Marathi News Maharashtra Tv9 Marathi News Bulletin navneet rana ravi rana devendra fadnavis kirit somaiya shivsena dilip walse patil, hanuman chalisa dispute
TOP 9 Headlines | 25 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीच्या आरोपावरूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच भोंग्यांबाबत सर्वपक्षीयांची बैठक पार पडली आहे. त्यावरून राजकारण तापलं आहे.
राज्यात आज अनेक मोठ्या राजकीय घडामोडीImage Credit source: tv9
Follow us
तुम्हाला जबाबदारी कळायला हवी, बॉम्बे हायकोर्टानं नवनीत राणांना फटकारलं, आजच्या सुनावणीनंतर सरकारी वकिलांची माहिती, वाचा सविस्तर, नवनीत राणा यांच्या पत्राची लोकसभा अध्यक्षांकडून तातडीने दखल, कोठडीतल्या वागणुकीबाबत 24 तासात रिपोर्ट सादर करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
राणा दाम्पत्याला कलम 353 मध्ये दिलासा, मात्र दुसरा गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली, तर अटकेवेळी अयोग्य वर्तन केल्याचा सरकारी वकिलांचा आरोप, वाचा सविस्तर
माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अडचणीत, तर काही मिनिटांतच जामिनावर सुटका!, वाचा सविस्तर
आमचे शेकडो कार्यकर्ते मारून टाकले, फडणवीसांचे ठाकरे सरकारला ‘जशास तसे’ उत्तर देण्याची घोषणा, सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीस आक्रमक, वाचा सविस्तर
सकाळी 6 ते रात्री 10 अजानचा भोंगा बंद करता येणार नाही तर मग पर्याय काय? वळसे पाटलांनी ‘केंद्रीय मार्ग’ सांगितला, गेल्या अनेक दिवासांपासून भोंग्यावरून वाद, वाचा सविस्तर
भोंग्याच्या बैठकीला गेले नाही पण फडणवीसांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली, तंतोतंत पालन व्हावं, अशीही मागणी, वळसे-पाटलांना कुठलेही अधिकार नसल्याचा जोरदार टोला, वाचा सविस्तर