यांचा नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन करण्यात आले…

  • 01 Sep 2024 11:20 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीचे आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर शहरात महाविकास आघाडीचे आंदोलन होत आहे. राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आंदोलन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 01 Sep 2024 11:10 AM (IST)

    पुतळा पडल्याची निष्पक्ष चौकशी करा- मनोज जरांगे पाटील

    पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला. यात राजकारण होऊ नये, याची सरकार जर चौकशी केली पाहिजे. कायद्यामध्ये बदल केला पाहिजे आणि कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरला सोडलं गेलं नाही पाहिजे. तो आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे. सरकारचा महापुरुषांच्या स्मारकाबद्दल बारीक वॉच असला पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

  • 01 Sep 2024 11:01 AM (IST)

    परवानगी देवो न देवो आंदोलन होणार -अंबादास दानवे

    परवानगी देवो न देवो छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान झाला आहे. त्याच्या विरोधात महाविकास आघाडीचा आंदोलन आहे. महाविकास आघाडीचे लोक दहशतवादी नाहीत, सरकार आंदोलनाला घाबरत हे स्पष्ट होतं, ज्या अर्थी परवानगी देत नाही त्या आर्थिक सरकारी आंदोलनाला घाबरली आहे. सरकार परवानगी देत नाही याच्यातच आंदोलनाचे यश दडलेलं आहे. सरकार एकदम हादरलेला आहे.परवानगी देवो न देवो आंदोलन होणार आहे, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

  • 01 Sep 2024 10:59 AM (IST)

    नेते रवाना, कार्यकर्ते मोर्चास्थळी

    आज महाविकास आघाडी मुंबईत मोर्चा करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. शरद पवार, उद्धव ठाकेरे थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल होतील.

  • 01 Sep 2024 10:50 AM (IST)

    काहीही झालं तरी आंदोलनाला जाणार- विचारे

    चुकीच्या पद्धतीने या सरकारचा कारभार सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचे आंदोलन आहे. यांनी माफी जरी मागितली असली तरी मात्र या सरकारने राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. आम्हाला परवानगी दिली नाही तरी मात्र आम्ही आंदोलन करणार ठाणे स्थानक रेल्वेतून प्रवास करत मुंबईकडे जाणार, असं ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी म्हटलंय.

  • 01 Sep 2024 10:40 AM (IST)

    उद्धव ठाकरे आंदोलनासाठी रवाना

    शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलनासाठी निघाले आहेत. थोड्याच वेळात ते हुतात्मा चौकात दाखल होतील, मग आंदोलन सुरु होईल. यावेळी महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

  • 01 Sep 2024 10:30 AM (IST)

    मविआत विरोधात भाजपचं आंदोलन

    महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचे प्रत्युत्तर आंदोलन केलं जात आहे. पुण्यातील डेक्कन चौकातील संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केलं जात आहे. मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी देण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वात पुण्यात आंदोलन करत आहेत.

  • 01 Sep 2024 10:15 AM (IST)

    भाजपचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन

    छत्रपती संभाजीनगर शहरात भाजपचे आंदोलन सुरू आहे. विरोधकांना सुबुद्धी मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. क्रांती चौकात भाजपचे आंदोलन सुरू आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे.

  • 01 Sep 2024 09:49 AM (IST)

    MahaVikasAghadi Protest Live : महाविकासआघाडीचा मोर्चा अडवण्यासाठी पोलिसांची तयारी, बैठक सुरु

    हुतात्मा चौकात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू.

    हुतात्मा चौकातल्या बिट चौकीत अधिकाऱ्यांची बैठक

    पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त आणि इतर अधिकारी बैठकीला उपस्थित

    महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

    महाविकास आघाडीचा मोर्चा गेट वे पर्यंत न सोडण्याची पोलिसांची भूमिका.

    मध्येच मोर्चा अडवण्याची पोलिसांची तयारी, मोठा पोलिस बंदोबस्त.

  • 01 Sep 2024 09:46 AM (IST)

    MahaVikasAghadi Protest Live : हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

    हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त.

    सर्व परिसरात बॅरिगेटिंग करून पोलिसांचा मोठा बंदोबस्त.

    महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या पर्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी.

    हुतात्मा चौकापासून गेट ऑफ इंडियापर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन करण्यात आलाय.

    महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नसली तरी प्रमुख नेते आंदोलनात सहभागी होणार असल्याने पोलिसांचा बंदोबस्त.

  • 01 Sep 2024 09:41 AM (IST)

    MahaVikasAghadi Protest Live : राजे, आम्ही येत आहोत, तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला, शिवसेना ठाकरे गटाचे ट्वीट

    जोडे मारा आंदोलनच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ट्वीट

    ‘राजे, आम्ही येत आहोत, तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवायला, असे ट्वीट शिवसेना ठाकरे गटाने केली आहे.

    त्यासोबतच आदित्य ठाकरेंचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.

  • 01 Sep 2024 09:38 AM (IST)

    MahaVikasAghadi Protest Live : महाविकासआघाडीतर्फे आज ‘जोडे मारो’ आंदोलन

    महाविकास आघाडीतर्फे आज ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहे.

    या आंदोलनात शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले आदी नेते सहभागी होणार आहेत

    राजकोट किल्ल्यावर डिसेंबर २०२३मध्ये उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत.

    महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे.

    सकाळी १० वाजल्यापासून हुतात्मा चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

Published On - Sep 01,2024 9:34 AM

Follow us
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.