Maharashtra Political News LIVE : तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 12 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात. देशभरात तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर होणार मतदान. 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि समान नागरी कायदा यांची अंमलबजावणी होऊ देणार नाही, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे स्पष्टीकरण. काही लोक निवडणुकीदरम्यान ‘दंगली घडवून आणण्याचा’ प्रयत्न करतील असा दावा करताना, लोकांनी त्यांच्या कारस्थानाला बळी पडू नये अस आवाहन ममता बनार्जी यांनी केलंय. उत्तर पुण्यातील शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील गहूं काढणीला वेग आलाय. सादलगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब जाधव यांच्या पाच एकरावरील गहूं काढणीची लगबग सुरू असल्याचं दिसून आलं. सध्या शेत मजुरांची कमतरता असल्याने शेतकरी राजाने यंत्राच्या साहाय्याने गहूं काढणीला सुरुवात केली आहे. शिरूर कृषी विभागाच्या मदतीने यंदाचं गव्हाचं विक्रमी पिकं आल्याने शेतकरी राजा मालामाल होणार. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
LIVE NEWS & UPDATES
-
निवडणूक प्रचारासाठी सिसोदिया यांनी जामीन मागितला
तुरुंगात असलेले मनीष सिसोदिया यांनी निवडणूक प्रचारात भाग घेण्यासाठी अंतरिम जामीन मागितला आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सीबीआय आणि ईडीला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. आता 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुनावणी होणार आहे.
-
आपचे खासदार संजय सिंह अखिलेश यादव यांच्यासोबत बैठक घेणार
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात आज बैठक होणार आहे. 5 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय सिंह यांची पहिली बैठक इंडिया अलायन्स पार्टीसोबत होणार आहे.
-
-
आपचे खासदार संजय सिंह अखिलेश यादव यांच्यासोबत बैठक घेणार
आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात आज बैठक होणार आहे. 5 वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय सिंह यांची पहिली बैठक इंडिया अलायन्स पार्टीसोबत होणार आहे.
-
सपाची कौशांबीमधून पुष्पेंद्र सरोज आणि कुशीनगरमधून प्रताप सिंह यांना उमेदवारी
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशातील जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने कौशांबीमधून पुष्पेंद्र सरोज आणि कुशीनगरमधून अजय प्रताप सिंह उर्फ पिंटू सैंतवार यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
-
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची महाराष्ट्रात आज पहिली सभा
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची पहिली महाराष्ट्रातील सभा गोंदिया येथे होणार आहे. भंडारा गोंदिया आणि गडचिरोली- चिमूर क्षेत्राचे भाजपाचे उमेदवारांचा प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
-
-
चंद्रकांत खैरे यांचा अत्यंत मोठा खुलासा
इम्तियाज जलील याला मी मिठी मारली नाही त्यानेच बळजबरी मिठी मारण्याचा प्रयत्न केला, असा मोठा खुलासा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
-
पालघरमध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचा एकाच दिवशी मेळावा
पालघरमध्ये एकाच दिवशी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची सभा तर दुसरीकडे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा देखील पालघरमध्येच मेळावा होणार आहे.
-
निलेश सांबरे यांचे मोठे विधान
मी अपक्ष निवडणूक लढणार वंचित बहुजन आघाडीच्या मला पाठिंबा. वंचितकडून नाव जाहीर झाल्यानंतर भिवंडी लोकसभा अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
-
वंचित बहुजन आघाडीकडून उत्तर मुंबईतून बीना सिंह यांना लोकसभेची उमेदवारी
वंचित बहुजन आघाडीने उत्तर मुंबईतून बीना सिंह यांना लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. बीना सिंह या उत्तर मुंबईतून वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना या लोकसभेतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही जागा इंडिया आघाडीच्या काँग्रेसच्या खात्यात गेली आहे, मात्र अद्यापपर्यंत काँग्रेसने उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही.
-
नवी दिल्ली- सीबीआयची के. कविता यांच्या 5 दिवसांच्या कोठडीची मागणी
दिल्लीच्या कथित दारू घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता यांची इडी कोठडी संपल्यानंतर आता सीबीआयने त्यांना ताब्यात घेतलं आहे. सीबीआयने ताब्यात घेतल्यानंतर के कविता यांना आज दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआयने के. कविता यांच्या 5 दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी सीबीआय आणि के कविता यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अर्जावरील निर्णय राखून ठेवलाय. के. कविता यांच्या जामीन अर्जावर 2 वाजता निर्णय येण्याची शक्यता आहे.
