Maharashtra Breaking News LIVE 23 September 2024 : शरद पवार गटाची आजपासून नाशिक जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा

| Updated on: Sep 23, 2024 | 10:47 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 23 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 23 September 2024 : शरद पवार गटाची आजपासून नाशिक जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा

LIVE NEWS & UPDATES

  • 23 Sep 2024 10:47 AM (IST)

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक

    धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर समाजातर्फे आज राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरात पुणे बेंगलोर महामार्ग जवळील तावडे हॉटेल चौकात धनगर समाज करणार आंदोलन. कोल्हापूर मधील आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर सहभागी होणार असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तावडे हॉटेल परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 23 Sep 2024 10:33 AM (IST)

    अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीला हादरे, रोहित पवारांना मोठा धक्का

    अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीला हादरे बसले असून विधासभा निवडणुकीपूर्वी राम शिंदेंचा आ. रोहित पवारांना जोरदार धक्का.

    अहमदनगर जिल्ह्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे.  कर्जत जामखेड मतदारसंघातील शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्यासह उबाठा गटाचे जामखेड तालुकाध्यक्ष संजय काशीद, जामखेड शहराध्यक्ष सुरज काळे व मविआचे पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदेंच्या उपस्थितीत प्रदेश मुख्यालयात हा प्रवेश पार पडेल.

  • 23 Sep 2024 10:27 AM (IST)

    दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुलाने घेतली मनोज जरांगेंची भेट

    दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगेंची भेट घेतली.  त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

    नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांच्याकडून तयारी सुरू आहे.

  • 23 Sep 2024 10:08 AM (IST)

    भाजपच्या निवडणूक समितीची आज बैठक

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे.  आगामी विधानसभा निवडणूक तयारी बाबत आढावा घेतला जाईल.

  • 23 Sep 2024 09:57 AM (IST)

    नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मार्गाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. सोबतच, स्वारगेट ते कात्रज या नव्याने मंजूर झालेल्या भूमिगत मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. सोलापूर विमानतळाचे VC chya माध्यमातून नरेंद्र मोदी उद्घाटन करणार आहेत. मोदींच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून मोदींची पुण्यात जाहीर सभाही होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या पुणे दौऱ्याला महत्व आहे.

  • 23 Sep 2024 09:45 AM (IST)

    शिवस्वराज्य यात्रा आज धुळे शहरात

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा आज धुळ्यात असणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने शिवतीर्थ चौकातून ट्रॅक्टर रॅलीचा आयोजन करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हिरे भवन इथं सकाळी अकरा वाजता भव्य सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.

  • 23 Sep 2024 09:30 AM (IST)

    निवडणूक आयोगाची टीम झारखंडमध्ये

    विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या आढाव्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम आज झारखंडमध्ये असणार आहे. आज आणि उद्या असा दोन दिवसांचा टीमचा झारखंड दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेणार असून तयारीचा आढावा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून घेणार आहेत. झारखंड आणि महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक सोबत होणार असल्याने तयारी किती झालीय त्याचा आढावा घेतला जाईल. याच आठवड्यात टीम महाराष्ट्राचा देखील दौरा करणार आहे. दोन्ही राज्यांचा दौरा झाल्यानंतर पुढील महिन्यात पहिल्या पंधरा दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • 23 Sep 2024 09:15 AM (IST)

    टीईटी परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबरला होणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व तपशील राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वरील वेबसाइटवर उपलब्ध आहे.

  • 23 Sep 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra News Live : शरद पवार यांची चिपळूणमध्ये जाहीर सभा, निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता

    – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची आज चिपळुणात जाहीर सभा होत आहे

    – शहरातील बहादूरशेख येथील स्वा. सावरकर मैदानावर सकाळी 10 वाजता ही सभा होणार आहे

    – प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी या सभेची तयारी केली असून, या सभेत खासदार शरद पवार निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

    – आज सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते सावरकर मैदानात आयोजित जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.

    – या दौऱ्यात ते माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी तसेच यादव यांच्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला भेट देणार आहेत.