-
नाशिकच्या लोकसभेच्या जागेचा तिढा कायम
नाशिकच्या लोकसभेच्या जागेचा तिढा कायम आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर भाजपकडून आक्षेप घेतल्यानंतर नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचं नाव गेल्या 4 दिवसापासून चर्चेत आहे. अजय बोरस्ते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कोपरी परिसरातील चैत्र नवरात्र या ठिकाणी देवीचं दर्शन घेणार आहेत. त्याचप्रमाणे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील भेटण्याची शक्यता आहे.
-
काँग्रेस आणि इंडिया आघाडीला देशातील बहुसंख्य लोकांच्या भावनांची पर्वा नाही- मोदी
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या लोकांना देशातील बहुसंख्य लोकांच्या भावनांची पर्वा नाही. त्यांना लोकांच्या भावनांशी खेळण्यात मजा येते. न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे आणि जो जामिनावर आहे, ते अशा गुन्हेगाराच्या घरी भेट देतात. सावन महिन्यात मटण शिजवण्याचा आनंद घेतात आणि देशातील जनतेला चिडवण्यासाठी ते त्याचा व्हिडिओ बनवतात. कायदा कोणाला काहीही खाण्यापासून रोखत नाही. पण लोकांचा हेतू काही औरच आहे.”
-
कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी निवडणूक आयोगावर टीका
कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे. निवडणूक आयोगाला वेळ मागवूनही निवडणूक आयोग वेळ देत नसल्याचा कॉंग्रेसचा आरोप आहे.
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पाईपलाईन फुटली.
कल्याण पश्चिम येथील वाडेकर परिसरात एका खाजगी कंपनीकडून खोदकाम कामादरम्यान पाईपलाईन फुटली.
रस्त्याच्या कडेला पाईपलाईन पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावरती पाण्याचे उडत लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
-
धुळे लोकसभेची उमेदवारी श्याम सनेर यांना द्यावी, शिंदखेडातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…
धुळे लोकसभेची उमेदवारी श्याम सनेर यांना द्यावी अशी मागणी शिंदखेडातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.
शोभा बच्छाव गो बॅक गो बॅक च्या घोषणा दिल्या. आयात उमेदवार परत करा परत करा, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शाम सनेरांना संधी मिळालीच पाहिजे, निष्ठावंतांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
-
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी दोन संशयित ताब्यात
बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. NIA ने पश्चिम बंगालमधून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अब्दुल मतीन , मुसाबिर हुसेन अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं असून तेच या स्फोटातील मुख्य आरोपी असल्याचा दावा NIA ने केला आहे.
-
जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतली भेट
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली . यड्रावकर यांच्या जयसिंगपूर मधील घरी दोघांची भेट झाली . या भेटी वेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हे देखील उपस्थित होते.
शिंदे गटांसोबत असलेल्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
-
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा स्वीकारला – चंद्रशेखर बावनकुळे
धैर्यशील मोहिते पाटील यांचा राजीनामा स्वीकारला. रणजितसिंह भाजपसोबत राहतील. देशातील जनता नरेंद्र मोदींच्या पाठिशी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
-
Live Update | उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केल्याशिवाय मोदींच्या सभेला महत्व प्राप्त होत नाही – अंबादास दानवे
महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी भाजपचे नेते म्हणून प्रचार करत आहेत… उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केल्याशिवाय मोदींच्या सभेला महत्व प्राप्त होत नाही… भाजपचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. शिवसेनेला नकली म्हणता मात्र तुम्ही शिवसेनेचे उंबरठे झिजवून याचना केली…. भाजपच्या पाया पडणारी तुम्हाला शिवसेना हवी होती मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना शरण येणार नाही… असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं आहे.
-
Live Update | बेंगळुरू मधील रामेश्वरम् कॅफे स्फोट प्रकरण
बेंगळुरू मधील रामेश्वरम् कॅफे स्फोट प्रकर… NIA ने दोन व्यक्तींना घेतल ताब्यात… पश्चिम बंगाल मधून घेतल ताब्यात… अब्दुल मतीन, मुसाबिर हुसेन यांना घेतल ताब्यात… हेच दोन्ही मुख्य आरोपी असल्याचा NIA चा दावा
-
Live Update | जयंत पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी जाऊन घेतली भेट
आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी बंद दार आड केली एक तास चर्चा… जयंत पाटील यांनी मीडियाला चकवा देत आमदार प्रकाश आवडे यांची घेतली भेट… आमदार प्रकाश आवडे यांच्या मुलाला राहुल आवाडे यांना भाजपाकडून तिकीट न दिल्यामुळे आमदार प्रकाश आवाडे नाराज… जयंत पाटील व आवाडे यांची भेट झाल्यामुळे चर्चेला उदान
-
Live Update | ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हीच खरी – संजय राऊत
ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी हीच खरी… राजकीय स्वर्थासाठी केलेली भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही… मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही, ही काही रशिया नाही… असली कोण आणि नकली कोण हे शाह ठरवू शकत नाहीत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…
-
सांगलीत विशाल पाटील यांना धक्का
सांगली लोकसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांना ही उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अपक्ष उभा राहण्याची चाचपणी करत असलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांना हा धक्का मानला जात आहे.
-
सयाजी शिंदे यांच्यावर एन्जिओप्लास्टी
ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.काल त्यांचावर एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. छातीत दुखत असल्याने त्यांचा काही तपासण्या करण्यात आल्या त्यात त्यांचा हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्यानंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आली.
-
उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये सभा
पालघर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचार्थ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बोईसरमध्ये जाहीर सभा होणार आहे. बोईसर पश्चिम पास्थल आंबटगोड मैदानावर आज दुपारी 4 वाजता ही सभा होणार आहे.
-
अजित पवार यांना धक्का
पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसला धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे आणि वाघोलीचे माजी उपसरपंच महेंद्र भाडळे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील विविध आमदारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला आहे.
-
National News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक. वाढत्या उष्णतेच्या लाटेच्या परिस्थिती बाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा. केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील सर्व सरकारी संस्थांना एकत्रितपणे काम करण्याच्या पंतप्रधानांनी दिल्या सूचना. बैठकीला पंतप्रधानांचे मुख्य सचिव, गृह सचिव, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी यांची उपस्थिती. एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात तापमान अधिक राहील अशी शक्यता वर्तवली गेली. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात या राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील वर्तवली गेली.
-
National News : BRS नेत्या के कविता यांना आज कोर्टात हजर करणार
CBI च्या अटकेत असलेल्या BRS नेत्या के कविता यांना आज कोर्टात हजर केलं जाणार. CBI ने या प्रकरणी काही दिवसांपूर्वी कविता यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. कविता यांना सकाळी 10.30 वाजता राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केलं जाणार. अधिक चौकशीसाठी कविता यांच्या कोठडीची CBI मागणी करण्याची शक्यता.
-
Maharashtra News : विलास मुत्तेमवार भाजपा विरोधात निवडणूक आयोगात
माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी निवडणूक आयोगात भाजप विरोधात तक्रार दाखल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुत्तेमवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विलास मुत्तेमवार यांच्या विरोधात शंकर नगर चौकात निदर्शने केली होती. या विरोधात मुत्तेमवार यांनी नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि अंबाझरी पोलिस स्थानकात तक्रार दिली आहे
-
Maharashtra News : तिसऱ्या टप्प्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरा
तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात. देशभरात तिसऱ्या टप्प्यात 94 जागांवर होणार मतदान. 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घ्यायचा दिवस. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांमध्ये 7 मेला मतदान होणार.
-
‘आप’च्या 60 आमदारांपैकी एकही मुख्यमंत्री होण्यास पात्र नाही: बन्सुरी स्वराज
भाजप नेते बन्सुरी स्वराज म्हणाले की, दिल्ली ही देशाची राजधानी आहे, दिल्ली हे देशाचे हृदय आहे आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवण्यास उत्सुक आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम आदमी पक्षात प्रतिभेचा दुष्काळ आहे का? आपल्याकडे 60 पेक्षा जास्त आमदार आहेत. त्यापैकी एकाचीही मुख्यमंत्री होण्याची पात्रता नाही का? तुम्ही दिल्लीतील लोकांचे नुकसान करणे बंद करा.
Published On - Apr 12,2024 8:07 AM