    – या सभेत खासदार शरद पवार नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 23 Sep 2024 08:45 AM (IST)

    Maharashtra News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, 26 सप्टेंबरला पुण्यात सभा

    – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २६ तारखेला पुण्यात जाहीर सभा,

    – पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन,

    – त्याचबरोबर इतर कामांचे देखील मोदींच्या लोकार्पण होणार आहे.

    – पंतप्रधान मोदींची सभा हि महायुतीच्या विजयाची नांदी ठरेल,

    – मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा निर्धार

  • 23 Sep 2024 08:44 AM (IST)

    Maharashtra News Live : इम्तियाज जलील यांची आज तिरंगा संविधान रॅली

    इम्तियाज जलील यांची आज तिरंगा संविधान रॅली

    छत्रपती संभाजीनगर ते मुंबई पर्यंत निघणार तिरंगा संविधान रॅली

    मोहम्मद पैगंबर यांच्या निंदे विरोधात निघणार रॅली

    रॅलीत हजारो मुस्लिम बांधव होणार सहभागी

    रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी

    मुंबईत रॅली पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्याना संविधान देणार भेट

    थोड्याच वेळात इम्तियात जलील हजारो समर्थकांसह मुंबईला होणार रवाना

  • 23 Sep 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra News Live : पुणे शहरात काल रात्री जोरदार पाऊस

    – मोठ्या विश्रांतीनंतर पुणे शहरात काल रात्री जोरदार पाऊस

    – पुण्यातील कोथरूड,वारजे आणि खडकवासला परिसरात मुसळधार पाऊस

    – मात्र आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची विश्रांती

    – खडकवासला धरण साखळीत काल रात्री मुसळधार पाऊस

  • 23 Sep 2024 08:42 AM (IST)

    Maharashtra News Live : काँग्रेसकडून आज नागपूर विभागाचा आढावा, दिग्गज नेते लावणार बैठकीला हजेरी

    चंद्रपुरात ठरणार काँग्रेसची विधानसभेसाठी रणनीती काँगेसचे दिग्गज नेते घेणार आज नागपूर विभागाचा आढावा

    लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे.

    आता विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी चंद्रपूर येथे नागपूर विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    या बैठकीमध्ये विधानसभानिहाय आढावाही घेतला जाणार आहे.

    चंद्रपूर येथे आयोजित आढावा बैठकीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील यासह राज्यभरातील काँग्रेसचे नेते हजेरी लावणार आहेत.

  • 23 Sep 2024 08:40 AM (IST)

    Maharashtra News Live : जळगावातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौरांनी घेतली जयंत पाटील यांची भेट, निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

    जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री महाजन यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट

    जयंत पाटील यांचे पाया पडत जयश्री महाजन यांनी आशीर्वाद सुद्धा घेतले

    जळगाव महापालिकेच्या शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर असलेल्या जयश्री महाजन जळगाव शहर मतदार संघातून निवडणूक लढवण्यास यांची तयारी सुरू आहे

    जयश्री महाजन शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास शरद पवार गटाकडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा

    शरद पवार गटाचे जळगाव ग्रामीणचे उमेदवार गुलाबराव देवकर, जयश्री महाजन व जयंत पाटील यांची एकत्रित झाली जळगावात जैन हिल्स वर चर्चा..

    जयंत पाटील महाविकास आघाडीचे नेते असल्यामुळे त्यांचे भेट घेतल्याची माहिती जयश्री महाजन यांनी दिली आहे..

    जळगाव शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून मातोश्रीवरून जे आदेश येतील त्या आदेशाचे पालन करणार असल्याचे जयश्री महाजन यांनी सांगितल.

    जळगाव शहरात मतदार संघातून मातोश्रीने दुसरा उमेदवार दिला तर त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू अशी सुद्धा भूमिका जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी त्यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. तर दुसरीकडे आदिवासी समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. तसेच महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरु आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यावेळी जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Published On - Sep 23,2024 8:36 AM

Follow us
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?.
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?.
जरांगे - लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ... वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप
जरांगे - लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ... वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप.
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.